सी सी आर टी कार्यशाळा नामनिर्देशनाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 9 जून 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
जा.क्र./राशैसंप्रपम/कला-क्रीडा/CCRT/२०२६/
दिनांकः ०९/०६/२०२६
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व)
२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (सर्व)
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)
४. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई.
५. शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)
६. शिक्षण निरीक्षक, (पश्चिम, दक्षिण, उत्तर), मुंबई.
७. प्रशासन अधिकारी, म.न.पा./ न.पा. (सर्व)
विषय - सी सी आर टी कार्यशाळा नामनिर्देशनाबाबत...
संदर्भ
- १. श्री राजीव कुमार, निदेशक, CCRT, नवी दिल्ली यांचा प्राप्त मेल सीसीआरटी/१३०११/१/२०२६ दि. ०४ मे, २०२६
२. Dr. Sandeep Sharma, Deputy Director (Training), Deputy, Centre for Cultural Resources and Training, Govt. of India, New Delhi - ११००७५ यांचा प्राप्त मेल दि.१९.०५.२०२६
३. Sh. Ashutosh, Deputy Director-Training-II (Workshop), Centre for Cultural Resources and Training, Govt. of India, New Delhi - ११००७५ यांचा प्राप्त मेल दि.२२.०५.२०२६
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणास कळविण्यात येते की, CCRT (Centre for Cultural Resources and Training) मार्फत वर्षभर सेवांतर्गत शिक्षक व अध्यापकाचार्य (Teacher Educators) यांच्यासाठी दिल्ली, हैद्राबाद, उदयपुर, दामोह, नागपूर व गुवाहाटी येथील केंद्रांवर प्रशिक्षण/कार्यशाळा/ अभिमुखता (Orientation) कोर्सेस आयोजित केले जातात. या कार्यशाळांमध्ये सहभागी शिक्षकांना आपल्या समृद्ध कलात्मक व सांस्कृतिक वारशाची ओळख करून दिली जाते. शिक्षण प्रक्रियेत विविध कलात्मक व सांस्कृतिक अभिव्यक्तींचा समावेश कसा करावा याची संकल्पना सहभागी शिक्षकांना या कोर्समधून दिली जाते.
CCRT मार्फत जून ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत सेवांतर्गत शिक्षकांसाठी प्रशिक्षण/कार्यशाळा/ अभिमुखता (Orientation) कोर्सेस करण्यात येणार आहेत. सोबत दिलेल्या लिंकमध्ये प्रशिक्षणाची माहिती देण्यात आलेली असून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात यावे. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल. प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम अशा क्रमाने तसेच सर्व जिल्ह्यांना प्राधान्य मिळेल अशा पद्धतीने शिक्षकांना नामनिर्देशित करण्यात येईल. सदरील लिंकवरच फेब्रुवारी २०२७ अखेरपर्यतचे कोर्सेस उपलब्ध होणार आहेत. दर दोन महिन्यांनी सदर लिंक अपडेट केली जाईल. सदरील लिंकवर नोंदणी करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना अवगत करण्यात यावे, तसेच उपरोक्त लिंकचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करण्यात यावा.
सोबत - नावनोंदणी लिंक https://forms.gle/k9tvVdUjdqdL.Ap1f6
Digitally signed by Arun Maruti Jadhav
Date: 09-06-2026 18:23:54
(अरुण जाधव)
उपसंचालक
सामाजिक शास्त्र, कला व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,, महाराष्ट्र, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंबई.
२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र, पुणे
विषय - CCRT प्रशिक्षण लिंक भरणेबाबत.
उपरोक्त विषयानुसार आपणास सूचित करण्यात येते की सी सी आर टी , नवी दिल्ली, गुवाहाटी, उदयपूर व तेलंगणा यांचे मार्फत
फेब्रुवारी 2026 मध्ये विविध प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार आहे. तरी इच्छुक शिक्षकांनी सोबत दिलेल्या लिंकमध्ये सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून दिनांक 12 जानेवारी 2026अखेर सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत आपली माहिती भरावी. अधिक माहितीसाठी सी. सी. आर. टी. नवी दिल्ली वेबसाईट पहावी. यावर्षी ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे त्यांनी लिंक भरु नये.
https://forms.gle/dSd2GhipCBofUNmH8
कला व क्रीडा विभाग
SCERTM पुणे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ने निर्गमीत केलेल्या दि. 28 मे 2024 रोजी च्या परिपत्रका नुसार सी.सी.आर.टी. प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत
१. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई.
२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व, यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
संदर्भ-
राहुलकुमार, उपसंचालक, सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र (CCRT), नवी दिल्ली यांचे पत्र क्र. सी सी आर टी / १३०११/१/२०२४/ दि.१६ मे २०२४
उपरोक्त विषयानुसार, सी. सी. आर. टी. (CCRT-Center For Cultural Resources & Training) नवी दिल्ली, यांच्या मार्फत जून २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दरमहा शिक्षकांसाठी प्रत्यक्ष (Offline) प्रशिक्षणांचे आयोजन केले जात आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणी खालील लिंकवर पुढील महिन्याच्या प्रशिक्षणासाठी करू शकतात.
https://forms.gle/nYoYUjwMq1peyTkV8
नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल. प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम अशा क्रमाने तसेच सर्व जिल्ह्यांना प्राधान्य मिळेल अशा पद्धतीने शिक्षकांना नामनिर्देशित करण्यात येईल. सदरील नोंदणी करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना अवगत करण्यात यावे. तसेच उपरोक्त लिंकचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करण्यात यावा.
(डॉ. माधुरी सावरकर)
उपसंचालक,
कला क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे ३०
प्रत माहिती व उचित कार्यवाहीस्तव :
• शिक्षणाधिकारी, प्राथमिक, सर्व जिल्हे. शिक्षणाधिकारी, माध्यमिक, सर्व जिल्हे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.




0 टिप्पण्या