महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय..
दिनांक- १५-६-२०२५
जाहिर प्रकटन
"शाळा प्रवेशोत्सव" २०२५-२६
दरवर्षीप्रमाणे शालेय शिक्षण विभागाने यावर्षीही मोठ्या प्रमाणात "शाळा प्रवेशोत्सव" साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. "शाळा प्रवेशोत्सव" हा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पट वाढविण्यासाठी व शालेय गुणवत्तेच्या वाढीसाठी राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील शाळा (विदर्भ वगळता) दि.१६/६/२०२५ पासून तर विदर्भातील शाळा दि.२३/६/२०२५ पासून सुरू होणार आहेत. या उपक्रमांतर्गत मा. श्री. देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री, मा. श्री. एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री, मा. श्री. अजित पवार उपमुख्यमंत्री सर्व मा. मंत्री, मा. खासदार, मा. आमदार, मा. सर्व लोकाप्रतिनिधी तसेच अधिकारी हे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विदयार्थ्यांचे शालेय प्रवेश प्रसंगी स्वागत करणेसाठी शाळेत उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विषयक सर्व योजना विदयार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहेत. प्रस्तुत उपक्रमांमुळे आजचा विदयार्थी भविष्यात राष्ट्रभिमानी, आत्मनिर्भर, यशस्वी व सुसंस्कारित नागरिक घडेल, यासाठी राज्य सरकार कटिबध्द आहे.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनांमुळे ग्रामीण तसेच शहरी आगातील विदयार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी मोठा हातभार लागत आहे.
मोफत पाठ्यपुस्तक योजना राज्यातील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमध्ये विदयाथ्यौना सर्व विषयाच्या माध्यमांची पुस्तके मोफत देण्यात येतात. यावर्षी राज्यात ७.२८,९६,५८५ पाठ्यपुस्तकांच्या प्रती वितरित करण्यात आल्या आहेत.
राज्यातील शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इ.१ ते इ.८ वी मधील शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांना दोन मोफत गणवेश, एक जोडी बुट, दोन पायमोजे शासनाकडून शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात येतात.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनांतर्गत शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमध्ये शिकणा-या विदयार्थ्यांसाठी दुपारचे पौष्टीक जेवण उपलब्ध करून देण्यात येते.
निपुण महाराष्ट्र अभियानातंर्गत इ.२ री ते इ.५ वी च्या प्रत्येक वर्गातील किमान ७५ टक्के विदयार्थ्यांना प्रथम भाषा व गणित विषयातील सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करण्याचे उद्दिष्टे ठरविले आहे.
शालेय आरोग्य तपासणी उपक्रमांखाली सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील सर्व विदयार्थ्यांना आरोग्य तपासणी करिता राष्ट्रीय व बालस्वास्थ्य कार्यक्रम राबविला जातो. विदयार्थ्यांच्या आरोग्याचे नियमित मुल्यांकन करण्यासाठी दरवर्षी शाळांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात.
"शाळा प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यासाठी "चला शाळेत जाऊया!"
शिक्षण....... आनंददायी..... गुणवत्तापूर्ण
शिक्षण..... भाकरीचे... राष्ट्रीयत्वाचे....
अशा अशयाचे बॅनर गाव पातळीवर लावण्यात आले आहेत, शाळेच्या पहिल्या दिवसाचे स्वागत करणेसाठी राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना मोबाईल वर एसएमएस पाठवून राज्य शासनामार्फत हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या शाळा प्रवेशोत्वस" या उपक्रमासाठी एकूण ४७३ लोकप्रतिनिधी तर २०५ इतके अधिकारी शाळेच्या पहिल्या दिवशी भेट देणार आहेत. या भेटीचा अहवाल संकलित करण्यासाठी तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांना शाळा पोर्टलवर लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भेटीचा संक्षिप्त अहवाल लिंकवर नोंदविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मान्यवर शाळेस भेट देणार असल्याने मान्यवरांना शालेय शिक्षण विभागाच्या विदयार्थ्यांसाठीच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी घडीपत्रिकाचे वितरण करण्यात आले आहे तसेच मा. मंत्री शालेय शिक्षण यांनी राज्यातील सर्व मंत्री महोदयांना पत्र लिहून शाळा भेटीचे निमत्रंण दिले आहे. त्याचबरोबर प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग व आयुक्त (शिक्षण) यांनी सुध्दा वरीष्ठ अधिका-यांनी शाळेस भेट देणेबाबत निमंत्रण पत्र दिलेले आहे.
