अल्पसंख्यांक मॅट्रिक शिष्यवृत्ती बाबत विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी महत्त्वपूर्ण माहिती

 अल्पसंख्यांक मॅट्रिक शिष्यवृत्ती बाबत विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी महत्त्वपूर्ण माहिती.



अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी माननीय पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार राज्यातील मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध शीख आरती व जैन या अल्पसंख्यांक समाजातील आर्थिक दुर्बल असलेल्या इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी शैक्षणिक सत्र 2008-09 पासून सुरू आहे. सन 2022 23 या वर्षासाठी इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाइन पद्धतीने नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांनी दिनांक 30 सप्टेंबर 2022 पर्यंत.


www.scholarship.gov.in


 वरील संकेतस्थळावरून अर्ज भरायचे आहेत.



इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय, निम शासकीय, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसाहित शासन मान्यता प्राप्त असलेल्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही लागू आहे.

अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेला असावा.

पालकाचे कुटुंब एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा कमी असावे.

पालकाची वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे.

एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही.

अर्ज भरताना विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती व बँक आधार माहिती अचूक भरावी.

धर्माबाबतचे स्वयंघोषणापत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र गुणपत्रक आधार कार्ड नोंदणी पावती विद्यार्थ्यांचा फोटो बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करावे.

या श्रुतीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा.

एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी 30 टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थिनीसाठी राखीव आहे.

विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांच्या वस्तीगृहात राहत असतील तवा राज्य शासनाच्या वस्तीगृहात राहत असतील केवळ तेच विद्यार्थी या योजनेत वस्तीत्वाचे विद्यार्थी म्हणून बनले जातात तसेच वस्तीगृहात मध्ये भरलेले शुल्काच्या पावत्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करणे बंधनकारक आहे.

या शिष्यवृत्ती पैकी 30% शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव आहे या प्रमाणात मुलींची शिष्यवृत्तीसाठी उपलब्ध झाल्या नाही त्या शिष्यवृत्ती मुलांना देण्यात येतील जर एखाद्या धर्माचे अर्ज निश्चित केलेल्या कोट्यापेक्षा जास्त आले तर प्राप्तर्जन मधून उत्पन्न व गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून त्या त्या धर्मासाठी निश्चित केलेल्या कोट्याच्या मर्यादित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.


अल्पसंख्यांक प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती अर्ज मोबाईल वरून कसा भरावा?


मुख्याध्यापक अथवा नोडल ऑफिसर यांच्या लॉगिन मधून अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती अर्ज कसा व्हेरिफाय करायचा.





वरील संपूर्ण माहिती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.



व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 



https://youtube.com/c/pradipjadhao



Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.