SQAAF Schools External Evaluation Update - बाह्य-मूल्यांकन करण्यासाठी पथके तयार करणे SCERT सूचना ०४/०७/२०२५

 शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा - (SQAAF) बाह्य-मूल्यांकन करण्यासाठी पथके तयार करणेबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 4 जुलै 2025 रोजी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. (सर्व) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि. प. सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण (SSSA) कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. संदर्भ क्र. ०२ च्या शासन निर्णयान्वये शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा (SQAAF) तयार करण्यात आला आहे. संदर्भ क्र. ०२ ला अनुसरून राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या (शासकीय, खाजगी अनुदानित व खाजगी विनाअनुदानित किंवा स्वयं-अर्थसहाय्यीत), सर्व माध्यमाच्या शाळांचे स्वयं मूल्यांकन (१००% शाळा), बाह्य-मूल्यांकन (स्वयं-मूल्यांकनातील १००% शाळांपैकी एकूण ५% शाळा) व त्रयस्थ पक्षाकडून मूल्यांकन (५% शाळांच्यापैकी ४०% शाळा) करण्यात येणार आहे, त्यासाठी संदर्भक्र. ०३ ते ०६ नुसार वेळोवेळी स्वयं-मूल्यांकनासाठी मुदतवाढ देण्यात आली होती व दिनांक: ३०.०६.२०२५ पासून स्वयं-मूल्यांकनाची लिंक बंद करण्यात आली आहे. स्वयं-मूल्यांकनाचा टप्पा पूर्ण केल्याने त्यानंतर बाह्य-मूल्यांकनाचा टप्पा सुरु करून पूर्णत्वास आणणे अपेक्षित आहे.

करिता, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये स्वयं मूल्यांकन पूर्ण केलेल्या शाळांचे बाह्य मूल्यांकन हे १५ जुलै, २०२५ ते ३१ जुलै, २०२५ च्या दरम्यान करून घेण्यासाठी सोबत दिलेल्या सुचनापत्राप्रमाणे शाळांचे बाह्य-मूल्यांकन करून घेण्यासाठी तालुकानिहाय पथकांची नियोजित संख्या देण्यात आली आहे (सोबत स्वतंत्र PDF देण्यात आली आहे). त्यानुसार शिक्षणाधिकारी (प्राथ. माध्य), जि. प. (सर्व) यांनी पथके तयार करण्यात यावीत व तयार केलेल्या पथकांमधील पथक प्रमुख यांची माहिती (जिल्ह्याची एकत्रित) Excel file मध्ये (इंग्रजीतील Font- Times New Roman, Font Size - १२) खालील नमुन्यात दिनांक: ०७.०७.२०२५ पर्यंत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. (सर्व) यांनी राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाच्या gaafmh@maa.ac.in या ई-मेल आयडीवर सादर करावी. पथक प्रमुख यांना लॉगीन उपलब्ध करून दिले जाणार असल्याने एकदा पथक प्रमुख म्हणून निवड केल्यानंतर पथक प्रमुख व त्यांचा इमेल आयडी बदलला जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी (दिलेल्या माहितीत कोणताही बदल स्वीकारला जाणार नाही).


बाह्य-मूल्यांकनाचे नियोजन सोबत जोडलेल्या सूचनापत्रकाप्रमाणे करून या बाबतच्या सूचना सर्व शाळांना तसेच सर्व पथक प्रमुख यांना ऑनलाईन / ऑफलाईन देण्यात याव्यात.

सोबतः १) बाह्य मूल्यांकनाचे नियोजन व पथकप्रमुख यासाठीच्या सूचना

२) तालुकानिहाय पथकांची संख्या.

३) राज्यस्तरीय मार्गदर्शक समितीतील सदस्याची यादी

४) SQAAF निर्मिती सदस्य यादी

५) शाळा व्यवस्थापन व शाळा स्तरनुसार वर्गीकरण यादी

शेरा


Signed by Rahul Ashok Rekhawar Date: 04-07-2025 21:07:23

(राहुल रेखावार, भा.प्र.से.)

संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व

प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


सूचनापत्र


बाह्य मुल्यांकन नियोजन टप्पा व सुचनाः


स्वयं-मूल्यांकनाचा टप्या पूर्ण केल्याने बाह्य-मूल्यांकनाचा टप्पा सुरु करून पूर्णत्वास आणणे अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील स्वयं-मूल्यांकन पूर्ण केलेल्या शाळांच्यापैकी सर्वाधिक गुणांकन प्राप्त करणाऱ्या एकूण ५% शाळांचे (सर्व व्यवस्थापननिहाय, सर्व माध्यमनिहाय, सर्व स्तर निहाय (शाळा प्रकारानुसार), तालुकानिहाय, सर्व मंडळनिहाय (बोर्डनिहाय ॥ खालीलप्रमाणे गटानुसार बाह्य-मूल्यांकन करण्यात येणार आहे.

शाळा व्यवस्थापनाचा प्रकार

१. शासकीय २. खाजगी अनुदानित ३. खाजगी विनाअनुदानित किंवा स्वयं-अर्थसहाच्यीत

शाळेचे माध्यम

१. मराठी २. हिंदी ३. इंग्रजी ४.उर्दू ५. सिधी ६. तमिळ 

७. गुजराती ८. कन्नड ९. तेलगु

शाळेचा स्तर

१. प्राथमिक, २. उच्च प्राथनिक, ३. माध्यमिक, ४.उच्च माध्यमिक

शाळेतील मंडळ (बोर्ड)

1.STATE 2.CBBC ICSE MADARASA

4. SANSKRUT BOARD

4. INTERNATIONAL BOARD

UNIVERSITY संलग्नित BOARD

सदरील नियोजनात प्रत्येक पथकाने एका दिवसात ०१ शाळेचे बाह्य-मूल्यांकन करावयाचे आहे. बाह्य-मूल्यांकन प्रक्रिया ही ०६ दिवसात करावयाची असल्याने प्रत्येक पश्थक किमान ०६ शाळांचे बाह्य मूल्यांकन करेल असे नियोजन करण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर खाली दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील SQAAF मूल्यांकनाची प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथ, माध्य) यांची राहील.

अनु क्र. मूल्यांकनाचा प्रकार

शाळेने स्वयं मूल्यांकन पूर्ण करणे

अंतिम दिनांक: ३० जून, २०२५

मूल्यांकनासाठी निश्चित केलेला कालावधी

 अंतिम दिनांकः ३१ जुलै, २०२५

जिल्हास्तरावरून होणारे बाह्य-मूल्यांकन पूर्ण करणे

तसेच, पथकातील सदस्याची निवड व संख्या खाली दिलेल्या निकषानुसार करावी.

पथकातील सदस्याची निवडीसाठीचे निकष, संख्या व सूचना खालीलप्रमाणे आहेत-

१. प्रत्येक पथकामध्ये एकूण किमान चार (०४) सदस्य संख्या असावी.

२. पथकाचा एक सदस्य पथकप्रमुख असतील व पथकात इतर तीन सदस्य राहतील.

३. गटशिक्षणाधिकारी / अधिव्याख्याता (DIET)/ विस्तार अधिकारी (शिक्षण केंद्रप्रमुख किंवा यांचेपेक्षा वरिष्ठ 

अशी व्यक्ती पथकाप्रमुख असतील.

४. सदस्य क. ०१ मुख्याध्यापक (प्राथ) किंवा खालील मुद्दा क्र. ०७ प्रमाणे असतील.

५. सदस्य क्र. ०२ मुख्याध्यापक (माध्य/ उपमुख्याध्यापक/ पर्यवेक्षक असतील.

६. सदस्य क. ०३ हे क्षमतावृद्धी प्रशिक्षण जिल्हास्तरावर शिक्षक २.० मध्ये SQAAF विषयी मार्गदर्शन केलेले 

शिक्षक किंवा प्राथमिक/माध्यमिक शाळेतील वरिष्ठतम शिक्षक प्रतिनिधी असतील.

७. SQAAF निर्मितीमध्ये सहभागी असणाऱ्या मुख्याध्यापक/शिक्षक/साधनव्यक्ती इ. तसेच आपल्या जिल्ह्यातील राज्यस्तरीय / जिल्हास्तरीय मार्गदर्शक समितीतील सदस्याची निवड सदस्य क. ०१ म्हणून अग्रक्रमाने होईल याची दक्षता घ्यावी (राज्यस्तरीय मार्गदर्शक समितीतील सदस्याची यादी सोबत देण्यात आली आहे).

८. बाह्य मूल्यांकनाची प्रक्रिया सुकर व्हावी यासाठी पथकप्रमुख यांनी पथकातील सदस्यांना पुढीलप्रमाणे कामकाज करणेबाबत सूचित करावे करावयाचे नियोजित कामकाज

पथकप्रमुख

(गटशिक्षणाधिकारी

१. SQAAF पोर्टलवरील स्वयं-मूल्यांकनाची माहिती मिळवणे / सोबत घेणे.

२ . पथकातील सदस्य यांचेकडून अहवाल घेणे,

अधिव्याख्याता (DIET)/ ३ विस्तार अधिकारी (शिक्षण) ४. / केंद्रप्रमुख किया यांचेपेक्षा वरिष्ठ अशी व्यक्ती 

. अहवालाचे एकत्रीकरण करणे.

