यु-डायस प्लस पोर्टलवर 2023 24 सत्र मधील विद्यार्थी पुढील वर्गात प्रमोशन करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे त्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही आपल्या मोबाईलवरून देखील आपण आपला वर्ग प्रमोट करू शकतो त्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
https://sdms.udiseplus.gov.in/
लिंक वर क्लिक केल्यानंतर ओपन झालेल्या विंडोमध्ये राज्य निवडून त्यासमोरील गो बटन वर क्लिक करा.
आपल्याला शाळेचे लॉगिन करण्यासाठी युजर आयडी व पासवर्ड टाकून त्याखाली सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर लॉगिन करायचे आहे लॉगिन यशस्वी झाल्यानंतर.
वरील प्रमाणे विंडो ओपन होते त्यामधील करंट अकॅडमी इयर 2024 25 वर क्लिक करा आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.
प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊन प्रोग्रेशन मॉडेलवर GO बटनावर क्लिक करावे
वर्ग आणि तुकडी निवडून GO बटनावर क्लिक करावे
नंतर आपल्याला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची यादी दिसेल यामध्ये प्रोग्रेशन स्टेटस मध्ये योग्य पर्याय निवडून व 2023-24 चे %, विद्यार्थ्यांचे शाळेतील उपस्थित दिवस, शाळेत शिकत असल्यास Study in Same School निवडावे किंवा TC दिली असल्यास ते ऑप्शन निवडावे. याप्रमाणे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची, ही प्रमोशनची प्रक्रीया पूर्ण करावी.
याच प्रमाणे इयत्ता 1 ली मध्ये सर्व नवीन प्रवेशित विदयार्थाना प्रवेश शाळांमध्ये दयावयाचे आहे. या नवीन प्रवेश घेणाऱ्या विदयार्थ्यांना त्यांच्या इतर कागदपत्रासोबतच विदयार्थ्यांचे आधारकार्ड बाबत विचारणा करावी. कारण सुरवातीलाच आधारकार्ड असेल तर पुढे सरल व युडायस मध्ये याची नोंद घेणे सोयीचे होईल. ज्या विदयार्थ्यांजवळ आधार नसेल त्यांना तात्काळ काढण्याच्या सूचना द्याव्यात. याच प्रमाणे शाळा सुरु होतच, विदयार्थांचे आधार पेंडिंग असल्यास ते काम तात्काळ पूर्ण करावे, कोणत्याही विदयार्थीचे आधार व्हॅलीडेशन पेंडीग राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
तसेच UDISE + मध्ये काही दुरुस्ती असल्यास त्या A1 Form मध्ये BEO यांच्या मार्कीग व आवश्यक पुराव्यासह, जिल्हा कार्यालयास सादर करावे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments