शालार्थ प्रणाली मधील माहे नोव्हेंबर २०२६ पेड इन डिसेंबर २०२६ पासून चे वेतन व भत्ते अदा करताना घ्यावयाची काळजी बाबत शिक्षण संचालक आदेश

शालार्थ प्रणाली मधील माहे नोव्हेंबर २०२६ पेड इन डिसेंबर २०२६ पासून चे वेतन व भत्ते अदा करताना घ्यावयाची काळजी बाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक 29 ऑक्टोबर 2026 रोजी पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.


क्र. शिसंमा/दि २०२६-२७/टि-६, बी

दिनांक :-२९/१०/२०२६

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व

२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि. प सर्व

३ शिक्षण निरिक्षक (उत्तर/ दक्षिण / पश्चिम) मुंबई.

४) प्रशासन अधिकारी महानगरपालिका/नगरपालिका / नगर परिषद, सर्व.

५० अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (माध्यमिक/प्राथमिक) सर्व.

विषयः- शालार्थ प्रणाली मधील माहे नोव्हेंबर २०२६ पेड इन डिसेंबर २०२६ पासून चे वेतन व भत्ते अदा करताना घ्यावयाची काळजी बाबत.

संदर्भ:-१) शासन शुध्दीपत्रक क्र. एसएसएन-२०१७/(२०-१७) टीएनटी-२.दि.२३.०८.२०१७

२) शासन निर्णय क्र.: शालार्थ-१११८/प्र.क्र.३०/टीएनटी-३.दि.१०.०६.२०२२.

३) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६बी.दि.१६.०७.२०२५/१३२८५३२.

४) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६बी.दि.२२.०१.२०२६/१६८५२९६.

५० संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६बी.दि.०४.०३.२०२६/१७५७८५०.

६) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि.२५-२६/टि-६बी. दि.०५.०३.२०२६/१७६१४७५.

७) शासन निर्णय का एसएसएन-२०१७/(२०-१७) टीएनटी-२.दि.३०.०१.२०२६.

८) संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/दि. २५-२६/टि-६बी.दि. २७.०३.२०२६/१८१३४८०.

९) संचालनालयाचे पत्र. क्र. शिसंमा/दि २०२६-२७/टि-६, बी.दि.१२.०६.२०२६

१०) दि.०९.०७.२०२६ रोजी वीसी व्दारे झालेली आढावा बैठक

११) संचालनालयाचे पत्र. क्र. शिसंमा/दि २०२६-२७/टि-६, बी.दि.०८.०७.२०२६

१२) दि.१५.०७.२०२६ रोजी वीसी व्दारे झालेली आढावा बैठक ०८.०७.२०२६

१३) दि.२३.०७.२०२६ रोजी वीसी व्दारे झालेली आढावा बैठक

१४) दि.३१.०७.२०२६ रोजी वीसी व्दारे झालेली आढावा बैठक

१५० संचालनालयाचे पत्र. क्र. शिसंमा/दि २०२६-२७/टि-६, बी. दि.०८.०९.२०२६

१६) दि.२८.१०.२०२६ रोजी वीसी व्दारे झालेली आढावा बैठक

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने माहे जानेवारी २०२६ व तत्पूर्वी आपणास वेळोवेळी सूचना व लेखी आदेश देण्यात आलेले आहेत. असे असतानाही दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील सर्व अधीक्षक वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय प्राथमिक आणि माध्यमिक यांची व्हीसीद्वारे पुनश्च संदर्भीय पत्रांमधील नमूद बाबींवरती कार्यवाही करण्याबाबत समग्र सूचना व विचार विमर्श करण्यात आलेला आहे. संदर्भीय पत्रानुसार आपणास वेळोवेळी लेखी व व्हीसीद्वारे कळविण्यात आलेले आहे. त्या कामामध्ये एक-दोन मुद्द्यांच्या संदर्भातील बाबींवर क्षेत्रस्तरावर मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी समाधानकारक कामकाज केले आहे. इतर

मुद्द्यांच्या बाबतीमध्ये समाधानकारक कामकाज झाल्याचे दिसून येत नाही. या पत्राद्वारे आपणास पुनश्च एकदा सदर काम पूर्ण करण्यास स्मरण करून देण्यात येत आहे. राज्याच्या एकत्रित निधीमधून कर्मचाऱ्यांचा वेतन व भत्ते यावर नियमाप्रमाणे निधी खर्च होणे आवश्यक आहे. आर्थिक बाबीतील अनियमितता झाल्यास यांस आपण जबाबदार रहाल. या गंभीर विषयाबाबत आपणास वारंवार लेखी सुचनेव्दारे कळवूनही या कामकाजात आवश्यक प्रगती दिसून येत नाही, असे खेदाने नमूद करावे लागत आहे.

१) प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या तीन स्तरांमध्ये शाळांचा युडायस क्रमांक उपयोगात आणून मुख्याध्यापकांचे एक डीडीओ कोड तयार करण्यात आलेले आहे. एकाच स्तरांमधील दोन किंवा दोन पेक्षा अधिक शाळांना एकच यु डायस क्रमांक ७ शाळांनी उपयोगात आणल्याचे दिसून येते. सोबत यादी संलग्न करण्यात येत आहे. (अधीक्षक व मुख्याध्यापक)

२) शालार्थ प्रणालीमध्ये प्राथमिक तपासणीत डीडीओ कोड आणि यु-डायस क्रमांक यांची जोडणी करताना प्रत्यक्षात सोबत जोडलेल्या यादीनुसार २०६ इतक्या शाळांच्या संच मान्यता ह्या शालार्थ प्रणालीमध्ये नमूद करण्यात आलेल्या यु-डायस क्रमांकावर करण्यात येत नाही. या यादीमधील शाळांचे अचूक यु-डायस क्रमांक नमूद करण्याची कार्यवाही मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्यास्तरावरुन करण्यात यावी. (अधीक्षक व मुख्याध्यापक)

२) शालार्थ प्रणालीमध्ये प्राथमिक तपासणीत डीडीओ कोड आणि यु-डायस क्रमांक यांची जोडणी करताना प्रत्यक्षात सोबत जोडलेल्या यादीनुसार २०६ इतक्या शाळांच्या संच मान्यता ह्या शालार्थ प्रणालीमध्ये नमूद करण्यात आलेल्या यु-डायस क्रमांकावर करण्यात येत नाही. या यादीमधील शाळांचे अचूक यु-डायस क्रमांक नमूद करण्याची कार्यवाही मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्यास्तरावरुन करण्यात यावी. (अधीक्षक व मुख्याध्यापक)

३) राज्यामध्ये एकूण ६१२ शाळांमध्ये संच मान्यतेमध्ये पदे मंजूर आहेत. तथापी कर्मचारी कार्यरत नाहीत. (अधीक्षक व शिक्षणाधिकारी)

४) एकूण ३६४२ शाळांमध्ये संच मान्यता उपलब्ध नाही व शालार्थ मध्ये कर्मचारीही कार्यरत नाहीत. करीता शुन्य मंजूर पदे व शुन्य कार्यरत पदे असणाऱ्या शाळांची खातरजमा मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्या स्तरावरुन करण्यात यावी. (अधीक्षक व मुख्याध्यापक)

५) सन २०२५-२६ मध्ये ८४२ शाळांच्या संचमान्यता उपलब्ध नाही तथापि या शाळांच्या यु-डायस क्रमांक जोडण्यात आलेल्या युडायस क्रमांकावर शालार्थमध्ये कर्मचारी कार्यरत असल्याचे दिसून येते. यासंदर्भात वेतन पथक अधीक्षक, शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी संच मान्यतेची कार्यवाही तातडीने कार्यवाही करणे अनिवार्य आहे. (अधीक्षक, शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक)

६) राज्यामध्ये माहे ऑक्टोबर २०२६ अखेरीस ३६२५ शाळांमध्ये ९५०९ कर्मचारी मंजूर पेक्षा अधिक कार्यरत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. ज्या ठिकाणी मंजूर पदांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्यांचे समायोजन गेल्या आठ महिन्यात का झाले नाही? याबाबतचा शाळा निहाय खुलासा संबंधित शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी करणे अनिवार्य आहे. (शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक)

७) राज्यामध्ये अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचारी असणाऱ्या १२०६ शाळा आहेत या शाळांमध्ये १४८४ कर्मचारी अतिरिक्त असल्याचे दिसून येते. याबाबतही अद्याप समायोजन का झाले नाही ? याचा खुलासा संबंधितांनी करणे अनिवार्य आहे. (शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक)

८) सद्यस्थितीत १०६९५ कर्मचारी डीडीओ कोड पासून विलग (डिटॅच) करण्यात आलेले आहेत आणि या कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत कोणताही निर्णय व्यवस्थापन / मुख्याध्यापकांकडून अद्याप पर्यंत घेतलेला नाही. या संदर्भातील उचित कार्यवाही मुख्याध्यापक स्तरावरुन होणे आवश्यक आहे.

९) सद्यस्थितीत २०२७ शाळांमध्ये एकूण २९०५ कर्मचारी सक्रीय आहेत, तथापी त्यांना वेतन व भत्ते अदा केले जात किंवा कसे याबाबतची खातरजमा करणे मुख्याध्यापक स्तरावरुन करणे आवश्यक आहे.

१०) संदर्भ पत्र क्र १२ व १५ अनुक्रमे दि.०८.०७.२०२६ व ०८.०९.२०२६ नुसार अनुदानित शाळांनमधील भविष्य निर्वाह निधीच्या नोंदी अद्यावत करुन भविष्य निर्वाह निधी चिठ्ठी (जिपीएफ स्लीप) शालार्थ प्रणाली मार्फत वितरीत करण्याच्या अनुषंगाने दि ०१.०४.२०२१ रोजीचा संबंधित कर्मचाऱ्याचा ओपनिग बॅलंस शालार्थ प्रणालीवर नोंद करण्याची कार्यवाही दि.१५.११.२०२६ पूर्वी अधीक्षक यांच्या स्तरावर पूर्ण करण्यात यावी. (अधीक्षक व शिक्षणाधिकारी)

११) संदर्भीय पत्र दिनांक १२ जून २०२६ मधील एकंदरी अकरा मुद्दयांबाबत शाळानिहाय आढावा घेऊन पूर्तता करणे अनिवार्य आहे. आपल्याकडून या ११ मुद्दयांची पडताळणी पूर्णतः आपल्या स्तरावर करण्यात आलेली नाही ही बाब अतिशय गंभीर आहे. सोबत जोडण्यात आलेल्या एक्सेल फाईलमध्ये विषय निहाय / जिल्हा निहाय यादया सलंग्न करण्यात आलेल्या आहेत. वेतन पथक अधीक्षक यांनी प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक याप्रमाणे फिल्टर सुविधेचा उपयोग करुन संबंधित यादी स्वतंत्र करावी व त्यामध्ये नमुद शाळा व कर्मचारी विषयक बाबींची उपरोक्त प्रमाणे पडताळणी करावी. (सुलभ संदर्भाकरीता प्रत संलग्न केली आहे).

करीता उपरोक्त सुचनेप्रमाणे त्वरीत कार्यवाही करण्यात यावी व माहे नोव्हेंबर २०२६ पेड इन डिसेंबर २०२६ चे वेतन अदा करतेवेळी कोणतीही तांत्रिक अडचण उदभवणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तांत्रिक कारणामुळे ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करण्यास अडचण आल्यास आणि अतिरीक्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वगळून अन्य कर्मचाऱ्यांची देयके विहीत वेळेत दरमहा ०१ तारखेस अदा करण्यात यावी.

सोबत सहपत्र- उपरोक्त विषया संबंधित प्रलंबित प्रकरणांची शाळा व कर्मचारी निहाय यादी


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक)

महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

Digitally signed by PALKAR MAHESH MADHUKAR Date: 29-10-2026 18:27:4

(डॉ. महेश पालकर) 

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

प्रत- माहितीस्तव सविनय सादर.

१) मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय मुंबई.

२) मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे-१

वरील संपूर्ण शासन आदेश PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


 शालार्थ प्रणालीतून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे सप्टेंबर / ऑक्टोबर-२०२६ चे वेतन देयके अदा करणे बाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे. 

क. शिसंमा/शिक्षक-शिक्षकेतर/शालार्थ वेतन /२०२६-२७/2178779/2016

दिनांक- Digital Sign, Date 09 OCT 2026

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व

२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक) जि.प., सर्व

३) शिक्षण निरीक्षक मुंबई (दक्षिण/उत्तर/पश्चिम) सर्व

विषयः- शालार्थ प्रणालीतून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे सप्टेंबर / ऑक्टोबर-२०२६ चे वेतन देयके अदा करणे बाबत.

उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ व शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ अनुक्रमे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करण्यात आलेल्या आहेत, या संचमान्यतेच्या आधारे ०१ एप्रिल २०२६ पासून संचमान्यतेच्या मंजूर पदांपेक्षा अधिक पदाचे वेतन एक स्तर अधिकारी यांच्या मान्यतेने काढण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. या सुविधेचा उपयोग करून राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, डिजिटलायझेशन मधील कागदपत्रांची पूर्तता न करणारे, जन्मदिनांक व रुजू दिनांक यांचा प्रणाली वर चुकीच्या नोंदी असणे, संच मान्यते करिता वापरण्यात आलेला यु-डायस क्रमांक व शालार्थ प्रणाली मधील यु-डायस क्रमांक यात भिन्नता असणे, एका यु-डायस क्रमांकावर प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक वामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त डीडीओ कोड अस्तित्वात असणे, शाळा बंद होणे, संच मान्यतेमध्ये पद मंजूर नसणे आणि न्यायालयीन प्रकरणाचे निर्देश इत्यादी कारणांमुळे मागील सहा महिन्यांमध्ये एक स्तर वरिष्ठ अधिकारी म्हणून देयकांना मान्यता देऊन देयके अदा करण्याची परवानगी देण्यात आली होती. ०१ सप्टेंबर २०२६ पासून शालार्थ प्रणाली मधील संचमान्यतेच्या मंजूर पदांपेक्षा अधिक पदांचे वेतन अदा करता येणार नाही, तसेच इतर प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींमध्ये त्रुटी असल्यास वेतन अदा करता येणार नाही, अशा पद्धतीच्या सूबना देण्यात आल्या होत्या.

तथापि सद्यस्थितीत कामकाजाची व्याप्ती व दिवाळी, दसरा यासारख्या महत्त्वाच्या सणांचे दिवस असल्यामुळे पुढील बाबींची पूर्तता करण्याच्या अटींवर माहे सप्टेंबर २०२६ व माहे ऑक्टोबर २०२६ ची वेतन देयके एक स्तर वरिष्ठ अधिकारी यांच्या मान्यतेने करण्यास परवानगी देण्यात येत आहे.

विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक) यांनी पुढील प्रमाणे शालार्थ प्रणाली मधील बाबींची पूर्तता माहे ऑक्टोबर-२०२६ अखेर पर्यंत करणे अनिवार्य असेल, संच मान्यता व शालार्थ मधील डीडीओ कोड यामधील यु-डायस क्रमांक भिन्न असल्यास तो एक सारखा करणे, शालार्थ प्रणाली मध्ये डिटॅच केलेल्या कर्मचाऱ्यांची योग्य माहिती नोंदविणे, शालार्थ प्रणाली मध्ये नमूद असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचे एकही वेतन व भत्ते देय करण्यात आलेले नाही, आशा कर्मचाऱ्यांची सेवाविषयक बाबी पडताळून प्रणाली वरून त्यांची नावे कमी करणे, अतिरिक्त असणाऱ्या कर्मचारी समायोजित शाळेत अद्यापही रुजू झाले नसल्यास त्यांना रुजू करण्याची कार्यवाही करणे, डिजिटलायझेशन, जन्मदिनांक, रुजू दिनांक व अन्य काही तांत्रिक कारणास्तव कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ प्रणाली वरील त्रुटीची पूर्तता करणे इत्यादी त्रुटींची पूर्तता आपल्या स्तरावरुन तातडीने करण्यात यावी. दिनांक ०१ नोव्हेंबर २०२६ पासून आणि अन्य काही कारणांमुळे संच मान्यतेत मधील मंजूर पदापेक्षा अधिकच्या पदांची वेतन देयके कोणत्याही परिस्थितीत अदा करता येणार नाही. त्यामुळे या प्रकारच्या सर्व त्रुटींची पूर्तता आपल्या स्तरावर विना विलंब करावी, याची सर्वांनी नोंद घ्यावी.


Digitally signed by 15:50:38 giri Gosavi

शिक्षण संचालक,

(प्राथमिक)

महाराष्ट्र राज्य पुणे-१

Digitally signes MADHUKAR PALKAR MAHESH Date: 09-10-2026 14:57:40

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

महाराष्ट्र राज्य पुणे-१

प्रतः- मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांना माहितीस्तव सविनय सादर

प्रत,

श्री. पवन जोशी, शालार्थ टीम लीडर महा आयटी मुंबई

/- यांना कळविण्यात येते की, उपरोक्त प्रमाणे दिलेले निर्देश विचारात घेता शालार्थ प्रणाली मध्ये माहे नोव्हेंबर

२०२६ पर्यंत उपरोक्त प्रमाणे बदल आपल्या स्तरावरून तातडीने करण्यात यावेत.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.