शिक्षकेत्तर पदावरून शिक्षक पदावरील नियुक्तीबाबतची 'ती' तरतूद रद्द! शासन निर्णय २५/०३/२०२६

 शिक्षकेत्तर पदावरून शिक्षक पदावरील नियुक्तीबाबतची तरतूद रद्द करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि २५/०३/२०२६ रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे. 


शिक्षकेत्तर पदावरून शिक्षक

पदावरील नियुक्तीबाबतची तरतूद रद्द करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण- २०२६/प्र.क्र.१६४/टिएनटि-१

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२

दिनांक : २५ मार्च, २०२६.

संदर्भ: शासन पूरकपत्र क्र. एसएसएन १०९९/ (३४०/९९) माशि-२, दि.१०.०६.२००५.

प्रस्तावना:- राज्यात शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीबाबतचा निर्णय सन २०१७ पासून शासनाने घेतलेला आहे. यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर नियुक्ती होत आहे. असे असताना उक्त संदर्भीय शासन पूरकपत्रकान्वये शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोणत्याही स्पर्धेशिवाय केवळ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या आधारावर शिक्षक/शिक्षण सेवक पदावर नियुक्ती केली जाणे, ही बाब विद्यार्थ्यांची अध्यापन प्रक्रिया व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्ता बाधित करणारी आहे. यास्तव सदरची तरतूद अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः

उक्त संदर्भाधीन शासन पूरकपत्र दिनांक १०.०६.२००५ मधील परिच्छेद क्र. ८ येथे खालीलप्रमाणे तरतूद आहे -

"शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याने माध्यमिक शिक्षकांसाठी वा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता प्राप्त केली आणि जर त्या संवर्गाचे पद माध्यमिक शाळेत वा उच्च माध्यमिक शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल तर, अशा प्रकरणी सदरहू शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यास शिक्षणसेवक म्हणूनच नियुक्ती द्यावी लागेल व त्यांना शिक्षणसेवकांचेच मानधन आणि इतर सर्व अटी व शर्ती लागू होतील. मात्र अशा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा ही सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरता येईल."

सदर तरतूद या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे.

०२. शिक्षकेत्तर पदावरुन शिक्षक/शिक्षण सेवक पदावर नियुक्तीबाबत कोणत्याही शासन आदेशात/परिपत्रकात/संलेखात असलेल्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तरतुदी देखील त्या मर्यादेत तात्काळ प्रभावाने अधिक्रमित करण्यात येत आहेत.

०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०३२५१७३७०६३९२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


ABASAHEB ATMARAM KAWALE

(आबासाहेब कवळे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१) मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मलबार हिल, मुंबई.

२) मा. सभापती / उपसभापती महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

३) मा. अध्यक्ष/उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

४) मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

५) मा मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.

६) मा. उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.

७) मा. मंत्री, शालेय शिक्षण, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.

८) मा. मंत्री, ग्रामविकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

९) मा. विधानसभा/विधानपरिषद सदस्य (सर्व)

११) संचालक (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.

१०) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

१२) सर्व विभागीय शिक्षण उपसंबालक.

१४) सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद.

१३) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

१५) शिक्षण निरीक्षक/प्रशासन अधिकारी, सर्व महानगरपालिका/नगरपालिका

१६) निवडनस्ती-टिएनटि-१.




महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.