शिक्षक बदली पोर्टल 2025
सर्वांना कळविण्यात येते की , जि प बुलढाणा अंतर्गत ज्या शिक्षकांनी संवर्ग 1 मधून बदलीस होकार दिला आहे. त्या शिक्षकांना शाळांचे पर्याय पोर्टलवर नोंदविणे करिता दिनांक 12 जुलै 2025 ते 15 जुलै 2025 पर्यंत पोर्टलवर सुविधा उपलब्ध झालेली आहे. संवर्ग 1 अंतर्गत बदलीस होकार दिलेल्या शिक्षकांना केवळ बदलीपात्र शिक्षकांच्या जागाच मिळणार असल्याने आपल्या लॉगीन मध्ये उपलब्ध Eligible Teacher List चा अभ्यास करून व Vacancy List मध्ये असलेला शाळानिहाय सांखिकीय माहितीचा अभ्यास करूनच आपले लॉगीन मधून पर्याय निवडावे. संवर्ग 1 अंतर्गत पर्याय कसे निवडावे या विन्सीसच्या अधिकृत video चा उपयोग करणेबाबत सर्वांना अवगत करावे ही विनंती. कोणत्याही अनधिकृत पोस्टवर अवलंबून राहू नये.
जिल्हा बदली नियंत्रण कक्ष
जिल्हा परिषद बुलडाणा
अधिकृत मार्गदर्शनपर विन्स इस ने प्रकाशित केलेला व्हिडिओ
विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी मोबाईल वरून प्राधान्यक्रम कसा भरावा..
🎯 Open होणाऱ्या पेजवर आपला मोबाईल नंबर टाईप करा व Send OTP ऑप्शन वर क्लिक करा.
🎯 आपल्या मोबाईल नंबर वर OTP आला असेल तो टाकून लॉगिन करा.
🎯 लॉगिन केल्यानंतर सर्वप्रथम पोर्टलची भाषा मराठी करून घ्यावी त्याकरिता पेजवरील 'मराठी' या टॅब वर क्लिक करा आपल्या पोर्टलची भाषा मराठी होईल.
🎯 स्क्रीनवर आलेले declaration स्विकारून डाव्या मेनूतील Intra district वर क्लिक करावे.
🎯 त्यातील application form वर क्लिक करावे.
🎯 त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर application type व action असे दोन ऑप्शन दिसतील.
🎯 Cadre 1 च्या समोर view application चा tab दिसेल application tab वर क्लिक केले की.
🎯 Cadre 1 application form स्क्रीनवर दिसेल त्यावर.
शिक्षकाचे नाव, आडनाव, शाळेचा यु डायस नंबर, शिक्षकाचा शालार्थ आयडी,
ही माहिती आपणास दिसेल यामध्ये आपण कोणताही बदल करू शकणार नाही.
🎯त्याखाली मला बदलीतून सूट हवी आहे असा प्रश्न दिसेल व त्याखाली आपला संवर्ग एक मधील प्रकार दिसेल.
वरील सर्व ही माहिती आपण पूर्वीच पोर्टलवर अपडेट केल्यामुळे ती या स्थितीत read only mode मध्ये असेल ती माहिती बदलता येणार नाही.
🎯त्याखाली आपणास प्राधान्यक्रम निवडण्याबाबत पर्याय निवडा अशी सूचना दिसेल.
पर्याय निवडण्यासाठी add preferences या टॅब वर क्लिक केल्यानंतर.
🎯 खालील लाल रंगाच्या रकान्यामध्ये आपणास कमीत कमी एक व जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम निवडण्यासंदर्भात सूचना दिसेल.
🎯 याचाच अर्थ विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना कमीत कमी एक प्राधान्यक्रम निवडणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम आपण निवडू शकता.
🎯 प्राधान्यक्रम भरतांना त्याखालील drop down मधून तालुका निवडावा व त्याखालील drop down मधून शाळा निवडावी.
🎯 शाळा निवडल्यानंतर आपणास त्या शाळेमधील.
किती मंजूर पदे, किती कार्यरत पदे, शाळेतील रिक्त पदे, समानीकरणाअंतर्गत ठेवलेली पदे, बदली पात्र शिक्षकांची पदे,
ह्या सर्व संख्या दिसतील.
🎯 Add tab वर क्लिक केली की आपण निवडलेली शाळा आपल्या प्राधान्य क्रमामध्ये ऍड केली जाईल.
🎯 आपल्या प्राधान्यक्रमामध्ये प्रत्येक शाळा ऍड करताना add केलेली शाळा save करणे अनिवार्य आहे.
🎯 या ठिकाणी संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा दाखवल्या जातील याचाच अर्थ आपणास फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रमांमध्ये दाखवल्या जातील.
🎯 Add केलेली प्रत्येक शाळा save या tab वर क्लिक करून save करावी.
🎯आपण निवडलेला पर्याय जर आपणास नको असेल तर × या चिन्हावर क्लिक करून do you want to remove selected School हा pop up दिसेल त्याखाली yes वर क्लिक केले की निवडलेली शाळा पर्यायातून delete केली जाईल.
🎯 अशा पद्धतीने प्रत्येक शाळा जोडताना add preferences वर क्लिक करून शाळा जोडावी प्रत्येक शाळा जोडल्यानंतर save करावी.
🎯 अशा पद्धतीने आपणास आवश्यक तेवढ्या शाळा प्राधान्यक्रमात भरल्यानंतर आपल्याला आपला application form submit करणे आवश्यक आहे त्याकरिता त्याखालील submit tab वर क्लिक करून आपला फॉर्म submit करावा आपण फॉर्म submit न केल्यास आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही.
🎯 यानंतर आपल्या लॉगिन केलेल्या मोबाईल नंबर वर पुन्हा एक ओटीपी येईल तो ओटीपी सबमिट केल्यानंतर आपला प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
🎯स़वर्ग एकच्या शिक्षकांना दिनांक 11 जुलै 2025 ते 14 जुलै 2025 प्राधान्यक्रम भरण्याकरिता सुविधा दिलेली आहे त्यानंतर लगेच 15 जुलैला संवर्ग एक च्या बदली झालेल्या शिक्षकांची यादी पोर्टलवर प्रकाशित करण्यात येईल व लगेच त्यानंतर दोन दिवसांनी संवर्ग दोन ला प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
🎯 वरील माहिती ही फक्त मार्गदर्शनपर आहे प्राधान्यक्रम भरताना शासन आदेशाचा अभ्यास करून निर्णय घ्यावा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*संवर्ग 1 (विनंती बदली प्रकार)*
1️⃣ *बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागणारा पहिला दावेदार म्हणजे संवर्ग 1 होय.*
2️⃣ *पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा कालावधी दिला जातो.*
3️⃣ *आपण कमीत कमी 1 ते 30 पसंतीक्रम , आपल्या इच्छेनुसार भरु शकतो*
4️⃣ *आपण जर बदलीस पाञ असाल बदलीस होकार दिला असल्यास किंवा टप्पा क्रमांक 7 मध्ये असाल बदलीस होकार दिला असल्यास तर 30 पसंतीक्रम देणे गरजेेचे असेल*
5️⃣ *आपली विनंती बदली ही 1.8.1 ते 1.8.20 नुसार, क्रमवारीनुसार होईल.*
6️⃣ *उपप्रकारानुसार, एकाच उपप्रकारात अनेक शिक्षक असतील तर सेवाज्येष्ठतेनुसार बदली होईल*
7️⃣ *उपप्रकारात सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्यास प्राधान्य राहील*
8️⃣ *फक्त बदलीपाञ शिक्षकांच्या जागाच संवर्ग 1साठी दाखविल्या जातील*
9️⃣ *निव्वळ रिक्त पदे ही संवर्ग 1 साठी दाखवली जात नाहीत.*
🔟 *जर आपल्याला शाळा भेटली नाही तर,आणि आपण जर पुढील संवर्गा मध्ये पात्र असल्यास संबंधित टप्प्यावर आपली बदली होईल*
1️⃣1️⃣ *संवर्ग 1 मधून एकदा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षक पुढील 3 वर्ष अर्ज करु शकणार नाहीत*
1️⃣2️⃣ *बदलीपाञ शिक्षकांच्या जागांचा योग्य ताळमेळ साधणे आवश्यक आहे*
1️⃣3️⃣ *आपला संवर्ग 1 मधील यादीतील नंबर व उपप्रकारानुसार आपला असलेला क्रम पाहून, आपला पसंतीक्रम देणे गरजेचे आहे*
1️⃣4️⃣ *बदली फाॅर्म भरून झाल्यावर आपल्याला जी. मेल. द्वारे आपण भरलेल्या शाळा यांची सविस्तर माहिती जी.मेल. द्वारे आपल्याला प्राप्त होईल.*
1️⃣5️⃣ *आपण फक्त संवर्ग 1 मध्ये आहात, पुढील बदलीच्या* *कोणत्याच टप्प्यात नसाल, आपल्याला पसंतीक्रम देऊन* *शाळाच मिळालीच नाही ,तर आपण आहे त्या शाळेत राहणार आहात*
1️⃣6️⃣ *आपल्या संवर्ग 1 मध्ये आपल्या सिनियर शिक्षक किती आहेत ते पाहून आपले पसंतीक्रम निवडणे फारच आवश्यक आहे*
1️⃣7️⃣ *पसंतीक्रम भरून झाल्यावर तीन दिवस बदली पोर्टल रन होईल तद्नंतर संवर्ग 1 यांना, त्यांना मिळालेल्या शाळा(पसंतीक्रम)यांची यादी सविस्तर जाहीर होईल*
1️⃣8️⃣ *संदर्भ क्रमांक 5.10.4 नुसार, संवर्ग 1 मधून अर्ज भरून बदली करून घेतली,शिक्षकांबद्दल तक्रार प्राप्त झाल्यास नैसर्गिक न्याय म्हणून त्यांना मत मांडण्यासाठी 7 दिवसांचा अवधी असेल*
1️⃣9️⃣ *संदर्भ क्रमांक 5.10.5 नुसार जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतली हे निदर्शनास आल्यानंतर संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी योग्य ती कारवाई प्रस्तावित करतील*
2️⃣0️⃣ *पसंतीक्रम भरताना* *आपल्या सोयीच्या, त्यानंतर मध्यम सोयीच्या त्यानंतर ज्या शेवटच्या मोजक्याच शाळा की आपल्याला मिळतील अशा, या पध्दतीने पसंतीक्रम भरणे गरजेचे ठरेल,आपल्या इच्छेनुसार आपण* *योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे*
जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात आताची अपडेट.
🎯 जिल्हांतर्गत बदलीबाबत अतिशय महत्त्वाचे.. 🎯
✳️ संवर्ग एकच्या शिक्षकांनी फॉर्म भरताना खालील मुद्द्यांचा विचार करावा.
✳️ आज सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा निहाय रिक्त पदांच्या याद्या संध्याकाळी पोर्टलवर अपलोड करण्यात येतील याद्या अपलोड होताच प्रकाशित करण्यात येतील.
✳️ संवर्ग एकच्या शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा दिनांक 12 जुलै 2025 ते 15 जुलै 2025 या दरम्यान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
✳️संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरताना कमीत कमी एक शाळा व जास्तीत जास्त 30 शाळा भरणे अनिवार्य आहे.
✳️ जर आपण बदली पात्र नसाल तर आपण कितीही पर्याय भरले तरी चालतील कारण आपण बदली पात्र नसल्यामुळे आपण भरलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा न मिळाल्यास आपली पूर्वीची शाळा कायम राहील.
✳️ परंतु आपण बदली पात्र शिक्षक अथवा अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत या यादीमध्ये येत असाल तर निश्चितच जास्तीत जास्त पर्याय भरण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपण दिलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा आपल्याला मिळेल अन्यथा वरील टप्प्यांमध्ये बदली होऊ शकते यापुढे कोणतेही संवर्गाला मुदतवाढ मिळणार नाही.
🎯 पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर खालील लिंक वर आपला मोबाईल क्रमांक टाकून आपण पोर्टलवर पोर्टल सुरू झाल्यानंतर प्राधान्यक्रम भरू शकता.
बदली पोर्टल वरील वेळापत्रकानुसार दिनांक 12 जुलै 2025 पासून दिनांक 15 जुलै 2025 पर्यंत संवर्ग एक साठी शाळा प्राधान्यक्रम भरण्यास सुविधा पोर्टलवर उपलब्ध असणार आहे.
त्यानंतर दिनांक 16 जुलै 2025 ते 18 जुलै 2025 संवर्ग एक च्या बदलीसाठी पोर्टल रन होईल.
सर्वांना कळविण्यात येते की , जि प बुलढाणा अंतर्गत रिक्त पदांची यादी आज दि 11 जुलै 2025 ला प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर यादी प्रत्येक शिक्षकांना त्यांचे लॉगीन मध्ये उपलब्ध आहे याबाबत सर्वांना अवगत करावे ही विनंती.
जिल्हा बदली नियंत्रण कक्ष
जिल्हा परिषद बुलडाणा
बदली अपडेट
संवर्ग 01 मध्ये पात्र असलेल्या शिक्षकांना पसंतीक्रम भरण्यासाठी दिनांक 12.07.2025 ते दिनांक 15.07.2025 पर्यंतचा कालावधी देण्यात येणार आहे.
माहितीस्तव
जिल्हा अंतर्गत बदली लिंक.
रिक्त पदाच्या याद्या पोर्टल वर अपलोड झाले आहे..
लॉगिन केल्यावर Instra District मधे Vacancy List मधे जावून Download करता येतील.
Vacancy type
👇
#sanction post(शाळेवर संचमान्यतेने मंजूर पदे)
👇
#sanction working post(बदली प्रक्रियेनंतर संचमान्यतेनुसार शाळेवर कार्यरत ठेवायची पदे)
👇
#compulsory post(शाळेवर सामानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे)
👇
#other working post(बदली पोर्टलवर नसणारे परंतु सध्या शाळेत कार्यरत आहेत)#
👇
#current working post(शाळेवरील कार्यरत पदे)
👇
#Total current working post(शाळेवरील एकूण कार्यरत पदे)
👇
#current compulsory post(शाळेवर सध्या सामानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे)
👇
#current clear post(शाळेवरील निव्वळ रिक्त पदे)
👇
#Eligible post ( बदलीपात्र जागा)
Category
👇
HM -मुख्याध्यापक
UG- उपाध्यापक
Gr Math&sci - गणित/विज्ञान पदवीधर
Gr Lang- भाषा पदवीधर
Gr S/Sci - स.अभ्यास पदवीधर
बदली पोर्टल अपडेट झालेल्या वेळापत्रकानुसार दिनांक 11 जुलै 2025 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्तरावरून रिक्त पदांची यादी पब्लिश करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे!
ऑनलाइन जिल्हांतर्गत बदली संबंधाने रिक्त जागा घोषित करण्याविषयीची सद्यस्थिती (१० जुलै २०२५, रात्री ९.२२)...
राज्यात बुलढाणा व यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी एक अशा दोन तालुकास्तरावर रिक्त जागा अपलोड झालेल्या नाहीत. राज्यातील ३६१ पैकी ३५९ तालुक्यात रिक्त जागा अपलोड झाल्या आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावरून अद्याप एकाही जिल्ह्याची रिक्त जागा माहिती अपलोड झालेली नाही.
उद्या शुक्रवार दि. ११ जुलै पर्यंत रिक्त जागा संबंधाने मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावरील कार्यवाही पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
माहितीसाठी
बदली पोर्टल वेळापत्रक अपडेट
गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी स्तरावरून रिक्त पदांची यादी अपडेट करण्यासाठी दिनांक सात जुलै 2025 ते 10 जुलै 2025 पर्यंत मुदत देण्यासाठी वेळापत्रक अपडेट झाल्याचे दिसते.
दिनांक सात जुलै 2025 रोजी बदली पोर्टलला लॉगिन केले असता.
गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी स्तरावरून कडीप्त पदांची यादी अपडेट करण्यासाठी दिनांक सात जुलै 2025 ते 8 जुलै 2025 पर्यंत मुदत देण्यासाठी वेळापत्रक अपडेट झाल्याचे दिसते.
जिल्हाअंतर्गत बदली 2025
प्रति
गटशिक्षणाधिकारी सर्व,
नोडल अधिकारी ग्रुपवरील प्राप्त सूचनेनुसार आज मा. शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने बदली प्रक्रिया 2025 साठी आवश्यक सर्व अंतिम याद्या
1) विशेष संवर्ग भाग 1 पात्र शिक्षक
2) विशेष संवर्ग भाग 2 पात्र शिक्षक
3) बदली अधिकार प्राप्त शिक्षक
4) बदलीस पात्र शिक्षक
5) अवघड क्षेत्र (टप्पा क्र.7 साठी पात्र शिक्षक)इ.
प्रसिद्ध करण्यात येतील
याबाबत आपले स्तरावरून सर्व शिक्षकांना सूचित करावे.
👉तसेच काही शाळांच्या रिक्त पदामध्ये बदल करावयाचा असल्यास सदर सुविधा
✒️ दि.07.07.2025 ते 08.07.2025 गटशिक्षणाधिकारी यांचेसाठी दोन दिवस उपलब्ध असतील.
✒️ दि.09.07.2025 मा.शिक्षणाधिकारी यांना रिक्त पदांची माहिती व्हेरिफाय करणेसाठी 1 दिवस राखीव असेल.
✒️दि.10.07.2025 मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांना रिक्त पदांची माहिती व्हेरिफाय करण्यासाठी 1 दिवस राखीव असेल.
त्यामुळे ज्या शाळांमध्ये रिक्त पदांची माहिती बदल करायची असेल त्या शाळांची माहिती (यादी ) तयार ठेवावी.
उदा. संच मान्यता दुरुस्त केलेल्या शाळांच्या रिक्त पदामध्ये बदल झालेला आहे. किंवा अन्य कारण असू शकेल.
महत्वाची सूचना
रिक्त पदांची माहिती अपडेट करण्यासाठी ही अंतिम सुविधा असेल यानंतर कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
त्यानंतर
विशेष संवर्ग भाग 1 साठी विकल्प नोंद करण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल.
अनिस नायकवडी.
शिक्षण विभाग (प्राथमिक)
जिल्हा परिषद ,सातारा
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
बदली अलर्ट
यापुढील टप्पा-:
गटशिक्षणाधिकारी स्तरावरून
रिक्त पदे दुबार पडताळनी करून
दिनांक 07.07.2ग025 ते 08.07. 2025
EO लॉगिन ला पाठविणे
मा.EO login वर पडताळून
09.07.2025
मा.CEO Login ला पाठविणे
मा. CEO Login वरून अंतिम अप्रूव्हल देणे
10.07.2025
अंतिम दिनांक 10.07.2025
संवर्ग 01
अर्ज भरणे
11.07.2025 पासून १००% सुरू
जिल्हा परिषद शिक्ष क बदली पोर्टलवर वेळापत्रक अपडेट झाले आहे.
दिनांक पाच जुलै 2025 ते सहा जुलै 2025 या कालावधीत बदली पात्र शिक्षकांची यादी प्रकाशित करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे तर..
बदली पात्र बदली अधिकार प्राप्त संवर्ग एक व संवर्ग दोनच्या याद्या पुन्हा प्रकाशित करण्यासाठी देखील दिनांक पाच जुलै 2025 ते 6 जुलै 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
✳️ जिल्हाअंतर्गत बदली 2025 अपडेट
सध्या बदली पोर्टलवर शिक्षकांसाठी लॉगिन डिसेबल आहे
दिनांक 5 जुलै 2025
✳️ दिनांक 28/06/2025 ते 04/07/25 पर्यंत संवर्ग 1 व संवर्ग 2 च्या याद्यावर शिक्षकांनी केलेल्या आक्षेपवर (Appeal) माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सुनावणी करून या कालावधीत केलेले अपील मंजूर अथवा ना मंजूर करण्याची कारवाई 4 जुलैला पूर्ण झालेली आहे.
✳️ वरील कार्यवाही संपलेली असून दिनांक 5 जुलै 2025 ला संपूर्ण जिल्ह्यांच्या संवर्ग 1, संवर्ग 2, बदली अधिकार प्राप्त व बदली पात्र शिक्षकांच्या अद्यावत याद्या पोर्टल वर intra district मधील list मध्ये प्रकाशित करण्यात येतील.
✳️ त्यानंतर जिल्हा निहाय रिक्त पदे अपलोड करताना जिल्हास्तरावर आलेल्या अडचणीमुळे येत्या तीन ते चार दिवसात रिक्त पदे पोर्टलवर अपलोड करण्यात येतील व लगेच रिक्त पदांची यादी पोर्टलवर प्रकाशित करण्यात येईल.
✳️ प्रत्यक्ष बदली प्रक्रियेमध्ये प्राधान्यक्रम भरण्याच्या सुविधेला सुरू होण्याकरिता पूर्वतयारीचे वरिल दोन टप्पे बाकी आहेत.
✳️ रिक्त पदांच्या याद्या प्रकाशित झाल्यानंतर दिनांक 11 जुलै च्या आसपास स़ंवर्ग एकला प्राधान्यक्रम भरण्या संदर्भात पोर्टलवर वेळापत्रक प्रसिद्ध होईल व लगेच प्राधान्यक्रम भरण्याची संधी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल ही सुविधा पोर्टलवर सुरू होण्यापूर्वीच आपणास कळविण्यात येईल.
जिल्हा अंतर्गत बदली लिंक.
➡️बदली प्रक्रिये विषयी विचारले जात असलेल्या प्रश्नांचे समाधान.
✳️ माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठामध्ये दाखल अवमान याचिका क्र. 216/2024 मध्ये दिनांक 25/10/2024 रोजी सुनावणी दरम्यान जिल्हातर्गत बदली प्रक्रिया विहित वेळापत्रानुसार चालू करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत. त्यामुळे काही कारणास्तव जरी बदलीला उशीर झाला असला तरी बदली प्रक्रिया ही पूर्णच होईल.
✳️ जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया शासन आदेशानुसार दरवर्षी नियमितपणे करायचे असल्यामुळे शाळा सुरु झाल्या तरीही सन 2024/25 ची बदली प्रक्रिया RDD व Vinsys कडून पूर्ण करण्यात येईल.
✳️ सद्य परिस्थितीत बदली प्रक्रिया ही संत गतीने चालत असल्याचे दिसून जरी येत असेल तरीही बदली प्रक्रियेत प्रत्येक संवर्गाला किंवा प्रत्येक टप्प्याला दिला जात असलेला कालावधी हा शासन आदेशानुसार देण्यात येत आहे.
✳️ काही तांत्रिक अडचणी न आल्यास जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया ही 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे.
✳️कार्यमुक्ती संदर्भात काही अडचणी येऊ शकतात दिवाळीच्या दीर्घ सुट्टीमध्ये शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येऊ शकते परंतु या कालावधीत ज्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आचारसंहिता असेल त्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासंदर्भात अडचण येऊ शकते.
संजय नागे दर्यापूर
9767397707
जिल्हा अंतर्गत बदली अपडेट
👉Teacher Appeal To Ceo Completed
👉Ceo To Teacher Case Close Action In Process-- Date 28/6/2025 to 04/07/2025.
ऑनलाइन शिक्षक बदली प्रक्रिया अंतर्गत संवर्ग -१/२ संबंधाने मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर राज्यात ३२२ अपिल झाले आहेत. ४ जुलै पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अपिलावर निर्णय देणे अपेक्षित आहे.
या संबंधाने आज २८ जून २०२५ सकाळी ९.०४ वाजतापर्यंतची स्थिती खालील प्रमाणे आहे.
राज्यातील ३४ जिल्ह्यापैकी ०६ जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर कोणतेही अपील झालेले नाही.
(१) वर्धा (२) भंडारा (३) गोंदिया (४) चंद्रपूर (५) वाशिम (६) पालघर...
उर्वरित २८ जिल्ह्यात एकूण ३२२ अपील प्रकरणे आहेत.
(१) पुणे - ५२
(२) सातारा - ३४
(३) सांगली - ०१
(४) सोलापूर - २५
(५) कोल्हापूर - २४
(६) नागपूर - ०३
(७) गडचिरोली - ०२
(८) अमरावती - २४
(९) यवतमाळ - ०२
(१०) अकोला - ०५
(११) बुलढाणा - ०९
(१२) नाशिक - ३०
(१३) अहिल्या नगर - ०५
(१४) जळगाव - ०२
(१५) धुळे - ०२
(१६) नंदुरबार - १३
(१७) रत्नागिरी - ०२
(१८) सिंधुदुर्ग -०७
(१९) ठाणे- ०२
(२०) रायगड - ०५
(२१) छत्रपती संभाजी नगर - १६
(२२) नांदेड - ०४
(२३) लातूर - २४
(२४) धाराशिव - ०३
(२५) जालना - ०४
(२६) हिंगोली - ०४
(२७) बीड - ११
(२८) परभणी - ०७...
जिल्हा परिषद शिक्षक जिल्हा अंतर्गत बदलीसाठी बदली पात्र बदली अधिकार प्राप्त संवर्ग एक व संवर्ग दोन अशा सर्व याद्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील करण्यासाठीचा पोर्टल वरील आजचा 27 जून 2025 हा शेवटचा दिवस आहे.
प्रसिद्ध झालेल्या सर्व म्हणजेच बदली पात्र शिक्षक यादी, बदली अधिकार प्राप्त शिक्षक यादी, विशेष संवर्ग भाग एक यादी, विशेष संवर्ग भाग दोन यादी व अवघड क्षेत्रासाठी पात्र शिक्षकांची यादी या सर्व याद्यांवर शिक्षणाधिकारी यांच्याकडे ऑनलाईन अपील करता येते.
अपील करण्यासाठी सर्वप्रथम आपला मोबाईल नंबर टाकून ओटीपी घेऊन चर्चा टाकून लॉगिन करा.
त्यानंतर डाव्या बाजूच्या इंट्रा डिस्टिक वर क्लिक करा.
त्याखालील लिस्ट वर क्लिक करा.
ज्या यादीतील शिक्षकांवर आक्षेप घ्यायचा आहे.
त्या यादीवर क्लिक करा पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.
त्यामधील निळ्या रंगाच्या APPEAL TO CEO बटन वर क्लिक करा.
प्रसिद्ध झालेल्या याद्यांवर आक्षेप घेण्यासाठी ज्या शिक्षकावर आक्षेप घ्यायचा आहे अशा शिक्षकाचे नाव त्या शिक्षकाचा शालार्थ आयडी त्याचाच शाळेचा यु डायस नंबर व आक्षेपाची नेमके कारण नमूद करायचे आहे.
बदली पोर्टल लिंक
वरील लिंक वर क्लिक करून लॉगिन केल्यानंतर इंट्रा डिस्टिक मध्ये लिस्ट वर जाऊन कोणत्याही एका लिस्ट ओपन केल्यानंतर अपील टू सीईओ असे निळ्या रंगाचे वरील विंडोत असल्याप्रमाणे बटन ओपन होते त्यावर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होते.
जिल्हा परिषद शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टल लॉगिन केले असता आज दिनांक 25 जून 2025 रोजी पासून 27 जून 2025 पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पोर्टलवर प्रकाशित झालेल्या याद्यांवर आक्षेप घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
त्यानंतर दिनांक 28 जून 2025 ते 4 जून 2025 या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी घेतलेल्या आक्षेपाची सुनावणी घेऊन सदर प्रकरणे बंद करतील.
जिल्हा अंतर्गत बदली 2025 बाबत.....
बदली पोर्टल अपडेट
बदली पोर्टल लिंक
शासन स्तरावर बदली प्रक्रिया ही कुठेही थांबलेली नाही किंवा संथ गतीने सुरू नाही.शासन आदेशानुसारच प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे बदल्या ह्या 100% होतील फक्त प्रश्न आहे कार्यमुक्त करण्याचा.
शिक्षकांनी केलेल्या अपील वर जिल्हा शिक्षणाधिकारी सुनावणी घेऊन अपील मान्य/अमान्य करतील.यासाठी आज रात्री बारा वाजता 24/06/2025 मुदत संपेल जर मुदत वाढली नाही तर आपल्या सर्वांचे लक्ष लागून आहे की संवर्ग एक साठी प्राधान्यक्रम कधी भरण्यास सुरुवात होईल परंतु त्या अगोदर ह्या चार प्रक्रिया पूर्ण होतील.
1) माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील करणे.
2) मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अपील स्वीकारणे किंवा फेटाळणे ही प्रक्रिया होईल.
3) संवर्गनिहाय एक ते चार संवर्गाच्या याद्या या पुन्हा जाहीर करण्यात येतील..
4) माननीय शिक्षण अधिकारी रिक्त पदांची यादी प्रकाशित करतील.
5) त्यानंतर संवर्ग एक साठी प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात होईल.
बदली पोर्टल अपडेट
सेवानिवृत्तीसाठी केवळ एक वर्ष शिल्लक असणारे; मात्र ते बदलीपात्र यादीत असल्याने बदलीसाठी संवर्ग -१ मधून होकार/नकार कळविलेले राज्यात १२१८ शिक्षक आहेत. अशा ज्यांना सेवानिवृत्तीसाठी शिक्षकांची हमीपत्रे विन्सिसकडे पाठवायची आहेत. वर्धा जिल्ह्यात असे १४ शिक्षक असून त्या १४ शिक्षकांची हमीपत्रे पाठविण्यात आलेली आहे. मात्र राज्यातील अन्य कोणत्याही जिल्हा परिषदेतून कार्यवाही झालेली नाही. उर्वरित जिल्ह्यांनी दि. २२ जून सायं. ६ पर्यंत या संबंधाने हमी पत्र pdf आणि एक्सेल पाठवावे अशा सूचना आहेत.
अत्यंत महत्वाचे
जिल्हा़तर्गत बदली अपडेट 2025
संजय नागे दर्यापूर
संवर्ग शिक्षक भाग 1 मध्ये भाग घेतलेल्या अथवा न घेतलेल्या जे शिक्षक 30 जून 2026 पर्यंत सेवानिवृत्त होत आहेत अशा शिक्षकांची यादी Vinsys कडून प्रकाशित होईल.
त्या यादीतील शिक्षकांकडून ज्या शिक्षकांना बदली हवी आहे अथवा बदली नको आहे अशा शिक्षकांकडून बदली हवी किंवा नको याबाबत हमीपत्र घ्यायचे आहे व तसे इमेल द्वारे व्हिंसिसला अवगत करायचे आहे.
तरी यादी आल्याबरोबर कार्यालयाकडून आपणास अवगत केले जाईल.
ही प्रक्रिया आजच पूर्ण करायची असल्यामुळे ज्या शिक्षकांना 30 जून 2026 ला सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी कृपया दक्ष रहावे.
हे काम आच पूर्ण करावयाचे असल्याने आपण याबाबत दक्ष राहून व कार्यालयाशी संपर्क साधून पूर्ण करुन घ्यावे व तसे कार्यालयास कळवावे.
धन्यवाद
30 जून 2026 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांसाठी हमीपत्र बदली मधून सूट हवी/नको.
शिक्षणाधिकारी यांच्याकडे केलेल्या अपीलाबाबत कार्यवाहीसाठी दिनांक 24 जून 2025 पर्यंत बदली पोर्टलवर मुदत देण्यात आलेली आहे.
बदली पोर्टलवर 17 जून 2025 रोजी लॉगिन केले असता 17 जून 2025 रोजी शिक्षणाधिकारी यांच्याकडे अपील करण्याची मुदत संपून दिनांक 18 जून 2025 ते 24 जून 2025 या कालावधीत शिक्षणाधिकारी यांना केलेले अपील मंजूर अथवा ना मंजूर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
बदली पोर्टलला लॉगिन केल्यानंतर आज दिनांक 15 जून 2025 रोजी Appeal to EO ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
विन्सइस चा कपिल कशी करावी अधिकृत व्हिडिओ
बदली पोर्टल ला लॉगिन सुरू झाले आहे.
लॉगिन केले असता बदली पोर्टल वरील नवीन वेळापत्रकानुसार आज दिनांक 14 जून 2025 रोजी बदली पात्र बदली अधिकार प्राप्त संवर्ग एक व संवर्ग दोन च्या याद्या शिक्षणाधिकारी लॉगिन मधून पब्लिश करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
तसेच...
दिनांक 15 जून 2025 ते 17 जून 2025 पर्यंत या याद्यांवर शिक्षणाधिकारी यांच्याकडे अपील करता येण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
बदली 2025 अपडेट.
➡️ शिक्षक बदल्या 2025 बदली online पोर्टलचे LOGIN BEO , EO व शिक्षकांकरिता DISABLE करण्यात आलेले आहे.
➡️ संवर्ग 1 व संवर्ग 2 मधून अर्ज केलेल्या शिक्षकांची याद्या आज रात्री शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला उपलब्ध करण्यात येईल त्यानंतर लगेच संवर्ग 1 व संवर्ग 2 च्या याद्या शिक्षकांकरिता कार्यालयाकडून प्रसिद्ध केल्या जातील.
➡️ वरील याद्यांवर कोणालाही आक्षेप असल्यास प्रथम शिक्षणाधिकारी (Appeal to EO) यांच्याकडे आक्षेप, तक्रारी द्यावा लागेल.
➡️ शिक्षणाधिकारी केलेल्या कार्यवाहीवर आपणास समाधान नसेल तर पुन्हा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (Appeal to CEO)यांच्या कडे आक्षेप द्यावा लागेल.
➡️ वरील आक्षेपावरील कालावधी हा शिक्षक बदली शासन आदेशानुसार राहील (काही शिक्षकांनी तक्रारी केल्यामुळे)
➡️ वरील बदली प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा संवर्ग एक, संवर्ग दोन, बदली अधिकार प्राप्त व बदली पात्र शिक्षकांच्या याद्या प्रकाशित करण्यात येऊन संवर्ग एकला पसंतीक्रम भरण्याकरिता वेळापत्रक पोर्टलवर प्रसिद्ध केले जाईल.
धन्यवाद
संवर्ग एक व संवर्ग दोन च्या अर्जांची तपासणी करून सर्व जिल्ह्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी लॉगिन मधून वरील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण केली आहे.
आज दिनांक 13 जून 2025 रोजी ऑनलाइन टीचर ट्रान्सफर पोर्टलवर लॉगिन केले असता बदली पोर्टलवरील नवीन अपडेटेड वेळापत्रकानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिन मधून संवर्ग एक व संवर्ग दोन सबमिट केलेले अर्ज दिनांक 13 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देऊन रिजेक्ट करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बदली प्रक्रिया 2024-25 update
सर्व संवर्गासाठी बदलीप्रक्रियेमध्ये बदली वर्षाची दिनांक 31 मे ऐवजी 30 जून करण्यात आली आहे.
त्यामुळे काही शिक्षकांना 30 जून अखेर सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष व सध्याच्या शाळेवर 5 वर्ष पूर्ण झाले असतील ते Eligible (बदलीपात्र) झाले आहेत.
त्यांच्या login मध्ये dashboard वर त्यांच्या नावाशेजारी Eligible (बदलीपात्र) असे दिसत आहे.
आज दिनांक 10 जून 2025 रोजी बदली पोर्टलला लॉगिन केले असता बदली पोर्टलवरील नवीन अपडेटेड वेळापत्रकानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिन मधून संवर्ग एक व संवर्ग दोन सबमिट केलेले अर्ज दिनांक 12 जून 2025 पर्यंत रिजेक्ट करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अर्थात त्या अगोदर तालुकास्तरीय समिती मूळ कागदपत्रांची तपासणी करून सदर अहवाल जिल्हा स्तरावर कळवेल.
