मुख्याध्यापक/नोडल ऑफिसर लॉगइन मधून अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती अर्ज कसा verify करायचे याची संपूर्ण माहिती

मोबाईल वरुन करा सर्व कामे...

आणि आपला वेळ आणि पैसा वाचवा..

 मुख्याध्यापक/नोडल ऑफिसर लॉगइन मधून अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती अर्ज कसा verify करायचे याची संपूर्ण माहिती.

सर्व आदरणी मुख्याध्यापक आणि नोडल अधिकारी महोदय,

तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती अर्ज ऑनलईन सादर केले असतीलच ते अर्ज verify करण्यासाठीं आता आपण कोणाकडे जायची गरज नाही, आपण आपल्या जवळ असलेल्या स्मार्टफोन वरून देखील ते अर्ज verify/defect/reject करू शकतो.

यासाठी आपल्याला मोबाईल मधील google application open करून त्यामध्ये nps school login असे सर्च करा.


👆 यात आलेल्या पहिल्याच लिंक वर क्लिक करा..

त्यानंतर 👇 अशी विंडो ओपन होईल.


यामधे नोडल ऑफिसर तसेच राहू द्या. चालू शैक्षणिक वर्ष निवडा तुमच्या शाळेचा Udise हा लॉगइन आयडी असतो तो टाईप करा पासवर्ड टाका कॅपचा टाका आणि login वर क्लिक करा..

वरील सर्व गोष्टी अचूक असतील तर खालील विंडो ओपन होईल.👇














वरील विंडों मधील verification यावर क्लिक करा त्यानंतर new application, renewal application असे पर्याय येतील त्यापैकी योग्य पर्याय निवडा त्यानंतर तुमच्या मोबाईल वर एक otp येईल तो पाच अंक किंवा capital alphabet असतील  otp  नंतर ओपन होणाऱ्या टॅब मधे अचूक टाईप करा.. त्यानंतर खालील विंडो ओपन होईल..,👇


त्यानंतर या विंडो मधील यादीतील तुमच्याकडे विद्यार्थ्याने भरलेला अर्ज व सर्व कागदपत्रे आणून दिले असतील त्या विद्यार्थ्याच्या नावा समोरील view details या हिरव्या रंगाच्या बटणावर क्लिक करा त्यानंतर खालील विंडो ओपन होईल 👇




तुमच्याकडील कागदपत्रे व अर्जातील माहिती अचूक आहे का हे काळजीपूर्वक तपासा upload केलेले Bonafide आपल्याच शाळेचे आहे का तपासा माहितीत तफावत आढळून आल्यास काय तफावत आहे ते remark या बॉक्स मध्ये टाईप करून अर्ज defect करा माहिती अचूक असेल तर तुमच्या शाळेच्या शुल्का विषयी विवरण तिन्ही ठिकाणी भरा शुल्क नसेल तर त्यात 0 टाईप करा खाली दिलेल्या दोन बॉक्स वर टिक करा आणि verify बटणावर क्लिक करा. तुमचा एका विद्यार्थ्याचा अर्ज verify झाला. अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज verify आपण करु शकतो. जर चुकून दुसऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तुमच्या शाळेच्या login मध्ये अर्ज केला असेल तर तो अर्ज reject करावा लागेल.

जर संपूर्ण सूचना वाचूनही काही अडचण आल्यास मला jadhaopg@gmail.com या ईमेल वर अथवा ९७६५४८६७३५ या नंबर वर आपली अडचण पाठवू शकता आपणास नक्कीच मदत केली जाईल..


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.