Government Salary Package SGPS या राष्ट्रीयकृत बँकेतील खाते असणाऱ्या शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांना खात्यांच्या फ़ायद्यांबाबत अवगत करणेबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय

State Government Salary Package (SGPS) राष्ट्रीयकृत बँकेतील खाते असणाऱ्या शासकीय/निमशासकीय अधिकारी/कर्मचारी यांना खात्यांच्या फ़ायद्यांबाबत अवगत करणेबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय. 


महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागात सर्व विभागाच्या मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव सर्व मंत्रालय विभागांना दिनांक 31 ऑगस्ट 2022 रोजी शासन निर्णया अन्वय शासकीय निम शासकीय अधिकारी कर्मचारी यांना राष्ट्रीयकृत बँकेच्या स्टेट गव्हर्मेंट सॅलरी पॅकेज एस जी पी एस या वेतन खात्याशी संलग्न आधार विमा योजनेबाबत अवगत करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अशा अपघात विमा विषय लाभ आधारित योजना विविध बँकांकडून राबविण्यात येत आहेत.  काही बँकांकडून वित्त विभागाकडे शासकीय अधिकारी कर्मचारी यांची वैयक्तिक वेतन खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत प्रस्ताव प्राप्त झाले होते. 

शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावे याबाबत शासन कोणतेही निर्देश देऊ शकत नाही तथापिवेतन खात्याशी संलग्न असणाऱ्या अपघात विमा विषयक विविध योजना अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांच्या वयक्तिक फायद्याच्या आहेत.  त्याकरिता बँकांकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाहीत.  त्यामुळे काही राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त स्टेट गव्हर्मेंट सॅलरी पॅकेज एस जी पी एस अंतर्गत अपघात विमा योजनांचा लाभ मिळण्यासंदर्भात अधिकारी कर्मचारी यांना अवगत करणे योग्य वाटते. आवश्यक माहिती अभावी शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्या अशा योजनांपासून वंचित राहू नये अशी यामागे भूमिका आहे. 

सदर पत्रासोबत जोडलेल्या विवरण पत्रामध्ये वित्त विभागास राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त प्रस्ताव व त्या अंतर्गत स्टेट गव्हर्मेंट सॅलरी प्रॅक्टिस एस जी पी एस या अपघात विमा योजनेचे विविध लाभांची माहिती दर्शवली आहे. 

प्रशासकीय विभागांनी सदरची माहिती विभागाच्या अधिनिस्त अधिकारी कर्मचारी यांना अवगत करावी तथा अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावे याबाबतचा निर्णय कर्मचाऱ्याने वैयक्तिकरित्या घ्यावयाचा आहे. 

अधिकारी कर्मचारी यांना उपरोक्त योजना बाबत काही शंका उद्भवल्यास त्यांनी संबंधित बँकेच्या स्थानिक शाखेकडे अथवा बँकेच्या मुख्यालयाकडे संपर्क साधावा सदर प्रकरणी कोणतीही चौकशी अथवा पत्रव्यवहार वित्त विभागाशी करू नये. 

वरील प्रमाणे निर्देश वित्त विभागाने सर्व प्रशासकीय विभागांना दिलेले आहेत. वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏
Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.