१५ ऑगस्ट, २०२५ शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचालन व विविध उपक्रम घेऊन साजरा करणे बाबत शिक्षण आयुक्त सूचना

दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचलन कार्यक्रम घेणे व प्रजासत्ताक दिनी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविणेबाबत महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणाधिकांनी दिनांक 23 जुलै 2025 रोजी पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहे. 


शासन परिपत्रक दि.३१ डिसेंबर, २०२४ अन्वये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन विविध (प्रभात फेरी, भाषण / निबंध / कविता स्पर्धा, खेळ, प्रदर्शनी) उपक्रमांसह साजरा करण्याचे निर्देश आहेत.

संदर्भाधीन शासन पत्र दि.१९ जुलै, २०२५ अन्वये आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने दि.१५ ऑगस्ट, २०२५ रोजी सर्व शाळांमध्ये कवायात कार्यक्रमाचे (साधारणतः वीस मिनिटे कालावधी) आयोजन करण्याचे निर्देश प्राप्त आहेत. सदर कवायतींचा मार्गदर्शक व्हिडीओची लिंक या पत्रासोबत देण्यात येत आहे.

१. वेगवेगळ्या वयोगटासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांचा समावेश असेल अशा विविध कवायती शाळांमध्ये आयोजित करण्यात याव्यात.

२. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याविषयी विद्यार्थ्यांनामध्ये जागरुकता निर्माण करणे, देशभक्तीची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य चळवळींवर आधारित या संचलन प्रकारांमध्ये समावेश असावा.

३. यासाठी समर्पक पेहराव व देशभक्तीपर पार्श्वसंगीताचा वापर करुन हे सादरीकरण अधिक प्रभावी करता येतील. तसेच, आवश्यक सराव करुन कवायात प्रकार यशस्वीरित्या सादर होतील याची खात्री करावी.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यासाठी आपल्यास्तरावरुन पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.


(सोबत : मार्गदर्शक व्हिडीओची लिंक)

https://www.youtube.com/watch?v=N7asfiJNYEK


Signed by

Sachindra Pratap Singh Date: 23-07-2025 18:35:49 (सचिन्द्र प्रताप सिंह, भा.प्र.से.)

आयुक्त (शिक्षण), म.रा., पुणे


प्रत पुढील आवश्यक कार्यवाहीस्तवः

१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व) विभाग

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषदा, सर्व

३. शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई महानगरपालिका (उ/द/प)

४. प्रशासन अधिकारी मनपा/नपा/नप सर्व

प्रत माहितीस्तवः उपसचिव, (एसडी-४), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२


दिनांक : १९ जुलै, २०२५

आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय :- दिनांक १५ ऑगस्ट या देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कवायत संचलन कार्यक्रम घेण्याबाबत..

संदर्भ :- शासनाचे समक्रमांकाचे परिपत्रक, दिनांक ३१ डिसेंबर, २०२४

महोदय,

राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये २६ जानेवारी, २०२५ पासून प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करणेबाबत संदर्भाधीन परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

२. दिनांक १५ ऑगस्ट या देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजी कवायत संचलन कार्यक्रम घेण्याचे आयोजन करण्यात यावे.

३. राज्याचा शासकीय झेंडा वंदन व केंद्र शासनाचा शासकीय झेंडा वंदन कार्यक्रमानंतर शाळांमध्ये कवायत कार्यक्रमाचे आयोजन व्हावे. कवायत संचलनाचा कार्यक्रम साधारणतः वीस मिनिटे इतक्या कालावधीचा असावा.

४. कवायतीचा मार्गदर्शक व्हिडीओ तयार करण्यात आला असून, त्याची लिंक या पत्रासोबत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

५. दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजीच्या स्वातंत्र्यदिनी करावयाच्या कवायत संचलनाच्या वर नमूद केल्याप्रमाणे व अतिरिक्त सूचना आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना देण्यात याव्यात, ही विनंती.


आपला,

सोबत : वरीलप्रमाणे.

Digitally signed by Tushar Vasantrao Mahajan Date: 19-07-2025 11:28:14

(तुषार महाजन) उपसचिव, महाराष्ट्र शासन



भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन समारंभ गुरुवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२४ साजरा करणे बाबत दिनांक नऊ ऑगस्ट 2024 रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन परिपत्रक निर्गमित करून पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.

शासन परिपत्रक

गुरुवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२४ रोजी भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन समारंभ साजरा करण्यात येणार आहे. राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खालीलप्रमाणे निदेश देण्यात येत आहेत :-

१) राज्यात सर्व विभागीय/जिल्हा/उप विभागीय/तालुका मुख्यालयात तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावा.

२) विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती व कोकण यांनी आपापल्या विभागातील तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याची योग्य ती व्यवस्था करावी.

३) राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करुन साजरा करण्यात येईल. पुणे येथे मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

४) काही मंत्री महोदय एकापेक्षा अधिक जिल्ह्यांचे पालकमंत्री असल्यास राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमासाठी शासनाकडून त्यांच्याकरिता एक जिल्हा निश्चित करुन देण्यात येईल. त्याप्रमाणे ज्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी त्यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात येईल. राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमासाठी पालकमंत्री निश्चिती झाली नसल्यास किंवा निश्चित झालेले पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी वेळेवर उपस्थित राहू न शकल्यास, विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी हे ध्वजारोहण करतील.

५) ध्वजारोहणाचा जिल्ह्याच्या/विभागाच्या मुख्यालयातील मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात यावा. सदर दिवशी सकाळी ८.३५ ते ९.३५ वा. या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ८.३५ वा. च्या पूर्वी किंवा ९.३५ वा.च्या नंतर आयोजित करावा.

६) राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत वाजविण्यात येईल व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येवून राज्यगीत वाजविण्यात येईल.

७) याप्रसंगी भाषणांचा विषय हा स्वातंत्र्यदिनाचे महत्व विषद करणारा तसेच उपस्थितांना देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित करणारा असावा.

८) संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालय आणि सरपंच किंवा गांव प्रमुख हे ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करतील.

९) समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा.

१०) दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे वृक्षारोपण, आंतर शालेय/आंतर महाविद्यालय वाद- विवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा/देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. निवडक विद्यार्थी / विद्यार्थीनींचे देशभक्तीपर गाणे/भाषणे आयोजित करावीत. शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एखादया विषयाचा Webinar आयोजित करावा, एनएसएस व एनवायकेएस द्वारे देशभक्तीपर मोहिम राबविण्यात यावी, तसेच देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मते संबंधातील गाण्यांचा प्रचार करावा.

११) राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर (ग्रामीण भागात सुध्दा) तसेच ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यांवर (उदा. रायगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, वसई, प्रतापगड, दौलताबाद, सिताबर्डी) राष्ट्रध्वज उभारण्यात यावा.

) राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी- १२ १०९१/३०, दिनांक २० मार्च, १९९१ व क्रमांक एफएलजी-१०९१ (२)/३०, दिनांक ५ डिसेंबर, १९९१ आणि परिपत्रक क्रमांक एफएलजी १०९८/३४३/३०, दिनांक ११ मार्च, १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत

तालीम घेतली जाईल याचीही दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची व १३ सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी. ) स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद/पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडीलांना, शौर्य पुरस्कार विजेत्यांना, स्थानिक राजकीय पक्षांचे प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, स्थानिक शासकीय अधिकारी आणि प्रमुख नागरिक यांना मुख्य शासकीय कार्यक्रमास निमंत्रित करावे.

१४) विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व अमरावती हे त्यांच्या विभागीय मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाची व्यवस्था करणार असल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही. विभागीय आयुक्त, कोकण हे कोकण भवन येथील समारंभाची व्यवस्था करतील. मंत्रालय, मुंबई येथे शासनाचा मुख्य कार्यक्रम असल्याने जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी ध्वजारोहणाची कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही.

१५) समारंभानंतर संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी सदर समारंभास निमंत्रित केलेल्या मान्यवरांची यादी शासनास तात्काळ सादर करावी. १६) विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी या परिपत्रकात दिलेले निदेश योग्य प्रकारे पाळण्यात येतील, याची व्यक्तीशः दक्षता घ्यावी.

१७) आचारसंहिता अंमलात असल्यास खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत असून सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावीः-

अ) ध्वजारोहणाच्या नेहमीच्या स्थळ व वेळेमध्ये बदल करण्यात येऊ नये,

व) कार्यक्रमाचा वापर राजकीय व्यासपीठासारखा होणार नाही याची दक्षता घ्यावी,

क) मा. पालकमंत्री/इतर मान्यवर भाषण करणार असल्यास त्यांच्या भाषणाचा आशय कुठल्याही पद्धतीने राजकीय असता कामा नये.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(मिलिंद हरदास)

 अवर सचिव, महाराष्ट्र शासन


संपूर्ण शासन परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 75 वा वर्धापन दिन समारंभ साजरा करणे व महत्वपूर्ण सूचना बाबत आजचे शासन परिपत्रक.


महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन परिपत्रकानुसार भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन समारंभ सोमवार दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी साजरा करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


सोमवार दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे सन 2019 प्रमाणे राज्यात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

राज्यात सर्व विभागीय जिल्हा उपविभागीय तालुका मुख्यालय तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात यावा.

विभागीय आयुक्त पुणे नागपूर औरंगाबाद अमरावती व कोकण यांनी आपापल्या विभागातील तसेच जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी बजरंग समारंभ आयोजित करण्याची योग्य ती व्यवस्था करावी.

राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण पूर्ण साजरा करण्यात येईल पुणे येथे माननीय राज्यपाल महोदय यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी आयोजित करण्यात यावा सदर दिवशी सकाळी 8:359:35 या वेळात ध्वजारोहणाची किंवा इतर कोणतीही शासकीय किंवा निम शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी आठ वाजून 35 वाजताच्या पूर्वी किंवा 9:35 वाजेच्या नंतर आयोजित करावा.

राष्ट्रध्वजातला वंदन करताना राष्ट्रगीत वाजविण्यात यावे सलामीच्या वेळी सज्ज असलेल्या बँड सलामीपूर्वी सलामी नंतर वाजवावा.

यावेळी करण्यात येणाऱ्या भाषणांचा विषय हा स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद करणारा तसेच उपस्थित त्यांना देशाची एक अखंडता अबाधित ठेवण्यासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित करणारा असावा.

संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार या अनुक्रमे उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालय आणि सरपंच किंवा गावप्रमुख हे ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करतील.

समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोशाख परिधान करावा.

दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे वृक्षारोपण आंतरशालेय अंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाइन पद्धतीने वाद-विवाद स्पर्धा परीक्षण मंजुषा देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धाचे आयोजन करण्यात यावे सोशल मीडियाद्वारे निवडक विद्यार्थींचे देशभक्तीपर गाणे भाषणे आयोजित करावीत शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी एखाद्या विषयाचा विबिनार आयोजित करावा एनएसएस व एन वाय के एस द्वारे देशभक्तीपर ऑनलाईन मोहीम राबवण्यात यावी तसेच सोशल मीडिया व डिजिटल माध्यमांद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मते ातील गाण्यांचा प्रचार करावा संदेश द्यावा.

राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतींवर ग्रामीण भागात सुद्धा तसेच ऐतिहासिक महत्त्वाच्या किल्ल्यांवर उदाहरणार्थ रायगड सिंहगड शिवनेरी पुरंदर वसई प्रतापगड दौलताबाद सीताबर्डी राष्ट्रध्वज उभारण्यात यावा.

राष्ट्रध्वज लावण्याचा योग्य पद्धती बाबत शासन परिपत्रक दिनांक आक्रमण 1998 दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी . ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याचीही दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची व सूर्यास्तास उतरला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी.

खासदार आमदार जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य नगरसेवक स्वातंत्र्यसैनिक शहीद जवानांच्या पत्नी आई-वडिलांना स्थानिक राजकीय पक्षांचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती स्थानिक शासकीय अधिकारी आणि प्रमुख नागरिक यांना मुख्य शासकीय कार्यक्रमास निमंत्रित करावे.

विभागीय आयुक्त पुणे नागपूर औरंगाबाद नाशिक व अमरावती हे त्यांच्या विभागीय मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाची व्यवस्था करणार असल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही विभागीय आयुक्त कोकण हे कोकण भवन येथील समारंभाची व्यवस्था करतील जिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी ध्वजारोहणाची कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही.

संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी आपापल्या अधिकार क्षेत्रातील स्वातंत्र्य दिन समारंभ साधना करण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही कृपया करावी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी या परिपत्रकात दिलेले निर्देश योग्य प्रकारे पाळण्यात येतील याची व्यक्तिशः दक्षता घ्यावी.

आचारसंहिता अमलात असल्यास खालील प्रमाणे सूचना देण्यात येत असून सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.

ध्वजारोहणाच्या नेहमीच्या स्थळामध्ये बदल करण्यात येऊ नये.

कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करू नये.

विभागीय मुख्यालय जिल्हा मुख्यालय ध्वजारोहण करण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांबाबत सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येत आहे.

हा कार्यक्रम साजरा करताना कोरोना विषाणूच्या पशुभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय व तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.




वरील महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.