शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) माहिती भरणे 2025-26 आदेश सूचना लिंक 11/03/2026

शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) स्वयं मूल्यांकन २०२५-२६ बाबतची माहिती SQAAF अॅप मध्ये भरणेबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ने पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


संदर्भ

: १. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.०९/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च, २०२४ (SSSA)

२. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.०९/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च, २०२४ (SQAAF)

३. मा. संचालक. SCERTM पुणे यांचे दि.०३/०२/२०२५ रोजीचे पत्र

४. मा. संचालक. SCERTM पुणे यांचे दि. १७/०२/२०२६ रोजीचे पत्र

उपरोक्त संदर्भ क्र.१ नुसार राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संदर्भ क्र. २ नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याची (SQAAF) निर्मिती करण्यात आलेली आहे. संदर्भ क्र.३ नुसार सन २०२४-२५ मधील स्वयं मूल्यांकन पूर्ण करण्यात आले आहे. संदर्भ क्र.४ नुसार सन २०२५-२०२६ मध्ये शाळांचे स्वयं मूल्यांकन करण्यासाठी दि. २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सर्व शाळांना पूर्व तयारीच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी विकसित करण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याची (SQAAF) प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची असेल. संकेतस्थळावर सर्व शाळांची नोंदणी व स्वयं मूल्यांकन पूर्ण करून घेण्याची जबाबदारी प्राथमिक शाळांच्या व माध्यमिक शाळांच्या संदर्भात अनुक्रमे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची राहील. शाळांना मूल्यांकना संदर्भात तसेच शाळा विकास आराखडा निर्मिती संदर्भात गरजेनुसार मार्गदर्शन करण्याची जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची राहील.

सन २०२५-२६ मध्ये शाळांचे स्वयं-मूल्यांकन पूर्ण करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या maa.ac.in या वेबसाईटवरील SQAAF टॅबमध्ये स्वयं-मूल्यांकनासाठीची लिंक दि. १६ मार्च २०२६ ते दि.१५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरील SQAAF अॅप वर दिलेल्या मुदतीत माहिती भरणे बाबत आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांना ऑनलाइन / ऑफलाइन बैठकीचे आयोजन करून कळविण्यात यावे.

सदरील SQAAF अॅप मध्ये माहिती भरण्यासाठीच्या सूचना सोबत देण्यात आलेल्या आहेत.

Digitaly signed by HEMANT SHARACHCHANDRA VASEKAR Date: 11-03-2026 16:06:39

(डॉ. हेमंत वसेकर, भा.प्र.से.) 

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर :

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई

२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र शासन, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे

३. शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.


SQAAF बाबत मुख्याध्यापक यांना सर्वसाधारण सूचना

* SQAAF - स्वयं मूल्यांकन माहिती भरण्यापूर्वी करावयाच्या बाबीः

अ) माहिती भरण्यापूर्वी आपणाला देण्यात आलेल्या SQAAF सुधारित मार्गदर्शक पुस्तिकेचा अभ्यास करावा. ही मार्गदर्शक पुस्तिका आपणाला SCERT च्या maa.ac.in या वेबसाईटवर SQAAF टॅबमधील SQAAF - सुधारित मार्गदर्शक पुस्तिका या सब-टॅबवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आ) SQAAF बाबत SCERT च्या maa.ac.in या वेबसाईटवर SQAAF या टॅबमधील SQAAF-व्हिडिओ या सब-टॅबवर उपलब्ध असणारे सर्व व्हिडिओ पाहावेत.

इ) वेबसाईटवर देण्यात आलेल्या शासन निर्णयांचे वाचन करावे.

ई) वेबसाईटवर देण्यात आलेल्या SQAAF या टॅबमधील अनू. क्र.३ SQAAF-DASHBOARD, अनू. क्र.४ SQAAF-कृती आराखडा (ACTION PLAN), अनू. क्र.५ SQAAF अ+ श्रेणी मिळविलेल्या शाळांचे मानक निहाय पुरावे, अनू. क्र.६ SQAAF- सहायक (SQAAF CHATBOT) आणि अनू. क्र.७ SQAAF मानकनिहाय, क्षेत्रनिहाय, स्तरनिहाय पुराव्यांची यादी या टॅब मध्ये देण्यात आलेल्या माहितीचे अवलोकन करावे.

उ) आपल्या शाळेतील सर्व घटकांशी म्हणजेच शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, विद्यार्थी यांच्याशी SQAAF मुल्यांकनाबाबत चर्चा करावी.

ऊ) पुस्तिकेत दिलेल्या मानकनिहाय पुराव्यांची/ दस्तऐवजांची / कागदपत्रांची शाळेत उपलब्धता असल्याची खात्री करावी.

ऋ) प्रत्येक मानकासाठी निर्धारित केलेले पुरावे हे वर्णन विधानांचे समाधान करणारे प्रत्यक्षदर्शी, वस्तुनिष्ठ असावेत.

ल) असे पुरावे शाळेच्याच ईमेल आयडीशी संलग्न असणाऱ्या गुगल ड्राईव्हला जतन करून ठेवावेत. गुगल ड्राईव्हला सेव्ह करताना मानक क्रमांक नमूद करून फाईल सेव्ह करावी.


SQAAF - स्वयं मूल्यांकन माहिती भरताना लक्षात घ्यावयाच्या बाबीः

"SQAAF -Maharashtra"

अॅप वापराबाबत महत्त्वाच्या सूचना

१) मुख्याध्यापकांनी आपल्या मोबाईलमध्ये, www.maa.ac.in या वेबसाईटवरील SQAAF tab मधील → अ.क्र. ८ मध्ये देण्यात आलेल्या लिंकवरून "SQAAF करून घ्यावे, अथवा Google Play Store वरून" SQAAF करावे. Maharashtra" हे अॅप डाउनलोड Maharashtra" हे अॅप डाउनलोड

२) मोबाईलमध्ये अॅप ओपन केल्यावर सर्वात प्रथम Login Window दिसेल.

३) मोबाईलमध्ये अॅप ओपन केल्यानंतर Login साठी मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेचा Udise नंबर नमूद करावा. त्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करावे, पुढील विंडो ओपन होईल.

४) नवीन विंडोवर शाळेचा Udise + मध्ये नोंदविलेला इमेल आयडी नमूद करावा व पुढे जा या बटनावर क्लिक करावे, पुढील विंडो ओपन होईल.

५) नवीन विंडोवर मुख्याध्यापक यांचा Udise + मध्ये नोंदविलेला मोबाईल नंबर / फोन नंबर दहा अंकी नमूद करावा व पुढे जा या बटनावर क्लिक करावे, पुढील विंडो ओपन होईल.

६) नवीन विंडोवर SQAAF साठी प्राप्त झालेला password नमूद करावा. (Udise + मध्ये नोंदविलेल्या इमेल आयडी वर हा password आपणाला प्राप्त झाला आहे. आपण (Udise मध्ये मध्ये नोंदविलेल्या इमेल वरील INBOX / SPAM BOX मध्ये इमेल प्राप्त झाला आहे का याची खात्री करावी. Password प्राप्त न झाल्यास खालील सूचनेनुसार कार्यवाही करावी.) व पुढे जा या बटनावर क्लिक करावे, पुढील विंडो ओपन होईल.

७) येथे आपणाला शाळेचा udise नंबर, मुख्याध्यापक यांचा Udise मध्ये नोंदविलेला मोबाईल नंबर, शाळेचा Udise + मध्ये नोंदविलेला इमेल आयडी, SQAAF साठी प्राप्त झालेला password दिसेल त्याखाली लॉगीन बटन दिसेल त्या बटनाला क्लिक केल्यानंतर पुढील विंडो ओपन होईल.

८) येथे आपणाला ३ टॅब दिसतील. पहिल्या टॅब मध्ये शाळेच्या संबंधित सर्व माहिती दिसेल. (शाळेचे नाव, शाळेचा udise नंबर, मुख्याध्यापकांचे नाव, केंद्र, तालुका, जिल्हा.) आपली माहिती बरोबर असल्याची खात्री करावी.

९) त्या खाली "स्वयं मूल्यांकन सुरु करा" हा दुसरा टॅब दिसेल त्या वर क्लिक करावे. पुढील विंडो ओपन होईल.

१०) येथे सुरवातीस सारांश दिसेल. (एकूण मानकांची संख्या १२८, प्रतिसाद नोंदविलेल्या मानकांची संख्या -०, प्रतिसाद न नोंदविलेल्या मानकांची संख्या १२८, प्राप्त गुण / एकूण गुण - ०/५१२)

११) त्याखाली १ ते १२८ मानके क्रमाने दिसतील. ज्या मानकासाठी प्रतिसाद नोंदवावयाचा आहे. त्या मानक क्रमांकावर क्लिक करावे पुढील विंडो ओपन होईल.

१२) त्या विंडो मध्ये सुरवातीला मानक क्रमांक, त्याखाली मानक विधान व त्यानंतर त्या मानकाशी संबंधित वर्णन विधाने दिसतील. आपल्या शाळेसाठी लागू होणारे वर्णन विधान निवडून त्या वर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर त्या वर्णन विधानाचे पुरावे नोंद करण्यासाठी PASTE PROOF हा टॅब ओपन होईल. येथे आपण या मानकासाठी तयार केलेली GOOGLE DRIVE ची लिंक PASTE करावी, GOOGLE DRIVE ची लिंक PASTE केल्यानंतर SUBMIT हा टॅब ओपन होईल. त्यावर क्लिक करावे. आपला त्या मानकासंबंधी प्रतिसाद नोंदविला जाईल. अशा प्रकारे १ ते १२८ मानकासाठी प्रतिसाद नोंदवावयाचा आहे. सर्व मानकांचा प्रतिसाद नोंदविणे बंधन कारक आहे.

१३) सर्व मानकांचा प्रतिसाद नोंदविल्यानंतर "स्वयं मूल्यांकन अंतिम करा" हा तिसरा टॅब ओपन होईल. जो पर्यंत सर्व मानकांचा प्रतिसाद नोंदविला जाणार नाही तो पर्यंत स्वयं मूल्यांकन अंतिम करा हा टॅब ओपन होणार नाही.

१४) "स्वयं मूल्यांकन अंतिम करा" या टॅब वर क्लिक केल्यानंतर मुख्याध्यापकांसाठीचे हमीपत्र दिसेल. या हमिपत्राचे वाचन करावे व त्या खाली दिलेल्या चेक बॉक्स वर क्लिक करावे. चेक बॉक्स वर क्लिक केल्यानंतर "स्वयं मूल्यांकन अंतिम करा" हे बटन ओपन होईल. त्यावर क्लिक करावे आपल्या शाळेचे स्वयं मूल्यांकन पूर्ण होईल.

१५) पुढील पेजवर आपणाला आपला प्रतिसाद यशस्वीरित्या नोंदविला आहे आपले मनःपूर्वक अभिनंदन असा संदेश सर्वात वर दिसेल. त्याखाली आपल्या शाळेची संपूर्ण माहिती दिसेल.

१६) आपण फायनल सबमिशन केल्यानंतरचा प्रतिसाद डाउनलोड या टॅबवर क्लिक करून घ्यावा. डाउनलोड केलेल्या प्रतिसादाची प्रत शाळास्तरावर जतन करून ठेवावी.

१७) याच पेजवर आपणाला आपला प्रतिसाद यामध्ये आपले प्राप्त गुण तसेच प्रतिसाद नोंदविलेल्या मानकांची संख्या, प्रतिसाद न नोंदविलेल्या मानकांची संख्या, लागू नाही हा पर्याय निवडलेल्या मानकांची संख्या इत्यादी माहिती दिसेल.

१८) याच पेजवर स्वयं मूल्यांकन पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र डाउनलोड या टॅबवर क्लिक करून घ्यावे व त्याची प्रत शाळास्तरावर जतन करून ठेवावी.

१९) आपला प्रतिसाद पूर्ण नोंदविल्यानंतर आपल्या शाळेला प्राप्त झालेले गुण मुख्याध्यापक मार्गदर्शिकेत दर्शविल्यानुसार आपल्या शाळेला कोणती श्रेणी मिळाली याची खात्री करून घ्यावी.

