पुन्हा मुदतवाढ! Shalarth Pending Bills Tab - २०२५-२६ मधील थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणे संचालक आदेश!

शालार्थ प्रणालीमध्ये जिल्हा परीषद बाबतीत DDO-१ (मुख्याध्यापक) लॉगीनमध्ये Pending Bill Entry करणेकरिता मुदतवाढ मिळणेबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

06 FEB 2026

प्रति.

श्री. पवन जोशी, बिझनेस अॅनालिस्ट (शालार्थ प्रणाली), महाआयटी को.लि. परेल, मुंबई

विषय :- शालार्थ प्रणालीमध्ये जिल्हा परीषद बाबतीत DDO-१ (मुख्याध्यापक) लॉगीनमध्ये Pending Bill Entry करणेकरिता मुदतवाढ मिळणेबाबत.

संदर्भ:- शिक्षणाधिकारी प्राथमिक जि.प. बुलडाणा याचे क्रमांक के. बुजिप/शिप्रा/लेखा-शालार्थ/ई ऑफीस१३२३६८६/२०२६, दि. २९/०१/२०२६ चे पत्र

उपरोक्त विषयी शिक्षणाधिकारी प्राथमिक (प्राथमिक), जिल्हा परीषद अंतर्गत अंतर्गत सन २०२५-२६ मध्ये शालार्थ प्रणालीअंतर्गत DDO-१ (मुख्याध्यापक) लॉगीनमध्ये Pending Bill Entry करणेची कार्यवाही सुरू आहे. परंतु ११ जानेवारी २०२६ पासून सदर सुविधा बंद करण्यात आलेली आहे.

जिल्हा परिषद शाळांवर लिपीक वर्गीय पदे मंजूर नसल्यामुळे पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांची वेतन फरक, वरीष्ठ / निवडश्रेणी फरक व इतरही रजा वेतनाची देयके प्रथमतः पंचायत समिती स्तरावरील लिपीक तयार करतात व ती सर्व देयके पंचायत समिती स्तरावरील सहाय्यक लेखाधिकारी यांचेकडून तपासून त्यानंतर सदर देयकांची मुख्याध्यापक लॉगीन मधून SHALARTH प्रणाली मध्ये Periding Bill Entry करण्यात येते. त्यामुळे SHALARTH प्रणाली मध्ये जिल्हा परीषद बाबतीत DDO-१ (मुख्याध्यापक) लॉगीनमध्ये Pending Bill Entry करणेकरिता लेखाशिर्ष २२०२०१७३-३६, २२०२३७०८ अंतर्गत दिनांक २० मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. तसेच लेखाशिर्ष २२०२३७०८ या लेखाशिर्षांतर्गत वैद्यकीय देयकांची प्रतिपूर्ती करीता बीडीएस काढण्याची सुविधा कार्यन्वित करण्यात यावी


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१


 थकीत वेतन देवके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणे सन २०२५-२६ पुन्हा मुदतवाढ देणेबाबत शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक यांनी दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व.

२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद, संबंधित सर्व.

३) शिक्षण निरीक्षक, (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई.

४) अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (प्राथमिक/माध्यमिक) संबंधित सर्व.

विषय थकीत वेतन देवके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत. सन २०२५-२६. मुदतवाढ.

संदर्भ- १) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २४१५/३४/१५) अर्थसंकल्प, दिनांक १५/७/२०१७.

२) शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. अंदाज-२०१/थकीत वेतन/२०२१/३०७० दिनांक ४/८/२०२१

३) दिनांक ६/६/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.

४) दिनांक ३/९/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश

५) संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालाये/चकीत/ऑनलाईन/५०४७दिनांक-११/१/२०२४.

६) संचालनालयाचे परिपत्रक क्र. प्राशिसं/अंदाज-२०३/वकीतशाओं/२०२४/६०९४

दिनांक-१२/९/२०२४.

७) संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा/२०२५/टि-७/चकोत/ऑनलाईन/०५३६९ विमांका-११/११/२०२५.


८) प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे परिपत्रक क्र. प्रशिस/अंदाज-२०३/चकील/ऑनलाईन १६४२३६७ दिनांक-०२/०१/२०२६

सन २०२४-२५ पासून शासन निर्णय दिनांक १५/७/२०१७ मधील आदेशानुसार थकीत देयके ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. यासंदर्भात विस्तृत सूचना संदर्भ क्र. ५ व ६ अन्वये देण्यात आलेल्या आहेत. तसेच संदर्भ क्र. ७ अन्वये सन २०२५-२६ मध्ये चकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत.

संदर्भ क. ८ अन्वये सन २०२५-२६ मध्ये थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी डिडिओ? (मुख्याध्यापक) शाळा स्तर यांना दिनांक १०/०१/२०२६ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.

दिनांक २०/०१/२०२६ रोजीच्या थकित देयकांबाबत ऑनलाईन माहीती नुसार प्रत्येक जिल्हानिहाय चकित देयके प्रलंबित असल्याचा तपशील या पत्रासोबत जोडलेला आहे, त्यानुसार आपल्या स्तरावरुन चकीत देयके (नियमित व न्यायालयीन प्रकरणे) (केवळ १ ते ६ वर्ष व ६ वर्षापेक्षा जास्त कालावधीचे) आपण दिनांक ०२/०२/२०२६ पर्यंत जशी जशी आपलेस्तरावरुन पडताळणी होईल तसे पूढे ऑनलाईन पध्दतीने पाठविण्यात यावेत,


प्रस्तावासोबत तपासणीसूचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची काटेकोरपणे तपासणी करुन ऑनलाईन फारवर्ड करावा तसेच ऑफलाईन पध्दतीने प्रस्ताव २ प्रतीमध्ये संचालनालयास सादर करावा.


त्यानंतर सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके मान्यतेसाठी स्थिकृत केली जाणार नाहीत. विलंबामुळे देयके आदा होणेस अडचण निर्माण झालेस त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील.


तसेच शासनास सादर करण्यात येणारी सहा वर्षावरील कालावधीचे चकीत देयकाचा प्रस्ताव विवरणपत्र-३ मध्ये ऑनलाईन सादर करावे. प्रस्तावासोबत तपासणीसूचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन ऑनलाईन फारवर्ड करावा आणि ऑफलाईन पध्दतीने प्रस्ताव २ प्रतीमध्ये संचालनालयास सादर करावा.


वर नमूद कालमर्यादा तंतोतंत पाळली जाईल याची दक्षता घ्यावी. सन २०२५-२६ मधील शालार्थ प्रणालीमधील चकीत देयकासंदर्भात केलेल्या सुधारित सुविधांच्या सविस्तर माहितीसाठी शालार्थमध्ये (User Manual) पहावे. सोबत वकित देयकांचा जिल्हानिहाय तक्ता.


शिक्षण संचालक,

(शरद गौसावी) प्राथमिक

महाराष्ट्र राज्य, पुणे-१.


 (डॉ. महेश पालकर) 

शिक्षण संचालक,

 माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, म. रा. पुणे-१.

प्रत-मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, संबंधित सर्व

प्रत माहितीस्तव सविनय सादर-

१. मा. आयुक्त, निक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे-१.

२. बी विशाल लोहार, कक्ष अधिकारी (टीएनटी-३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

प्रत थी. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई यांनी वरील प्रमाणे दिलेल्या निर्देशानुसार सन २०२५-२६ मध्ये चकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन टेंब उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच वेळोवेळी येणा-या तांत्रिक अडचणीचे तात्काळ निराकरण करावे.

मुदतवाढ संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील Download वर क्लिक करा. 

Download

थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणे सन २०२५-२६ मुदतवाढ प्राथमिक शिक्षण संचालनालय आदेश ०२/०१/२०२६



संदर्भ- १) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २४१५/(३४/१५)/अर्थसंकल्प, दिनांक १५/७/२०१७.

२) शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. अंदाज-२०१/थकीत वेतन/२०२१/३०७० दिनांक ४/८/२०२१

३) दिनांक ६/६/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.

४) दिनांक ३/९/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.

५) संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/थकीत/ऑनलाईन/५०४७दिनांक-११/९/२०२४.

६) संचालनालयाचे परिपत्रक क्र. प्राशिसं/अंदाज-२०३/थकीतशाओं/२०२४/६०९४ दिनांक-१२/९/२०२४.

७) संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा/२०२५/टि-७/थकीत/ऑनलाईन/०५३६९ दिनांक-१९/११/२०२५.

सन २०२४-२५ पासून शासन निर्णय दिनांक १५/७/२०१७ मधील आदेशानुसार थकीत देयके ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. यासंदर्भात विस्तृत सूचना संदर्भ क्र. ५ व ६ अन्वये देण्यात आलेल्या आहेत. तसेच संदर्भ क्र. ७ अन्वये सन २०२५-२६ मध्ये थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत.

संदर्भ क्र. ७ अन्वये सन २०२५-२६ मध्ये थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी डिडिओ१ (मुख्याध्यापक) शाळा स्तर यांना दिनांक ३१/१२/२०२५ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. परंतू अद्यापही बहुतांश शिक्षक कर्मचा-यांचे थकीत देयके शाळा स्तरावरून शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर होऊ शकलेली नाही. यासाठी वेतन पथक कार्यालय व विविध संघटनांकडून सन २०२५-२६ मध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळणेबाबत विनंती करण्यात आलेली आहे.

सबब डीडीओ-१ (मुख्याध्यापक) शाळा स्तरावरुन थकीत देयके (नियमित व न्यायालयीन प्रकरणे) (केवळ १ ते ६ वर्ष व ६ वर्षापेक्षा जास्त कालावधीचे) ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक १०/०१/२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानंतर सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होणार नाही.