बदली पोर्टलवर संवर्ग एक किंवा दोन साठी अर्ज भरला असेल आणि आपल्याला कन्फर्मेशन मेल आलेला नसेल म्हणजेच पीडीएफ अर्ज आलेला नसेल.
त्यासाठी आता पुन्हा एकदा आपला मेल चेक करावा.
उशिरा रात्रीपर्यंत ई-मेल प्राप्त झाले आहे.
कन्फर्मेशन ई-मेल आला नसेल तर.
@ Email :- ottsupport@vinsys.com
या वरील ईमेलवर बदली पोर्टलवर जो आपला अधिकृत ई-मेल नोंदवलेला आहे त्या ईमेल आयडी वरून कन्फर्मेशन ई-मेल प्राप्त झाला नाही अशा आशयाचा ईमेल करावा आपल्याला कन्फर्मेशन ईमेल प्राप्त होतो.
बदली पोर्टल पूर्ण क्षमतेने सुरू झालेले आहे
संवर्ग१-तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का?
होय
नोंदवल्यास तुमचा बदलीसाठी नकार आहे असे मानले जाते
संवर्ग१-तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का?
नाही
नोंदवल्यास तुमचा बदलीसाठी होकार आहे असे मानले जाते
या YES/NO बाबींची योग्य ती नोंद घ्यावी.
संवर्ग 2 मध्ये : 30 किमी पेक्षा जास्त अंतर असलेले पतिपत्नी या मध्ये फक्त बदली लाभ घेता येतो नकार देता येत नाही.
🎯IMP: एक वेळ आपला प्रतिसाद नोंदवला गेला की परत बदल करता येत नाही त्यावर तुमची बदली अवलंबून आहे म्हणून काळजीपूर्वक आपला प्रतिसाद नोंदवावा.
बदली पोर्टल लिंक
संवर्ग एक व संवर्ग 2 अर्ज करण्यासाठी आज दिनांक 9 जून 2025 आजचा एक दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे!
जिल्हा परिषद शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली पोर्टलवर संवर्ग एक व संवर्ग दोन चे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
बदली पोर्टल महत्वाचे
सर्वांना कळविण्यात येते की, बदली पोर्टलवर संवर्ग - 1 व संवर्ग 2 मध्ये लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांची नोंद करण्याकरिता सुविधा सुरू झालेली आहे.
संवर्ग - 1
सर्वप्रथम Mobile नंबर आणि OTP टाकून LOGIN करावे.
⏹️अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी , अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाइल.
📌या समोरील ✅ करावा.
यानंतर तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे काय ? या प्रश्नाचे उत्तर होय किंवा नाही मध्ये द्यावे लागेल.
यानंतर विशेष संवर्ग भाग 1 चा प्रकार निवडायचा आहे
➡️Self किंवा Spouse* *स्वतः चे आधारे लाभ घेत असल्यास self निवडावे तसेच पती किंवा पत्नीच्या आधारावर लाभ घेत असल्यास spouse निवडावे.
यानंतर संवर्ग भाग -1 चा उपप्रकार निवडावा.
➡️स्वतःच्या आधारे असेल तर एक ते 14 पैकी जो लागू असेल तो पर्याय निवडावा.
➡️जोडीदाराच्या आधारे लाभ घेत असाल, तर 15 ते 20 या क्रमांकापैकी लागू असलेला क्रमांक क्रमांक निवडावा.
व OTP टाकून Submit करावे
संवर्ग -2
सर्वप्रथम
⏹️जिल्हांतर्गत बदली अर्ज शासन निर्णय मुद्दा क्रमांक 4.3.5 मध्ये नमूद केल्याप्रमाणे विशेष संवर्ग भाग-२ चा लाभ घेण्यासाठी, शिक्षकांनी सक्षम अधिकाऱ्यांकडून प्रमाणित केलेला ३० किमी चा दाखला उपलब्ध करून तो सादर करणे अनिवार्य आहे. मी ही प्रमाणपत्रे सादर करण्यास असमर्थ ठरलो तर माझा अर्ज रद्द करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहे हे मी मान्य करतो.
यासमोरील check box ✅ करावे
📌सध्याचे तुमचे व तुमच्या जोडीदाराच्या शाळांमधील अंतर 30 किलोमीटर पेक्षा जास्त असायला हवे.
सूचना दिसेल
➡️यानंतर संवर्ग भाग दोन मधील प्राधान्य क्रमांक निवडा
असे दिसेल
📌यामध्ये खालील ड्रॉप डाऊन मेनू मधील अनुक्रमांक 1 ते 7 मधील जे लागू असेल ते निवडावे
व OTP टाकून Submit करावे
💥टीप- आपण निवडलेले पर्याय ओटीपी टाकून सबमिट केल्याशिवाय ते ग्राह्य धरल्या जाणार नाही. आपण भरलेले पर्याय सबमिट झाल्याची खात्री करावी अनावधानाने विड्रॉल करू नये.याची गांभीर्याने नोंद घ्यावी.*
💥सद्यस्थितीत बदली पोर्टलला आपल्याला शाळा निवडायच्या नाहीत केवळ आपण संवर्ग एक किंवा दोन चा लाभ घेऊ इच्छिता का व त्याचे उपप्रकार एवढीच माहिती नोंदवायची आहे.
सद्यस्थितीत सदर सुविधा ही दिनांक 8 जून 2025 ला मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहील. त्यामुळे वेळेपूर्वी आपली माहिती नोंद करून घ्यावी.
🔁 OTT Support numbers :-
ऑनलाईन बदलीबाबत vinsys सॉफ्टवेअर पुणे यांचे महत्वाचे नंबर
1) 7757968420.
2)7757968435.
3) 02035050201.
4) 02035050203.
@ Email :- ottsupport@vinsys.com
आज दिनांक सात जून 2025 रोजी जिल्हा परिषद शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टलवर लॉगिन केले असता. संवर्ग एक व दोन साठी अर्ज करण्यासाठी दिनांक सात जून 2025 ते 8 जून 2025 पर्यंत मुदत दिल्याचे डॅशबोर्डवर दिसते.
अर्थात अजून कुठलाही अधिकृत आदेश ग्रामविकास विभागामार्फत देण्यात आलेला नाही.
संवर्ग एक दोन अर्ज कसा करावा अधिकृत व्हिडिओ
वेळापत्रक जरी दिसत असले तरी अर्ज करण्याची सुविधा मात्र अजून उपलब्ध झाली नाही.
ऑनलाइन शिक्षक बदली पोर्टलवर रिक्त पदांची यादी गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी स्तरावर अपडेट करण्यासाठी उद्या दिनांक 5 जून 2025 पर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती 7 जून 2025 पर्यंत देण्यात आली आहे.
ऑनलाइन शिक्षक बदली पोर्टलवर रिक्त पदांची यादी गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी स्तरावर अपडेट करण्यासाठी उद्या दिनांक 5 जून 2025 पर्यंत सुविधा उपलब्ध.
शिक्षक बदली पोर्टलवर लॉगिन केले असता आज दिनांक 4 जून 2025 रोजी बदली अधिकार प्राप्त बदली पात्र व अवघड क्षेत्रासाठी बदली पात्र शिक्षकांच्या याद्या पब्लिश करण्यासाठी पुन्हा आजचा दिवस मुदत वाढवून दिलेली आहे.
बदलीस पात्र ( Eligible), बदली अधिकार प्राप्त ( Entitled) व टप्पा क्र 7 साठी पात्र शिक्षकांची यादी आज कोणत्याही परिस्थितीत प्रसिद्ध करण्यात यावी. तसेच सदर यादीमध्ये काही सुधारणा असल्यास त्या आजच करण्यात याव्यात. तदनंतर यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, याची कृपया सर्व जिल्हा परिषदांनी नोंद घ्यावी.
आस्था-14, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
बदली पोर्टल वर बदली पात्र अधिकार प्राप्त अवघड क्षेत्रासाठी पात्र याद्या उपलब्ध झाल्या असून आपण आपले स्वतःचे लॉगिन करून आपल्या जिल्ह्याच्या याद्या पाहू व डाऊनलोड करू शकता.
अर्थात सर्वच जिल्ह्याच्या याद्या उपलब्ध झाल्या असतीलच असे नाही कारण दिनांक 2 जून 2025 पर्यंत याद्या अपलोड करण्यासाठी मुदत आहे.
💥बदली 2025 महत्त्वाचे💥
*जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांना कळविण्यात येते की,*
*आज दिनांक 01 जून 2025 ला*
*💥 बदलीपात्र शिक्षक सुधारीत यादी*
*💥 बदली अधिकार पात्र शिक्षक यादी*
*💥 विस्थापित राऊंडसाठी पात्र शिक्षक यादी*
*💥जर चुकीच्या माहिती मुळे आपली बदली झाली किंवा बदलीमधून सूट मिळवल्यास असे शिक्षक प्रशासकीय कारवाईस पात्र ठरतील.💥*
*🚨बदलीपात्र शिक्षकांची यादी🚨
*यामध्ये ज्या शिक्षकांचा सध्याच्या क्षेत्रात 10 वर्ष सेवा व सध्याच्या शाळेत 5 वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे यांचा समावेश होतो. या करिता current Area joining date व Current School joining date या दिनांकाचा उपयोग होतो.* *त्याकरिता प्रत्येकाने आपल्या या दोन्ही दिनांक तपासून बरोबर असल्याची खात्री करावी.*
*🚨Entitled List ( बदली अधिकार पात्र शिक्षक )🚨
*यामध्ये ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सेवा 3 वर्ष पूर्ण झाली असे शिक्षक येतील.तसेच ज्या शिक्षकांची 2022 मध्ये बदली अधिकार पात्र असतांना सुद्धा बदली न झालेले शिक्षक येतील.
*💥यामध्ये ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की, या यादीमधील शिक्षकांची current Ared joining date ही , ती शाळा अवघड क्षेत्र म्हणून घोषित झाल्याची दिनांक किंवा त्या शाळेवर रूजू झाल्याची दिनांक यापैकी जी नंतरची असेल ती असायला हवी.*💥
Difficult Area List ( Random Round करिता पात्र शिक्षकांची यादी )
*या यादीमध्ये ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात सलग 10 वर्ष सेवा पूर्ण झालेली असेल मग शाळेवर 5 वर्ष पूर्ण झालेले नसले तरीही व बदलीपात्र यादीमध्ये नाव नसले तरीही त्यांचे नाव सदर यादीमध्ये येईलच.
*त्यामुळे प्रत्येक शिक्षकांनी याद्या तपासून घ्याव्या व आपल्या Current Area joining date व Current School joining date तपासून घ्याव्या. यामध्ये आता कोणताही बदल होणार नाही याची नोंद घ्यावी.
माहितीस्तव
*जिल्हा बदली नियंत्रण कक्ष*
*जिल्हा परिषद बुलडाणा*
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टल वर लॉगिन होत आहे.
लॉगिन केले असता नवीन अपडेट प्रमाणे दिनांक 2 जून 2025 पर्यंत बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त तसेच अवघड क्षेत्रासाठी बदली पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यासाठी वेळ देण्यात आली आहे!
बदली पोर्टल प्रोफाइल अपडेट आज अंतिम मुदत!
बदली पोर्टलला लॉगिन केले असता आज पुन्हा दिनांक 30 मे 2025 रोजी शिक्षक प्रोफाइल अपडेट करण्यासाठी मुदत देण्यात आल्याचे दिसते.
बदली पोर्टल प्रोफाइल अपडेट आज अंतिम मुदत!