२०) स्वयं-मुल्यांकन/बाह्य मुल्यांकन/त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणारे मुल्यांकन करताना खालीलप्रमाणे स्तरनिहाय गुणदान करून संबंधित शाळेची श्रेणी निश्चित करण्यात येईल.

(एकूण गुणांपैकी प्राप्त गुणावर आधारित श्रेणी निश्चित करता येईल.

प्राप्त गुण

श्रेणी

९१ ते १०० टक्के

अ +

८१ ते ९० टक्के

७१ ते ८० टक्के

ब+

६१ ते ७० टक्के

५१ ते ६० टक्के

क+

५० टक्के पेक्षा कमी

ii आपल्या शाळेची माहिती नोंदवण्यासाठी शुभेच्छा...ii

संपूर्ण आदेश व सूचना पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.

Download

शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) सन २०२५-२०२६ मध्ये होणाऱ्या स्वयं मूल्यांकना बाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ने पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 

प्रति, विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व) प्रशासनाधिकारी मनपा/नपा (सर्व) शिक्षण निरीक्षक, मुंबई (सर्व)

विषय : शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) सन २०२५-२०२६ मध्ये होणाऱ्या स्वयं मूल्यांकना बाबत.

संदर्भ :-

१. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.०९/ एसडी-६ मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च, २०२४

२. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.०९/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि. १५ मार्च, २०२४

३. मा. संचालक सो. SCERT, PUNE यांचेकडील मान्य टिपणी

उपरोक्त संदर्भ क्र. १ नुसार राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संदर्भ क्र. २ नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याची (SQAAF) निर्मिती करण्यात आलेली आहे. संदर्भ क्र. ३ नुसार सन २०२५-२०२६ मध्ये सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचे स्वयं-मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या maa.ac.in या वेबसाईटवरील SQAAF टॅबमध्ये स्वयं-मूल्यांकनासाठीची लिंक दि.२७ फेब्रुवारी २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरील लिंक द्वारे आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांचे सन २०२५-२६ मधील SQAAF स्वयं मूल्यांकन पूर्ण करणे आवश्यक आहे.

तरी, सन २०२५-२०२६ मध्ये होणाऱ्या स्वयं-मूल्यांकनाबाबत पूर्व तयारीच्या सूचना आपल्या स्तरावरून शाळांना ऑनलाइन / ऑफलाइन बैठकीचे आयोजन करून देण्यात याव्यात.


Digitally signed by

HEMANT SHARACHCHANDRA VASEKAR Date: 17-02-2026 15:03:38

(डॉ. हेमंत वसेकर, भा.प्र.से.) 

संचालक 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर :

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई

२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र शासन, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे

३. शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,




SQAAF लिंक भरणेबाबत महत्वाच्या सूचना


१) एका इमेल आयडी वरून एकाच शाळेची माहिती भरता येते.

२) एका इमेल आयडी वरून एकाच शाळेची माहिती पूर्ण केली व त्यानंतर त्याच लॉगीनमधून दुसरी शाळा भरल्यास पूर्वी भरलेल्या शाळेची माहिती डीलीट होते. व पूर्वी भरलेली शाळा not started च्या यादीत समाविष्ट होते.

३) "शाळा बदला" या टॅबचा वापर शक्यतो करू नये.

४) "शाळा बदला" या टॅबचा वापर केल्यास आपल्या इमेल आयडी वरून यापूर्वी भरलेल्या शाळेची माहिती डीलीट होते.

५) खाते तयार करा या टॅबचा वापर करून प्रथमच नोंदणी करत असल्यास इमेल आयडीची खात्री करण्यासाठी १५० सेंकंदापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. तेव्हा "पुन्हा इमेल पाठवा" या टॅबचा वारंवार वापर केल्यास आपला इमेल आयडी BLOCK होतो, त्यामुळे इमेल आयडीची खात्री करण्यासाठी आपल्या इमेल आयडीवर verification इमेल प्राप्त होईपर्यंत थांबावे/वाट पहावी. इमेल आयडी बरोबर नोंदविला असल्यास आपल्या इमेल आयडीवर इमेल प्राप्त होतोच. परत-परत "पुन्हा इमेल पाठवा" या ठिकाणी क्लिक करू नये.

