या कर्मचाऱ्यांना मिळणार तब्बल दीडपट DA व दीडपट पगार - शासन निर्णय

या कर्मचाऱ्यांना मिळणार तब्बल दीडपट DA व दीडपट पगार - शासन निर्णय.


गृह विभागाच्या शासन निर्णयानुसार संबंधित कर्मचाऱ्यांसाठी सणासुदीची आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली अहेरी पोलीस जिल्हा व गोंदिया जिल्ह्यातील अति संवेदनशील पोलीस ठाणे पोलीस उपट आणि सशस्त्र दुरक्षेत्रे व कार्यालय येथे अति संवेदनशील क्षेत्रात कार्यरत विविध शाखांचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांना आणूने वेतनाच्या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

नक्षलग्रस्त गडचिरोली अहेरी पोलीस जिल्हा व गोंदिया जिल्ह्यातील अति संवेदनशील क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना अनुज्ञेय असलेल्या वेतनाच्या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता देण्यासंबंधीचे शासन निर्देश देत आहे.

नक्षलग्रस्त गडचिरोली अहेरी पोलीस जिल्हा व गोंदिया जिल्ह्यातील अति संवेदनशील क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या राज्य राखीव पोलीस दल बिनतारी संदेश विभाग मोटार परिवहन विभाग गुन्हे अन्वेषण विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाहतूक विभाग विशेष कृती दल नक्षलविरोधी अभियान राज्य गुप्तवार्ता विभाग इत्यादी सह पोलीस अधिकारी कर्मचारी यांना अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट दराने मूळ वेतन व महागाई भत्ता देण्यात यावा त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील उद्देशिकेतील अनुक्रमांक चार येथील दिनांक 18 फेब्रुवारी 2011 च्या शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आलेल्या पोलीस ठाणे पोलीस उपट आणि सशस्त्र दुरक्षेत्रे व कार्यालय यामध्ये कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकारी राज्यसेवेतील अधिकारी कर्मचारी यांना अनुज्ञेय असलेल्या मूळ वेतनाच्या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता देण्यात यावा म्हणजेच राज्यातील पोलीस दलाच्या विविध शाखांचे अधिकारी कर्मचारी अति संवेदनशील क्षेत्रात कार्यरत तैनात असेपर्यंत त्यांना करावी लागणारे जखमीचे काम विचारात घेता कार्यरत कालावधीसाठी मिळत असलेल्या अनुद्नेय वेतनाच्या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता देण्यात यावा.

राज्य गुप्त वार्ता विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी एक स्तर पदोन्नतीचा लाभते राज्यात कुठेही कार्यरत असले तरी अनुज्ञेय आहे तथापि गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या कामाची स्वरूप अत्यंत जोखमीची आहे यास्तव जिल्ह्यात अति संवेदनशील भागात कार्यरत असलेल्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने एक स्तर पदोन्नतीचा लाभ किंवा अति संवेदनशील पोलीस ठाणे पोलीस उपट आणि सशस्त्र दुरुक्षेत्र येथे कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आणूनही वेतनाच्या दीडपट दराने वेतन अधिक महागाई भत्ता यापैकी जे जास्त असेल ते देण्यात यावे.

राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या गडचिरोली अहेरी गोंदिया जिल्ह्यातील अति संवेदनशील क्षेत्रात कार्यरत आहेत या सवती संवेदनशील क्षेत्रात जे कार्यकृत असताना त्यांना आणूने वेतनाच्या दीडपट दराने मूळ वेतन अधिक महागाई भत्ता देण्यात यावा राज्य राखीव पोलीस बलातील अधिकारी कर्मचारी मुक्त संवेदनशील भागात कार्यरत असतील तोवरच त्यांना दीडपट दराने अनुज्ञेय वेतन व महागाई भत्ता लागू राहील.

नक्षलग्रस्त भागात कार्यरत संबंधित अधिकारी कर्मचारी यांना सामान्य प्रशासन विभागाकडून नक्षलग्रस्त भागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना लागू केलेल्या इतर आर्थिक सवलती अनुज्ञेय असणार नाही सदरची बाब संबंधित अधिकारी यांनी विचारात घेऊन त्याप्रमाणे वेतन अदा करावे.

याबाबत येणाऱ्या वेतन व मागे भत्त्यावरील अधिकचा खर्च या कर्मचाऱ्यांची वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची घालण्यात येतात त्याच लेखाशीर्षाखाली खर्ची घालावा व तो मंजूर तरतुदीतून भागवण्यात यावा.

ही आदेश दिनांक एक एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीच्या वेतन भत्त्यासाठी लागू राहतील.



 
वरील वित्त विभागाचा संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.