Educational Annual Planning 2025-26 - शैक्षणिक कामकाज नियोजन दिनदर्शिका २०२५-२६ PDF Download

 प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालयातून निर्गमित दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी सध्या शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी शैक्षणिक कामकाज नियोजन २०२५-२६ बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


कोणतेही काम दर्जेदार व विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी प्रथमतः प्रभावी नियोजन करणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन राज्य, जिल्हा, तालुका व शाळा /वर्ग पातळीवर केले जाते. विविध शैक्षणिक व प्रशासकीय कामे राज्य पातळीपासून शाळा पातळीपर्यंत होत असतात. या सर्व उपक्रमांचे योग्य प्रकारे नियोजन करून प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास याचा विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी निश्चितच उपयोग होईल. या उद्देशाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शैक्षणिक कामकाज नियोजन (कैलेंडर) तयार करण्यात आले आहे. सदर कॅलेंडर तयार करताना विविध स्तरावरील अधिकारी व शिक्षक यांचा सहभाग घेतला होता.

सदर शैक्षणिक उपक्रम नियोजन तीन टप्प्यात तयार केले आहे १. दैनंदिन करावयाची कामे २. दरमहा करावयाची कामे ३. महिनानिहाय आठवडानिहाय करावयाची कामे, इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी व शाळा यांचा यामध्ये विचार केला आहे. यानुसार विविध शैक्षणिक कामांचे वरील तीन प्रकारात वर्गीकरण केले आहे.

शैक्षणिक कामकाज नियोजन हे फक्त शाळा शिक्षक / मुख्याध्यापक यांचेसाठी नसून राज्यस्तरावरील सर्व कार्यालये/ विभाग स्तरावरील कार्याल जिल्हा तालुका/बीट / केंद्र पातळीवरील कार्यालये व सर्व शाळा या सर्वांसाठी आहे. या सर्व स्तरावरीच कार्यालयांनी यातील कामकाजानुसार /उपक्रमानुसार आपल्याशी संबंधित बाबींची कार्यवाही दिलेल्या विहित कालावधीत प्रभावीपणे होईल याची दक्षता घ्यावी, यासाठी आवश्यक पूर्वतयारी, पत्रव्यवहार, निधी वितरण, कार्यक्रम आयोजन इत्यादी आवश्यक बाबी कराव्यात, या कैलेंडरमध्ये नमूद सर्व बाबी सर्जच कार्यालयांना अथवा सर्वच शाळांना लागू आहेत असे नाही. प्रत्येक शाळा, तसेच तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील कार्यालये यांनी आपल्याशी संबंधित कामांचे / उपक्रमांचे महत्व समजून आवश्यक नियोजन व अंमलबजावणी करावी.

सदर शैक्षणिक कामकाज नियोजनाचा उपयोग शाळा पातळी, तसेच तालुका, जिल्हा, विभाग, राज्य पातळीवरील सर्व कार्यालयांना आपल्या कामकाजामध्ये नियोजन करण्यास, प्रभावी अंमलबजावणी करण्यास, पाठपुरावा करण्यास व पर्यायाने विद्यार्थी विकासास हातभार लावण्यास होईल याची खात्री वाटते. आपण स्वतः व आपल्या अधिनस्त सर्व कार्यालय व शाळा यांना सदरचे नियोजन पीडीएफ (PDF) स्वरूपात उपलब्ध करून द्यावे. याचा हेतू लक्षात घेऊन विविध उपक्रमांचे / विषयांचे नियोजन व अंमलबजावणी करावी. सदर कॅलेंडरमध्ये आवश्यक बदल / सुधारणा असल्यास या कार्यालयास कळवाव्यात. जेणेकरून पुढील शैक्षणिक वर्षाचे कामकाज नियोजनात आवश्यक बदल / सुधारणा करता येईल.


 (डॉ. महेश पालकर) 

शिक्षण संचालक (माध्य व उच्च माध्य) महाराष्ट्र राज्य, पुणे

(शरद गोसावी) 

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे



शिक्षण आयुक्तालयाने दिलेली शैक्षणिक दिनदर्शिका 2025 26

शैक्षणिक कामकाज नियोजन वर्ष 2025 26 पीडीएफ डाउनलोड

Download

 

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.