राज्यातील खाजगी विनाअनुदानीत वरून अंशतः व पूर्णत अनुदानित वर बदली सरल पोर्टल वरून ऑनलाईन!

राज्यातील खाजगी विनाअनुदानावरून अंशतः व पूर्णत अनदानावर बदलीबाबत महाराष्ट्राच्या शिक्षण आयुक्तांनी दिनांक 27 मार्च 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे. 

महाराष्ट्र शासन

शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे ४११ ००१

दूरध्वनी क्रमांक 020-26121394/96

ईमेल: docsecondary1@gmail.com/doehighersec@gmail.com

जा.क्र.शिसंमा/विना-अनु बदली /कार्यासन-टि-४/टि-२/

प्रति,

विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),

विषय : राज्यातील खाजगी विनाअनुदानावरून अंशतः व पूर्णत अनदानावर बदलीबाबत.

संदर्भ :

 १. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७.

२. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१.

३. शासन परिपत्रक क्रमांक. एसएसएन-२०१६/प्र.क्र.३२/१६/टीएनटी-२ दि.२८.०६.२०१६

४. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन अधिसूचना क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र.३४१/टीएनटी-१, दि.०८.०६.२०२०.

५. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र.३४१/टीएनटी-१, दि.०१.०४.२०२१.

६. शासन परिपत्रक समक्रमांक दि.०१.१२.२०२२

७. रिट याचिका क्र.१५५२६/२०२३ सौ. शिंदे प्रितम मंगेश विरुध्द महाराष्ट्र राज्य व इतर प्रकरणी मा. उच्च न्यायालयाचे दि.२२.०१.२०२४ चे आदेश,

८. श्री. नितीन भिका ताडगे व इतर रिट याचिका क्र.२०४/२०१९ प्रकरणी मा. न्यायालयाने दि.१६.०४.२०२४ रोजी दिलेले आदेश.

९. फ्रेंडस सोशल सर्कल, अकोला व इतर विरुध्द महाराष्ट्र राज्य रिट याचिका क्र.८२१५/२०२२ प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दि.२१.०७.२०२३ रोजी दिलेले आदेश.

१०. शासन परिपत्रक क्रमांक-संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१२०/टिएनटि-१ दि.२९.०४.२०२४

११. शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१२०/टिएनटि-१ दि.०३.१०.२०२४.

१२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची अधिसूचना दि.१३.११.२०२५.

राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षकांच्या विनाअनुदानित/अंशतः अनुदानित शाळा अथवा तुकडी मधुन अनुक्रमे अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित शाळा अथवा तुकडीतील रिक्त पदावर बदलीच्या प्रस्तावास मान्यता देणेबाबतचे अधिकार दि.१३.११.२०२५ च्या अधिसूचनेने आयुक्त (शिक्षण) यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील विनाअनुदानित वरुन अंशत: अनुदानावरतसेच विनाअनुदान ते अनुदानावर बदलीचे प्रस्तावाबाबत सादर करणेसाठीचे ऑनलाईन पोर्टल संस्था लॉगीन व शिक्षणाधिकारी लॉगीन कार्यान्वित करण्यात येत असून सदरची सुविधा संस्था/ शाळा व शिक्षणाधिकारी यांचे लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार संस्था/शाळा स्तरावरुन परिपूर्ण प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने सादर करणेकामी आवश्यक निर्देश आपल्या अधिनस्त कार्यालयाना आपल्यास्तरावरुन देण्यात यावेत.

Digitally signed by

SACHIND SACHINDRA PRATAP SINGH Date: 27-03-2026 13:45:43

(सचिन्द्र प्रताप सिंह, भा.प्र.से) 

आयुक्त, शिक्षण

महाराष्ट्र राज्य पुणे-१


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download

 अनुदानित शाळा पदभरतीची पळवाट देखील बंद! एक एप्रिल 2019 मधील तरतुदीस स्थगिती देणेबाबत दिनांक 1 डिसेंबर 2022 चा शासन निर्णय. 


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील खाजगी विनाअनुदानित वरून अनुदानित शाळा किंवा तुकडीवर बदली करण्याबाबत अधिसूचना दिनांक 8 जून 2020 व शासन निर्णय दिनांक 1 एप्रिल 2021 मधील तरतुदी ला तुर्त स्थगिती देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


राज्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील कर्मचाऱ्यांना त्यांची कर्तव्य परिणामकारकरीत्या व कार्यक्षम रित्या पार पाडणे शक्य व्हावी म्हणून त्यांना सेवेत शाश्वती व स्थैर्य मिळवून देण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीचे विनियमन महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी विनियम अधिनियम 1977 नवे करण्यात आलेली आहे सदर अधिनियमांतर्गत महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी नियमावली 1981 तयार करण्यात आलेली आहे. सदर नियमातील नियम क्रमांक 41 नंतर विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदान शाळा अथवा तुकडी मधून अनुक्रमे अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित शाळा अथवा तुकडीवर रिक्त पदांवर बदली करण्याबाबत उपनियम शासन अधिसूचना दिनांक आठ जुलै 2020 अन्वय दाखल करण्यात आले आहे यामध्ये अतिरिक्त शिक्षक नसल्यास खात्री सेवाजेष्ठतेचे पालन विषयाची गरज लक्षात घेणे बदली पूर्वी शिक्षकांच्या नियुक्तीस मान्यता दिलेली असावी बदली रिक्त पदावरच करणे या तरतुदीचे पालन करणे आवश्यक असल्याचे नमूद आहे तसेच या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 1 एप्रिल 2021 अन्वय सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे. 

परंतु शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवर बंदी असताना मूळ नियमावलीत समाविष्ट करण्यात आलेला अधिनियम शासन अधिसूचना दिनांक 8 जुलै 2020 व शासन निर्णय दिनांक एक एप्रिल 2021 मधील तरतुदीचे पालन न करता विनाअनुदानित पदावरून अंशतः अनुदानित किंवा अनुदानित शाळा किंवा तुकडीवर शिक्षकांची बदली करून अशा शिक्षकांना शासनाच्या शंभर टक्के अनुदानित पदावरून वेतन देण्याबाबत अनियमिता झाल्याची निदर्शनास आले आहे त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. 

या शासन निर्णयान्वय दिनांक आठ जुलै 2020 मधील नियम क्रमांक पाच मधील उपनियम 41 व शासन निर्णय एक एप्रिल 2021 ला पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात येत आहे. 

सबब अशी स्थगिती दिल्या नंतर ही जे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आणि विभागीय शिक्षण उपसंचालक वैयक्तिक मान्यता देण्याची कार्यवाही करतील त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तणूक शिस्त व अपील नियम 1979 मधील तरतुदीनुसार शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल. 

स्थगिती कालावधीत काही न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास त्यामध्ये प्रकरण निकाली काढण्यासाठी तातडी आवश्यक असल्याची खात्री झाल्यास त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनास आयुक्त शिक्षण यांचेमार्फत आदेशार्थ व निर्यात सादर करण्यात यावा. 

राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शिक्षकांच्या बदलीबाबत संदर्भाधिन अधिसूचना दिनांक आठ जुलै 2020 व शासन निर्णय दिनांक १ एप्रिल 2021 मधील तरतुदीचे पालन झाले आहे किंवा नाही तसेच पद भरती बंदीच्या काळात बदली झाली आहे किंवा कसे याबाबत शहानिशा करून सविस्तर अहवाल शिफारसी सह शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी शासन परिपत्रकाच्या दिनांक पासून तीन महिन्याच्या आत शासनास सादर करावा. 

वरील प्रमाणे निर्देश शासन निर्णयानुसार देण्यात आले आहेत. 



वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.