तसेच शासनास सादर करण्यात येणारी सहा वर्षावरील कालावधीचे थकीत देयकाचा प्रस्ताव विवरणपत्र-३ मध्ये ऑनलाईन सादर करावे. प्रस्तावासोवत तपासणीसूचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने प्रस्ताव २ प्रतीमध्ये संचालनालयास सादर करावा. वर नमूद कालमर्यादा तंतोतंत पाळली जाईल याची दक्षता घ्यावी. सन २०२५-२६ मधील शालार्थ प्रणालीमधील थकीत देयकासंदर्भात केलेल्या सुधारित सुविधांच्या मविस्तर माहितीसाठी शालार्थमध्ये (User Manual) पहावे.


Digitally signed by

Shriram Mahadu Panzade

शिक्षण सहसंचालक,

माध्यमिक व उच्च माध्यमिक

शिक्षण संचालनालय, म.रा.पुणे-१


Digitally signed by

SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 01-01-2026 18:43:19 (शरद गोसावी)

शिक्षण संचालक प्राथमिक

प्रत-मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, संबंधित सर्व

महाराष्ट्र राज्य, पुणे-१.


प्रत माहितीस्तव सविनय सादर-

१. मा. आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे-१.

२. श्रीमती विशाल लोहार, कक्ष अधिकारी (टीएनटी-३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

प्रत- श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई. यांनी वरील प्रमाणे दिलेल्या निर्देशानुसार सन २०२५-२६ मध्ये थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी दि. १०/०१/२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आले असून त्यानुसार टॅब उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच वेळोवेळी येणा-या तांत्रिक अडचणीचे तात्काळ निराकरण करावे.

वरील संपूर्ण परिपत्रक PDF स्वरूपात Download.. 

Download


लेखाशिर्ष २२०२०५११ मधील माहे फेब्रुवारी २०२५ चे राहिलेले वेतन व लेखाशिर्ष २२०२३३६१ मधील ७ व्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करणे बाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

विषयांकित प्रकरणी पर्याप्त अनुदान उपलब्ध नसल्याने लेखाशिर्ष २२०२०५११ मध्ये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील माहे फेबुवारी २०२५ चे नियमित वेतन अशंताः अदा होवू शकलेले नाही. तसेच माहे फेबुवारी २०२५ च्या वेतनासोबत ७ वा वेतन आयोग पाचवा हप्ता अदा करणे साठी काही जिल्हयात पर्याप्त अनुदान उपलब्ध नसल्याने लेखाशिर्ष २२०२३३६१ मध्ये ७ वा वेतन आयोग पाचवा हप्ता अदा होवू शकलेला नाही.

शासन निर्णय क्र. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकिर्ण २४१५/ (३४/१५) अर्थसंकल्प दि.१५/०७/२०१७अन्वये त्या त्या आर्थिक वर्षाची देयके ३१ मार्चपूर्वी अदा न झाल्यास ती थकित समजण्यात येवून मान्यतेसाठी संचालनालयास सादर करून मान्यता घेण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार लेखाशिर्ष २२०२३३६१ मध्ये ७ वा वेतन आयोग पाचवा हप्ता अदा करणे बाबत कार्यपध्दतीचा अवलंब करावा.

नियमित मासिक वेतन देयकास प्रशासकीय मान्यता क्रमांक नसतो, शाळा स्तरावरून शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन थकित देयके सादर करतांना प्रशासकीय मान्यता आदेश क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. लेखाशिर्ष २२०२०५११ मध्ये माहे फेबुवारी २५ चे राहिलेले वेतन देयक ऑनलाईन सादर करण्यासाठी संचालनालयाचे सदर पत्राचा क्रमांक संदर्भ क्रमांक म्हणून नमूद करून माहे फेबुवारी २५ चे राहिलेले वेतन देयक ऑनलाईन मान्यतेसाठी सादर करण्यात यावे.


(डॉ. महेश पालकर)

 शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रत माहितीस्तव सादर :-

१. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे-१. सविनय सादर

२. विभागीय शिक्षण उपसंचालक, संबधित सर्व


थकित वेतन... shalarth प्रणाली मधून अदा करणे सुरू....

आपली सर्व प्रकारची थकित देयक online करून घ्या....

कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे थकीत देयके, 7 व्या वेतन आयोगाचे हप्ते व इतर वेतन फरकाचे प्रलंबीत देयके SHALARTH प्रणालीमधून Online पद्धतीने सादर करणेबाबत मार्गदर्शक सुचना.



संदर्भ:


1) मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) / (माध्यमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्रक्र. शिसंमा /2025 / टि-7/ थकीत / ऑनलाईन 05369 दिनांक 19.11.2025.

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे थकीत देयके 7 व्या वेतन आयोगाचे हप्ते व इतर वेतन फरकाचे प्रलंबीत देयके

SHALARTH प्रणालीमधून ONLINE पद्धतीने सादर करणेबाबतचे निर्देश प्राप्त झालेले आहेत. त्यानुषंगाने आपले पंचायत समिती / हायस्कूल अंतर्गत 7 व्या वेतन आयोगाचा हप्ता प्रलंबीत

असेल किंवा इतरही ज्या देयकाचे मंजुरी आदेशास 01 वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला असेल तर, अशा देयकांना सर्वप्रथम लेखापुर्व परवानगी करीता देयकाबरोबर गटशिक्षणाधिकारी / हायस्कूल मुख्याध्यापक यांचे स्वाक्षरीचा लेखापूर्व परवानगी नमुना जोडून मंजुरी घेण्यात यावी. मंजुरी नंतर खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

प्रलंबीत देयके SHALARTH प्रणालीमधून Online पद्धतीने सादर करतांना खालील मार्गदर्शक सुचनानुसार कार्यवाही करण्यात यावी.


