जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाच्या गट क भरतीचे वेळापत्रक जाहीर - शासन निर्णय

जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाच्या गट क भरतीचे वेळापत्रक जाहीर - शासन निर्णय . 


महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी माहीम मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषद यादीतील आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गातील पद भरती बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

मार्च 2019 महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या खात्यातील जिल्हा परिषद अंतर्गत गट संवर्गाच्या पद भरती बाबत संदर्भातील दिनांक 10 मे 2022 च्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या हत्यार येथील सर्व रिक्त पदे यापुढे सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णय जिल्हा परिषद मधील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक आरोग्य सेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील पदे भरण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याबाबत तसेच सदर परीक्षेच्या आयोजनासाठी गोळा झालेली सर्व माहिती व परीक्षा शुल्क अनुक्रमे मेसर्स न्यास कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड व उप आयुक्त स्थापना विभाग आयुक्त कार्यालय कोकण विभाग, नवी मुंबई तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. 

सदर पद भरती घेण्याच्या अनुषंगाने तसेच याबाबतच्या परीक्षा पारदर्शक व निष्पक्षपातीपणे पार पडण्याच्या दृष्टीने अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करण्याकरता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांचे अध्यक्षतेखाली अभ्यासकट स्थापन करण्यात आला होता. याबाबत सर्व जिल्हा परिषदांशी सल्लामसलत करून आरोग्य विभागाशी संबंधित घटकासम वर्गातील पदभरती बाबत परीक्षेचे वेळापत्रक ठरविण्यात येऊन शासनास सादर करण्याबाबत अध्यक्ष राज्यस्तरीय समन्वय समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांना कळविण्यात आले होते. 

अध्यक्ष राज्यस्तरीय समन्वय समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी शासनास सदर परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक तसेच कृती आराखडा सादर केला आहे.  सदर शिफारशींना अनुसरून माहे मार्च 2019 व माहे ऑगस्ट 2020 च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या इत्यादीतील गट कम मधील आरोग्य विभागाशी संबंधित पाच संबंधातील पदभरती बाबत सर्व जिल्हा परिषदांना परीक्षा बाबतचे संभाव्य वेळापत्रक तसेच इतर सूचना पुढील प्रमाणे देत आहे. 

मार्च 2019 व माहे ऑगस्ट 2021 महाभरती अंतर्गत ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट कम मधील आरोग्य विभागाशी संबंधित पाच संवर्गातील पद भरती करण्याकरिता परीक्षा घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम शासन निर्णयात निश्चित करण्यात आला आहे. 

यामध्ये 27 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2022 या कालावधीत बिंदू नामावली अंतिम करण्यात येणार आहे. 

16 सप्टेंबर 2022 पर्यंत विभागीय स्तरावरून कंपनीची निवड करणे अपेक्षित आहे. 

17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2022 या कालावधीत निवड झालेल्या कंपनीने मेसर्स कंपनीकडून डेटा हस्तांतरित करू घेणे अपेक्षित आहे. 

23 सप्टेंबर 2022 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत निवड झालेल्या कंपनीने संवर्गनिहाय पात्र उमेदवारांची संख्या जिल्हा निवड समिती कळवावी. 

28 सप्टेंबर 2022 ते 4 ऑक्टोबर 2022 या कालावधीत जिल्हा निवड समितीने प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजना संदर्भात कार्यवाही करावयाची आहे. 

5 ऑक्टोबर 2022 ते 10 ऑक्टोबर 2022 या कालावधीत जिल्हा निवड समितीने शासनाकडून निवड झालेल्या कंपनीमार्फत पात्र उमेदवारांची प्रवेश पत्र तयार करून संबंधित उमेदवारांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत. 

संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी ऑनलाइन पद्धतीने आरोग्य पर्यवेक्षक (सकाळी 11 ते एक वाजेपर्यंत) औषध निर्माता( दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत) या दोन संवर्गाची परीक्षा राहील. 

दिनांक 16 ऑक्टोबर 2022 रोजी आरोग्य सेवक पुरुष व आरोग्य सेविका सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत व प्रयोगशाळा तंत्रज्ञ दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी परीक्षा घेण्यात येईल. 

दिनांक 17 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत लेखी परीक्षा नंतर आंसर की प्रसिद्ध करणे उमेदवारांना ऑब्जेक्शन फीलिंगसाठी तीन दिवस वेळ देणे अंतिम निकाल जाहीर करणे, पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे व त्या अनुषंगाने नियुक्ती आदेश देणे ही कामे पूर्ण करावी


मार्च 2019 व माहे ऑगस्ट 2021 महाभरती अंतर्गत ग्राम विकास विभागाच्या अतिरिक्त जिल्हा परिषद आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक आरोग्य सेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने उपरोक्त वेळापत्रक कार्यवाही करण्यात यावी सदर वेळापत्रकात आपल्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच कार्यालयातील दर्शनी भागात सर्वांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध करावे. 

सदर वेळापत्रक आपल्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच कार्यालयातील दर्शनी भागात सर्वांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध करावे. 

सदर विषयाची गांभीर्य तसेच तातडी लक्षात घेऊन उपरोक्त सूचनांचे तसेच संदर्भातील सामान्य प्रशासन विभाग व ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयातील सूचनांचे पात्रतेच्या निकषांचे व संदर्भ दिन शासन पत्रकांवर दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे यात कसूर केल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित करण्यात येऊन शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल याबाबत आपल्या अधिनस्त सर्व संबंधितांना जाणीव करून द्यावी ही विनंती. 

सदर शासन आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने निर्गमित करण्यात आलेला आहे. 

वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.