Pfms प्रणाली कशी वापरावी संपूर्ण माहिती

 Pfms प्रणाली कशी वापरावी सुरुवात.. 


सर्वसाधारणपणे शाळेची आर्थिक व्यवहार या अगोदर शाळा व्यवस्थापन समिती ठराव घेऊन शाळेचा आवश्यक गोष्टी खरेदी करण्यास मान्यता घेतली जायची व चेक द्वारे सदर खर्च ची रक्कम संबंधितास अदा केली जायची. 

परंतु राज्य व केंद्र शासन जिल्हा तालुका व शाळा स्तरावर नेमकी किती रक्कम खर्च केली आहे ही करण्यासाठी वारंवार अहवाल मागवण्याची गरज होती परंतु यात एकसूत्रीपणा आणण्यासाठी केंद्र शासनाने पी एफ एम एस नावाची एक ऑनलाईन प्रणाली या वर्षीपासून सुरू केली आहे या प्रणालीची पूर्ण नाव पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम असे आहे. सदर पोर्टल वरील खर्च हा  काल मर्यादित करायचा असल्यामुळे सदर काल मर्यादेनंतर ही रक्कम परत शासनाच्या खाती वळती केली जाऊ शकते. 

अर्थातच ही प्रणाली सर्वांसाठी नवीन असल्यामुळे ती कशी वापरावी वापरताना कोण कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे आणि कोण कोणत्या गोष्टी करू नये यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे ज्यासाठी आपला हा पोस्ट  प्रपंच. . 

सर्वात अगोदर आपल्या वरिष्ठ कार्यालयातून पी एफ एम एस प्रणाली साठी आपल्या कार्यालयासाठी तयार झालेला युजर आयडी आणि पासवर्ड मिळवावा तो मिळाल्यानंतर आपल्या पीसी अथवा मोबाईल मध्ये क्रोम ब्राऊझर अथवा गुगल ओपन करून त्यामध्ये ते पुढील प्रमाणे पी एफ एम एस असेच सर्च करावे. 


वरील प्रमाणे सर्च केल्यास सुरुवातीलाच म्हणजे प्रथमच दिसणाऱ्या सजेशन किंवा सर्च वर क्लिक करा त्यानंतर खालील प्रमाणे पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम हे वेब पोर्टल ओपन होईल त्यामध्ये आपल्या उजव्या बाजूला निळ्या रंगात Login असे दिसेल त्यावर क्लिक करावे. 
वरील चित्रामधील लोगिन वर क्लिक केल्यानंतर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल त्या विंडोमध्ये लोगिन करण्यासाठी आपल्याला वरिष्ठ कार्यालयातून प्राप्त युजर आयडी व पासवर्ड भरावा व त्यानंतर खाली दिलेल्या निळ्या Login वर क्लिक करावे जर आपण पहिल्यांदाच लॉगिन करत असाल तर आपणासाठी वरिष्ठ कार्यालयातून मिळालेला पासवर्ड बदलण्यासाठी संदर्भातील विंडो दिसेल या विंडोमध्ये कार्यालयातून प्राप्त पासवड सुरुवातीला टाकून पासवर्ड बदलण्यासाठी नवीन पासवर्ड दोनदा सारखाच अचूक टाकून त्यालाच चेंज पासवर्ड असे म्हटले की आपला कार्यालयातून मिळालेला पासवर्ड बदलून जो नवीन पासवर्ड आपण तयार केला आहे तो नवीन पासवर्ड पोर्टल साठी कार्यान्वित होईल आता परत लॉग इन ची विंडो ओपन झालेली असेल त्या ठिकाणी कार्यालयातून प्राप्त यूजर आयडी जसाचा तसा टाकून आपण नवीन तयार केलेला पासवर्ड टाकावा व लॉग-इन बटनवर क्लिक करावे. 
आपण यशस्वीरीत्या लॉगिन झाल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन झालेली दिसेल.. 


वरील प्रमाणे आलेल्या मेसेज वरती केल्यानंतर घेतलेल्या प्रिंट वर शिक्के मारून सही करून बँकेत सबमिट केल्यानंतर बँकेतून अॅप्रोवल मिळाल्याबरोबर संबंधित दुकानदार याचे खाते मध्ये रक्कम जमा होईल. 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group
धन्यवाद! 
Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.