* उपलब्ध निधीनुसार प्रलंबीत । थकीत देयकांसाठीचे प्राधन्यक्रम *

1) मार्च 2025 पुर्वीचे प्रलंबीत वेतन / रजा वेतन

2) सेवानिवृत्त कर्मचारी यांचे 7 वा वेतन आयोग फरकाचे प्रलंबीत असेल तो हप्ता

3) सेवानिवृत्त कर्मचारी यांचे महागाई भत्ता फरकाचे देयक,

4) कार्यरत कर्मचारी यांचे वरीष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी फरकाचे देयक

5) कोणताही वेतन फरक प्रलंबीत असेल त्या वेतन फरकाचे देयक

6) निलंबन काळ सेवाकाळ झालेला असेल त्याचे वेतन फरकाचे देयक.

7) Stepping UP मुळे वेतन वाढ झालेली असल्यामुळे वेतन फरकाचे देयक

8) जि प हायस्कूलवरील शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे रजारोखीकरण देयक

9) विशेष शिक्षकांचे दिनांक 08 ऑक्टोबर 2024 पासून नियमीत वेतनश्रेणी अदा केलेल्या दिनांकापर्यंतचे वेतन फरक


प्रलंबीत । थकीत देयकांसाठीचे कार्यपद्धती

1) सर्वप्रथम प्रलंबीत वेतन / रजा वेतन हे देयक तसेच इतरही देयके ही पंचायत समिती स्तरावर अस्थापना लिपीक यांनी Offline प्रचलीत पद्धतीने अचूक नमुना-26 तयार करावा.

2) सदर देयक गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीने तपासणी साठी पंचायत समिती लेखा विभागाकडून

तपासणी करून सदर देयकावर सहाय्यक लेखाधिकारी यांनी तपासले म्हणून त्यांची स्वाक्षरी घ्यावी.

3) त्यानंतरच सदर देयकाची User Manual चा उपयोग करून SHALARTH प्रणालीमध्ये Claim Entry करावी.

4) Broken Period ID च्या Page ची Ctrl + P चा उपयोग करून प्रिंट काढणे व त्यासोबत गटशिक्षणाधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी यांच्या स्वाक्षरीची देयकाची झेरॉक्स प्रत सोबत जोडावो.

5) गटशिक्षणाधिकारी लॉगीनमध्ये सर्व Claim Entry चे Pending Bill Batch Creation करावे Batch चा Performa Report वर गटशिक्षणाधिकारी यांची सही व शिक्क्यासह त्याखाली क्रमाने देयकाचे Hard Copy जोडून जिल्हा कार्यालयास Batch Approval साठी सादर करावे,

मार्च 2025 पुर्वीचे प्रलंबीत वेतन/रजावेतन चे Claim सोबत जोडावयाचे


आवश्यक कागदपत्रे 

रजा वेतन किवा प्रलंबीत वेतन अदा करणेबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचे आदेश,

सदर देयकाचे अचूक विवरणपत्र नमुना -26

सदर देयक यापुर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही याबाबत गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.

देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी.

सेवानिवृत्त / मयत कर्मचारी यांचे 7 वा वेतन आयोग फरकाचे हप्ते (1 ते 5 वा हप्ता) यापैकी जो प्रलंबीत असेल तो हप्ता चे Claim सोबत जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे

7 वा वेतन आयोग फरकाचे माहे जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 पर्यंतचे विवरणपत्र.

सेवानिवृत्ती आदेशाची झेरॉक्स प्रत

मयत कर्मचारी बाबतीत मृत्यू प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत

सेवापुस्तकाच्या वेतन निश्चिती पडताळणी झालेल्या पानाची झेरॉक्स प्रत

सदर देयक यापूर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही याबाबत गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र

देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी.

* सेवानिवृत्त कर्मचारी यांचे महागाई भत्ता फरकाचे देयक चे Claim सोबत जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे *

* महागाई भत्ता फरकाचे विवरणपत्र व वेतन देयक नमुना-26

सेवानिवृत्ती आदेशाची झेरॉक्स प्रत.

* सदर देयक यापूर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही याबाबत गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.

* देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी.


कार्यरत कर्मचारी यांचे वरीष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी फरकाचे देयक चे Claim सोबत जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे *

* वेतन फरकाचे विवरणपत्र, व वेतन देयक नमुना 26

वरीष्ठ वेतन श्रेणी / निवडश्रेणी मंजूर आदेशाची झेरॉक्स प्रत.

सेवापुस्तकाच्या वेतननिश्चिती पडताळणी झालेल्या पानाची झेरॉक्स प्रत

* सदर देयक यापूर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही याबाबत गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र,

देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक

लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी.

* कोणताही वेतन फरक प्रलंबीत असेल त्या वेतनफरकाचे Claim सोबत

जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे *

* वेतन फरकाचे विवरणपत्र व वेतन देयक नमुना -26

वेतन फरक प्रलंबीत असून अदा करणेबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचे आदेश.

सदर देयक यापुर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही याबाबत गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र,

देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी.

* निलंबनकाळ सेवाकाळ झालेला असेल त्याचे वेतन फरकाचे Claim सोबत जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे

वेतन फरकाचे विवरणपत्र. व वेतन देयक नमुना -26

निलंबनकाळ सेवाकाळ केले असलेबाबत सक्षम प्राधिकारी यांचे आदेश.

सदर देयक यापुर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही

याबाबत गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र,

देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी.

Stepping UP मुळे वेतन वाढ झालेली असल्यामुळे वेतन फरकाचे Claim

सोबत जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे

वेतन फरकाचे विवरणपत्र. वेतन देयक नमुना -26

Stepping UP मुळे वेतनवाढ केले असलेबाबत सक्षम प्राधिकारी यांचे आदेश.

सेवापुस्तकाच्या वेतननिश्चिती पडताळणी झालेल्या पानाची झेरॉक्स प्रत

सदर देयक यापुर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही

याबाबत गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.

देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी.

* हायस्कूलवरील शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे रजारोखीकरणाचे Claim सोबत

जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे "

वेतन फरकाचे विवरणपत्र. वेतन देयक नमुना-26

रजो रोखीकरण मंजुरीबाबत मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि) यांचे आदेश.

सेवानिवृत्ती आदेशाची छायांकीत प्रत

सेवापुस्तकातील रजालेखा प्रमाणित छायांकीत प्रत,

* शेवटचे महिन्याचे (सेवानिवृत्त झालेले महिन्याचे) शालार्थ वेतनस्लीप

सदर देयक यापूर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही

याबाबत हायस्कूल मुख्याध्यापक यांचे प्रमाणपत्र.

देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी.


* विशेष शिक्षक यांचे 08 ऑक्टोबर 2024 पासून ते नियमीत वेतनश्रेणी लागू झालेपर्यंतचे वेतन फरकाचे Claim सोबत जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे

वेतन देयक नमुना-26

समग्रशिक्षा अभियानकडून यापुर्वी दिलेल्या वेतनाचेपुष्टी करिता विवरणपत्रावर पूर्वीच्या

अस्थापनेच्या प्रमुखांची स्वाक्षरी, व नादेय प्रमाणपत्र,

सदर देयक यापूर्वी अदा करण्यात आलेले नाही व सदर देयकामध्ये अतिप्रदान झालेले नाही

याबाबत गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.

नियुक्ती आदेशाची छायांकीत प्रत.

देयक अचूक व वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणी बाबत पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी.

उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करून उपलब्ध अनुदानानुसार दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत पहिला टप्प्यामध्ये 1) मार्च 2025 पुर्वीचे प्रलंबीत वेतन / रजा वेतन (2) सेवानिवृत्त कर्मचारी यांचे 7 वा वेतन आयोग फरकाचे प्रलंबीत हप्ते 3) सेवानिवृत्त कर्मचारी यांचे महागाई भत्ता फरकाचे देयक जिल्हा कार्यालयास सादर करावे. तसेच उर्वरीत देयके ही दुसऱ्या टप्प्यामध्ये दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत जिल्हा कार्यालयास सादर करावे. सदर बाबतीत विलंब झाल्यास व आपले पंचायत समिती / शाळेअंतर्गत एकही शिक्षकांचे देयक प्रलंबीत राहील्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांची राहील.

सोबत जिल्हा समन्वयक यांनी तयार केलेले User Manual


Digitally signed by Vikas Mahadu Patil Date: 17-12-2025 13:09:55

विकास म पाटील

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जिल्हा परीषद बुलडाणा



शालार्थ पेंडींग बिलांबाबत....


माहे डिसेंबर 2025 या महिन्यात शालार्थ 2.0 टॅब मधून पेंडिंग बिले काढली जाणार आहेत तरी फरक बिले तयार करून, अर्ज, व कागद पत्रे एक प्रत ऑफिसला व एक प्रत शालार्थ प्रतिनिधी यांचे कडे देणेत यावी टॅब मर्यादित कालावधी साठी असते याची नोंद घ्यावी टॅब बंद झालेनंतर फरक बिले टाकता येत नाहीत....

सेवानिवृत्त असो वा सेवेत महागाई भत्ता फरक, पगार, 7 वा वेतन आयोग फरक,मेडिकल बिल, इत्यादी बिले सादर करावीत.....


👆 निव्वळ माहितीस्तव 👆

----------------------

थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत सन २०२५-२६ शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 


संदर्भ- १) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २४१५/(३४/१५)/अर्थसंकल्प, दिनांक १५/७/२०१७.

२) शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. अंदाज-२०१/थकीत वेतन/२०२१/३०७० दिनांक ४/८/२०२१

३) दिनांक ६/६/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.

४) दिनांक ३/९/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.

५) संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/थकीत/ऑनलाईन/५०४७दिनांक-११/९/२०२४.

६) संचालनालयाचे परिपत्रक क्र. प्राशिसं/अंदाज-२०३/थकीतशाओं/२०२४/६०९४ दिनांक-१२/९/२०२४. 

सन २०२४-२५ पासून शासन निर्णय दिनांक १५/७/२०१७ मधील आदेशानुसार थकीत देयके ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. यासंदर्भात विस्तृत सूचना संदर्भ क्र. ५ व ६ अन्वये देण्यात आलेल्या आहेत.

सन २०२५-२६ मध्ये शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून त्याअनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.

तपशिल 

१.संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य ती तपासणी/पडताळणी करुन सदर दाव्यांना मंजूरी पेण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये आपल्या लॉगीन बरुन थकीत देवकासह माहिती भरावी. तसेच आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करावीत.

तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व) शिक्षणाधिकारी/अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक/माध्यमिक) संबंधित सर्व यांचेकडून आज अखेर संचालनालयास ऑफलाईन सादर केलेल्या नवीन /तसेच न्यायालयीन प्रकरणाची चकीत देयके ऑनलाईन सादर करावीत. सन २०२४-२५ मध्ये

संचालनालयाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेली परंतु कोषागारात मादर न केलेली व मान्यता न मिळालेली देयके पुनश्च ऑनलाईन पध्दतीने सादर करावीत.

प्रलंबित सर्व थकीत देयकाची माहिती दिलेल्या तारखेपर्यंत शालार्थमध्ये ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची राहील.

२. अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक/माध्यमिक) व संबंधित शिक्षणाधिकारी

( प्राथमिक/माध्यमिक) यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेली थकीत वेतन अनुदानाची देर्यके नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करुन सदर दाव्यांना ऑनलाईन मंजूरीकरिता संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे सादर करणे.

तथापि, ऑन लाईन प्रस्तावासोबत पुढील कागदपत्रे सादर करावीत.

१. थकीत देयक प्रशासकीय मान्यता संदर्भ आदेश (वैयक्तीक मान्यता/बरिष्ठश्रेणी / न्यायालयीन आदेश / अनुदानाअभावि थकीत देयके इत्यादी)

२ . विहीत नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र यापूर्वी दिलेले आहे.

३. उपरोक्त क्रमांक १ च्या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.

विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांचेकडे ऑनलाईन प्राप्त झालेली थकीत वेतन अनुदानाची देयके नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना ऑनलाईन मंजूरीकरिता संचालकाकडे सादर करणे तसेच उपरोक्त ज.क्र..१ च्या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात. १. विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरील समितीचे मंजूरीस्तव शिफारसपत्र,

२. थकीत देयक प्रशासकीय मान्यता संदर्भ आदेश (वैयक्तीक मान्यता/वरिष्ठश्रेणी/न्यायालयीन आदेश/अनुदानाअभावि थकीत देयके इत्यादी)

३. विहीत नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र जोडावे. यापूर्वी दिले प्रमाणे

४. न्यायालयीन प्रकरणाचे प्रस्ताव संचालनालयाचे न्यायालयीन प्रकरण बाबतचे परिपत्रक दि.६/१/२०२३ नुसार सादर करावे.

विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून बॉनलाईन प्राप्त झालेली प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य ती तपासणी व पडताळणी करुन सदर दाव्यांना शासन निर्णय १५/७/२०१७ मधील सूचनानुमार ऑनलाईन प्रशासकीय मंजूरी शिक्षण संचालक यांचे स्तरावरुन देण्यात येईल.

५.संचालनालय स्तरावरुन शासन निर्णय दिनांक १५/७/२०१७ मधील सूचनानुसार प्रशासकीय मंजूरी दिलेल्या दाव्यांची लेखाशीर्षनिहाय पुरवणी मागणी पुनर्विनियोजन / मुधारित अंदाजाच्या माध्यमातून शासनाकडून निधी उपलब्धतेवाचतचे मागणी प्रस्ताव प्रस्तावित करण्यात येईल.

६. वरीलप्रमाणे लेखाशीर्षनिहाय निधी उपलब्धतेनुसार अनुक्रमांक ४ मध्ये नमूद प्रशासकीय मान्यतानुसार संबंधित सर्व प्रशासकीय आदेश क्रमांक व दिनांक नमूद करुन स्वतंत्रपणे निधी वितरण आदेश वितरीत करण्यात येईल,

थकीत देयकाच्या प्रकारानुसार अपलोड करावयाच्या कागदपत्रांची यादी तपशील खालीलप्रमाणे आहे.

