राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या संस्थेच्या नामाभिधानाबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 25 मार्च 2026 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या संस्थेच्या नामाभिधानाबाबत.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: मराशै-२०१९/प्र.क्र.९७/प्रशिक्षण
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक: २५ मार्च, २०२६
वाचा:-
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. मराशै-२०१९/प्र.क्र.९७/प्रशिक्षण, दि. २९ नोव्हेंबर, २०१९.
प्रस्तावना:-
उपरोक्त दि. २९ नोव्हेंबर, २०१९ च्या शासन निर्णयान्वये "महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद" या संस्थेचे मराठी भाषेत नाव, "राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र" व इंग्रजी भाषेत "State Council for Educational Research and Training, Maharashtra" असे करण्यात आले होते.
२. भारत सरकारच्या अधिनस्त National Council of Educational Research and Training (NCERT) या संस्थेच्या नामकरणात देखील "of" शब्दाचा वापर करण्यात आलेला आहे. याच धर्तीवर देशातील इतर राज्यांमध्येही संबंधित संस्था "State Council of Educational Research and Training (SCERT)" या नावानेच कार्यरत आहेत. सदर वस्तुस्थिती विचारात घेता दि.२९ नोव्हेंबर, २०१९ च्या शासन निर्णयात दुरुस्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन शुध्दीपत्रक-
शासन निर्णय दि. २९ नोव्हेंबर, २०१९ मध्ये नमूद "राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र या संस्थेचे इंग्रजी भाषेतील नाव "State Council for Educational Research and Training. Maharashtra" याऐवजी "State Council of Educational Research and Training, Maharashtra" असे वाचण्यात यावे.
२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२६०३२५१७३९५४०५२१ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
Digitally signed by MOHINUDDIN B TASHILDAR
Date: 2026.03.25 17:40:53 +05'30'
(मो. बा. ताशिलदार)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
प्रत-
१. मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई
२. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे अप्पर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. उप मुख्यमंत्री, (नगर विकास) महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. मा. उप मुख्यमंत्री, (राज्य उत्पादन शुल्क) महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
५. मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. मा. राज्यमंत्री (शालेय शिक्षण) यांचेखाजगीसचिव, मंत्रालय, मुंबई
७. सर्व अ.मु.स./प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय मुंबई
८. प्रधान सचिव (शालेय शिक्षण), मंत्रालय, मुंबई.
९. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र शासन, पुणे
१०, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे
११. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र (१/२), मुंबई/नागपूर
१२. महालेखापाल (लेखा परिक्षा), १/२, महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
१३. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
१२. वित्त विभाग (व्यय-५/अर्थसंकल्प ८), मंत्रालय, मुंबई.
१३. अर्थसंकल्प कार्यासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
१४. निवडनस्ती (प्रशिक्षण)
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 Comments