भविष्य निर्वाह निधी लेखा चिठ्ठी (GPF Slip) शालार्थ प्रणाली मार्फत तयार करुन वितरीत करणे संचालक आदेश

भविष्य निर्वाह निधी अभिलेखे अद्यावत करुन भविष्य निर्वाह निधी लेखा चिठ्ठी (GPF Slip) शालार्थ प्रणाली मार्फत तयार करुन वितरीत करणे बाबत  शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक यांनी दिनांक  13 जुलै 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.

शिसंमा/दि २०२६-२७/टि-६, बी

दिनांक :-०८/०७/२०२६

प्रति,

२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प.सर्व

२) अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (प्राथमिक/माध्यमिक) सर्व.

विषयः भविष्य निर्वाह निधी अभिलेखे अद्यावत करुन भविष्य निर्वाह निधी लेखा चिठ्ठी (GPF Slip) शालार्थ प्रणाली मार्फत तयार करुन वितरीत करणे बाबत.

संदर्भः संचालनालयाचे पत्र.क्र. शिसंमा/क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/जीपीएफ/स्लीप /२९३८ दिनांक-१३/०६/२०२५.

उपरोक्त विषयान्वये भविष्य निर्वाह निधी लेखा चिठ्ठी (GPF Slip) शालार्थ प्रणाली मार्फत तयार करुन वाटप करणे बाबत संदर्भिय पत्रान्वये कळविण्यात आले होते. तथापी एकूण १,७८,४९८ भविष्य निर्वाह निधी पात्र कर्मचाऱ्यांपैकी ७९८४९ कर्मचाऱ्यांचे शालार्थ Opening Balance शालार्थ प्रणालीवर अद्यावत करण्यात आलेले असून उर्वरीत ९८,६४५ कर्मचाऱ्यांचे Opening Balance शालार्थ प्रणालीवर अद्यावत करणे प्रलंबित आहे. याबाबतचा वेतन पथक निहाय तपशील सोबत जोडला आहे.

या संदर्भात पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१) दि.०१.०४.२०२१ रोजीचा Opening Balance शालार्थ प्रणालीव नोंद करणे आवश्यक आहे. तदनंतर ऑफलाईन पध्दतीने देण्यात आलेला परतावा, नापरतावा व अंतिम अदयागी याची नोंद प्रणालीवर करणे आवश्यक आहे. या करीता कालबध्द नियोजन करुन दि.३०.०९.२०२६ पर्यात आपल्या जिल्हयातील सर्व कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी संबंधित हिशोब शालार्थ प्रणालीवर अद्यावत करण्यात यावा.

२) उपरोक्त कार्यवाही करतेवेळी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी तसेच सन २०२६-२७ व सन २०२७-२८ मध्ये सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी हिशोब प्राधान्याने अद्यावत करावेत.

३) उपरोक्त प्रमाणे संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) व अधिक्षक वेतन पथक (प्राथमिक/माध्यमिक) यांनी दि. ०१.१०.२०२६ नंतर जी.पी.एफ परतावा / नापरतावा व अंतिम अदायगी तसेच नियमित व परतावा वजावट याबाबतची कार्यवाही शालार्थ प्रणाली मार्फत कार्यन्वीत होईल याची दक्षता घेण्यात यावी. तदनंतर भविष्य निर्वाह निधी संदर्भातील कोणतीही कार्यवाही ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार नाही याची याची नोंद घ्यावी.


Digitally signed by Sharad Shankargiri Gosavi Date: 13-07-2026 17:09:29

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक  प्राथमिक

Digitally signed by

PALKAR MAHESH MADHUKAR Date: 13-07-2026 15:53:23

(डॉ. महेश पालकर) 

शिक्षण संचालक

 (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

(प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१


प्रत- माहितीस्तव सविनय सादर.

३) मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे-१

४) विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व


प्रत- माहिती व कार्यवाहीस्तव-

श्री. पवन जोशी यांना देऊन कळविण्यात येते की, उपरोक्त कार्यवाही संदर्भात मार्गदर्शक

सूचना (SOP) शालार्थ प्रणालीवर देण्यात यावी.

शालार्थ पोर्टल लिंक

https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp



 भ.नि.नि. लेखा चिठठी (GPF Slip) ही सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये Live करणेबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 13 जून 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

संदर्भ- १) संचालनालयाचे पत्र दिनांक १३/५/२०२५

२) वेतन पथक (माध्यमिक) पुणे यांचे पत्र क्र. वेवभनिनिपपु/१७५४/२५-२६ दिनांक २७/५/२०२५.

३) वेतन पथक (माध्यमिक) कोल्हापूर यांचे पत्र क्र. वेपमाको/भ.नि.नि.ले.चि/२०२५ दि २७/५/२०२५.

संदर्भ क्र. १ अन्वये दिनांक ८/५/२०२५ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्तानुसार वेतन पथक, माध्यमिक, पुणे आणि कोल्हापूर यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील ५-६ शिक्षक कर्मचा-यांचे शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन भनिनि चिठठी तयार करून पडताळणी करणेबाबत कळविण्यात आले होते.

संदर्भ क्र. २ व ३ अन्वये वेतन वेतन पथक पुणे आणि कोल्हापूर यांनी ५-६ शिक्षक कर्मचा-यांचे शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन भनिनि चिठठी तयार करून वेतन पथक कार्यालयातील अभिलेख्याशी पडताळणी करण्यात आली असून सदर कर्मचा-यांच्या शालार्थ प्रणालीमध्ये भनिनि चिठठी व वेतन पथक कार्यालयातील अभिलेख्यांच्या भ.नि.नि चिठठया सुसंगत आढळून आल्याबाबत संचालनालयास अहवाल सादर करण्यात आलेला आहे. तथापि भनिनि चिठठी शालार्थ प्रणालीमध्ये Live करणेबाबत विनंती करण्यात आली आहे.

सबब संदर्भ क्र. २ व ३ अन्वये सादर अहवालानुसार भ.नि.नि. लेखा चिठठी (GPF Slip) ही सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये तात्काळ Live करण्यात यावी.

या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल या संचालनालयास सादर करावा.


 (डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रत- शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक/अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) संबंधित सर्व यांना कळविण्यात येते की, उपरोक्त विषयी संदर्भ क्र. २ व ३ अन्वये सादर अहवालानुसार भ.नि.नि. लेखा चिठठी (GPF Slip) ही सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये Live करण्यात येत असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे भ.नि.नि. लेखा चिठठ्याचे वाटप तात्काळ पूर्ण करावे.

शिक्षक कर्मचा-यांचा शालार्थ आयडी हाच त्याचा GPF नंबर असेल. शिक्षकांचे जिल्हयाबाहेर बदली झाली तरी त्याचे खाते वर्ग करण्याची आवश्यकता राहणार नाही.

तसेच सन २०२१ ते २०२४ पर्यंत जे अग्रीम घेतले आहे त्याची नोंद करूनच जीपीएफ स्लीपांचे वाटप करावे.

प्रत- विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व.

प्रत- माहितीस्तव सविनय सादर.

१. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१

२. वि. र. परमार, अवर सचिव, टिएनटी-६, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई-३२

३. कक्ष अधिकारी, टिएनटी-३ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई-३२



वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.