आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त व रुजू होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त व रुजू होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.


नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या संचिका सादर करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


प्राथमिक शिक्षकांच्या अंतर जिल्हा बदलीसाठी बदली कोटीवर अर्ज करण्याची सुविधा दिनांक 6 ऑगस्ट २०२२ ते 11 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये होती यादरम्यान शिक्षकांनी अंतर जिल्हा बदलीसाठी बदली पोर्टलवर अर्ज केले होते त्यापैकी ज्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या आहेत त्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी त्यांना सर्व कागदपत्रांची तपासणी करण्याचे अनुषंगाने खालील कागदपत्र आपल्या स्तरावर प्राप्त करून घ्यावे असे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.


पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे.

1) ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रत.

2) निवड प्रवर्ग आदेश सत्यप्रत.

3) प्रथम नियुक्ती आदेश सत्यप्रत.

4) जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र.

5) सेवेत कायम असल्याचा आदेश सत्यप्रत.

6) संवर्ग एक चे सबळ पुरावे लागू असल्यास संबंधित पुराव्यापैकी.

7) संवर्ग दोन चे सबळ पुरावे लागू असल्यास जोडीदार कार्यरत असल्याचे प्रमाणपत्र, पती-पत्नी असल्याचा पुरावा.

8) एसटी प्रवर्गातून पेसा क्षेत्रासाठी अर्ज केला असेल तर संबंधित जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील रहिवासी प्रमाणपत्र सत्यप्रत.

9) शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्र सत्यप्रत.

10) आंतरजिल्हा बदलीचे सर्व नियम व अटी मान्य प्रमाणपत्र.

11) विभागीय चौकशी कार्यवाही सुरू नसल्याचे प्रमाणपत्र.

12) न्यायप्रविष्ठ प्रकरणात वादी प्रतिवादी नसल्याचे प्रमाणपत्र.

13) सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाची सत्यप्रत.

14) मत्ता दायित्व सादर केल्याचे प्रमाणपत्र.

15) गोपनीय अहवाल सादर केल्याचे प्रमाणपत्र.

16) मुख्याध्यापक प्राथमिक पदवीधर व विशेष शिक्षक असल्यास पदावनती प्रस्ताव.

17) मुख्याध्यापक प्राथमिक पदवीधर व विशेष शिक्षक असल्यास पदोन्नत होऊन सहशिक्षक पदावरून कार्यमुक्त करण्याचा अर्ज.

18) शासकीय आणि पतसंस्था बेबाकी प्रमाणपत्र.

19) कार्यरत शाळेचे नादेय प्रमाणपत्र.

20) निवडणूक न हरकत प्रमाणपत्र.

इतर आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्रे.


वरील सर्व कागदपत्र ज्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली आहे यांनी तयार करून ठेवावीत म्हणजेच आपणास आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त करणे बाबतची कार्यवाही करणे सुलभ होईल.

यापैकी अत्यावश्यक असलेली कागदपत्रे जर आपण सादर करून शकले नाहीत तर कार्यरत जिल्हा परिषद आपणास कार्यमुक्त करण्यास विलंब करील त्यामुळे सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत.


जिल्हाअंतर्गत बदली कार्यमुक्ती व रुजू होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची सर्व नमुने एकाच ठिकाणी.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.