📢 महत्त्वाची सूचना – केंद्रप्रमुख पायाभूत प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण गरजांचा अभ्यास (TNA)
महोदय / महोदया
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत राज्यातील नवनियुक्त केंद्रप्रमुखांच्या पायाभूत प्रशिक्षण गरजांचा अभ्यास (Training Need Analysis – TNA) करण्यात येत आहे.
तरी सर्व संबंधित अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागातील पर्यवेक्षकीय यंत्रणेतील संबंधितांनी खालील Google Form लिंकद्वारे आपली माहिती दिनांक *१५/११/२०२६ पर्यंत भरावी.
🔗 Google Form Link:
https://forms.gle/2Bfsn6vBNaXNxvDB8
सर्व संबंधितांनी सदर माहिती विहित मुदतीत भरावी ही विनंती.
संचालक,
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), छत्रपती संभाजीनगर
जा.क्र/मिपा/प्रशिक्षण/२०२६-२७/
दिनांक - ०९/११/२०२६
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व.
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व.
४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व
५. शिक्षणाधिकारी, बृहमुंबई, महानगरपालिका
६. शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम दक्षिण/उत्तर)
७. प्रशासन अधिकारी (मनपा/नपा/नप), सर्व
विषय :- केंद्रप्रमुख पायाभूत प्रशिक्षण प्रशिक्षण गरजांचा अभ्यास (TNA) बाबत.
संदर्भ :- १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र/मिपा/प्रशिक्षण/२०२६-२७/६९९ दि.११/०८/२०२६.
२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र./मिपा/लेखा/२०२६-२७/८०७ दि.१०/०९/२०२६.
३. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या दि.०५/११/२०२६ बैठकीतील निर्देश.
उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्रात नवनियुक्त केंद्रप्रमुखांना त्यांच्या पदाच्या जबाबदाऱ्यांची माहिती देणे, प्रशासकीय कौशल्ये, शैक्षणिक नेतृत्व व तांत्रिक कौशल्ये याबाबत माहिती देणे यासाठी राज्यस्तरीय नवनियुक्त केंद्रप्रमुख पायाभूत प्रशिक्षण आयोजन करणे तसेच प्रशिक्षणासाठीचे मोड्यूल तयार करण्याबाबत वरिष्ठ स्तरावरुन सूचना प्राप्त आहेत.
केंद्रप्रमुख यांची भूमिका व जबाबदारी सक्षमणे पार पाडण्यासाठी कोण-कोणत्या प्रशिक्षण घटकांची आवश्यकता आहे यासाठी प्रशिक्षण गरजांचा अभ्यास (TNA) करणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी शिक्षण, गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता, प्रशासन अधिकारी, शिक्षण निरिक्षक, शिक्षणाधिकारी, प्राचार्य व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व सदस्य यांना खालील लिंक दि.१५/११/२०२६ पर्यंत भरण्याबाबत आपल्या स्तरावरुन आदेशित करण्यात यावे.
गुगल फॉर्म लिंक - https://forms.gle/2Bfsn6vBNaXNxvDB8
Digitally signed by Prakash Mugutrao Mukund Date: 09-11-2026 13:43:48
(प्रकाश मुकुंद)
संचालक
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), छत्रपती संभाजीनगर
प्रत माहितीस्वत सविनय सादर -
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
२.मा. आयुक्त शिक्षण, शिक्षणा आयुक्तालय, म.रा, पुणे.
३. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, म.रा, पुणे.
४. मा.शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, म.रा, पुणे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 टिप्पण्या