वरील लिंक वर जाऊन आपला मोबाईल नंबर टाकून ओटीपी घेऊन कोड टाकून लॉगिन करा आपली बदली पोर्टल वरील प्रोफाइल पुन्हा एकदा तपासून घ्या! त्यामध्ये काही बदल करायचा असल्यास म्हणजे काही चुकीची माहिती असल्यास ती बदलण्यासाठी तात्काळ गटशिक्षणाधिकारी यांना अर्ज करून त्यांच्याकडून ती दुरुस्त करून कारण ग्राम विकास विभागाच्या सूचनेनुसार बदली पोर्टल मधील शिक्षक प्रोफाइल मध्ये बदलाची अंतिम संधी आज दिनांक 30 मे 2025 रोजी पर्यंत उपलब्ध असणार आहे. त्यानंतर कोणताही बदल आपल्या प्रोफाईल मध्ये करता येणार नाही.
सार्वत्रिक बदल्या - २०२५ बाबत शिक्षक बदली पोर्टल सक्रिय झाले असून सर्व शिक्षक बांधव व भगिनी आपणास सर्वांना विनंती आहे की कृपया आपण आपला मोबाईल क्रमांक टाकून otp सत्यापित करून आपापली प्रोफाइल माहिती तपासून घ्यावी, त्यामुळे वेळेवर आपली अडचण होणार नाही
माहितीत काही त्रुटी असतील तर आपल्या केन्द्र प्रमुखांना कळवावे
लॉग इन साठी लिंक
https://ott.mahardd.com/teacher/profile
आज दिनांक 27 मे 2025 रोजी बदली पोर्टलवर लॉगिन केले असता बदली पोर्टल वर शिक्षणाधिकारी लॉगिन मध्ये शिक्षकांची माहिती अपलोड करणे व असलेली माहिती दुरुस्त करणे यासाठी 28 मे 2025 पर्यंत मुदत दिल्याचे दिसते.
त्याबरोबरच गटशिक्षणाधिकारी लॉगिन वरून शिक्षकांची प्रोफाइल माहिती एक्सेप्ट करण्यासाठी देखील दिनांक 28 मे 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
बदली पोर्टलवर दिनांक 24 मे 2025 रोजी बदली पात्र, बदली अधिकार प्राप्त व अवघड क्षेत्रासाठी पात्र शिक्षकांच्या प्रसिद्ध करण्यासाठी मुदत देण्यात आली होती.
परंतु मुदतीत याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यामध्ये अनेक चुका लक्षात आल्यामुळे आता त्या चुका दुरुस्त करण्यासाठी शिक्षकांच्या प्रोफाईल मधील माहिती दुरुस्त करण्यासाठी वेळ वाढवून दिला आहे.
अर्थात दिनांक 28 मे 2025 पर्यंत हे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व जिल्ह्यांच्या याद्या पोर्टलवर पब्लिश होऊ शकतात.
जि.प. शिक्षकांच्या बदल्यांबाबत महत्वाच्या सूचना -
1) प्रोफाईल अपडेट साठी पोर्टल केवळ दोनच दिवस सुरु राहील. त्यानंतर प्रोफाईल अपडेट करता येणार नाही, याची सर्व जिल्हा परिषदांनी कृपया नोंद घ्यावी.
2) संचमान्यता सन 2023-24 व सन 2024-25 नुसार सर्व जिल्हा परिषदांनी रिक्त पदांची माहिती अद्ययावत करुन तयार ठेवावी. पोर्टल सुरु होताच सदर माहिती एक दिवसामध्ये भरुन पूर्ण करावी.
3) मे.विन्सीस कडून बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करण्यात येतील व बदलीची पुढील प्रक्रिया सुरु होईल.
कार्यासन- आस्था-14,
ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
परंतु बदली पोर्टल वर गेल्यानंतर बदली पात्र व अवघड क्षेत्रासाठी पात्र शिक्षकांच्या याद्या उपलब्ध आहेत मात्र बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी अद्याप 25/05/2025 दुपारी 12:40 पर्यंत पोर्टलवर पब्लिश झाली नाही.
अर्थात त्यात तांत्रिक अडचण असल्यास ती सोडवली जाऊ शकते.
मात्र प्रशासकीय अडचण असेल तर ती उद्या कार्यालयीन दिवशी सोडविण्याची शक्यता आहे.
ही एका जिल्ह्याची परिस्थिती आहे इतर जिल्ह्यांची वेगळी असू शकते.
बदली पोर्टलवर लॉगिन करून आपण आपल्या जिल्ह्याची परिस्थिती काय आहे ते चेक करू शकता.
जिल्हा अंतर्गत बदली- अवघड क्षेत्र निकष बाबत महत्त्वपूर्ण..!
थेट ग्रामविकास स्तरावरून,
आपला स्नेही,
महेश ठाकरे
📞7745823492
प्रहार शिक्षक संघटना.
जिल्हा परिषद मधील कार्यरत शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2025 अंतर्गत अवघड क्षेत्रातील काही बदल या ठिकाणी प्रामुख्याने सर्व शिक्षक बांधवांच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यातून शिक्षकांनी याबाबत विचारणा केली होती. करिता याबाबत ग्राम विकास स्तरावरून मार्गदर्शन घेऊन सदर पोस्ट च्या माध्यमातून ही माहिती देण्यात येत आहे.
➡️अवघड क्षेत्रातील बदली प्रक्रियेबाबत महत्वपूर्ण..
👉 अवघड क्षेत्रातून बदली प्राप्त शिक्षक हा त्या अवघड क्षेत्रात एकूण सेवा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक झालेली असेल हा निकष महत्त्वपूर्ण मानला आहे.
👉 अवघड क्षेत्रात एकाच शाळेवर सलग तीन वर्ष सेवा असणे गरजेचे नसून अवघड क्षेत्रातील एकूण सेवा ही तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो संबंधित शिक्षक बदली अधिकार प्राप्त ठरतो. आणि अशा सर्व शिक्षकांची ( जे अवघड मधून अवघड मध्ये बदली केलेले असतील त्यांची सुद्धा) नावे ही बदली अधिकार प्राप्त यादीमध्ये अंतर्भूत असणार आहे.
👉 ज्या शाळा 2022 पूर्वी अवघड क्षेत्रात होत्या आणि पुन्हा 2022 नंतर अवघड क्षेत्रात आलेल्या आहेत अशा शाळेवरील शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त यादीमध्ये दाखविले जाणार आहे.
👉 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या यादीमध्ये संबंधित शिक्षकाची एकूण जिल्ह्यातील सेवा जेष्ठता हा निकष विचारात घेण्यात आलेला असून अवघड क्षेत्रातील वास्तव सेवा हा निकष या यादीमध्ये विचारात घेण्यात आलेला नाही हे उल्लेखनीय .
👉 अवघड क्षेत्रातील वास्तव सेवा विचारत न घेण्यात आल्याने एकूण सेवा ही त्या जिल्ह्यातील शिक्षकांची ग्राह्य धरण्यात आल्याने अवघड क्षेत्रातील वास्तव सेवा धारक शिक्षक हा बदली अधिकार प्राप्त यादीमध्ये ज्युनियर ठरला आहे.
➡️संवर्ग १ व २ बाबत महत्वपूर्ण ..
शासन निर्णय नुसार अवघड क्षेत्रामध्ये एकूण सेवा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तो संबंधित शिक्षक बदली अधिकार प्राप्त ठरतो.हा निकष संवर्ग एक अथवा दोन मधील शिक्षकांना देखील क्रमप्राप्त असल्याने संवर्ग एक व दोन मधील शिक्षकांना देखील विनंती बदली करिता अवघड क्षेत्रामध्ये एकूण सेवा ही तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
👉 अवघड क्षेत्रामधील बदली प्रक्रिया करिता बदली पात्र व रिक्त पदे दाखविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
करिता अवघड क्षेत्रातील सर्व शिक्षक बांधवांच्या माहितीस्तव...
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत बदली पात्र शिक्षकांची सुधारित यादी आज दिनांक 24 मे 2025 ला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी सर्व शिक्षकांच्या निदर्शनास सदर यादी आणून देण्यात यावी.
बदलीपात्र शिक्षकांची यादी
यामध्ये ज्या शिक्षकांचा सध्याच्या क्षेत्रात 10 वर्ष सेवा व सध्याच्या शाळेत 5 वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे यांचा समावेश होतो. या करिता current Area joining date व Current School joining date या दिनांकाचा उपयोग होतो.
शिक्षकांना त्यांचे लॉगिन मध्ये सुद्धा सदर यादी डाऊनलोड करता येण्याची सुविधा उपलब्ध आहे.
बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या याद्या व अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी टप्पा क्रमांक सात करिता पात्र असलेल्या शिक्षकांच्या याद्या आज सायंकाळपर्यंत प्रसिद्ध करण्यात येतील.
जिल्हा बदली नियंत्रण कक्ष
जिल्हा परिषद बुलडाणा
आज संध्याकाळपर्यंत सर्व जिल्ह्यांच्या बदली पात्र बद्दल अधिकार प्राप्त तसेच अवघड क्षेत्रासाठी पात्र शिक्षकांची यादी देखील प्रसिद्ध होणार आहे!
बदली पोर्टल वेळापत्रक अपडेट
जिल्हा परिषद शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली बाबत बदली पोर्टलवर वेळापत्रक अपडेट झाले आहे.
सदर वेळापत्रकानुसार आज शिक्षणाधिकारी बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या पुन्हा प्रकाशित करण्यासाठी आज दिनांक 24 मे 2025 रोजी चा वेळ दिला आहे.
तसेच अवघड क्षेत्रासाठी पात्र शिक्षकांची यादी देखील आजच दिनांक 24 मे 2025 रोजी प्रकाशित करण्यासाठी वेळ दिला आहे
बदली पोर्टल अपडेट
रिक्त पदे माहिती भरणे
दिनांक 19/05/2025 ते 22/05/2025
आज पासून 22 तारखे पर्यंत beo लॉगिन वर रिक्त पदांची माहिती भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.22 तारखेनंतर बदली बाबतची पुढील प्रक्रिया सुरू होईल.
न्यायालयाच्या निर्णयानंतर ग्रामविकास विभागाने आज काढलेल्या परिपत्रकावरून बदली पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
आजच्या निकालानंतर काय होऊ शकतं..?
🍁 शासनाने निकाल स्वीकारला तर, बदली पोर्टलवर आपसी आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची Currentt District Joining Date मध्ये तसे बदल करावे लागतील.
🍁31 मे पर्यंत बदली प्रकिया पूर्ण होऊ शकत नाही. बदलीसाठी किमान 31 जुलै पर्यंत मुदतवाढ घेऊन सुधारित वेळापत्रक जाहीर करावे लागेल.
🍁 शासनाला आपल्या भूमिकेवर ठाम राहायचं असेल तर सेवाप्रवेश नियम 1967 मध्ये सुधारणा करावी लागेल. मात्र त्यासाठी विधानसभेत मंजुरी घ्यावी लागेल. या प्रक्रियेसाठी बराच कालावधी लागू शकतो.
मंत्रालयीन अपडेट✌️✌️
गजानन पांचाळ सर ✌️🤝
आताच बांधकाम भवन मंत्रालय येथील जबाबदार अधिकाऱ्यांशी स्वराज्य शिक्षक संघटनेच्या राज्याध्यक्ष या नात्याने संवाद केला असताजिल्हा अंतर्गत बदली पोर्टल लवकरच 12 किंवा 13 मे या तारखेपासून सुरू होईल, शिक्षकांच्या प्रोफाईल मध्ये काही तारखा बदलायच्या असल्यास त्या ही होतील. मा.न्यायालयाने निकाल दिल्याप्रमाणे कारवाई होऊन पोर्टल रन होईल अशी माहिती मिळाली.
आपला मित्र
गजानन पांचाळ 🙏
राज्य अध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य
बदलीसंदर्भात शिक्षकांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा – सेवा वरिष्ठता ग्राह्य धरण्याचा निर्णय.
