विद्या समीक्षा केंद्रांतर्गत "स्मार्ट उपस्थिती" या Bot वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविणे आयुक्त आदेश 30/09/2025

VSK स्मार्ट उपस्थिती Bot विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती भरणे बाबत मार्गदर्शक सूचना

➡️ Google play store वरून Swift Chat Application download करणे 

➡️ स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविणे 

➡️ यामध्ये केवळ अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या नावासमोरील अनुपस्थित या बटनावर क्लिक करून सबमिट करावे 

➡️ सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी स्वीफ्ट चॅट या एप्लीकेशन वर लॉगिन करण्यासाठी शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा

➡️ उपस्थिती नोंदविताना शिक्षक व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेचा यु-डायस कोड व स्वतःच्या शालार्थ आयडी चा वापर करावा.

➡️ सद्यस्थिती शालार्थ आयडी असणाऱ्या शिक्षकांनाच उपस्थिती नोंदविता येईल.

➡️ एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विनाअनुदानित असेल तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकाच्या शालार्थ आयडीद्वारे नोंदविण्यात यावी 

➡️ उपस्थिती नोंदविताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ व यु डायस पोर्टल मधील माहिती अपडेट करावी सदर पोर्टल अपडेट झाल्यानंतर अशा अडचणी पुढील काही दिवसात आपोआप दूर होतील.

➡️ सकाळ सत्रात भरणाऱ्या शाळांनी सकाळी  7.00 ते 12.00 या वेळेत  व दुपार सत्रात भरणाऱ्या शाळांनी सकाळी10.00 ते सायं 5.00 या वेळेत उपस्थिती नोंदवावी 

➡️ शाळेत इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यास त्याच दिवशी इतर वेळेत उपस्थिती नोंदवता येईल.

➡️ पहिले 2 महिने सर्वांनी विद्यार्थी उपस्थिती स्मार्ट उपस्थिती या बोटवर ऑनलाईन तसेच नियमित हजेरी पत्रकातही नोंदवावी त्यानंतर ऑनलाईन उपस्थिती नोंदणीची Pdf प्रत डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यात येईल अशी सुविधा प्राप्त झाल्यावर नियमित हजेरी पत्रकात उपस्थित नोंद करण्याची आवश्यकता नाही.

➡️ मासिक आढावा बैठकीत याविषयीचा नियमित आढावा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत घेण्यात येईल.

➡️ एखादी तुकडी किंवा वर्ग दिसत नसल्यास किंवा वर्गातील काही विद्यार्थी दिसत नसल्यास  या होम मेनू वरील Edit Registration ऑप्शन मध्ये शिक्षकांनी पुन्हा एकदा शाळेचा यु डायस कोड व आपला शालार्थ आयडी टाकावा. तसे केल्यानंतर दिसत नसलेला वर्ग तुकडी व विद्यार्थी आपल्याला दिसतील.

➡️ सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी  सदरच्या मार्गदर्शक सूचना आपले अधीनस्थ सर्व शाळांपर्यंत पोचविण्यात याव्या.

➡️ सदर बाबतीत काही अडचण असल्यास ईश्वर वाघ, समग्र शिक्षा जिल्हा परिषद बुलढाणा (9822680527) या क्रमांकावर संपर्क साधावा

  सदर बाबतीत केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी यांनी नियमित आढावा घेऊन उपस्थिती दररोज 100% नोंदवणे बाबत आपल्या सर्व शाळांना सुचित करावे.....

     आदेशावरून

 शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक.

 जिल्हा परिषद बुलढाणा


शिक्षण महाविद्यालयातून निर्गमित दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी च्या परिपत्रकानुसार शिक्षण आयुक्तांनी विद्या समीक्षा केंद्रांतर्गत "स्मार्ट उपस्थिती" या Bot वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


उपरोक्त विषयान्वये, शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभव्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना माहिती विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम /योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले आहे.

संदर्भ क्र. २ अन्वये, दि. ०१ डिसेंबर २०२३ पासून स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ. १ ली ते १० वीच्या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती Swift Chat या Application मधील "स्मार्ट उपस्थिती" या Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याबाबत राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेद्वारे आदेश देण्यात आले होते.

तसेच संदर्भ क्र. ४ अन्वये, शासन निर्णयानुसार, सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना "स्मार्ट उपस्थिती" या Bot वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्यासाठी निर्देश देऊन, उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याचा जिल्हा स्तरावरून आढावा घेण्याबाबत सर्व क्षेत्रीय यंत्रणेला पुनश्च आदेशित करण्यात आले होते.

आतापर्यंत ५०००० पेक्षा अधिक शाळांनी या Bot द्वारे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद यशस्वीपणे केलेली आहे. तथापि, सद्य:स्थितीत राज्यातील केवळ २००० ते २५०० शाळाच नियमितपणे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवत आहेत. सदर बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून वारंवार आदेश देऊनही जिल्हा स्तरावरील क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत याबाबत नियमित आढावा घेण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यामध्ये अनियमितता दिसून येत आहे.

राष्ट्रीय कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक (PGI) मध्ये डिजिटल विद्यार्थी व शिक्षक उपस्थिती या दर्शकासाठी स्वतंत्र गुणांकन आहे. विद्या समीक्षा केंद्रांतर्गत "स्मार्ट उपस्थिती" या Bot वर नियमितपणे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविल्यास PGI मध्ये राज्याचा प्रतवारी निर्देशांक सुधारण्यास मदत होणार आहे.

तरी, माहे ऑक्टोबर २०२५ पासून इ. १ ली ते १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती Swift Chat या Application मधील स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याबाबत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना त्वरित निर्देश देण्यात यावेत. तसेच जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी VSK च्या जिल्हा लॉगिनद्वारे नियमित आढावा घ्यावा, क्षेत्रीय अधिकारी यांनी संबंधित सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात, तसेच अंमलबजावणीचा नियमितपणे आढावा घ्यावा.


Digitally signed by

Sachindra Pratap Singh Date: 30-09-2025

आयुक्त (शिक्षण) 

महाराष्ट्र राज्य, पुणे

 PAT (महाराष्ट्र) chatbot 💬 on SwiftChat. 

https://links.swiftchat.ai/pqBOxT

Swift Chat App Link :

https://play.google.com/store/apps/details?id=ai.convegenius.app



विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती मार्गदर्शक सूचना

१. Google play store वरून Swift Chat हे Application download करावे.
२. यापूर्वी प्रशिक्षणात दिलेल्या सुचनेनुसार Swift Chat या Application मधील स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्गशिक्षकांनी नोंदवावी. यामध्ये केवळ अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या नावासमोरील "अनुपस्थित" या बटणावर क्लिक करुन सबमिट करावे.
३. सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी Swift Chat या Application वर लॉगिन करण्यासाठी शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा.
४. उपस्थिती नोंदविताना शिक्षक व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेचा यु-डायस कोड व स्वतःच्या शालार्थ आय. डी. चा वापर करावा.
५. सद्यस्थितीत शालार्थ आय. डी. उपलब्ध असलेल्या सर्व शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांना स्मार्ट उपस्थिती या Bot वर शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती नोंदविता येईल. तसेच मुंबई मनपा शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांना यु-डायस पोर्टलमधील PEN ID (Permanent Enrolment Number) द्वारे उपस्थिती नोंदविता येईल.
६. भविष्यात उच्च माध्यमिक (इ. ११ वी व १२ वी) चे विद्यार्थी तसेच इतर व्यवस्थापनाच्या व इतर मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती या Bot वर नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल.
७. तूर्त एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विनाअनुदानित असेल, तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकाचा शालार्थ आय. डी. द्वारे नोंदविण्यात यावी.
८. काही शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे उपस्थिती नोंदविताना शालार्थ आय. डी. मध्ये अडचणी येत असतील, तर त्यांनी आपल्याच शाळेतील इतर शिक्षकाच्या शालार्थ आय. डी. चा वापर करून विद्यार्थ्यांची उपस्थिती स्वतः नोंद करावी.
९. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ व यु-डायस पोर्टलमधील माहिती अपडेट करावी. सदर पोर्टल अपडेट झाल्यानंतर अशा अडचणी पुढील काही दिवसात आपोआप दूर होतील.
१०. या Attendance Bot (चॅटबॉट) वर दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी ७.०० ते दु. १२.०० तर अन्य शाळांसाठी सकाळी १०.०० ते सायं. ०५.०० या कालावधीत उपस्थितीची नोंद करावी. शाळेत इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यास त्याच दिवशी इतर वेळेतही उपस्थिती नोंदविता येईल.
११. पहिले दोन महिने सर्वांनी विद्यार्थी उपस्थिती "स्मार्ट उपस्थिती" या Bot वर ऑनलाईन, तसेच नियमित हजेरी पत्रकातही नोंदवावी. त्यानंतर ऑनलाईन उपस्थिती नोंदीची पीडीएफ प्रत डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यात येईल. अशी सुविधा प्राप्त झाल्यावर नियमित हजेरी पत्रकात उपस्थिती नोंद करण्याची आवश्यकता नाही.
१२. ऑनलाईन उपस्थिती नोंदविण्यासाठी मार्गदर्शक सूचना व डेमो व्हिडीओ सोबत देण्यात येत आहेत.
१३. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र शिक्षा व मनपा स्तरावरील समकक्ष अधिकारी हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.) व जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील.
१४. मासिक आढावा बैठकीत याविषयीचा नियमित आढावा या कार्यालयाकडून घेण्यात येईल.
१५. ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणी https://tinyurl.com/AttendanceBot या लिंकवर सादर कराव्यात.


मा. शिक्षण संचालक कार्यालयाकडून प्राप्त सुचनेनुसार विद्यार्थ्यांचे ऑनलाईन उपस्थिती Swiftchat app चे माध्यमातून नोंदणी करणेकरिताची सुविधा लवकरच कार्यान्वीत होणार आहे. त्याकरिता Swiftchat app मध्ये शिक्षकांचे लॉगीन करिता त्यांचे SHALARTH प्रणालीमध्ये असलेल्या Mobile Number चा उपयोग होणार आहे.

त्यानुषंगाने आपणास कळविण्यात येते की, मुख्याध्यापकांनी आपले SHALARTH प्रणालीमध्ये DDO - १ लॉगीनमध्ये Worklist > Payroll > Update Aadhar and UDISE Details या Path चा उपयोग करून दिनांक २७ जानेवारी २०२५ पर्यंत आपल्या शाळेवर कार्यरत शिक्षकांचे Mobile Number Update करून घ्यावेत. याकरिता गटशिक्षणाधिकारी यांनी आपले पंचायत समिती अंतर्गत सर्व शिक्षकांचे Mobile Number SHALARTH प्रणालीमध्ये UPDATE करून घेणेबाबतची सनियंत्राणाची जबाबदारी अधिनस्थ विस्तार अधिकारी / केंद्रप्रमुख यांचे वर सोपवून त्याबाबतचा कार्यपुर्ती अहवाल मंगळवार दिनांक २८ जानेवारी २०२५ ला लेखा शाखा, शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद बुलडाणा येथे सकाळी ११.०० वाजेपर्यंत सादर करावा.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

 जिल्हा परीषद बुलडाणा



 महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई च्या प्रकल्प संचालकांनी दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी विद्या समीक्षा केंद्रांतर्गत स्मार्ट उपस्थिती या Bot वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थित्ती नोंदविणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.





संदर्भ : १) या कार्यालयाचे पत्र जा.क्र. मप्राशिप / सशि/संगणक /VSK/२०२२-२३/२९८४, दि.०३-११-२३
२) शासन निर्णय क्र, समग्र २०२४/प्र.क्र. ३३ / एसडी-१ मादाम कामा मार्ग, हुतात्मा चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई, ४०००३२. दिनांकः १२ मार्च, २०२४.
३) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र जा. क्र. राशैसंप्रपम/आय टी/VSK/आदेश/२०२४-२५/०३१९९ दि.४-७-२४.
४) Director (Digital Education), केंद्रीय शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र. १-३४/ २०२२-(DIEGD- part (३) दि.२६-९-२०२४.

उपरोक्त विषयान्वये, शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगदान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले आहे.

संदर्भ क्र. १ ते ३ अन्वये, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ. १. ली ते इ. १० वीच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती विद्या समीक्षा केंद्राच्या Swift Chat या Application मधील स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया दि. ०१ डिसेंबर २०२३ पासून सुरु करण्यात आली आहे. तथापि, याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून नियमित आढावा न घेतल्याने शिक्षक / मुख्याध्यापक यांचेद्वारा याची नियमित अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

तरी आपल्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचेद्वारा नियमित आढावा घेऊन आपल्या क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये १००% विद्यार्थी उपस्थिती नियमित नोंदविली जाईल याची खात्री करावी.

सोबत : संदर्भीय पत्र १ व ३

(आर. विमला, भा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक


संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे द्वारे निर्गमित दिनांक 4 जुलै 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार विद्या समीक्षा केंद्रांतर्गत स्मार्ट उपस्थिती या Bot वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थित्ती नोंदविणेबाबत सर्व गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


संदर्भ : १) राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र जा.क्र.मप्राशिप / सशि/संगणक / VSK/२०२२-२३/२९८४, दि.०३ नोव्हेंबर २०२३

२) शासन निर्णय क्र. समग्र २०२४/प्र.क्र. ३३ / एसडी-१ मादाम कामा मार्ग, हुतात्मा चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई, ४०००३२. दिनांकः १२ मार्च, २०२४.


उपरोक्त विषयान्वये, शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या नियंत्रणाखाली विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले आहे.

संदर्भ क्र. १ अन्वये, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ. १ ली ते इ. १० वीच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती Swift Chat या Application मधील स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया दि. ०१ डिसेंबर २०२३ पासून सुरु करण्यात आलेली होती. परंतु जिल्हा स्तरावरील क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत याबाबत नियमित आढावा घेणे, तसेच सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यामध्ये अनियमितता दिसून आली आहे.

संदर्भ क्र. २ च्या शासन निर्णयानुसार, सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थित्ती नोंदविण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. तरी आपल्या अधिनस्त सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती या Bot वर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी आदेशित करावे. तसेच सदर उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत आपल्या स्तरावरून आढावा घेण्यात यावा.

सोबत : मार्गदर्शक सूचना।


(राहूल रेखावार भा.प्र.से.)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत समग्र शिक्षा उपकार्यालय, पुणे येथे विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले आहे.

सदर विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत सदर Attendance Bot (चॅटबॉट) च्या वापरासंबंधी विभाग, तालुका व केंद्र स्तरापर्यंत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आलेले आहे. त्याप्रमाने स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ.१ ली ते इ.१० वीच्या इयत्तेतील विद्यार्थी उपस्थिती SwiftChat या Application मधील Attendance Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया दि.०१ डिसेबर २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे.

तरी आपल्या अधिनस्त सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना या Attendance Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी आदेशित करावे, तसेच सदर उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत आपल्या स्तरावरून नियमितपणे आढावा घेण्यात यावा. सोबत : मार्गदर्शक सूचना


(प्रदीपकुमार डांगे गा.प्र.से.)

राज्य प्रकल्प संचालक म. प्रा. शि. प. मुंबई



विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती - मार्गदर्शक सूचना

१. Google play store वरून SwiftChat है Application download करावे.

२. प्रशिक्षणात दिलेल्या सुचनेनुसार SwiftChat या Application मधील Attendance Bot (चॅटबॉट) द्वारे इयत्ता १ ली ते १० वीच्या वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवावी.

३. उपस्थिती नोंदविताना शिक्षकांनी आपल्या शाळेचा यु-डायस कोड व स्वतःच्या शालार्थ आय.डी. चा वापर करावा.

४. शिक्षकांनी शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा.

५. सद्यस्थितीत जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित शाळेतील शालार्थ आय.डी. उपलब्ध असलेल्या शिक्षकांना या Attendance Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थी उपस्थिती नोंदविता येईल. सेवार्थ व इतर प्रणालीमध्ये वेतन असणाऱ्या शिक्षकांना Attendance Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थी उपस्थिती नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल.

६. एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विनाअनुदानित असेल, तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकाचा शालार्थ आय. डी. द्वारे नोंदविण्यात यावी.

७. काही शिक्षकांना Attendance Bot (चॅटबॉट) द्वारे उपस्थिती नोंदविताना शालार्थ आय. डी. मध्ये अडचणी येत असतील, तर त्यांनी आपल्याच शाळेतील इतर शिक्षकाच्या शालार्थ आय.डी. चा वापर करून विद्यार्थ्यांची स्वतः नोंद करावी.

८. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ पोर्टल, सरल पोर्टल व यु-डायस या सर्व पोर्टलमधील माहिती अपडेट करावी. सदर सर्व पोर्टल अपडेट झाल्यानंतर अशा अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

९. या Attendance Bot (वेंटबॉट) वर दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी ७.०० ते दु. १२.०० तर अन्य शाळांसाठी सकाळी १०.०० ते सायं. ०५.०० या कालावधीत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद करावी, १०. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र शिक्षा हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. विद्यार्थ्यांची यांची दैनंदिन उपस्थिती Attendance Bot (चॅटबॉट) वर नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील. ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणी 

https://tinyurl.com/AttendanceBot

 या लिंकवर सादर कराव्यात.


वरील संपूर्ण आदेश डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.