दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ मधील तरतूदीच्या अनुषंगाने दिव्यांग अधिकारी / कर्मचारी यांच्या बदलीसंदर्भात सूचना निर्गमित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी शासन निर्णय आदेश निर्गमित करून पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
प्रस्तावना :-
दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ च्या कलम २० (५) अन्वये असे विहित करण्यात आले आहे की, शासकीय सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या व बदल्यांबाबत सुयोग्य शासन धोरण आखू शकेल. दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ च्या परिशिष्टामध्ये "निर्दिष्ट दिव्यांगत्व" याची व्याख्या करण्यात आली आहे, त्यानुसार भारत सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या दि.०८.१०.२०१८ च्या कार्यालयीन ज्ञापनाव्दारे ज्या कर्मचाऱ्यांचे अवलंबित कुटुंब सदस्य निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहेत, अशा काळजीवाहक कर्मचाऱ्यांना प्रशासकीय सोयीनुसार बदलीतून सूट देण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याच धर्तीवर राज्य शासकीय सेवेतील दिव्यांग प्रवर्गात मोडणारे शासकीय अधिकारी/कर्मचारी व ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील अवलंबित सदस्य असे निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहेत, अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात सूचना देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक :
राज्य शासकीय सेवेतील जे अधिकारी/कर्मचारी हे स्वतः किंवा त्यांच्यावर संगोपनासाठी अवलंबून असणारे मुलगा/मुलगी/आई-वडील/वैवाहिक जोडीदार/भाऊ बहिण हे दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६ च्या परिशिष्टामध्ये नमूद केलेले निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहेत व ज्यांच्याकडे त्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र आहे, त्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना संबंधित बदली करणारे सक्षम प्राधिकारी प्रशासनाची सोय आणि पदाची रिक्तता या बाबींचा सारासार विचार करुन सर्वसाधारण बदलीतून सूट देण्याबाबत विचार करतील.
२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०८२६१४५२०६४२०७ असा
आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
LEENA ASHISH SANKHE
(लिना संखे)
उप सचिव (सेवा), महाराष्ट्र शासन
वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments