NISHTHA Category III अंतर्गत "Cyber Hygiene Practices: Personal Digital Devices" हा ऑनलाइन कोर्स शिक्षकांनी पूर्ण करण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे कार्यालयाने दिनांक 7 ऑक्टोबर २०२६ रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
प्रति,
१. विभागीय उपसंचालक (सर्व)
२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
४. प्रशासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व)
५. प्रशासन अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
६. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) (सर्व)
७. शिक्षण निरीक्षक, दक्षिण, उत्तर व पश्चिम मुंबई
विषय : NISHTHA Category III अंतर्गत "Cyber Hygiene Practices: Personal Digital Devices" हा ऑनलाइन कोर्स शिक्षकांनी पूर्ण करण्याबाबत....
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) यांच्या NISHTHA कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७मधील Cycle 2 अंतर्गत "Cyber Hygiene Practices: Personal Digital Devices B10" हा ऑनलाइन कोर्स DIKSHA प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा कोर्स मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षण विभागातील अधिकारी अधिकारी यांच्यासाठी उपलब्ध आहे.
सदर कोर्सचा प्रारंभ दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ असून, कोर्समध्ये नोंदणी करण्याची अंतिम मुदत १० मार्च २०२७ आहे. तसेच, कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मुदत १५ मार्च २०२७ आहे.
तरी, आपल्या कार्यक्षेत्रातील / अधिनस्त सर्व संबंधिताना सदर कोर्समध्ये विहित मुदतीत नोंदणी करून तो पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.
कोर्सचा तपशील :
Course Name: Cyber Hygiene Practices: Personal Digital Devices - B10
Medium: English
Starting Date: ०१ ऑक्टोबर २०२६
Enrolment Closing Date: १० मार्च २०२७
Course Closing Date: १५ मार्च २०२७
Course Link: https://learning.diksha.gov.in/diksha/course.php?id=1664§ion=3321
Digitally signed by
Jyoti Balasaheb Shinde
Date: 07-10-2026 17:56:11
(ज्योती शिंदे)
उपसंचालक,
आयटी विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 टिप्पण्या