पी एफ एम एस प्रणाली बद्दल संपूर्ण माहिती व शंका निरसन समज-गैरसमज.

 पी एफ एम एस प्रणाली बद्दल संपूर्ण माहिती व 

शंका निरसन समज-गैरसमज.


 पी एफ एम एस प्रणाली मधुन दुकानदार यांना पैसे कसे द्यावे यबद्द्ल सविस्तर माहिती साठी 

येथे क्लिक करा

पी एफ एम एस प्रणालीवर काम कसे करायचे याबद्दल आपण या अगोदरच्या पोस्ट्स मध्ये हे पाहिले आहे. परंतु त्यामधून आपल्या मनात काही शंका निर्माण होतात ह्या शंका कोणकोणत्या असू शकतात आणि त्याचे निरसन आपण येथे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पी एफ एम एस प्रणालीबाबत काही समज आणि गैरसमज देखील आपल्या मनात आहेत तर नेमके गैरसमज कोणते आणि आपल्याला योग्य रित्या समजलेली माहिती कोणती याबद्दल देखील आज आपण चर्चा करणार आहोत. 


नेमकी पी एफ एम एस प्रणाली म्हणजे काय? 

पी एफ एम एस प्रणाली म्हणजे पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम असा तिचा फुल फॉर्म आहे. ही प्रणाली केंद्र शासनाचा निधी खर्च करण्यासाठी जो अगोदर आपल्या या बँकेच्या अकाउंटला जमा होत होता तो बँकेच्या अकाउंट ला डायरेक्ट जमा न करता या प्रणालीत आभासी पद्धतीने आपले क्रेडिट म्हणून उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि जर आपण त्यापैकी काही किंवा संपूर्ण निधी खर्च केला असेल किंवा करायचा असेल तर या या प्रणालीत दिलेल्या प्रोसिजर प्रमाणे प्रोसिजर पूर्ण करून ती ॲडव्हाइस बँकेत पाठवल्यानंतर आपल्या खात्यातील रक्कम वजा न होता डायरेक्ट संबंधित विभागाच्या खात्यातून आपल्या शाळा अथवा कार्यालयात केल्या गेलेल्या खर्चाची रक्कम संबंधित दुकानदार अथवा काम करणाऱ्या व्यक्ती याचे खात्यात वर्ग केली जाते. अगोदर आपल्या खात्यात जमा असलेल्या रकमेपैकी खर्च केलेल्या रकमेचा आपण चेक द्वारे संबंधित दुकानदार अथवा व्यक्तीस ती रक्कम अदा करत होतो. 


पी एफ एम एस प्रणालीद्वारेच खर्च का? 

शासनाकडून मिळालेले अनुदान या अगोदर आपल्या कार्यालयाच्या किंवा शाळेच्या खाते वर डायरेक्ट जमा व्हायचे मग या पैकी काही रक्कम खर्च व्हायची तर काही रक्कम तशीच राहतो आणि ही रक्कम वर्षानुवर्ष संबंधित खात्यात तशीच पडून राहत होती. शासनाकडून आपणास ही ठराविक रक्कम संबंधित काम पूर्ण करण्यासाठी दिली जाते ते काम करण्यासाठी ती पूर्ण रक्कम खर्च होतेच असे नाही त्यापैकी काहीतरी रक्कम किंवा त्या रकमेवरील व्याज संबंधित कार्यालयाच्या शाळेच्या खात्यात शिल्लक राहत होते. ती रक्कम वर्षं वर्षे त्याच खात्यात पडून राहत होती आता तसे नव्हता उरलेला खात्यातील कृपया देखील शासनाला परत येणे शक्य होणार त्यासाठी केंद्र शासनाच्या नीच वितरणाची प्रणाली आहे. 

Public Financial Management System. 

Pfms system झाल्यामुळे आता शाळेत इतर आर्थिक रेकॉर्ड ठेवायचे काय? 

हो, पी एफ एम एस प्रणालीद्वारे फक्त आपण या अगोदर रक्कम अदा करण्यासाठी चेकचा वापर करत होतो चेकचा वापर न करता पी एफ एम एस प्रणालीद्वारे संबंधिताच्या खात्यामध्ये देय रक्कम वर्ग करायची आहे. बाकी सर्व या अगोदर आपण जेवढे आर्थिक लेखी आणि रेकॉर्ड शाळेच्या दप्तरी किंवा कार्यालयाच्या दप्तरी ठेवत होतो ते सर्व आतादेखील ठेवायचे आहे आणि खरेदीची पद्धत देखील तीच अवलंब वायची आहे. 


पीएफएमएस प्रणाली मध्ये काम करताना रक्कम देण्यास विलंब होतो का? 

पी एफ एम एस प्रणाली ही आपल्यासाठी नवीन असल्यामुळे ती जोपर्यंत सुरळीत सुरू होत नाही आणि आपल्या अंगवळणी पडत नाही तोपर्यंत यामध्ये काही तांत्रिक बाबींमुळे अपवादात्मक परिस्थितीत विलंब होऊ शकतो परंतु एकदा का ही प्रणाली सुरळीत सुरु झाली की या प्रणालीद्वारे होणारे व्यवहार हे अगोदर पेक्षा जलद गतीने होण्यास मदत होईल. 


पी एफ एम एस प्रणाली आणि चेक द्वारे रक्कम अदा करणे यामध्ये नेमका काय फरक आहे? 

जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला चेक देतो तेव्हा तो व्यक्ती त्याचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेत तो चेक जमा करतो व ती बँक तो चेक ज्या बँकेचा आहे त्या बँकेकडे पाठवून ती बँक संबंधिताची खाते धारक बँकेकडे पैसे पाठवून नंतर त्या संबंधिताच्या खात्यात तो पैसा टाकला जातो यामध्ये बराचसा वेळ जातो. 

तसेच आपण जरी आज एखाद्या संस्थेचे किंवा व्यक्तीला चेक दिला तरी तो व्यक्ती तोच एक तीन महिन्यापर्यंत तेव्हाही हटवण्यासाठी बँक कडे पाठवू शकतो यामुळे आपल्या खात्यातील रक्कम तेवढे दिवस तशीच राहते व आपल्याला रेकॉर्ड लिहिण्या मध्ये अडचण जाते. 

शासनाचा निधी 31 मार्च या दिनांकापर्यंत खर्ची घालायचा असतो परंतु चेकद्वारे व्यवहार करताना आपण 31 मार्च या दिनांकावर दिलेला चेक जून महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत देऊन तो हटवू शकत होतो यामुळे ती रक्कम 31 मार्च या दिनांक आला खर्च न होता त्यानंतर तीन महिन्यापर्यंत खर्च झालेली आपल्या बँकेच्या खात्यावर दिसत होती यामुळे लेखा आक्षेप येत होता. 

आता ही रक्कम आपण पीएफएमएस प्रणाली द्वारे प्रिंट ॲडव्हान्स द्वारे जरी सदा केली तरी बँकेच्या की लंबा मुळे जास्तीत जास्त दहा दिवस ही रक्कम अदा करण्यास लागू शकतात यानंतर प्रिंट ॲडव्हाइस आपोआप रद्द होते. म्हणजेच चेकद्वारे व्यवहारांमधील च्या तांत्रिक त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करण्याचे काम पीएफएमएस प्रणाली द्वारे करण्यात आल्याचे दिसून येते. 

पी एफ एम एस प्रणालीद्वारे रक्कम संबंधिताच्या खात्यात वर्ग करणे हे देणाऱ्या संस्थेच्या नियन्त्रणात राहिल. ज्याला रक्कम घ्यायची आहे त्यांच्या नाही. 


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... 



व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao




नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Post a Comment

2 Comments

  1. It's very nice .we are techno world myself as president of zp school want clear and applicable work so that we can devlop more as accepted. Thanks

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.