रजेचा/सुट्टी चा अर्ज ही आता ऑनलाईन करावा लागणार? eLeave च्या अंमलबजावणीबाबत दि.०१ एप्रिल, २०२४ पासून सर्व रजेचे अर्ज eHRMS प्रणालीमार्फत सादर करण्याबाबत शासन निर्णय.

 महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने eLeave च्या अंमलबजावणीबाबत दि.०१ एप्रिल, २०२४ पासून सर्व रजेचे अर्ज eHRMS प्रणालीमार्फत सादर करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 


शासन परिपत्रक


राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवापुस्तकविषयक बाबीसंदर्भात eHRMS (Human Resource Management System) प्रणाली विकसित करण्यात आली असून त्याअंतर्गत सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची डिजिटल सेवापुस्तके तयार करण्यात येत आहेत. तसेच सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील अधीनस्थ कार्यालयांचा (उदा. आयुक्तालय, संचालनालय इ.) समावेश या eHRMS प्रणालीत करण्यात येत आहे. सदर प्रणालीवर सर्व अधिकारी / कर्मचारी यांची सेवापुस्तकविषयक माहिती भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना दि.०३ मार्च, २०२३ च्या परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत.


२. eHRMS प्रणालीमध्ये leave या सेक्शनमध्ये रजेचे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा आहे. तथापि बऱ्याच विभागांमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे आढळून आले आहे. eHRMS प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित होण्याकरिता प्रत्येक विभागातील सर्वच अधिकारी/कर्मचाऱ्यांनी त्यांचे रजेचे अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. याकरिता सर्व मंत्रालयीन विभागांना सूचित करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व अधिकारी / कर्मचारी (खुद्द आणि क्षेत्रीय) यांना दिनांक ०१ एप्रिल, २०२४ पासून त्यांचे सर्व रजेचे अर्ज eHRMS प्रणालीमार्फतच सादर करण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच सर्व विभागांनी त्यांच्या अधीनस्थ सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे रजा लेखे अद्ययावत ठेवावेत. कोणतेही रजेचे अर्ज ऑफलाईन घेण्यात येऊ नयेत.


३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०३२८१२३८१८२४०७ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(रो. दि. कदम-पाटील)

 शासनाच्या उप सचिव

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव.


२. मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई. ३. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.


४. मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.


वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadमहत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.