या विषयावर शिक्षण विभागाची राज्यस्तरीय ऑनलाईन बैठक.. ०२/०६/२०२६

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 2 जून 2026 रोजी शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत सर्व अधिकार्‍यांची वेगवेगळ्या विषयांवर ऑनलाईन सभा आयोजित करणे बाबत पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.

 कमांक:- बैठक-२०२६/प्र.क्र.५३/समन्वय

दिनांक:- ०१.०६.२०२६

प्रति.

१. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

२. संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नीरोड, मुंबई.

३. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

४. संचालक, बालभारती, पुणे.

५. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे,

६. शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक/योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे.

७. जिल्हाधिकारी (सर्व)

८. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

९. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)

१०. शिक्षणाधिकारी (सर्व) (प्राथमिक/माध्यमिक/योजना)

११. शिक्षणाधिकारी (सर्व) (महानगरपालिका)

१२. शिक्षण निरिक्षक (सर्व), मुंबई.

विषय :- राज्यस्तरीय ऑनलाईन बैठक आयोजित करणेबाबत

महोदय,

मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली दि.२ जून, २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता शालेय शिक्षण विभागाशी संबंधित सोबत जोडलेल्या विषय सूचीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठक Video Conference द्वारे घेण्यात येणार आहे.

सदर बैठकीसाठी क्षेत्रिय अधिकारी यांनी स्वतंत्रपणे पुरविण्यात येणाऱ्या ऑनलाईन लिंक द्वारे उपस्थित रहावे. सदर बैठकीसाठी तालुका स्तरावरील शिक्षण विषयक कामकाज पाहणारे अधिकारी यांना शिक्षण अधिकारी कार्यालयात उपस्थित राहणेबाबत संबंधित शिक्षणाधिकारी यांनी सूचना द्याव्यात. सदर बैठकीसाठी आयुक्त (शिक्षण) यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे कडून ऑनलाईन लिक तयार करुन घेऊन सर्व संबंधितांना पाठविण्याची व सर्व संबंधितांना बैठकीस उपस्थित राहणेबाबत त्यांच्या स्तरावरुन सूचित करावे ही, विनंती.

सोबत वरील प्रमाणे


आपला,

(दत्तात्रय शिंदे) 

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत माहिती तथा योग्य कार्यवाहीसाठी अग्रेषित :-

१. मा. मंत्री, शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिन,

२. मा.प्रधान सचिव, यांचे स्वीय सहायक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई.

३. उप सचिव (सर्व) यांचे स्वीय सहायक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई


जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी(जि.प.) व शिक्षण विभाग अधिकारी संयुक्त बैठक.

१. शाळा प्रवेशोत्सव नियोजन

२. शालेय गणवेश उपलब्धता

३. पाठय पुस्तके वितरण

४.पी.जी.आय. (Performance Grading Index) बाबत विशेष लक्ष देणे.

५. शाळा व परिसर स्वच्छता

५.१. पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, शाळा इमारत रंग रंगोटी, पिंक रुम,

५.२. वर्ग खोली दुरुस्ती/बांधकाम

५.३. डी.पी.डी.सी., गौण खनिज, जि.प.सेस व इतर निधीतून प्राधान्याने

६. सीएसआर निधीसाठी जिल्हयातील प्रमुख उद्योजकांच्या मदतीने शाळेचा भौतिक विकास करणे.

७. जिल्हा व तालूका स्तरावरील सर्व वर्ग-१ व वर्ग-२ चे अधिकारी यांना जिल्हा परिषद, महानगर पालिका व नगरपालिकेच्या शाळा दत्तक देणे

८. शाळा व विद्यार्थी सुरक्षा योजना यांची प्रभावी अंमलबजावणी, प्रवास व्यवस्था, एकल पालक हेल्थकार्ड

९. अंगणवाडीचे वर्ग जि.प. शाळेय आवारात सुरु करणे

१०. आयडॉल शिक्षक यांच्या मदतीने परिसरातील इतर शाळांमध्ये नाविण्यापूर्ण उपक्रम राबविणे

११. शिक्षण पर्यटन उपक्रम प्रभावि अंमलबजावणी

१२. निपूण महाराष्ट्र अंतर्गत जून ते सप्टेंबर या कालावधीत लेखन, वाचन उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी

१३. राणी लक्षमीबाई आत्मरक्षा अभियान, देशभक्तीपर कवायत व योगा संचलन प्रबोधन प्रभावी राबविणे

१४. प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागावरील नामफलकावर मोठ्या अक्षरात शाळेचा युडायस क्रमांक व योजना लिहिणे बंधनकारक करणे

१५. मान्यता नसलेल्या बोगस शाळांची नावे प्रसार माध्यमांमधून प्रसिध्द करणे, सदर शाळे बाहेर शाळेस मान्यता नाही असा फलक लावून पालकांमध्ये जागृति करणे व संबंधित शाळा बंद करणे

१६. पवित्र पोर्टल भरती, पदोन्नती संदर्भातील निर्णय तात्तडीने घेण्यात यावेत, शिक्षक भरती नोंदणी करावी

१७. शाळा व्यवस्थापन समिती

१८. ११वी, १२ वी Face reading कॉमेरे / Classes साठी / college साठी.



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.