शिक्षण विस्तार अधिकारी भरती 2023 अभ्यासक्रम, अर्हता, वयोमर्यादा व संदर्भ पुस्तके.

 शिक्षण विस्तार अधिकारी भरती 2023 अभ्यासक्रम, अर्हता व संदर्भ पुस्तके.




          महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 11 एप्रिल 2023 च्या पत्रानुसार सर्व विभागीय आयुक्तांना शालेय शिक्षण विभागाच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख पदे महत्वाची असून सदरची मोठ्या प्रमाणात रिक्त असणारी पदे भरण्यासाठी कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे लवकरच शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदे लवकरच भरली जाण्याची शक्यता आहे.

   जिल्हा परिषदेच्या 9 मे 2023 च्या पत्रानुसार जिल्हा परिषदेतील विविध पदांचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर झाला आहे. शिक्षण विस्तार अधिकारी पदाचाही अभ्यासक्रम जाहीर झाला असून तो पूर्णतः नवीन व शिक्षणशास्त्रातील अद्ययावत संकल्पनांवर आधारित आहे.  त्यामुळे शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी आवश्यक अर्हता पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना सदर पदासाठी आतापासून तयारी केल्यास त्यांना निश्चितच यश मिळू शकते.


शिक्षण विस्तार अधिकारी वेतनश्रेणी : 41800 - 132300


शैक्षणिक अर्हता व अनुभव

     बी.एड आणि शासनमान्य 3 वर्षे अध्यापन किंवा प्रशासनाचा अनुभव

         शिक्षण विस्तार अधिकारी सरळसेवेने अर्हता (ग्राम विकास व जलसंधारण विभाग अधिसुचना 10 जून 2014 नुसार)

 (1) जे आधीपासून जिल्हा परिषदेच्या सेवेत नसून ज्यांचे वय ३६ वर्षापेक्षा अधिक नसेल;


    सध्या शासननिर्णयानुसार ही वयोमर्यादा खुला प्रवर्ग 38 व राखीव प्रवर्ग 43 आहे.

(2)ज्यानी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./बी. एस. सी. ही पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केली असेल.

 (3)ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. एड अथवा समकक्ष पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केली असेल, आणि 

(4) ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक/माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, अध्यापक विद्यालयातील शासनमान्य पदावरील सक्षम प्राधिकाऱ्याने वैयक्तिक मान्यता दिलेला किमान तीन वर्षाच्या अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा अनुभव आहे. अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाने/सरळसेवेने भरली जातील

एकूण रिक्त पदांच्या 50 टक्के पदे सरळसेवेने, 25 टक्के विभागीय परीक्षा व 25 टक्के पदे पदोन्नतीने भरली जातात.


शिक्षण विस्तार अधिकारी पदाचा नवीन अभ्यासक्रम व संदर्भ ग्रंथ:

        शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी तांत्रिक अभ्यासक्रम 80 गुण,मराठी 30 गुण, इंग्रजी 30 गुण, सामान्य ज्ञान 30 गुण व बुद्धिमापन 30 गुण असे विभाजनआहे. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असून 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जाणार आहेत परीक्षेसाठी दोन तास वेळ असणार आहे.


    विस्तारअधिकारी (शिक्षण) तांत्रिक अभ्यासक्रम (40 प्रश्न 80 गुण)

         (केंद्रप्रमुख पेपर दुसरा व शिक्षण विस्तार अधिकारी तांत्रिक अभ्यासक्रम 80 टक्के सारखाच आहे.)

      परीक्षेसाठी शिक्षणशास्त्र हा घटक 80 गुणांना असून या घटकाच्या अभ्यासावरच परीक्षेतील बहुतांश यश अवलंबून आहे, त्याचा नवीन अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे.

     1.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ व सदर अधिनियमा नुसार महाराष्ट्र राज्य नियमावली २०११ (अदयावत दुरुस्त्यांसह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी

2.शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था / संघटन व त्यांचे कार्य

3.UNICEF, NCERT, NUEPA, NCTE CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT, MIEPA, DIET 

4.प्रश्न निर्मिती ( स्वाध्याय) कौशल्य ASER, NAS, PISAT

5.प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र

6.नविन शैक्षणिक धोरण- २०२०

7.संप्रेषण कौशल्य समाज संपर्काची विविध साधने 

8.समग्र शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान

9.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान

10.राष्ट्रीय शिक्षा अभियान

11.केंद्र व राज्य शासनाच्या अर्थ सहाय्य विदयार्थी वैयक्तिक लाभाच्या योजना

12.संगणक व माहिती तंत्रज्ञान- शैक्षणिक क्षेत्रातील संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि टेक्नॉलॉजी, शासनाचे कार्यक्रम मिडीया लॅब, एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र, ई-गव्हर्नर, शालेय सरल प्रणाली U-DES, DBT अल क्लासरुम, डिजीटल स्कूल, दैनंदिन माहिती देवाण घेवाण तंत्र, ई-मेल, व्हॉटस अॅप

13.महाराष्ट्र जिल्हा परिषदा, पंचायत समिती अधिनियम १९६१

14.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९६६ व पंचायतराज व्यवस्थापन, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा (उक्त पुस्तकांच्या अनुषंगाने शिक्षण संबंधी तरतुदी)

15.शालेय शिक्षण विभागाची संरचना (प्रशासकीय विभाग व विविध संचालनालय) व त्यांची कार्यपध्दती.

 संदर्भ पुस्तके

1.केंद्रप्रमुख पेपर दुसरा व शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा - डॉ.शशिकांत अन्नदाते (तिसरी आवृत्ती)

       सदर पुस्तकात तांत्रिक अभ्यासक्रम मुद्दे व शिक्षणशास्त्र संकल्पनाची माहिती मुद्देसूद व परिक्षाभिमुख पद्धतीने दिली असल्याने हे पुस्तक अभ्यासणे आवश्यक आहे.

2.प्रगत शैक्षणिक तंत्रज्ञान - डॉ.ह.ना.जगताप

3. शालेय प्रशासन व संघटन - डॉ.अरविंद दुनाखे

4.संपूर्ण शिक्षक अभियोग्यता, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (नववी आवृत्ती)

5.महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग शासननिर्णय व योजना

6. केंद्र शासनाच्या शिक्षण विषयक योजना

7.अभ्यासक्रमातील शिक्षण विषयक संस्थांची संकेतस्थळ

8. शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - स्वाती शेटे (तिसरी आवृत्ती)


शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेत मराठी 15 प्रश्न इंग्रजी 15 प्रश्न बुद्धिमत्ता पंधरा प्रश्न व सामान्य ज्ञान 15 प्रश्न विचारले जाणार आहे त्याचा अभ्यासक्रम व संदर्भ पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत.

1.केंद्रप्रमुख पेपर पहिला - के' सागर

2. केंद्रप्रमुख पेपर पहिला - डॉ. शशिकांत अन्नदाते

      या दोन्ही पुस्तकातून मराठी, इंग्रजी,बुद्धिमत्ता या विषयांचे परीक्षाभिमुख तयारी करता येईल.


मराठी (बारावी) (15 प्रश्न 30 गुण)

सर्वसाधारण शब्दसंग्रह

वाक्यरचना

व्याकरण

म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग

उताऱ्यावरील प्रश्न


संदर्भ पुस्तक

के सागर/ बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे


बौद्धिक चाचणी (पदवी) (15 प्रश्न 30 गुण)

सामान्य बुद्धीमापन व आकलन

तर्क आधारित प्रश्न

अंकगणित आधारित प्रश्न

संदर्भ पुस्तक

अनिल अंकलगी/के सागर/पंढरीनाथ राणे


इंग्रजी (बारावी)

General Vocabulary

Sentence Structure

 Grammar

Idioms & Phrases- their meaning and use

Comprehension

संदर्भ पुस्तक

के सागर/ बाळासाहेब शिंदे


सामान्य ज्ञान (पदवी) (15 प्रश्न 30 गुण)

भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनांसह महाराष्ट्र भारत जागतीक भूगोल - भौतिक, सामाजिक,

आर्थिक भूगोल भारत आणि महाराष्ट्र राज्य आणि शासन, - राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज,

सार्वजनिक धोरण, हक्कांचे मुद्दे आर्थिक आणि सामाजिक विकास शाश्वत विकास ध्येये,

गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम

सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान

पर्यावरणीय परिस्थीतीतील जैवविविधता हवामान बदल,सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण

 भारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास

चालू घडामोडी - आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्रासह कृषि आणि ग्रामीण विकास

     संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये

संदर्भ पुस्तक

1.लेटेस्ट जनरल नॉलेज - विनायक घायाळ

2.जनरल नॉलेज - के सागर

      अभ्यासक्रम व्यापक असल्याने या पदास पात्र शिक्षकांनी त्वरित अभ्यास सुरुवात करून आपले यश सुनिश्चित करावे तसेच आपले ओळखीच्या शिक्षक बंधू भगिनींना सदर माहिती पाठवावी.


शैक्षणिक बातम्या येण्यासाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏


Post a Comment

0 Comments