"शाळा प्रवेशोत्सव" याउपक्रमास मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री सर्व मंत्री, मा. लोकप्रतिनिधी व अधिकारीगण यांच्या उपस्थितीमुळे विदयार्थी, शिक्षक, पालक व समाज यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या पटसंख्येत वाढ होऊन राज्याच्या शैक्षणिक प्रगतीस मदत होईल असा विश्वास शालेय शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
"शाळा प्रवेशोत्सव" हा उपक्रम राबविणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 12 जून 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
"शाळा प्रवेशोत्सव" हा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची गुणवत्ता व मुलांची उपस्थिती वाढविण्यासाठी राबविण्यात येत आहे. या शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर विभागामध्ये दिनांक १६.०६.२०२५ पासून तर विदर्भात दिनांक २३.०६.२०२५ पासून सुरु होत आहे. सदर उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत संदर्भ क्र २ च्या पत्रान्वये सविस्तर सूचना दिलेल्या आहेत.
"शाळा प्रवेशोत्सव" या उपक्रमांच्या नियोजनासाठी आपल्या जिल्हयामध्ये "शाळा प्रवेशोत्सव कक्ष" स्थापन करावा. सदर कक्षामध्ये आवश्यक कर्मचारी व अधिकारी यांची नेमणूक करावी. विदर्भ वगळता इतर विभागामध्ये दिनांक १६.०६.२०२५ पासून शाळा सुरु होत असल्याने दिनांक १४ व १५ जून २०२५ रोजी व विदर्भातील शाळा दिनांक २३.०६.२०२५ रोजी सुरु होत असल्याने दिनांक २१ व २२ जून २०२५ रोजी आपल्या कार्यालयातील शाळा प्रवेशात्सव कक्ष सुरु राहील याबाबत दक्षता घ्यावी. शाळा प्रवेशोत्सवाबाबत आवश्यक पूर्वतयारी करावी. तसेच राज्यस्तरावरुन मागितलेली माहिती तात्काळ सादर करावी शाळा प्रवेशोत्सव" हया उपक्रमाबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनला शाला प्रणालीमध्ये (school portal) शाळा भेटीचा अहवाल नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. विदर्भ वगळता इतर विभागात दिनांक १६.०६.२०२५ व विदर्भामध्ये दिनांक २३.०६.२०२५ रोजी भेट देणा-या मा. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या शाळा भेटीच्या अहवालाची नोंद करावयाची आहे. तरी दिलेल्या सुविधेमध्ये तालुक्यांतील शाळा भेटीची ची माहिती त्याच दिवशी नोंद करण्यासाठी आपल्या स्तरावरुन गटशिक्षणाधिकारी यांना कळवावे. सदर सुविधा ही शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशी संध्याकाळी ६.०० वाजता बंद होणार असल्याने विहित मुदतीत माहिती भरणेबाबत सर्व संबंधीतांना कळवावे.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक),
महाराष्ट्र राज्य, पुणे-१
प्रत माहितीस्तव सविनय सादर मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करणे व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा पट वाढविणेसाठी उपाययोजना करणेकरीता ऑनलाईन बैठक बाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक 14 मे 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
शासन निर्णय दिनांक १२/०३/२०२५ नुसार सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शाळेत मुलांची उपस्थिती व शाळेची गुणवत्ता वृध्दिंगत करण्यासाठी शासनाने निर्देश दिलेले आहेत. तसेच संदर्भ क्र.२ च्या पत्रान्वये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राज्य मंडळाच्या शाळा सुरु करणेबाबत विस्तृत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करणे व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या पटामध्ये लक्षणीय वाढ करण्याच्या दृष्टीने सर्व जिल्ह्यांमध्ये उपाययोजना करणे आवश्यक आहे.
यासाठी शाळा, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर सर्व शिक्षक, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी एकत्रिपणे उपाययोजना करणे गरजेचे आहे. या विषयाच्याअनुषंगाने शिक्षक व अधिकारी यांची मते जाणून घेऊन अंमलबजावणीचा कृती आराखडा तयार करावयाचा आहे. यासाठी दिनांक १५ मे, २०२५ रोजी दुपारी ०४:०० वाजता ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले आहे. सदर बैठकीस मा. मंत्री महोदय मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व राज्यस्तरीय संघटनांचे अध्यक्ष व सचिव (२ प्रतिनीधी) यांनी व उपरोक्त नमूद अधिकारी यांनी ऑनलाईन बैठकीस उपस्थित रहावे.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे-०१
प्रत माहितीस्तव सविनय सादर-
१. मा. मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, यांचे खासगी सचिव, मंत्रालय मुंबई.
२. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments