APAAR ID Generation Update - शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे APAAR आयडी या मुदती पर्यंत काढण्याची कार्यवाही पूर्ण करणे MPSP निर्देश.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे APAAR आयडी दि. ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत काढण्याची कार्यवाही पूर्ण करणेबाबत

संदर्भ:

१) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O.No.१-२७/२०२३-DIGED-Part (१) दि. ०२/०९/२०२४ रोजीचे पत्र.

२) या कार्यालयाचे जा.क्र. मप्राशिप/समग्र शिक्षा/संगणक/U-DISE/२०२५-२६/२१२४ दि. १८ जुलै, २०२५ रोजीचे मार्गदर्शक सूचना.

३) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O.N०.१-२७/२०२३-DIGED-Part (६) दि. ३० डिसेंबर, २०२५ रोजीचे पत्र.

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी यु-डायस प्लस प्रणालीमार्फत काढण्यासाठी सर्व शिक्षणाधिकारी यांना कळविण्यात आले होते. विद्यार्थ्यांना अपार आयडी प्राप्त झाल्यावर विद्यार्थ्यांचे डिजिटल पध्दतीने चाईल्ड ट्रॅकिंग, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२० इत्यादी बाबीचे संनियंत्रण करता येईल.

दि. ०१ जानेवारी, २०२६ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीद्वारा प्राप्त अहवालानुसार राज्यातील १८४.२१ लाख (८५.५%) विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याची कार्यवाही पूर्ण झालेली असून २०४.८२ लाख (९५%) विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण झालेले आहे.

राष्ट्रीय मुख्य सचिव, भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याबाबतच्या विषयाचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने संदर्भिय पत्र क्र. ३ नुसार सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याची कार्यवाही दि. ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत पूर्ण करण्यासाठी कळविण्यात आले आहे.
दि. ०१ जानेवारी, २०२६ रोजीच्या अहवालानुसार शाळेतील पूर्व प्राथमिक व इयत्ता १लीच्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्यासाठी नोंदणी केलेली नसल्याचे दिसून येत आहे. अहवालानुसार २९.८० लाख विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत अपार आयडी काढण्यासाठी नोंदणी केली नसल्याचे दिसून येत आहे.

करिता जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावरून कॅम्प आयोजित करून प्रलंबित शाळांमधील विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात यावी. याबाबत जिल्हा व तालुका स्तरावरून दररोज आढावा घेण्यात यावा. अपार आयडी काढत असतांना शाळांना अडचणी येत असल्यास जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) याच्यांशी संपर्क करण्यासाठी कळविण्यात यावे.

सोबत : १) केंद्र शासनाचे दि. ३० डिसेंबर, २०२५ रोजीचे पत्र.

२) जिल्हानिहाय अहवाल

(संजय यादव, भा.प्र.से) 1/1/26

राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.

संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 


यु-डायस स्टुडन्ट पोर्टलवर सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांचा अपार आयडी जनरेट करायचा आहे त्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती पुढील प्रमाणे.

आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करण्यासाठी  विद्यार्थ्यांच्या पालकाचे संमती पत्रक उघडून घ्या त्यासोबत त्यांच्या पालकाचे ओळखपत्र देखील घ्या व पुढील लिंक वर क्लिक करा.

लॉगिन विंडो ओपन होईल आपल्या शाळेचा यु डायस प्लस पोर्टलचा यूजर आयडी म्हणजेच यु डायस कोड व पासवर्ड टाकून लॉगिन करा. 
लगीन झाल्यानंतर पुढील विंडोमध्ये दिल्याप्रमाणे APAAR Module वर क्लिक करा.

वरील विंडोमध्ये आता ज्या वर्गातील विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करायचे आहे तो वर्ग निवडा तुम्हाला त्या वर्गातील विद्यार्थ्यांची लिस्ट पुढील विंडोमध्ये दिल्याप्रमाणे दिसून येईल.
विद्यार्थ्यांच्या नावासमोर शेवटी असलेले Generate वर क्लिक करा.



विद्यार्थ्यांच्या नावासमोरील जनरेट बटनवर क्लिक करा.

विद्यार्थ्याच्या नावासमोरील जनरेट बटन वर केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल ज्यामध्ये विद्यार्थ्यांची माहिती दिसेल व त्याखाली विद्यार्थ्यांच्या पालकाचे संमती पत्र दिसेल त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकाची विद्यार्थ्यांशी असलेले नाते ड्रॉप डाऊन लिस्ट मधून निवडा. त्या अगोदर विद्यार्थ्यांच्या पालकाची नाव टाईप करा. नाते निवडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्याचे ओळखपत्र जे दिले आहे ते निवडा व त्यानंतर त्या ओळखपत्राचा क्रमांक अचूक नोंदवा. व सर्वात शेवटी असलेल्या निळा रंगाच्या Submit बटन वर क्लिक करा.

वरील विंडोमध्ये अचूक माहिती नोंदवून सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांचा अपार आयडी यशस्वीरित्या बनवल्या गेला आहे(APAAR ID generated successfully) असा मेसेज व तयार झालेला अपार आयडी आपल्याला दिसेल.


सदर अपार आयडी आपण नोंदवून घ्यायचा आहे.
यु-डायस प्लस स्टुडन्ट पोर्टलवर तो आपल्याला नेहमीसाठी उपलब्ध असणार आहे.

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.