शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत आपल्या जिल्ह्यातील शालेय शिक्षणातील विविध क्षेत्राअंतर्गत सकारात्मक बदल झालेल्या किमान दोन शाळांची यशोगाथा मार्गदर्शक मुद्यांनुसार सादर करणेबाबत.

शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत आपल्या जिल्ह्यातील शालेय शिक्षणातील विविध क्षेत्राअंतर्गत सकारात्मक बदल झालेल्या किमान दोन शाळांची यशोगाथा मार्गदर्शक मुद्यांनुसार सादर करणेबाबत  महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था संभाजीनगर कार्यालयातून दिनांक 4 जुलै 2025 रोजी पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे.


शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील उत्तम शाळांच्या यशोगाथा (Case Study) मिपा संस्था, छत्रपती संभाजीनगर मार्फत NCSL, निपा, नवी दिल्ली येथे पाठविल्या जातात व NCSL, निपा, नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय पोर्टल https://ncsl.niepa.ac.in/ मधील School Leadership Academy महाराष्ट्राच्या वेबपेज https://ncsl.niepa.ac.in/schoolleadershipacademy/maharashtra/maharashtra.php वर प्रकाशित करण्यात आले आहे.

संदर्भिय पत्रानुसार सन 2025-26 मध्ये शालेय शिक्षणातील विविध क्षेत्राअंतर्गत मुख्याध्यापकांच्या नेतृत्वातून शिक्षकांच्या सहकार्याने अनेक सकारात्मक बदल झालेले आहेत, अशा महाराष्ट्रातील शाळांच्या यशोगाथा NCSL, निपा, नवी दिल्ली येथे पाठवावयाच्या आहेत.

आपल्या जिल्ह्यातील शालेय शिक्षणातील विविध क्षेत्राअंतर्गत सकारात्मक बदल झालेल्या किमान 02 ज्यात शासकीय/जिल्हा परिषद/नगर परिषद/महानगरपालिका/कटक मंडळे (स्थानिक स्वराज्य संस्था) / खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या यशोगाथा सोबतच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करुन या कार्यालयाच्या miepasla2019@gmail.com या ईमेलवर दि.21/07/2025 पर्यंत Google Input मध्ये Arial Unicode MS या Font मध्ये टंकलिखित करुन Word व PDF स्वरुपात पाठवाव्यात.

सोबत - 1. यशोगाथा लेखनासाठी क्षेत्रांची/ विषयांची यादी

2. यशोगाथा लेखन - मार्गदर्शक सूचना, समाविष्ट करावयाचे मुद्दे व Format.


(प्रकाश मुकुंद) 

संचालक

महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), छत्रपती संभाजीनगर.


यशोगाथा लेखनासाठी क्षेत्र / विषय निवडण्यासाठी संदर्भ यादी

1. शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मुलभूत क्षमता वाढविण्यासाठी मुख्याध्यापकांनी केलेले प्रयत्न

2. शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/अनुदानित शाळांमध्ये कौशल्य आधारित आणि व्यावसायिक शिक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्याध्यापकांनी केलेले प्रयत्न

3. शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/अनुदानित शाळांमध्ये पायाभूत शिक्षण मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान यात सक्षम करण्यासाठी मुख्याध्यापकांनी केलेले प्रयत्न

4. शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/अनुदानित शाळांमध्ये लिंग समभाव व समावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्याध्यापकांनी केलेले प्रयत्न.

5. आदिवासी बहुल भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध कृती कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापकांनी केलेले प्रयत्न

6. समता, सामाजिक ज्ञान आणि दिव्यांगासाठीचे शिक्षण समावेशन यासाठी मुख्याध्यापकांनी केलेले प्रयत्न

शाळा यशोगाथा लेखनाबाबत मार्गदर्शक सूचना

1. लेखनाची भाषा मराठी/हिंदी/इंग्रजी

2. एकूण लेखन शब्द मर्यादा अंदाजे 2500 ते 3000 शब्द

3. वरील यादीतील क्षेत्रांपैकी एकाच क्षेत्रावर आधारित लेखन अपेक्षित

4. मुख्याध्यापक व इतर सहकारी यांनी शाळेत घडविलेले सकारात्मक परिवर्तन यावर लेखन अपेक्षित

5. सकारात्मक परिवर्तनाबाबत लेखन करतांना फोटो व व्हीडीओ लिंक समाविष्ट करणे आवश्यक

6. शाळेत / विद्यार्थ्यांत झालेले सकारात्मक परिवर्तन याबाबतची स्पष्ट माहिती यशोगाथेत आवश्यक आहे.

7. शाळा निवड - पूर्व प्राथमिक / प्राथमिक / उच्च प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक

8. शाळा व्यवस्थापन शासकीय / जिल्हा परिषद / नगर परिषद / महानगरपालिका/ कटक मंडळे (स्थानिक स्वराज्य संस्था) / खाजगी अनुदानित

शाळेची प्रारंभिक माहिती बाबत मुद्दे

1. शाळेचे पूर्ण नाव, पत्ता व ईमेल आयडी

2. मुख्याध्यापकाचे पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी

3. शाळेचे व्यवस्थापन

4. शाळेचे माध्यम

5. शाळेतील इयत्ता ---- ते

6. एकूण विद्यार्थी संख्या

महत्वाचे -

1. Google Input मध्ये Arial Unicode MS font.

2. Word व PDF फाईल miepasla2019@gmail.com या ईमेलवर पाठवाव्यात.


 वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.