9 मे 2025 | औरंगाबाद खंडपीठ, उच्च न्यायालय
शिक्षकांच्या परस्पर आंतरजिल्हा बदल्यानंतर नवीन जिल्ह्यातील सेवा वरिष्ठता ग्राह्य धरण्याबाबतचा मोठा निर्णय आज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून देण्यात आला. न्यायालयाने शासनाच्या नकारात्मक निर्णयाला झुगारत शिक्षकांच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
मुख्य मुद्दा:
परस्पर आंतरजिल्हा बदलीनंतर नवीन जिल्ह्यातील सेवा वरिष्ठता ही अंतर्गत जिल्हा बदलीसाठी ग्राह्य धरावी की नाही? या प्रश्नावर आज निकाल देण्यात आला.
न्यायालयाचा स्पष्ट निर्णय:
• सेवा वरिष्ठता ग्राह्य धरावी
• शासनाचा 28 मार्च 2025 रोजीचा नकारात्मक पत्र रद्द
• MZP सेवा नियम 1967 चे कलम 6(8)(ii) नुसार निर्णय
• शासनाचा आडमुठेपणा झुगारत शिक्षकांना दिलासा
निकालाचे परिणाम:
1. बदली प्रक्रियेवरील तांत्रिक स्थगिती हटवली
2. शिक्षक आता पोर्टलवर आपली सेवा व वरिष्ठता दुरुस्त करून अंतर्गत बदल्यास पात्र ठरू शकतील
3. ज्याची सेवा कमी असेल, त्याच वरिष्ठतेनुसार दोघांची गणना होणार
4. ऑनलाईन पोर्टलवरील प्रोफाइलमध्ये आवश्यक दुरुस्ती करणे गरजेचे
पुढील प्रक्रिया:
• BEओ व EO यांचे व्हेरिफिकेशन 3-4 दिवसांत अपेक्षित
• नवीन बदल्यांचे वेळापत्रक 15 मे ते 16 जूनदरम्यान जाहीर होण्याची शक्यता
• शासनाच्या अधिकृत सूचनेनंतर पोर्टल अपडेट होणार
• प्रत्येक संवर्गासाठी पूर्वनियोजित दिवस अपरिवर्तनीय
महत्त्वाचा निष्कर्ष:
• आता शिक्षकांची बदली निश्चितच होणार
• बदल्यांबाबत शासनाची ठाम भूमिका
• निवडणूक आचारसंहितेचा बदल्यांवर परिणाम नाही
• बदल्या 15 जूनपूर्वी पूर्ण करणे ही शासनाची जबाबदारी
न्यायालयीन प्रकरणे व संच मान्यता 2024 25 यामुळे सध्या ऑनलाईन बदली पोर्टल बंद असल्याचे समजते.
न्यायालयीन प्रकरणांमधील पती-पत्नी एकत्रीकरण नकार अधिकार बाबत याचिका फेटाळली आहे.
तसेच सातवा राऊंड सेवाजेष्ठ शिक्षकांना तीन वर्ष किंवा पाच वर्षे एका शाळेवर झालेले नसल्यामुळे बदली करण्यात येऊ नये अशी याचिका देखील बदली धोरण ठरवण्याचे अधिकार शासनाचे आहेत म्हणून न्यायालयाने फेटाळली आहे.
मात्र आपसी बदली बाबत याचिका दाखल झालेली असून सदर याचिकेची पुढील सुनावणी पाच मे 2025 रोजी आहे.
न्यायालयाचा आदेश.
तसेच संच मान्यता 2024 25 देखील अंतिम टप्प्यात असून सदर संच मान्यतेनुसार बदल्या करण्याबाबत विचाराधीन आहे.
वरील माहिती ही आपल्याच शिक्षक बांधवांकडून मिळालेली आहे. याबाबत ग्रामविकास विभागाच्या कोणताही अधिकृत आदेश किंवा सूचना उपलब्ध नाही.
बदली प्रक्रिया 2024-25 Updates
👉 ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार बदली portal सध्या down करण्यात आले आहे.
👉 बदली portal बंद ठेवण्यामागे अधिकृत कारण सध्या RDD व vinsys कंपनीकडून देण्यात आलेले नाही.
👉 बदली portal बंद करण्यामागील अधिकृत माहिती प्राप्त होताच ग्रुपवर कळवली जाईल.
महत्वाची बाब,
👇👇
👉 काही ग्रुपवर न्यायालयीन आदेशाने पोर्टल बंद केले असल्याबाबतचे message येत आहेत ते अधिकृत नाहीत.
👉 सध्याची 2024-25 बदली प्रक्रियाच मा.उच्च न्यायालय नागपूर अवमान याचिका क्र.216/2024 निर्णयाच्या अधीन राहून वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न RDD व Vinsys कंपनीकडून केला जात आहे.
👉 मा.उच्च न्यायालय नागपूर अवमान याचिका क्र.216/2024 निर्णयाच्या अधीन राहून या वर्षीची बदली प्रक्रिया पार पडणे आवश्यक आहे व इतर न्यायालयही वरील आदेशाचा विचार करतील त्यामुळे बदली प्रकिया स्थगित होणार नाही.
जिल्हांतर्गत बदली अपडेट
🕶️🕶️🕶️🕶️🕶️🕶️🕶️🕶️🕶️
आज दिनांक 16/04/2025 रोजी झालेल्या VC मधील ठळक मुद्दे. 👇
➡️ प्रत्यक्ष बदली प्रक्रिया सुरू करण्यासाठी बदली पोर्टल वर BEO login वरून संच मान्यता नुसार मंजूर पदे, कार्यरत पदे, समानीकरणाची पदे अपडेट करणे.
➡️ कोणत्या संच मान्यता नुसार बदली प्रक्रिया होणार हे RDD कडून येणाऱ्या सूचनेनुसार निश्चित होईल.
➡️ अवघड क्षेत्रात महिला शिक्षकांच्या बदली होणार नाही
➡️ या पूर्वी संवर्ग 1 मधून बदली घेतली असल्यास त्यांना 3 वर्षे पर्यंत बदली मागता येणार नाही.
➡️ नव्याने संवर्ग 1 मध्ये मोडत असल्यास त्यांना सेवा कालावधी ची अट नाही.
➡️ जे शिक्षण सेवक संवर्ग2 मध्ये येत असतील असे शिक्षण सेवक संवर्ग 2 मधून बदली मागू शकतात. इतर कोणत्याही संवर्गातून शिक्षण सेवक ची बदली होणार नाही.
➡️ बदली पोर्टल मध्ये जे तीन प्रकारच्या याद्या प्रसिद्ध झाले आहेत त्यांचे तपशील खालील प्रमाणे
*1) Eligible list*
🎈 एकाच क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण सेवा व current शाळेत 5 वर्षे पूर्ण असे सर्व शिक्षक
(यात पुढील वर्षी 30 जून पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचा समावेश नाही. असे शिक्षकांना बदली मागायची असल्यास संवर्ग 1 चा लाभ घेऊ शकतात)
*२) Entitled list*
🎈 अवघड क्षेत्रात 3 वर्षे सेवा पूर्ण केलेले शिक्षक (बदली अधिकार प्राप्त)
*३) Deficult Area list*
🎈 बदली च्या शेवटच्या टप्प्यात अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व शिक्षकांची यादी (यात महिला शिक्षकांना वगळण्यात आले आहे)
कालच्या १६/०४/२०२५ व्हीसी मधील मुद्दे
1. सर्व जिल्हयानी आपली गोल्डन फाइल डाउनलोड करावी. त्यातील अॅक्टिव शिक्षक, inactive शिक्षक , निलंबित शिक्षक, शिक्षण सेवक, सेवानिवृत्तीसाठी एक वर्ष राहिलेले शिक्षक या सर्वांची संख्या पडताळून घ्यावी.
2. निलंबित शिक्षक Inactive असतील तर त्यांना अॅक्टिव करून घ्यावे. फक्त current working (कार्यरत शिक्षक) शिक्षकांची संख्या चुकू नये म्हणून त्यांना अॅक्टिव करावे, त्यांना बदली प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. तसेच वन यूनिट मध्येही त्यांची बदलीहोणार नाही.
3. सेवानिवृत्तीला 1 वर्षे राहिलेले शिक्षक Inactive केले असतील तर त्यांना अॅक्टिव करावे. त्यांना फक्त विशेष संवर्ग 1 मधून बदली हवी असेल तर अर्ज करता येईल. इतर कुठलेही टॅब त्यांना उपलब्ध होणार नाहीत तसेच विशेष संवर्ग 1 व्यतिरिक्त कुठल्याही यादीत त्यांचे नाव येणार नाही.
4. जात प्रवर्ग खुला आणि नियुक्ती प्रवर्ग ews असेल तर validation काढण्यात आलेले आहे. तर अशा शिक्षकांचे प्रोफाइल अॅड करून सबमिट करून घ्यावे.
5. 2022 मध्ये जे शिक्षक अधिकार प्राप्त शिक्षक होते (आर डीडी पत्र 28 मार्च 2025 आणि 16 एप्रिल 2025) व ज्यांना बदली मिळाली नव्हती. अशा शिक्षकांना 2025 च्या बदली मध्ये पुनः संधि देण्यात येणार आहे. त्या सर्व शिक्षकांची यादी आम्ही तुम्हाला पाठवत आहोत. सर्व जिल्हयानी आपली यादी पडताळून घ्यावी. व सुधारित यादी आम्हाला पाठवावी. पोर्टल वर पुनः बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी प्रसारित केली जाइल.
6. गटशिक्षण अधिकाऱ्यांना शिक्षकाची माहिती अद्ययावत करण्यासाठी पोर्टल वर टॅब खुला करून देण्यात येईल. तेव्हा गटशिक्षण अधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील शिक्षकांची माहिती अद्ययावत करून घ्यावी. 1. सरनेम 2. विद्यमान क्षेत्र रुजू दिनांक 3. Marital status 4. लिंग , इत्यादि माहिती अद्ययावत करून घ्यावी.
7. शिक्षक Inactive चे अॅक्टिव केले असतील तर त्या शिक्षकांचे प्रोफाइल beo force acceptance मधून accept करून घ्यावे.
8. डेटा अपडेट व करेक्शन ची फेज तीन दिवस चालू राहील. तेव्हा सर्व जिल्हयाणणी आपापळी माहिती अद्ययावत करून घ्यावी
9. त्यानंतर वेकन्सी अपडेट चालू होईल. तेव्हा सर्वांना विनंती आहे की माहिती वेळेत आणि अचूक अद्ययावत करून घ्यावी. वेकन्सी चालू झाली की डेटा अपडेट फेज बंद होईल याची नोंद घ्यावी.
जिल्हांतर्गत बदली शंका
शंका / समाधान (शासन निर्णय संदर्भ) स्पष्टीकरण
1 संवर्ग 1 मध्ये व संवर्ग 3 मध्ये आहेत. जर संवर्ग 1 मध्ये फॉर्म भरले परंतु भरलेले विकल्प मिळाले नाही तर संवर्ग 3 मध्ये फॉर्म भरता येईल का?
संवर्ग 3 मधील यादीत नाव असेल तर अर्ज भरता येईल.
2 संवर्ग 4 मध्ये आपल्या ज्युनिअर शिक्षकाचीच शाळा घेऊ शकतो का ?
जर जागा उपलब्ध असतील तर भेटू शकते.
3 संवर्ग 3 मध्ये एक युनिट चा लाभघेण्यासाठी जोडीदाराला जर शाळेवर दोन वर्ष झाले असतील तर एक युनिटचा लाभघेता येईल का? (जोडीदाराची बदली 2023 मध्ये संवर्ग 1 मधून झाली होती)
अर्ज करणाऱ्या शिक्षकाचे नाव बदली अधिकार प्राप्त यादीत असेल तर त्याला वन यूनिट मधून अर्ज करता येईल (जोडीदार जिल्हा परिषद शिक्षक असेल तर)
4 शिक्षकाच्या वडिलांवर कॅन्सरचे उपचार सुरू आहेत. पुरावा म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक यांचा दाखला उपचार सुरू आहेत त्या जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक यांचा दिला तर चालेल काय?
या प्रश्नाचे उत्तर तुमच्या जिल्ह्याचे नोडल अधिकारी देऊ शकतील.
5 1) जर एखादा शिक्षक संवर्ग 1 मध्ये पहिल्यांदा बदली मागत असेल तर त्याच्या जोडीदाराला युनिट 1 मध्ये बदलीसाठी अर्ज करता येईल काय? (दोघांचीही सध्याच्या शाळेतील सेवा 3 वर्ष पूर्ण झालेली नाही.)
नाही.
6 संवर्ग 1 मध्ये बदलीसाठी अर्ज जिल्हातर्गत बदली शासननिर्णयातील मुद्दा क्रमांक 1.8.8 करिता कोणते पुरावे सादर करावे लागतील? एखादा पुरावा उपलब्ध होण्यासाठी अडचण असल्यास मुदत वाढवून मिळेल काय? हे पुरावे कोणाकडे सादर करावे लागतील ?
नोडल अधिकारी अथवा शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
7 जर 53 वर्ष पूर्ण असेल त्यांनी नकार दिल्यास तो रँडम राऊंडला पात्र असेल का?
नाही.
8 माझी joining 2009 ची आहे. 2019 च्या यादी मध्ये माझी शाळा दुर्गम दाखवली होती. तसेच माझी बदली 2019 ला ज्या शाळेवर झाली तीही शाळा दुर्गम आहे तर माझी करंट joining एरिया date काय येणार. (2009/२०१९
२००९ मध्ये ती शाळा कोणत्या क्षेत्रात होती, जर ती दुर्गम क्षेत्रात असले तर २००९ ची तारीख टाकावी, जर २०२२ मध्ये त्या शाळेचे क्षेत्र बदल झाले असल्यास २०२२ ची दिनांक टाकावी.
9 2021 निलंबन कालावधी संपून हजर झाले आहेत. सध्या 54+वय आहे. तर संवर्ग 1 मधून बदली हवी आहे. तर सदर बदली प्रक्रियेत समाविष्ट होतील का?
हो घेऊ शकतो.
10 current aera date 09/06/1990 आहे. सध्या वय ५६ आहे बदली यादीत नाव नाही.
पूर्ण माहिती पाठवावी तर check करता येईल.
11.8.8 मनोरुग्ण मुलांचे पालक शिक्षक किंवा मनोरुग्ण भाऊ-बहीण जर शिक्षकांना या संवर्गात चालत असतील तर आई किंवा वडील मनोरुग्ण चालत नाहीत का सर कृपया मार्गदर्शन व्हावे.
नोडल अधिकारी अथवा शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
121.8.8 शिक्षक जर मनोरुग्ण मुलांचे पालक किंवा मनोरुग्ण भाऊ-बहीण जर शिक्षकांना या संवर्गात चालत असतील तर आई किंवा वडील मनोरुग्ण चालत नाहीत का सर कृपया मार्गदर्शन व्हावे.
नोडल अधिकारी अथवा शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
13 एक शिक्षक 10 वर्षा पासून अवघड क्षेत्र शाळेत आहेत, ह्या वर्षी त्यांची शाळा सर्व साधारण क्षेत्रात दाखवली आहे. तर १० वर्षा पासून अवघड क्षेत्रात काम केले असल्याने ते संवर्ग 3 मधून फॉर्म भरायचे की ह्या वर्षी त्यांची शाळा अवघड क्षेत्रात नसल्या मुळे संवर्ग 4 मध्ये फॉर्म भरायचे.
संवर्ग 3 मधील यादीत नाव असेल तर अर्ज भरता येईल.
14 संवर्ग 1 करिता सक्षम अधिकारी पुरावे.
नोडल अधिकारी अथवा शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
15 संवर्ग 2 पुरावे यादी आहे काय ?
सक्षम नोडल अधिकारी अथवा शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
16 अधिकार प्राप्त शिक्षकंना होकार देण्यासाठी कालावधी दिला जाईल काय ?
नाही.
17 संवर्ग 1 मधून लाभ घेतला आहे ? शाळेवर 3 वर्ष पूर्ण नाही पुन्हा बदली करिता संवर्ग साठी लाभ घेता येईल का?
नाही.
18 बदली अधिकार प्राप्त शिक्षकंनी होकार दिल्यास आणि प्रध्यान क्रमातील शाळा न मिळाल्यास विस्थापित होतील काय ?
नाही.
19 सातव्या टप्प्यात महिला शिक्षिका वगळण्यात आल्या आहेत का ? घोषित यादीत महिला शिक्षिका नावे दिसत नसण्याची कारणे काय असावी?
आर डी डी पत्र 15-4-2025 पहावे.
सन २०२५ मध्ये होणा-या जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत खालील प्रमाणे बदल होणेबाबत महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी ग्रामविकास व पंचायत राज मंत्र्यांना पुढील प्मणे विनंती पत्र दिले आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत खालील प्रमाणे बदल व्हावे असे वाटते.
१. सद्या एकत्र असलेले (३० कि.मी. च्या आतील) बदलीपात्र पती-पत्नी शिक्षक यांना तसेच संवर्ग २ मधील शिक्षकांना बदली प्रक्रिया २०२५ मध्ये संवर्ग १ प्रमाणे नकार देण्याची संधी मिळावी, जेणेकरुन बदल्यांची संख्या कमी होईल ही विनंती.
२. या आधीच ३० कि.मी. च्या आतील सदर पती-पत्नी शिक्षकांचा / संवर्ग २ शिक्षकांचा जोडीदार, यंदाच्या बदल्यांमध्ये बदली पात्र असल्यास, संवर्ग-२ प्रमाणे सर्व रिक्त जागा बदली पात्र सर्व शिक्षकांच्या जागा दाखवल्या जाव्यात ही विनंती.
३. पती-पत्नी यांना प्राधान्य देवून त्यांचे शासन धोरणानुसार एकत्रिकरण अबाधित ठेवावे ही विनंती.
४. अवघड क्षेत्र बदली राऊंडमध्ये पती/पत्नी विस्थापित संख्या मोठ्या संख्येने वाढेल या करिता नकाराची संधी द्यावी.
तरी, वरील प्रमाणे जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत बदल होणेबाबत विनंती आहे.
आपला,
(दादाजी भुसे)
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 28 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे नवीन निर्देश दिले आहेत.
महोदय,
उपरोक्त विषयाबाबत आपणांस खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे :-
(अ) जिल्हांतर्गत बदली :-
१) जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन २०२५ करीता, जे शिक्षक दि.३० जून २०२५ रोजी वयाची ५३ वर्षे पूर्ण करीत असतील, अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग-१ अंतर्गत पात्र ठरविण्यात यावे.
२) सन २०२२ मध्ये ज्या शाळा अवघड क्षेत्रामधून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत, अशा शाळांमधील ३ वर्षे सलग सेवा पूर्ण केलेल्या ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची विनंती अर्ज करुनही सन २०२२-२३ मध्ये बदली झाली नव्हती, अशा शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील अनु. क्र. १.७.२ येथील तरतुदीनुसार सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून संधी द्यावी.
तसेच या विभागाच्या पत्र क्र. जिपब-११२५/प्र.क्र.१४/आस्था-१४, दि. २८ फेब्रुवारी, २०२५ मधील अनु.क्र. १ येथे नमुद केल्यानुसार सदर शिक्षक टप्पा क्र.७करीता बदली पात्र होणार नाहीत.
३) सर्व जिल्हा परिषदांनी विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची कार्यवाही जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदलीपूर्वी तातडीने पूर्ण करावी.
४) अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याबाबत टप्पा क्र. ७ राबविण्यात यावा. तथापि, त्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागा
निश्चित करताना समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाची पदे विहीत तत्वानुसार निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.
५) पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी विनंती केल्यास त्यांना विशेष संवर्ग-१ मधून बदलीपात्र ठरविण्यात यावे.
(ब) आंतरजिल्हा बदली :-
१) सन २०२५ या वर्षात नविन शिक्षक पदभरती होणार असल्यामुळे विभागाच्या दि.२३.८.२०२३ रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार दि.२३.५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील २.८ मध्ये नमुद आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातुन बाहेर जाण्याकरीता रिक्त पदांची टक्केवारी १० टक्केपेक्षा कमी असणे गरजेचे आहे, ही अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया २०२४-२५ करीता शिथील करण्यात येत आहे. तथापि, शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापुर्वी नविन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणे आवश्यक राहील.
२) आंतरजिल्हा बदलीसाठी दि.३० सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या संचमान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शविण्यात याव्यात. तसेच सदर संचमान्यतेनुसार ज्या जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक अतिरिक्त असतील, अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली अनुज्ञेय असणार नाही.
आपली, (नीला रानडे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
संपूर्ण शासनादेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
जिल्हा परिषद शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रिया अपडेट..
शिक्षकांची माहिती बदली पोर्टलवर नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आज बदली प्रक्रिया टप्पा क्रमांक दोन मध्ये आंतरजिल्हा बदलीसाठी पुढील प्रक्रिया ऑनलाईन बदली पोर्टलवर सुरू करण्यात आली आहे.
आंतरजिल्हा बदली प्रक्रिया अंतर्गत बिंदू नामावली अर्थात रोस्टर अपडेट आणि अप्रू करून पोर्टलवर अपलोड करण्यासाठी दिनांक 28 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
तर सध्याच्या पोर्टलवरील स्थितीनुसार दिनांक 29 मार्च 2025 रोजी राज्यातील जिल्हा परिषदांचे रोस्टर म्हणजेच बिंदू नामावली बदली पोर्टल प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
प्रसिद्ध केलेली बिंदू नामावली दिनांक 30 मार्च 2025 रोजी पाहता येणार आहे.
शिक्षकांची शाळांची CEO/EO/BEO लॉगिन वरून ॲड करणे साठी मुदतवाढ!
शिक्षकांसाठी महत्वाची सूचना!
प्रोफाईल अपडेशन - Phase 1 (सुधारित वेळापत्रक)
Social Appeal
ज्या शिक्षकांनी मुदतीत प्रोफाईल स्वीकारले (Accept) नाही, त्यांचे प्रोफाईल आज 18 मार्च 2025 रोजी गटशिक्षणाधिकारी सक्तीने स्वीकारतील (Force Acceptance).
ज्या शिक्षकांनी प्रोफाईल स्वीकारले आहे, ते राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रोफाईलमधील माहिती पाहू शकतात.
प्रोफाईलमध्ये चुकीची माहिती आढळल्यास, 19 मार्च 2025 रोजी Social Appeal द्वारे आक्षेप नोंदवा.
Social Appeal मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पोर्टलवर ऑनलाइन नोंदवता येईल.
आक्षेपांवर 20 ते 21 मार्च 2025 दरम्यान सुनावणी होऊन निर्णय जाहीर होईल.
राज्यातील इतर शिक्षकांची प्रोफाइल आपल्या लॉगिन वरून कशी पहावी.
बदली पोर्टल अपडेट
दि.27.02.2025
सर्व शिक्षकांना रीड ओन्ली मोडमध्ये बदली पोर्टल लॉग इन सक्षम केलेले आहे.
बदली पोर्टल लिंक
https://ott.mahardd.com/teacher/profile
सुरू झाले आहे
सदरील लिंक open करून - मोबाईल नंबर टाकून आपली माहिती पाहू शकता
जर शिक्षकांच्या प्रोफाइल मध्ये
👉Salutation
👉First Name
👉Middle Name
👉Last Name
👉Date Of Birth
👉Gender
👉Mobile Number
👉Aadhar Number
👉Shalarth Id
👉Marital Status
यामध्ये काही बदल करावयाचा असल्यास मा.मुख्यकार्यकारी अधिकारी/मा. शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी विनंती अर्ज करावा लागेल व ज्या फिल्डमध्ये बदल करावयाचा आहे त्याबाबत चे योग्य ते कागदपत्र सोबत जोडावे लागतील.
जर शिक्षकांच्या Employment Details मधील माहितीत
👉Date Of Appointment In Zp
👉Cast Category
👉Appointment Category
👉Current District Joining Date
👉Udise Code Of Current School
👉Current School Joining Date
👉Current Teacher Type
👉Teaching Subtyp
👉Teaching Medium
👉Last Transfer Category
👉Last Transfer Type
👉Current Area Joining Date
👉Have You Work Continously Non Difficult Area For Last Ten Years?
👉Have you Been Suspended in Last 10 Years?
बदल करावयाचा असल्यास त्याबाबत सर्व शिक्षकांना लॉग इन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
महत्वाची सूचना
Personal Details
माहितीत बदल असल्यास
अर्ज नमुना व माहिती फॉर्म तयार करून पाठवला जाईल.
तसेच त्याबाबतच्या पुढील सूचना लवकरच दिल्या जातील.
शिक्षण विभाग (प्राथमिक)
जिल्हा परिषद रत्नागिरी.
बदली पोर्टलसाठी माहिती फॉर्म भरताना नवनियुक्त शिक्षकांसाठी महत्वाच्या सूचना फॉर्ममधील सर्व माहिती इंग्रजीमध्ये नोंद करावी.
• Salutation = Mr./Mrs./Ms. / Smt./Kum / Shri. यापैकी योग्य ते लिहावे
• First Name = प्रथम मराठीत लिहावे व त्यापुढे इंग्रजीत लिहावे.
• Middle Name = प्रथम मराठीत लिहावे व त्यापुढे इंग्रजीत लिहावे.
• Last Name = प्रथम मराठीत लिहावे व त्यापुढे इंग्रजीत लिहावे.
• Date Of Birth = जन्मदिनांक लिहिताना प्रथम अंकी व नंतर अक्षरी लिहावी.
• Gender = Male/Female / T यापैकी योग्य ते लिहावे.
• Marital Status
Abandoned / Divorsed / Married / Unmarried / Widow
यापैकी योग्य ते लिहावे.
• Mobile Number = बदली फॉर्म भरताना OTP तसेच बदली पोर्टलकडून इतर मेसेज प्राप्त होतील असा चालू असलेला स्वतःचा मोबाईल नंबर लिहावा.
• Email = इमेल अचूक लिहावा. इमेल चुकीचा नोंद झाल्यास बदल करता येणार नाही. तसेच बदली पोर्टलकडून पाठविलेले OTP किंवा बदली अर्ज / बदली आदेश प्राप्त होणार नाहीत याची नोंद घ्यावी.
• Shalarth Id = 13 अंकी शालार्थ आय.डी अचूक लिहावा.
• PAN Number = 10 अंकी पॅनकार्ड नंबर अचूक लिहावा.
• Aadhaar Number = 12 अंकी आधार नंबर अचूक लिहावा.
• Caste Category =
• Nomadic Tribe B
Scheduled Cast
• Nomidac Tribe C
Scheduled Trible
• Nomidac Tribe D
• Scheduled Cast Converted To Buddhism
• Open
Special Backward Class
Other Bachword Class
• Vimukta Jati (A)
• Socially And Educationally Backward Category
• Economically Weaker Section
• Appoinment Category
• Nomadic Tribe B
• Scheduled Cast
• Nomidac Tribe C
• Scheduled Trible
• Nomidac Tribe D
• Scheduled Cast Converted To Buddhism
• Open
• Special Backward Class
• Other Bachword Class
• Vimukta Jati (A)
• Socially And Educationally Backward Category
• Economically Weaker Section
• Date Of Appoinment In Zp = सेवापुस्तकानुसार प्रथम नियुक्तीचा रुजू दिनांक लिहावा.
Current District Joining Date = पुणे जिल्हा परिषद पुणे मध्ये रुजू झालेला दिनांक लिहावा.
Current Area Joining Date = सध्याच्या क्षेत्रात (सर्वसाधारण/अवघड) कधीपासून आहात तो दिनांक लिहावा.
संदर्भासाठी दिनांक 18.04.2022 रोजी प्रसिद्ध केलेली सर्वसाधारण/अवघड क्षेत्र यादी पहावी.
Current School Joining Date = सध्याच्या शाळेतील रुजू दिनांक लिहावा
UDISE Code Of Current School = सध्याच्या शाळेचा युडायसकोड अचूक लिहावा.
Current Teacher Type Graduate / Under Graduate, Headmaster यापैकी योग्य ते लिहावे.
Current Teacher Sub Type = Under Graduate असल्यास - NA लिहावे.
Graduate असल्यास Language / Maths And Science /Social Science यापैकी योग्य ते लिहावे.
• Teaching Medium = Marathi / Urdu यापैकी योग्य ते लिहावे.
• Last Transfer Type =
Inter District आंतरजिल्हा बदली
Intra District जिल्हांतर्गत बदली
NA - लागू नाही. (सर्व शिक्षणसेवकांनी NA लिहावे.)
• Last Transfer Category = Cadre 1/Cadre 2/Entitled/Eligible/Noc/NA
(सर्व शिक्षणसेवकांनी NA लिहावे)
• Last Transfer Date = कोणत्याही कारणामुळे नवनियुक्त शिक्षकांची बदली झाली असल्यास बदलीचा दिनांक लिहावा.
(जिल्हा बदली कक्ष, जिल्हा परिषद पुणे)
जिल्हा प.शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टल ACTIVE!
बदली पोर्टल सुरू झाले आहे.
तरी सद्या फक्त लॉगिन करून आपली माहिती तपासून ठेवा.
ज्यांचे ऑफलाईन समायोजन , pramotion झाले असेल त्यांचे माहित आपल्या लॉगिन ला अपडेट करावी लागणार आहे.
मधील विशेष बाबी
माननीय सीईओ आणि ईओ पोर्टलवर त्यांच्या लॉगिनवरून त्यांच्या जिल्ह्याचा नवीन शाळा आणि शिक्षकांचा डेटा जोडू शकतात. तसेच ते डेटा अपडेट आणि हटवू शकतात.
नवीन शाळा जोडण्यासाठी, खालील पायऱ्या आहेत.
ईओ/सीईओ पोर्टलवर लॉगइन करून
नवीन शाळा जोडण्यासाठी, खालील पायऱ्या आहेत.
शिक्षक जिल्हांतर्गत बदली बाबत.
संदर्भ: व्हिन्सीस मार्फत झालेली व्हिसी दिनांक 10.02.2025
वरील संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने तमाम शिक्षक बंधू भगिनी आपणास कळविण्यात येते की, प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू होत आहे.
1) पहिल्या फेज मध्ये
ACTIVE SCHOOL
INACTIVE SCHOOL
ACTIVE TEACHER
INACTIVE TEACHER
NEW TEACHER ADDING
चे काम जिल्हास्तरावरून सुरू होणार आहे .
2) बदली पोर्टलवर ज्या शिक्षकांची प्रोफाईल पूर्वीपासून अस्तित्वात आहे त्या शिक्षकांना Read Only मोड मध्ये त्यांच्या प्रोफाईल मधील माहिती दिसनार आहे.
3) ज्या शिक्षकांच्या प्रोफाईल मध्ये अपडेशन करावयाचे आहे ते अपडेशन तालुकास्तरीय पडताळणी नंतर जिल्हास्तरावरून होणार आहे.
4) वरील काम संपल्यावर किंवा सोबतच सर्व शिक्षकांचे प्रोफाईल अपडेशन आणि व्हेरिफिकेशन प्रक्रिया तालुकास्तरावरून सुरू होण्याची शक्यता आहे.
दिनांक 30.12.2024 च्या पत्रातील सूचनेनुसार आपल्या स्तरावरील बदली माहितीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून दिनांक 10.02.2025 रोजी या कार्यालयात माहिती सादर करण्यासाठी आपणास अवगत करण्यात आले होते .
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली शासन परिपत्रक 7 एप्रिल 2021 शासन वेळापत्रकाप्रमाणे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत वेळापत्रक...
- कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन
दिनांक - ७ नोव्हेंबर, २०२४
प्रमाणे
➡️ संवर्ग १ बदली - २८ एप्रिल ते ३ मे २०२५
➡️ संवर्ग २ बदली - ४ मे ते ९ मे २०२५
➡️ संवर्ग ३ बदली - १० मे ते १५ मे २०२५
➡️ संवर्ग ४ बदली - १६ मे ते २१ मे २०२५
➡️ विस्थापित बदल्या - २२ मे ते २७ मे २०२५
➡️ अवघड क्षेत्रातील जागा भरणे - २८ मे ते ३१ मे २०२५
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण आणि वेळापत्रक जाहीर केले आहे. दिनांक १८ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार, बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविली जाईल.
बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे/अद्ययावत करणे, पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबतची कार्यवाही दि.२८ फेब्रुवारी पर्यंत अद्ययावत करणे आवश्यक आहे.
══════════
बदली पोर्टल लिंक
https://ott.mahardd.com/teacher/confirmprofilechanges
महत्त्वाच्या सूचना
सर्व शिक्षकांनी वाचणे सक्तीचे आहे
कृपया आपल्या प्प्रोफाइलमधील माहितीची पडताळणी करावी आणि सर्व फील्ड्समध्ये बरोबर माहिती दिलेली आहे हे तपासून घ्या.
शिक्षकाला त्याने / तिने प्रोफाइलमध्ये दिलेल्या माहितीत केवळ एकदाच बदल करता येईल.
सर्व शिक्षकांनी आपल्या नोकरीबद्दलचे तपशील यातील सर्व फील्ड्समधील माहिती तपासून घेतली पाहिजे आणि तिची पडताळणी केली पाहिजे. शिक्षकाची बदली ही पूर्णपणे त्याने/तिने या संकेतस्थळामध्ये पुरवलेल्या माहितीवर अवलंबून आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे.
शिक्षकाने पुरवलेली माहिती चुकीची असल्यास, चुकीची व अवैध माहिती दिल्याच्या परिणामी चुकीच्या ठिकाणी बदली होईल.
दिलेली माहिती १००% अचूक आणि पडताळणी केलेली असणे अपेक्षित आहे. दिलेल्या माहितीची गट शिक्षण अधिकारी मार्फत तपासणी होणार असली तरी अचूकता आणि स्वीकारण्याची जबाबदारी शिक्षकाची आहे.
शिक्षक सर्व २ अर्जाची पडताळणी करतील आणि स्वीकारतील.
• वैयक्तिक तपशील
• नोकरीबद्दलचे तपशील
एकदा पडताळणी केल्यावर, शिक्षकांनी 'स्वीकार करा' (Accept) बटण दाबावे. त्यानंतर शिक्षकाची प्रोफाइल कायमची संग्रहित होईल व त्यानंतर त्यात कोणत्ताही बदल करता येणार नाही.
प्रोफाइल मधील माहिती भरत असताना या ३ गोष्टी आवश्यक आहेत -
1. उत्तम इंटरनेट कनेक्शन
2. ओटीपी एसएमेस मिळवण्यासाठी व वाचण्यासाठी नोंद केलेला मोबाइल नंबर असलेला मोबाइल फोन.
3. माहिती प्रमाणित करण्यासाठी शिक्षकाच्या प्रत्यक्ष कागदपत्रांची आणि / किंवा सेवा पुस्तकाची प्रत.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
4 Comments
माझी पत्नी 53 + आहे.मी दुसऱ्या खात्यात नोकरीस आहे. तर बदलीसाठी शाळा निवडताना ज्या शाळा पोर्टल वर रिक्त दाखवतील त्या पैकी कोणत्याही 30 शाळा द्यायच्या का?
ReplyDeleteकिंवा आपल्या पेक्षा जुनियर /कनिष्ठ /नन्तर नोकरीवर रुजू झालेल्या शिक्षकांच्या शाळा निवडायच्या. कृपया मार्गदर्शन व्हावे. 🙏
कोणत्याही 30
Deleteउच्चश्रेणी मुख्याध्यापक शक्यतो संवर्ग १ मध्ये आहेत - त्यांना रिक्त जागा उपलब्धी नाही . त्यांचा होकार असल्यास त्यांची गैरसोयीच्या ठिकाणी बदली होवू शकते . याबद्दल मार्गदर्शन -
ReplyDeleteYes..
Delete