६) GOOGLE DRIVE वर मानकांचे पुरावे ज्या फोल्डरमध्ये उपलोड करण्यात आले आहेत. त्या फोल्डरची लिंक कॉपी करण्यापूर्वी शेअर टॅबवर क्लिक करून Anyone with the link टॅब निवडून Viewer हा पर्याय निवडावा. तरच आपण नोंदविलेली लिंक / दस्तऐवज बाह्य मूल्यांकनाच्यावेळी पाहता येते.

७) इमेल आयडी नोंदविल्यानंतर इमेल प्राप्त न झाल्याने पुन्हा इमेल आयडी लिंकमध्ये नोंदविण्याचा प्रयत्न वारंवार केल्यास email- already in use असा संदेश प्राप्त होतो. असा संदेश प्राप्त होत असल्यास आपण पासवर्ड बदला या टॅबचा वापर करून तेथे प्रविष्ट केलेला इमेल आयडी नोंदवून आपल्या इमेल आयडीची पुष्टी करून लॉगीन करू शकता व आपल्या शाळेची माहिती नोंदवू शकता.

८) अनेक शाळांनी स्वयं-मुल्यांकनात नोंदविलेली google drive ची लिंक View to anyone with the link केलेली नाही. अशा सर्व, मुख्याध्यापक यांनी आपले google drive चे document/लिंक View to anyone असे करावे. जेणेकरून बाह्य-मूल्यांकनात अडथळा निर्माण होणार नाही.




 शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) - राज्यस्तरीय मार्गदर्शन समिती बाबत महा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 18 मार्च 2025 रोजी  पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित करून यासाठी मार्गदर्शकांची यादी प्रसिद्ध केली आहे.


शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) बाबत राज्यस्तरीय मार्गदर्शन समिती स्थापन करण्याच्या सूचना मा. आयुक्त यांच्या दि. ११.०३.२०२५ राँगीच्या 95 VC मध्ये देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) बाबत राज्यस्तरीय मार्गदर्शन समिती खालीलप्रमाणे स्थापन करण्यात आली आहे.

समितीतील सदस्य आणि मार्गदर्शनासाठी दिलेले घटक -



वरीलप्रमाणे राज्यस्तरीय समिती सदस्यांची निवड करून SQAAF मार्गदर्शनासाठी घटक निश्चित करण्यात आले आहेत. तरी समिती संदर्भात माहिती आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांच्यापर्यंत पोहोच करून मुख्याध्यापक यांना SQAAF बाबत माहिती भरताना तसेच SQAAF मानका संबंधित कोणतीही समस्या किंवा शंका निर्माण झाल्यास संबंधित समितीतील सदस्यांनकडून तात्काळ मार्गदर्शन घेण्याबाबत अवगत करावे. आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन १००% पूर्ण करून घ्यावे.


राहुल रेखावार (भा.प्र.से.) 

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

प्रत माहितीस्तव :

मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रत कार्यवाहिस्तवः

समिती सदस्य

/२ (यांनी आपणाला सोपविण्यात आलेल्या घटकानुसार जिल्हास्तरीय सदस्यांना तसेच सर्व मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन करण्यात यावे.)

वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.

Download

शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) बाबतची माहिती सोबत दिलेल्या लिंकमध्ये भरणे बाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ने पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 


राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक सशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संदर्भ क्र.२ नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची (SQAAF) निर्मिती करण्यात आलेली आहे. संदर्भ क्र.३ नुसार सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयं-मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे याच्या maa.ac.in या वेबसाईटवरील SQAAF टॅबवर https://scert-data.web.app/ या नावाने स्वयं-मूल्यांकनासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तरी, सदरील ऑनलाईन लिकवर माहिती भरणे बाबत आपल्या जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे. तसेच, सदरील लिंक ही दि.२८ फेब्रुवारी, २०२५ रोजी सायं. ०५:०० पर्यत भरण्याची कार्यवाही करावी. सदरील लिंकमध्ये माहिती भरण्याची कार्यवाही खाली दिलेल्या सूचनानुसार विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावी.

१. सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी विकसित करण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मुल्याकन आणि आश्वासन आराखड्याची (SQAAF) प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) याची असेल.

२. संकेतस्थळावर सर्व शाळांची नोंदणी व स्वयं-मुल्यांकन करून घेण्याची जबाबदारी प्राथमिक शाळांच्या व माध्यमिक शाळांच्या संदर्भात अनुक्रमे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची राहील.

३. शाळांना मुल्यांकनासंदर्भात तसेच शाळा विकास आराखडा निर्मिती संदर्भात गरजेनुसार मार्गदर्शन करण्याची जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था यांची असेल,

४. माहिती भरणे बाबत सर्व मुख्याध्यापक याना सोबत दिलेल्या सूचना पत्राचे अवलोकन करून माहिती भरणे बाबत कळविण्यात यावे.

५. SQAAF बाबत मार्गदर्शनपर व्हिडीओ SCERT, PUNE यांच्या SQAAF टॅबमधील SQAAF व्हिडीओ या सबटॅबवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. माहिती भरण्यापूर्वी सर्व मार्गदर्शनपर व्हिडीओ पाहण्यासाठी सूचित करावे.

६. SQAAF बाबत शासन निर्णय SCERT, PUNE यांच्या SQAAF टॅबमधील SQAAF- शासन निर्मान्ध या सबटॅबवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. माहिती भरण्यापूर्वी सर्व शासन निर्णयवाचे अवलोकन करणेविषयी सूचित करावे.

७. मुल्यांकनासंदर्भात काही तक्रार असल्यास किंवा SQAAF लिंक भरणे बाबत काही तात्रिक समस्या निर्माण झाल्यास sqaafmh@maa.ac.in या ई-मेल आयडीवर शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचे मार्फत कळविण्यात यावे.

८. जिल्ह्यातील सर्व शाळांचे स्वयं-मूल्यांकन पूर्ण झाल्यानतर बाह्य-मूल्यांकनं व त्रयस्थ सत्स्येद्वारे मूल्यांकन केले जाणार आहे. तरी, सर्व शाळांना स्वय-मूल्यांकन करताना वस्तुस्थितीदर्शक माहिती भरणेबाबत कळविण्यात यावे. अवास्तव स्वयं-मूल्यांकन होणार नाही याची खबरदारी संबंधित मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती / शाळा व्यवस्थापन व विकास समिती यांना घेणेविषयी कळविण्यात यावे.

९. स्वयं-मूल्यांकनानंतर यथास्थिती बाह्य-मूल्यांकन व त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यांकन केले जाणार आहे.

१०. स्वय-मूल्यांकनानंतर यथास्थिती बाह्य-मूल्यांकनात व त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणारे मूल्यांकनात १५% हून अधिक तफावत आढळल्यास संबंधित मुख्याध्यापकावर याबाबतची जबाबदारी निश्चित करण्यात यावी.

११. बाह्य- मुल्यांकनानंतर ज्या मानकामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. अशा मानकांचा विकास आराखडा तयार करणे शाळाना बंधनकारक राहील व SOAAF पोर्टलवर अपलोड करणेबाबत सूचना प्राप्त होताच अपलोड करणे बंधनकारक राहील.

१२. बाह्य- मुल्यांकनानंतर /त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणारे मुल्यांकनानतर मिळालेल्या श्रेणीचा शाळेच्या दर्शनी भागात व शाळेच्या लेटरहेडवर उल्लेख करावा.

१३. स्वयं-मूल्यांकन/बाह्य-मूल्यांकन/त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणारे मूल्यांकन करताना खालीलप्रमाणे स्तरनिहाय गुणदान करून संबंधित शाळेची श्रेणी निश्चित करण्यात येईल.


सोबत - SQAAF लिंक बाबत मुख्याध्यापक यांना सर्वसाधारण सूचना पत्र.


राहूल रेखावार (भा.प्र.से.)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व

प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

मुख्याध्यापक यांचे साठी सूचना मुख्याध्यापकांसाठी सूचना पुस्तिका

Download

संपूर्ण माहिती पुस्तक SQAAF Booklet PDF Download

Download

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.