दि.३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले "लेक वाचवा लेक शिकवा" अभियान राबविण्याबाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यालयाने दिनांक एक जानेवारी 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत.
संदर्भ :
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०१६/प्र.क्र.१.एस.डी.-४. दि.२/१/२०१६.
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०१६/प्र.क्र.३७६/एस.डी.-४, दि.३०/१२/२०१६.
३) मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. लेक शिकवा/२०१६-१७/४-५१६, दि.३१/१२/२०१६.
४) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२०/प्र.क्र.२३०/एस.डी.-४, दि.२४/१२/२०२०.
५) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे पत्र क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१७/एस.डी.-४, दि.३०/०१/२०२५.
६) शासन पत्र क्र. संकीर्ण २०२५/प्र.क्र.१-एस.डी.-४, दि. ३१/०१/२०२५
७) मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. आस्था-क/टे.क्र.प्राथ/शा.प/१६०१/२०२५/८७८, दि.२०/२/२०२५
८) सामान्य प्रशासन विभागाचे शासन परिपत्रक क्र. जपूती-२०२५/प्र.क्र९९५/कार्या-जपुक (२९), दि.२९/१२/२०२५,
उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भिय शासन परिपत्रक, शासन निर्णय तसेच पत्रांचे अवलोकन करावे, सावित्रिबाई फुले यांच्या महान शैक्षणिक कार्याची ओळख शाळांतील विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी राज्यातील सर्व शाळांमधून "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा" अभियान राबविण्याचा निर्णय संदर्भ क्र.१ चे दि.०२/०१/२०१६ चे शासन परिपत्रकान्वये घेण्यात आला. (प्रत संलग्न) त्यानुसार हे अभियान दरवर्षी दि.०३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येते.
सदर परिपत्रकान्वये निर्देश दिल्यानुसार, बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ नुसार प्रत्येक बालकास समान गुणवत्तेचे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याची कायदेशीर तरतूद आहे. त्यानुसार राज्यात मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, मुलीच्या शिक्षणाला गती मिळावी, एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, मुलीच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि गुणात्मक दर्जाचे अधिष्ठान लाभावे, परिस्थितीमुळे मुलीच्या शिक्षणात खंड पडू नये, शाळाबाह्य मुलीना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, स्थलांतरीत पालकांच्या मुलीच्या अखंडीत शिक्षणाची हमी देणे, मुलीना शिक्षणाची प्रेरणा देणे, त्यांच्यात आत्मविश्वास रुजविणे, वैचारिक व तार्किक क्षमता निर्माण करणे, शारीरिक क्षमता वाढीस लावणे, त्यांच्या सृजनशिलतेस वाव देणे तसेच विशेष करुन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणातील विद्यार्थिनीची गळती कमी होणे यासाठी "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा" अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या उद्देशाने स्त्री शिक्षणास सुरुवात केली तो उद्देश केंद्रिभुत ठेवून "लेक वाचवा, लेक शिकवा" या अभियानांतर्गत दि.०३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
तसेच शासन परिपत्रक दि.२९/१२/२०२५ अन्वये सन २०२६ मध्ये राष्ट्र पुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम सोबत असलेल्या परिशिष्टानुसार साजरे करण्याबाबत आपल्या अधिनस्त कार्यालयांस तसेच सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये साजरे करण्यासाठी कळविण्यात यावे. (प्रत संलग्न)
(डॉ. सुचिता पाटेकर)
शिक्षण उपसंचालक
माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण संचालनालय महा. राज्य पुणे.
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 Comments