जनगणना व बीएलओ चे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद सर्विस बुक मध्ये करणे शिक्षण संचालक दि 6/10/2026 चे पत्र

जनगणना व बीएलओ चे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद सर्विस बुक मध्ये करणे बाबत डॉ. महेश पालकर शिक्षण संचालक यांचे दिनांक 6/10/2026 चे पत्र पुढील प्रमाणे.

क्र. शिसंमा/संकीर्ण/जनणनावबीलएलओ/२०२६/ए-१/विद्या शाखा/

प्रति,

दिनांक स्वाक्षरीचे खाली नमूद आहे

मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.

विषयः जनगणना व बी.एल.ओ. चे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद सर्व्हिस बुकमध्ये करणेबाबत.

संदर्भः- विजयकुमार गुंड, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, सोलापूर यांचे जा.क्र.४६/२०२६-२७, दिनांक ०८/०९/२०२६ रोजीचे पत्र.

महोदय,

जनगणना व बी.एल.ओ. चे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद सर्व्हिस बुकमध्ये करणेबाबत संदर्भिय पत्र संचालनालयास प्राप्त झाले आहे. (प्रत सलंग्न) सदर निवेदनामध्ये खालील प्रमाणे मागणी करण्यात आली आहे.

जनगणना व बी.एल.ओ. ची कामे करताना माध्यमिक शिक्षकांनाही त्यांच्या नियमित शैक्षणिक कामकाजाव्यतिरिक्त शासनाने सोपलेले अतिरिक्त राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे लागते.

अशा परिस्थितीत प्राथमिक शिक्षकांना अर्जित राजेचा लाभ देण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित झालेले असताना समान स्वरुपाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना सदर लाभापासून वंचित ठेवणे हे अन्यायकारक व भेदभावपूर्ण ठरेल तसेच जनगणना व बी.एल.ओ. चे काम हे शिक्षकांनी स्वेच्छेने स्वीकारलेले काम नसून शासनाच्या आदेशानुसार पार पाडलेले राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे या कालावधीतील प्रत्यक्ष कामाचे दिवस शिक्षकांच्या सेवाकालाचा भाग म्हणून विचारात घेऊन त्यानुसार अर्जित रजेचा लाभ देणे आवश्यक असून खालील प्रमाणे मागण्या करण्यात येत आहेत.

१. शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक २६/०८/२०२६ रोजी निर्गमित केलेल्या आदेशाच्या धर्तीवर माध्यमिक वा उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी स्वतंत्र आदेश तातडीने निर्गमित करावेत.

२. जनगणना व बी एल ओ चे राष्ट्रीय कर्तव्य बजावलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी प्रत्यक्ष केलेल्या कामाच्या दिवसांच्या प्रमाणात अर्जित रजा त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये जमा करणचे निर्देश संबंधित शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांना द्यावेत.

३. यापूर्वी जनगणना व बी एल ओ चे काम केलेल्या शिक्षकांनाही या निर्णयाचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने देण्याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत.

४. राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनाही समान राष्ट्रीय कर्तव्य बजावलेले असल्याने प्राथमिक शिक्षकांप्रमाणेच त्यांनी समान निकष व समान लाभ देण्यात यावा.

५. या संदर्भात जिल्हानिहाय कार्यवाही करण्यासाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना स्पष्ट सूचना निर्गमित कराव्यात.

वरील प्रमाणे करण्यात आलेल्या मागणी ही धोरणात्मक स्वरुपाची बाब असल्याने सदर निवेदन पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर, सहपत्र-वरीलप्रमाणे


आपला विश्वासू, 

Digitally signed by PALKAR MAHESH MADHUKAR Date: 06-10-2026 16:30:38

(डॉ. महेश पालकर) 

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रत :- मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे-१ यांना माहितीस्तव सविनय सादर.

प्रत माहितीस्तव :- विजयकुमार गुंड, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, सोलापूर जिल्हा.



 महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.