देयकाचा प्रकार

१. पदोन्नती

२. वेतनवाढ

३. निवडश्रेणी-

४. वरिष्ठ वेतनवेणी-

५. शिक्षण सेवक मानधन-

६. महागाई भत्ता फरक-

७. ६ वा ७वा वेतन आयोग फरक

८. निलंबन/बडतर्फ कालावधीतील फरक-

९. न्यायालयीन प्रकरणे-

१०. पवित्रद्वारे नियुक्ती असल्यास

११. नियमित वेतनश्रेणी फरक-

आवश्यक कागदपत्रे -

शिक्षणाधिकारी यांचा आदेश व लेखाधिकारी यांचे वेतननिधीती पडताळणी आदेश

मुख्याध्यापकाचा आदेश

शिक्षणाधिकारी यांचा मान्यता आदेश.

लेखाधिकारी यांचे वेतन निश्चिती पडताळणी आदेश के. व दिनांक शिक्षणाधिकारी/निक्षण उपसंचालक मान्यता आदेश.

शासन निर्णय/मुख्याध्यापक यांचे पत्र

मुख्याध्यापक यांचे पत्र, देयक पूर्वी अदा केले नसल्याबाबत वेतन पथक यांचे प्रमाणपत्र तसेच नेचाधिकारी यांचे वेतन निश्चिती प्रत शिक्षणाधिकारी मान्यता प्रत विभागीय शिक्षण उपसंचालक यांची मान्यता प्रत संस्था आदेश, देयक दुबार आहरित केले नसल्याबाबतचे मुख्याध्यापक आणि वेतन पथक अधीक्षक  यांचे हमीपत्र

विहीत नमुन्यातील न्यायालयीन प्रकरणाचे प्रपत्र, न्यायालयाच्चा निकाल, घटनाक्रम, याचिका दाखल केलेले प्रतिज्ञापत्र

संस्थेचा आदेश व रुजू बहवालाची प्रत

शिक्षणाधिकारी/शिक्षण उपसंचालक मान्यता व वेतननिश्चिती प्रस

उपरोक्त सर्व १ ते ११ देयकाबाबत देयकाचा कालावधी व फरक तक्ता शिक्षणाधिकारी/अधीक्षक यांच्या स्वाक्षरीचा जोडावा तसेच सा सादर करावा तसेच देयकाबाबत मुख्याध्यापक यांचे हमीपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.

८.वरील कागदपत्रासोबतच विहीत नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र अपलोड करावेत. संबंधित शाळांकडून ऑनलाईन प्राप्त थकीत देयके अधीक्षक, वेतन पथक, प्राथमिक/माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक, आणि विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व यांनी तपासून क्षेत्रिय स्तरावरील समितीच्या संयुक्त स्वाक्षरीच्या प्रमाणित अहवालासह (हार्ड कॉपी) संचालनालयास सादर करावी. संबंधित डिडिओ स्तरावर थकीत देयके प्रलंबित राहील्यास अथवा विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.

शासनास सादर करण्यात येणारी सहा वर्षावरील कालावधीचे थकीत देयकाचा प्रस्ताव विवरणपत्र-३ मध्ये सादर करावे. प्रस्तावासोबत तपासणीसूचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने प्रस्ताव २ प्रतीमध्ये सादर करावा.

डीडीओ-१ (मुख्याध्यापक) स्तरावरुन थकीत देयके (नियमित व न्यायालयीन प्रकरणे) (केवळ १ ते ६ वर्ष व ६ वर्षापेक्षा जास्त कालावधीचे) ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक ३१/१२/२०२५ पर्यंत मुविधा उपलब्ध राहील, त्यानंतर सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होणार नाही.

डीडीओ-२ शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक/अधीक्षक, वेतन पथक प्राथमिक स्तरावरुन थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक ३१/०१/२०२५ पर्यंत सुविधा उपलब्ध राहील. डिडिओ-२ यांनी अंतिम दिनांकापर्यंत बाट न पाहता शाळा/मुख्याध्यापक यांचेकडून जसे जसे ऑनलाईन बकोत देयके प्राप्त होतील तसे नियमानुसार पडताळणी करून थकीत देयके त्वरीत पुढे अग्रेषित करावी.

सन २०२४-२५ मध्ये डिडिओ-२ यांनी शाळा/मुख्याध्यापक यांचेकडून ऑनलाईन प्राप्त चकोत देयके नियमानुसार ऑनलाईन तपासणी न करता फॉरवर्ड केल्याचे मागील वर्षी निदर्शनास आले होते. त्यामुळे डिडिओ-२ यांनी शाळा/मुख्याध्यापक यांचेकडून ऑनलाईन प्राप्त थकीत देयके नियमानुसार ऑनलाईन तपासणी पडताळणी करूनच पुढे फॉरवर्ड करावे,

डीडीओ-३ विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरुन वकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक १०/०२/२०२५ पर्यंत मुविधा उपलब्ध राहीन. डिडिओ-३ यांनी अंतिम दिनांकापर्यंत वाट न पाहता शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक/अधीक्षक, वेतन पथक प्राथमिक/माध्यमिक यांचेकडून ऑनलाईन प्राप्त चकीत देयके नियमानुसार पडताळणी करून त्वरीत संचालनालयास फॉरवर्ड करावे

उपरोक्त नमूद अंतिम दिनांकापर्यंत संबंधित डिडिओ यांनी बाट न पाहता त्यांचे स्तरावर ऑनलाईन प्राप्त थकीत देयके नियमानुसार पडताळणी करून त्वरील पुढील डिडिओकडे ऑनलाईन अग्रेषित करावीत. व यासोबतच सदरील देयकाची (हार्ड कापी) पडताळणीसह व स्पष्ट शिफारशीसह संचालनालयास सादर करावी.

