YCMOU Admission 2024-25 Update - सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक ऑनलाइन अर्ज लिंक सूचना

Yashwantrao Chavan Maharashtra Open University,

 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दिनांक : 31 मे 2024 च्या सूचनापत्रक क्र. 1/2024-25 नुसार.. 

१) विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार बी.एड., बी.एड. (विशेष), शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालील तक्यात नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू होत आहे.


ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत


दिनांक 01.06.2024 ते दिनांक 31.07.2024 पर्यंत (संध्याकाळी 11.59 वाजेपर्यंत)

https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1303

२) विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहितीपुस्तिका) 2024-25 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत.


३) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल.


४) विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा.


 मा. संचालक, विद्यार्थी सेवा विभाग

उपकुलसचिव नोंदणी कक्ष


प्रत : 1) मा. कुलगुरू यांचे माहितीसाठी सविनय सादर 2) मा. प्र-कुलगुरू यांचे माहितीसाठी सविनय सादर


प्रत: 1) सर्व वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार, य.च.म.मु. विद्यापीठाचे विभागीय केंद्र यांनी सदरचे सूचनापत्र आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व अभ्यासकेंद्रांच्या निदर्शनास आणून द्यावे.

2) सर्व विद्याशाखा/केंद्र/कक्ष

3) एम.के.सी.एल.

4) डाटा प्रोसेसिंग सुपरवायझर, विद्यार्थी सेवा विभागसन 2024-2025 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना


१) विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयानुसार प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. प्रथमतः आपण https://ycmou.digitaluniversity.ac विद्यापीठ संकेतस्थळावर भेट द्यावी.

२) आपणास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहितीपुस्तिका) 2024-2025 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत. माहितीपुस्तिकेतील प्रवेशाशी संबंधित माहिती उदा. प्रवेश पात्रता, शुल्क, अभ्यासक्रम (विषय) इत्यादी बाबतची माहिती वाचून प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या पानांची प्रिंट काढून घ्यावी.

३) विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या होमपेजवर Study Centres या टॅबखाली आपणास शिक्षणक्रमनिहाय अभ्यासकेंद्रांची यादी उपलब्ध आहे. आपणास जवळचे किंवा सोयीस्कर असलेल्या ज्या अभ्यासकेंद्रावर प्रवेश घ्यावयाचा आहे. त्या अभ्यासकेंद्राचा पत्ता व संकेतांक लिहून ठेवावा

४) माहितीपुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे अर्जदाराने प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारे स्वतःचा फोटो, स्वाक्षरी यांची स्वतंत्रपणे सॉफ्टकॉपी JPG/JPEG/PNG या format 4 KB ते 30 KB पर्यंत आणि शैक्षणिक पात्रतेची मूळकागदपत्रे JPG/JPEG/PNG या format 10 KB ते 500 KB पर्यंत पूर्णतः सुस्पष्टपणे कलर स्कॅन करून सोबत ठेवावे.

५) ऑनलाईन प्रवेश करण्यापूर्वी संकेतस्थळावरील होमपेजवर Presentations या टॅबखाली User Guide Presentation मध्ये Students माहितीनुसार ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावा. Online Admission मध्ये दिलेला डेमोतील

६) नव्याने प्रवेश घेणाऱ्या अर्जदारांनी ऑनलाईन प्रवेश करतांना प्रथम त्यांचा आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. त्यानंतर सर्व तपशीलांसह ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. अर्जदारास प्रथमतः OTP मिळतो. सदरचा OTP नोंदणीकृत मोबाईल आणि ई-मेलवर येतो. त्यानुसार पुढील माहिती भरून प्रवेश करता येईल.

 ७) जे अर्जदार विद्यापीठाचे पूर्वीचे विद्यार्थी आहेत व ज्यांना 16 अंकी कायम नोंदणी क्रमांक मिळालेला आहे. त्यांचा USER ID हा कायम नोंदणी क्रमांक असेल आणि Password हा मागील वर्षी वापरल्या नुसार असेल. Password आठवत नसेल तर Forgot Username/Password क्लिक करून त्यात विचारलेली योग्य ती माहिती भरून अर्जदारास नवीन Password मिळू शकतो. तुमचा मोबाईल नंबर आणि यापूर्वी प्रवेश घेतांना नोंदवलेला मोबाईल नंबर वेगळा असेल तर नवीन Password मिळाल्यानंतरच पुढील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येईल

८) ऑनलाईन प्रवेश करते वेळी प्रवेशाकरिता विचारलेली माहिती काळजीपूर्वक वाचून अर्जदाराने अचूक माहिती भरावी, प्रवेश पात्रतेची आवश्यक ती मुळ कागदपत्रे, फोटो व स्वाक्षरी इत्यादी वरील मुद्दा क्र. 4 प्रमाणे सुस्पष्टपणे कलर स्कॅन करून काळजीपूर्वक पात्रतेसंबंधित कागदपत्रे अपलोड करावीत. अर्धवट, अपूर्ण, चूकीची, अथवा अस्पष्ट (blur) असलेली अशी कागदपत्रे टाकू नयेत. त्यामुळे अर्जदाराची प्रवेश पात्रतात पासतांना प्रवेश नाकारण्यात जाऊ शकतो. 

९) आपण प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे प्रवेश शुल्क माहितीपुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे भरणे अनिवार्य आहे. विद्यापीठ हिस्सा व अभ्यासकेंद्र हिस्सा हा एकाचवेळी भरावयाचे असल्याने शुल्क भरण्याबाबतच्या सूचनेनु‌सार प्रवेश अर्जात दिलेल्या लिंकवरून सदरचे ऑनलाइन पेमेंट गेटवे वापरून क्रेडिट/डेबिट कार्ड / नेट बँकिंग‌द्वारे शुल्क भरावयाचा आहे. दिलेल्या लिंक व्यतिरिक्त इतर कुठल्याही लिंकवर भरलेले शुल्क ग्राह्य धरले जाणार नाही. अर्जदाराची राहील. त्यामुळे याची सर्वस्वी जबाबदारी

१०) प्रवेशाबाबतचा मेल/ एस.एम.एस. आपल्या मेल आय.डी मोबाईलवर पाठविण्यात येतो. त्यामुळे अर्जदाराने आपणास आलेला E-mail/ SMS वर कायम लक्ष ठेवावे व जतन करून ठेवावे.

११) अर्जदारास प्रवेशास पात्र किंवा अपात्र झाला ह्याबद्दल अर्जदार आपला UserID व Password वापरून प्रवेशाचे Status पाहू शकतात अर्जदारास आपला अर्ज अपात्र असल्यास Reject आणि पात्र असल्यास Approved असा शेरा दिसेल त्यामुळे अर्जदाराने हे सतत अर्जाबाबतची माहिती तपासत राहणे ही अर्जदाराची जबाबदारी असेल. अर्जदारास वि‌द्यापीठाकडून याबाबतचा स्वतंत्रपणे कोणताही मेल/ मेसेज पाठविला जात नाही. प्रवेश चूकीचा अथवा अपात्र झाल्यास वि‌द्यापीठ नियमानुसार शुल्क परतावा मिळणार नाही.

१२) ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहिती ही शिक्षणक्रम यशस्वीरित्या पूर्ण होईपर्यंत अर्जदारास बदलता येणार नाही. अर्जदारास वि‌द्यापीठातर्फे विविध प्रकारचे एस.एम.एस. पाठविण्यात येणार असल्याने मोबाईल क्रमांक एकच ठेवावा वारंवार त्यात बदल करू नये.

१३) आपला प्रवेश कायम होण्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्जाची प्रिंट काढून अभ्यासकेंद्रावर सदरच्या अर्जाची प्रिंट जमा करून आपण आपले अध्ययन साहित्य घ्यावे. १४) महाराष्ट्र शासनाने मंजुर केलेल्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृतीबाबतचे स्वतंत्रपणे सूचनापत्र https://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर Admission या टॅबवर 'शिष्यवृत्ती पर्याय स्वीकारून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी नियमावली शैक्षणिक सत्र 2024-25' या ठिकाणी दिलेले असून त्याचे काळजीपूर्वक वाचन करूनच आपल्या ऑनलाईन प्रवेशाची आणि शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्जाची समाजकल्याण विभागाच्या संकेतस्थळावरून कार्यवाही वेळेत पूर्ण करावयाची आहे.

१५) विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयानुसार दृष्टीबाधीत (Visual Impaired), बंदी बांधव आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाल्य इत्यार्दीना प्रवेश शुल्कात संपूर्णपणे सूट देण्यात आलेली आहे दृष्टीबाधील (Visual Impaired), आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाल्य इत्यादी अर्जदारांनी पूर्णपणे भरलेला ऑनलाईन प्रवेश अर्ज आणि बंदी बांधवांचे विहित नमुन्यातील पूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज निवड केलेल्या अभ्यासकेंद्रावर संबंधित कागदपत्रांसह वि‌द्यापीठाने दिलेल्या विहित मुदती पूर्वी जमा करणे बंधनकारक असेल. अभ्यासकेंद्रामार्फत सदरचे प्रवेश अर्ज तात्काळ वि‌द्यापीठाकडे पाठविण्यात यावेत. विद्यापीठ पातळीवर सदरचे प्रवेश कायम करण्यात येतील.

 दृष्टीबाधीत (Visual Impaired,

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाल्य

बंदी बांधव

सिव्हील सर्जनचा अंधत्वाचा दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला, संबंधित शिक्षणक्रमाचे शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे आणि प्रवेश अर्ज

कायम नोंदणी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 

१६ अंकी कायम नोंदणी क्रमांक असल्याचे कागदपत्रे आणि सर्व संबंधित कागदपत्रांसह प्रवेश अर्ज

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाल्यांकरिता पित्याची आत्महत्या झाल्याचा तहसीलदाराचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, संबंधित शिक्षणक्रमाचे शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे आणि प्रवेश अर्ज

शाळा सोडल्याचा दाखला, संबंधित शिक्षणक्रमाचे शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे, संबंधित अभ्यासकेंद्राचे शिफारसपत्र आणि प्रवेश अर्ज

१६ अंकी कायम नोंदणी क्रमांक असल्याचे कागदपत्रे आणि सर्व संबंधित कागदपत्रांसह प्रवेश अर्ज

१६ अंकी कायम नोंदणी क्रमांक असल्याचे कागदपत्रे आणि सर्व संबंधित कागदपत्रांसह प्रवेश अर्ज. 

प्रवेशासंबंधित काही अडचणी आल्यास आपल्या नोंदणीकृत अभ्यासकेंद्राशी वि‌द्यापीठाच्या संबंधित विभागीय केंद्राशी / नोंदणी कक्षाशी संपर्क करावा. तसेच nondani@ycmou.digitaluniversity.ac ह्या मेलवर आपली अडचण कळवू शकता.

१६) विद्यार्थ्यांचे ओळखपत्र ऑनलाईन तयार केले जाईल. अभ्यासकेंद्र /विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून प्रिंट करू शकतात.

१७) अर्जदाराने स्वतःचा प्रवेश अर्ज स्वतः भरावा. मित्र / नातेवाईक / सायबर कॅफे यांच्यावर प्रवेश अर्ज भरण्याची संपूर्ण जबाबदारी सोपवू नये चूकीची माहिती भरलेला प्रवेश अर्ज अभ्यासकेंद्र/ विभागीयकेंद्राकडून अथवा वि‌द्यापीठाकडून नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे अर्जदाराचे शैक्षणिक / आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असेल.

१८) प्रवेशासंबंधीचे सर्व नियम, अटी व शर्ती तसेच आपण हमीपत्रा‌द्वारे दिलेली माहिती आणि 2024- 2025 या तुकडीच्या माहितीपुस्तिकेतील नियमांचे पालन करणे अर्जदारास बंधनकारक असेल.


मा. संचालक, विद्यार्थी

सेवा विभाग

उपकुलसचिव नोंदणी कक्ष


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.