टिईटी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांसंदर्भात माहिती सादर करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक एक जून 2026 रोजी पुढील प्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना निर्देश दिले आहे
विधानमंडळ प्राथम्य/तात्काळ
क्र.संकीर्ण-२०२५/प्र.क्र.३१२/आस्था-१४
दिनांक :-१ जून, २०२६
प्रति, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
विषय :- टिईटी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांसंदर्भात माहिती सादर करणेबाबत.
महोदय,
मा. मुख्य सचिव महोदय आगामी साप्ताहिक बैठकीत टिईटी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांसंदर्भात आढावा घेणार आहेत. तरी खालील मुद्दयांची माहिती शासनास आज दुपारी ४.०० पर्यंत सादर करण्यात करण्याची आपणांस विनंती आहे.
१) टीईटी (TET) उत्तीर्ण शिक्षकांची एकूण संख्या
२) टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची टक्केवारी
३) तसेच शिक्षकांनी टीईटी परीक्षेस बसावे व ती उत्तीर्ण व्हावी, यासाठी आपल्या स्तरावर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती.
आपली,
(ज्योत्स्ना अर्जुन)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
प्रत :- शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (सर्व)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे - ०४
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) - २०२५
प्रसिध्दीपत्रक
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ परीक्षेचे आयोजन दि. २३/११/२०२५ रोजी करण्यात आले होते. या परीक्षेतील पेपर क्र. । (इ. १ ली ते इ. ५ वी स्तर) व पेपर क्र. ।। (इ. ६ वी ते इ. ८ वी स्तर) चा अंतिम निकाल दि.०३/०२/२०२६ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात आलेला होता.
सदर परीक्षेत पात्र उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्र त्या त्या जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद । शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांचे कार्यालयाकडे देण्यात येत आहे.
तरी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांचे कार्यालयात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्राचे वाटप दिनांक १८/०५/२०२६ ते ०८/०६/२०२६ या कालावधीत केले जाणार आहे तरी पात्रता धारक उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या वेबसाईट वरील सूचना वाचून आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह ज्या जिल्हयात परीक्षा दिली तेथील जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षण निरीक्षक मंबई (प/द/उ) यांचे कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावेत.
ठिकाण : पुणे
दिनांक : १५/०५/२०२६
(अनुराधा ओक)
आयुक्त
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे - ०४
प्रमाणपत्राचे वितरण खालील सूचना प्रमाणे करावे.
१. उमेदवारांनी खालील कागदपत्रे व प्रमाणपत्रे यांच्या प्रती घेऊन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र घेण्यासाठी उपस्थित रहाणे आवश्यक आहे.
अ) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र प्रत.
ब) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका प्रत.
क) डी.टी.एड. उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र अथवा बी.एड. उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक
ड) आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र.
इ) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र.
फ) माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा पुरावा.
ग) ओळखपत्र (आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्राइव्हिंग लाईसन्स, निवडणूक ओळखपत्र इ.)
२. प्रमाणपत्र वितरणाची पेपर निहाय नोंद वही ठेवावी.
३. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दि. २३/११/२०२५ चे पात्रता प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराला वितरित करताना प्रमाणपत्राच्या मागील पृष्ठावर संबंधित विद्यार्थ्याने शिक्षणाधिकारी (प्राथ.)/ शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांचे समक्ष स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. त्यानुसार स्वाक्षरी घेऊन व संबंधितांच्या प्रमाणपत्राची खात्री करुन शिक्षणाधिकारी (प्राथ.)/ शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांनी प्रमाणपत्र वितरीत करावे.
४. पात्र परीक्षार्थीना शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांचेमार्फत प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांचेकडे लेखी तक्रार नोंदवावी. अर्जासोबत पुरावा दर्शक कागदपत्रे (गुणपत्रक, प्रमाणपत्र) जोडावेत. शिक्षणाधिकारी प्राथमिक/शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांनी सदर तक्रारींचा शहनिशा करून स्वः अभिप्रायासह सदर तक्रारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे त्वरीत पाठवाव्यात.
(अनुराधा ओक)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे - ०४.
TET 23 नोव्हेंबर 2025 प्रमाणपत्र अपडेट
दि. २३/११/२०२५ रोजी झालेल्या (MAHATET परीक्षा) परीक्षेत पात्र उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्र त्या त्या जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद /शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांचे कार्यालयाकडे देण्यात येत आहे.
पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्राचे वाटप दिनांक १८/०५/२०२६ ते ०८/०६/२०२६ या कालावधीत केले जाणार आहे.
पात्र उमेदवारांनी वरील समबंधित कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावेत.
आवश्यक कागदपत्रे
उमेदवारांनी खालील कागदपत्रे व प्रमाणपत्रे यांच्या प्रती घेऊन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणप घेण्यासाठी उपस्थित रहाणे आवश्यक आहे.
अ) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र प्रत.
ब) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका प्रत.
क) डी.टी.एड. उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र अथवा बी. एड. उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक
ड) आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र.
इ) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र.
फ) माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा पुरावा.
ग) ओळखपत्र (आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्राइव्हिंग लाईसन्स, निवडणूक ओळखपत्र इ.)
शिक्षक पात्रता चाचणी (TET) प्रमाणपत्राच्या वैधतेच्या कालावधीत वाढ राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत.
नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशनच्या 50 व्या सर्वसाधारण सभेतील निर्णयानुसार आणि 7 जून 2021 रोजीच्या पत्र क्रमांक 21-3/2021-IS.1 च्या मंजूरीनुसार, पॅरा 11 चे दुसरे वाक्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे, एनसीटीईने पत्र क्र. 76-4/2010/NCTE/Acad. दिनांक 11/02/2011 जो "नियुक्तीसाठी TET पात्रता प्रमाणपत्राचा वैधता कालावधी सर्व श्रेणींसाठी जास्तीत जास्त सात वर्षांच्या अधीन असलेल्या योग्य सरकारद्वारे निश्चित केला जाईल." "नियुक्तीसाठी TET पात्रता प्रमाणपत्राची वैधता कालावधी, अन्यथा योग्य सरकारद्वारे अधिसूचित केल्याशिवाय, आजीवन वैध राहील" द्वारे बदलले जाईल.
2. पॅरा 11 ची इतर वाक्ये तशीच राहतील.
3. टीईटी मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून ही तरतूद पूर्वलक्षी प्रभावाने होणार असल्याने, 7 ( सात) वर्षे झाली.
तुमचा विश्वासू
(सुश्री केसांग यांगझोम शेर्पा, IRS)
सदस्य सचिव
वरील परिपत्रकानुसार आता टीईटी उत्तीर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्राची वैधता ही लाईफ टाईम असणार आहे म्हणजे एकदा टीईटी पात्र झाल्यानंतर पुन्हा टीईटी देण्याची गरज नाही.
या अगोदर टीईटी प्रमाणपत्राची वैधता ही सात वर्ष होती.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.





0 Comments