विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी दिनांक ८ ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार मा. आयुक्त (शिक्षण), म.रा.पुणे यांची दिनांक ०७/१०/२०२५ रोजीच्या आभाशी सभेमधिल निर्देशानुसार कार्यवाही करण्याबाबत पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ : १) शासन शुध्दीपत्रक क्रमांक MSC-२१०४०/३/२०२५-MSC-(SM-५) दिनांक ०७.१०.२०२५
२) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-०१ यांचे आभासी सभा दिनांक ०७.१०.२०२५ मधिल निर्देश
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, संदर्भीय शासन निर्णय व मा. आयुक्त (शिक्षण), म.रा.पुणे यांनी दि.०७/१०/२०२५ रोजीच्या आभासी सभेमध्ये निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार पुढील प्रमाणे कार्यवाही तात्काळ करावी.
१. एकाच कॅम्पस मधिल शाळा बंद करुन एकाच शाळेत रुपांतर करावे.
२. ० पटाच्या तसेच १ ते ५ पटसंख्या असणाऱ्या शाळा तात्काळ बंद कराव्यात.
३. ० पटाच्या तसेच १ ते ५ पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करुण विद्यार्थ्यांचे निजिकच्या शाळेत समावेशन करावे.
४. शाळा बंद केल्यामुळे समावेश झालेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असल्यास वाहतुक भत्ता दरमाह रु. ६००/-प्रमाणे मिळण्याबाबत प्रस्ताव तात्काळ या कार्यालयास सादर करावा.
५. बंद करण्यात आलेले शाळांचा U-DISE क्रमांक तात्काळ बंद करण्याबाबतचा प्रस्ताव या कार्यालयास सादर करावा.
६. शासन शुध्दीपत्रक क्रमांक MSC-२१०४०/३/२०२५-MSC-(SM-५) दिनांक ०७.१०.२०२५ मधिल निर्देशनुसार स्वतंत्र कन्या शाळांचे सहशिक्षणामध्ये रुपांतर करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी.
Digitally signed by Nilima Sachin Gulhane
शिक्षण उपसंचालक
अमरावती विभाग, अमरावती
प्रतिलिपी : माहितीस्तव तथा आवश्यक कार्यवाहीस्तव सविनय सादर.
१) मा. आयुक्त, (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, म.रा.पुणे -०१
२) मा. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती/अकोला/वाशिम यवतमाळ/बुलढाणा
३) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती/अकोला/वाशिम/यवतमाळ/बुलढाणा
४) मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, म.रा.पुणे
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments