शिक्षण सेवक पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही - शासन आदेश/निर्णय

शिक्षण सेवक पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही - शासन आदेश/निर्णय.

राज्यात शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास नेमणूक देण्यासंबंधीची अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीची योजना शासन निर्णयान्वये कार्यान्वित करण्यात आली आहे व त्यानंतर त्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले आहेत. तसेच सदर योजना खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे. तथापि सद्यस्थितीत राज्यातील सर्व व्यवस्थापना अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त होणारी पदे कंत्राटी तत्त्वावर दिनांक दहा 27 फेब्रुवारी 2003 च्या शासन निर्णयान्वय सुधारित करण्यात आलेल्या शिक्षण सेवक योजनेनुसार भरण्यात येतात. सदर पदे ही कंत्राटी स्वरूपाची असल्याने अनुकंपा तत्वाने भरण्यात येत नव्हती. 

सद्यस्थितीत अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी प्रतीक्षा यादीवर असलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता त्यांना अनुकंपा नियुक्तीसाठी अपरिहार्यपणे काही कालावधी लागतो त्यामुळे जिल्हास्तरावरील कार्यरत शिक्षण सेवक ग्रामसेवक व कृषी सेवक यांना कंत्राटी पद्धतीवरील पदांसाठी अनुकंपा नियुक्ती देय करता येईल काय ही बाब राज्याच्या अनुकंपा व प्रकल्पग्रस्त नियुक्ती धोरणाचा आढावा घेण्यासाठी माननीय मंत्री वित्त यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उप समितीच्या विचाराधीन होती. त्याबाबत सविस्तर विचार करून ग्रामविकास विभागाने शासन निर्णयान्वये कंत्राटी ग्रामसेवक पदे अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी अनुज्ञेय ठरविली आहे त्या अनुषंगाने शिक्षण सेवकांची पदे अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी अनुदनीय ठरवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 

राज्यातील सर्व व्यवस्थापन अंतर्गत येणारे शाळांमधील शिक्षण सेवकांच्या पदांवर अनुकंपा नियुक्ती देण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे. 
राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय तसेच विद्यानिकेतन सैनिकी शाळांमध्ये शिक्षण सेवक म्हणून अनुकंपा तत्व आणि नियुक्ती मिळण्याकरता संबंधित अनुकंपा धारकास शासनाच्या निर्णयातील संबंधित अटी व शर्ती लागू राहतील. 

स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत शाळेमध्ये शिक्षण सेवक म्हणून अनुकंपा तत्व आणि नियुक्ती मिळण्याकरता संबंधित अनुकंपा धारकास सामान्य प्रशासन विभागाने पारित केलेल्या व सुधारणा केलेल्या शासन निर्णयातील संबंधित अटी व शर्ती लागू राहतील नियुक्तीच्या वेळी सदर अटी शर्ती मान्य असल्याचे प्रतिज्ञापत्र संबंधित उमेदवाराकडून घेण्यात यावे. 

अनुकंपा योजनेअंतर्गत नियुक्ती देण्यात आलेल्या शिक्षण सेवकास दिनांक दहा तीन दोन हजार च्या शासन निर्णयाने लागू करण्यात आलेल्या सुधारित करण्यात आलेल्या शिक्षण सेवक योजनेतील मानधन वेतन संबंधी इतर अटीय शर्ती लागू राह तील. 

संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.