बाहा-मूल्यांकनात शाळेस प्राप्त झालेले गुण, श्रेणी तसेच सुधारणा करण्यासाठी सूचना व शाळा विकास आराखडा तयार करण्याबाबत मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन करणे,

५. SQAAF पोर्टलवर बाह्य मूल्यांकनाची माहिती नोंदवणे,

सदस्य क्र.१

(मुख्याध्यापक (प्राथ) असतील किंवा वरील मुद्दा

सदस्य क्र २.

(मुख्याध्यापक (माध्य. उप मुख्याध्यापक /पर्यवेक्षक असतील

सदस्य क्र.३ (शिक्षक)

क्षेत्र क्र. ०१ व क्षेत्र क्र. ०५ शी संबंधित स्वयं मूल्यांकनात

ONLINE नींदवलेली माहिती व पुरावे याची खात्री करणे व आपला अहवाल पथकप्रमुख यांना देणे.

हक्षेत्र क. ०२ व दक्षेत्र क. ०३ शी संबंधित स्वयं मूल्यांकनात

ONLINE नोंदवलेली माहिती व पुराने याची खात्री करणे व आपला अहवाल पथकप्रमुख यांना देणे.

क्षेत्र क्र. ०४ व क्षेत्र क्र. ०६ शी संबंधित स्वयं-मूल्यांकनात

ONLINE नौदवलेली माहिती व पुराने याची खात्री करणे व आपला अहवाल पथकप्रमुख यांना देणे.

वर दिलेल्या कामकाज वाटपाच्या नियोजनात अंशक्त बदल करण्याचे अधिकार पथकप्रमुख यांना राहतील,

९. पथकप्रमुख व सदस्य यांनी शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/ प्र. क्र. ०९/ एसडी-६ मंत्रालय, मुंबई दि. १५ मार्च २०२४, शाला गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) मधील प्रकरण क्र. १ मधील १.३ मध्ये दिलेल्या सूचनेनुसार बाह्य-मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करणेबाबत आपल्या स्तरावरून सूचित करावे.

१०. आपल्या जिल्ह्यातील शाळांचे बाडा-मूल्यांकन करण्यासाठी ज्या शाळांनी स्वयं मूल्यांकन पूर्ण केलेले आहे अशाच शाळांची निवड करण्यात येणार आहे.

११. पथकातील सदस्यांनी SOAAF मार्गदर्शक पुस्तिकेचे वाचन व आवश्यक चर्चा शाळेच्या बाड़ा-मूल्यांकनास जाण्यापूर्वी करावी. तसेच, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांनी तयार केलेले SQAAF मार्गदर्शक व्हिडीओ पहावेत, त्याचबरोबर, वैळोवेळी पाठवलेली पत्रे व परिपत्रकाचे बारकाईने वाचन करावे, BQAAF संचभर्भातील सर्व संदर्भ, परिपत्रके व मार्गदर्शन व्हिडीओ है maa.ac.in या संकेतस्थळावरील SQAAF या Sub Tab मध्ये आहेत त्याचे वाचन टीम मधील सर्व सदस्यांनी करावे.

१२. बाहा मूल्यांकन करताना मानकासंबंधी शंका निर्माण झाल्यारा राज्यस्तरीय मार्गदर्शन समितीतील सदस्यांशी चर्चा करून स्तर निशिती करून गुणदान करण्यात यावे.

१३. पथकाची स्थापना, पथकप्रमुखाची व पथकातील सदस्यांची निवड करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथ) यांची राहील, पथकातील सदस्यांची निवड करण्यासाठी तसेच पथकातील सदस्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी अनुक्रमे शिक्षणाधिकारी (माध्य) व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संरथा यांचे सहकार्य घ्यावे. याउपरही काही शंका असतील तर SQAAF जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय मार्गदर्शन समिती सदस्य यांचेशी

चर्चा करणेबाबत पथकप्रमुख यांना सूचीत करावे. १४. आवश्यकतेनुसार पथकप्रमुख व सदस्यांची ONLINE किया OFFLINE बैठक जिल्हास्तरावरून आयोजित करून बाह्य-मूल्यांकनासंदर्भात सर्व सूचना देण्यात याच्यात.

१५. पथक प्रमुख यांनी बाह्य-मूल्यांकनासाठी maa.ac.in या संकेतस्थळावर SQAAF SubTab मध्ये देण्यात आलेल्या बाह्य मूल्यांकनासाठीच्या (https://soert-data/web.app/) या लिंकमध्ये मानकनिहाय आपला प्रतिसाद नोंदवावा,

१६. बाह्य-मूल्यांकनासावी निश्चित केलेल्या शाळांची माहिती जिल्हास्तरावर उपलब्ध झाल्यावर लगेचच ती माहिती पथकाप्रमुखांना उपलब्ध करून द्यावी.

१७. शाळा भेटीचे नियोजन करून पथकप्रमुखांना व बाह्य मूल्यांकनास निचलण्यात आलेल्या शाळांना किमान ०३ दिवस अगोदर कळविण्यात यावे.

१८. पथक प्रमुख यांनी आपला इमेल आयडी प्रतिष्ठ करून प्रथम लिंकमध्ये लॉगीन करावे.

१९. त्यानंतर पथकाला बाह्य-मूल्यांकनासाठी देण्यात आलेल्या सर्व शाळा दिसतील त्यातील आपण भेट दिलेल्या शाळेचा Udise Number प्रविष्ठ करावा.

२०. शाळेचा Udice Number प्रविष्ठ केल्यानंतर शाळेची माहिती व शाळेने स्वयं-मूल्यांकनात मानकनिहाय निवडलेला स्तर व दिलेली Google Drive ची लिक दिसेल.

२१. Google Drive वरील पुरावे व भेटीच्यावेळी सादर केलेले पुरावे यानुसार प्रत्येक मानकाचा स्तर निश्चित करून मानकनिहाय स्तर लिंकमध्ये नोंदवावा व सर्वात शेवटी आपला प्रतिसाद पूर्ण करा या Tab चा वापर करून आपला अहवाल अंतिम करावा. स्वयं-मूल्यांकनात नोंदविलेल्या सर्व मानकांचे बाह्य-मूल्यांकन करणे बंधनकारक राहील.

२२. बाह्य मूल्यांकनासाठी शाळेला भेट दिल्यानंतर पथक प्रमुखांनी आपल्या सदस्यांच्या समवेत भेट दिलेल्याचा फोटो व बाह्य-मूल्यांकनासाठीची लिंक SQAAF पोर्टलवर त्याच दिवशी उपलोड करणे बंधनकारक राहील.

२३. पथक प्रमुखांनी मुख्याध्यापक यांच्यासमोर शाळेतच SQAAF पोर्टलवर (https://acert-data.web.app/) ऑनलाईन माहिती नोंदवणे आवश्यक आहे. गुणदान अंतिम केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही. नोंदविलेला अहवाल त्याच रात्री १२.०० वाजता अद्ययावत होईल. अपूर्ण गुणदान केल्यास/गुणदान पूर्ण न केल्यास पथक प्रमुख जबाबदार राहतील.

२४. स्वयं-मूल्यांकन व पथकाने केलेले बाह्य-मूल्यांकन यामध्ये जर १५% पेक्षा जास्त फरक आला असेल तर पथक प्रमुखांनी संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथ., माध्य.) यांच्या निदर्शनास आणून द्यावी.

२५. तालुकानिहाय बाह्य मूल्यांकनासाठी निवडण्यात येणाऱ्या शाळांची संख्या सोबत स्वतंत्र PDF फाईल मध्ये देण्यात आली आहे. त्यानुसार तालुकानिहाय पथकांची स्थापना करण्यात यावी.

२६. जिल्हास्तरावर तालुकानिहाय पथकप्रमुख व पथकातील सदस्यांची माहिती खालीलप्रमाणे तयार असावी - 


२७. बाह्य-मूल्यांकनासाठी निवडलेल्या शाळांची यादी SCERT मार्फत दिली जाईल त्यात राज्यातील सर्व PM-SHRI शाळांचा समावेश देखील केला जाणार आहे. यादीतीलच शाळांचे बाह्य-मूल्यांकन करण्यात यावे. निवड पात्र शाळांच्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.

२८. दिल्या गेलेल्या शाळेचे बाह्य-मूल्यांकन पथक प्रमुखांनी पूर्ण केल्यानंतर आपला अहवाल खालील नमुन्यात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे जमा करावा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी आपल्या जिल्ह्याचा एकत्रित अहवाल sgaafmh@maa.ac.in या इमेल आयडीवर दिनांक: ०५.०८.२०२५ रोजी सायंकाळी ५.०० पूर्वी सादर करावा.







सदरील बाह्य-मूल्यांकनाची प्रक्रिया ही "शाळेचा विकास आराखडा" गुणवत्तापूर्ण करण्याची एक उत्तम संधी आहे. या विचारानुसार शाळेचे सकारात्मकरीत्या मूल्यांकन करावे.

वर दिल्याप्रमाणे पथकांची स्थापना करून आपल्या जिल्ह्यातील बाह्य-मूल्यांकनाचे कामकाज विहित कालावधीत पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथ., माध्य) यांची राहील. तथापि अपवादात्मक किंवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेवून काही बदल करावयाचे असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांनी मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांची परवानगी घेवूनच नियोजनात बदल करावा.


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.