सन २०२४-२५ मध्ये डिडिओ-३ यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक/अधीक्षक, वेतन पथक प्राथमिक/माध्यमिक यांचेकडून ऑनलाईन प्राप्त काही चकोत देयके नियमानुसार ऑनलाईन तपासणी न करता संचालनालयाकडे फॉरवर्ड केल्याचे मागील वर्षी निदर्शनास आले होते. त्यामुळे डिडिओ-३ यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक/अधीक्षक, वेतन पथक प्राथमिक/माध्यमिक यांचेकडून ऑनलाईन प्राप्त थकीत देयके नियमानुसार ऑनलाईन तपासणी/पडताळणी करूनच पुढे फॉरवर्ड करावे.

वरीलप्रमाणे दिलेल्या नियोजनानुसार वफीत देयकांसाठी निधी उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने आपल्यास्तरावरुन दिलेली कालमर्यादा पाळल्यास दिनांक १५/७/२०१७ च्या शासन निर्णयातील परिच्छेद २ मधील सूचनांनुसार कार्यवाही करणे सोईचे होईल व पर्यायाने चालू आर्थिक वर्षातील मंजूर असलेल्या तरतूदी मधून नियमित वेतनाचा खैर्च नियमितपणे भागविणे सुकुर होईल, तसेच थकीत वेतनासाठी तरतूद उपलब्ध करून देणेबाबत कार्यवाही करता येईल, वर नमूद कालमर्यादा सर्वच स्तरावर तंतोतंत पाळली जाईल याची दक्षता घ्यावी, सन २०२५-२६ मधील शालार्थ प्रणालीमधील थकीत देयकासंदर्भात केलेल्या सुधारित सुविधांच्या सविस्तर माहितीसाठी शालार्थमध्ये

(User Manual) पहावे.


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक,

प्राथमिक

महाराष्ट्र राज्य, पुणे-१.

(डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक,

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, म. रा. पुणे-१.

प्रत माहितीस्तव सविनय सादर-

१. मा. आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे-१.

२. श्री विशाल लोहार, कक्ष अधिकारी (टीएनटी-३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

प्रत- श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई, यांनी वरील प्रमाणे दिलेल्या निर्देशानुसार सन २०२५-२६ थकीत देयके अदा करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन टॅब उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच वेळोवेळी येणा-या तांत्रिक अडचणीचे तात्काळ निराकरण करावे.

संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


सन २०२५-२६ मधील थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत  शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक एक ऑगस्ट 2025 रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), सर्व, शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पशिम) मुंबई, अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, (माध्यमिक) सर्व  यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


सन २०२४-२५ पासून शासन निर्णय दिनांक ११५/७/२०१७ मधील आदेशानुसार चकीत देयके ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. यासंदर्भात विस्तृत सूचना संदर्भ क्र. ५ अन्वये देण्यात आलेल्या आहेत. प्राप्त स्थितीत न्यायालयीन आदेशामुळे अदा करावयाच्या चकीत देयकाबाचत विविध कार्यालयाच्या स्तरावर अवमान याचिका दाखल झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने मा. न्यायालयाच्या आदेशान्वये तसेच मा. लोकायुक्त व उपलोकायुक्त यांच्या आदेशान्वये अदा करावयाची थकीत देयके महाआयटी शालार्थ प्रणालीमार्फत चकीत देयके (केवळ १ ते ६ वर्ष व ६ वधी पेक्षा जास्त कालावधीचे प्रशासकीय मान्यता दिलेली न्यायालयीन प्रकरणे) अदा करण्यासाठी शालार्थ प्रणालीवरील थकीत देयकाचा टॅब दिनांक ०८/०८/२०२५ ते २०/०८/२०२५ या कालावधीसाठी सुरू करण्यात येत आहे.

संचालनालयाचे संदर्भिय पत्र क्र. ५ नुसार ऑनलाईन थकीत देयके संचालनालयास सादर करावयाची प्रक्रिया राबविण्यात यावी. तसेच न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित थकीत देयके शाळा स्तरावरून अपलोड केल्यानंतर त्याची एक प्रत, न्यायालयीन आदेशासह शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या मार्फत व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची तपासणी समिती यांच्या संयुक्त स्वाक्षरीच्या अहवालासह न्यायालयीन प्रकरणाचे प्रपत्रासह संचालनालयास तातडीने ऑनलाईन व ऑफलाईन (हार्ड कॉपी) (दिनांक ५ बर्ष २०२५) पर्यंत संचालनालयास सादर करावी.

मा. न्यायालयाचे आदेश/मा. लोकायुक्त व उपलोकायुक्त यांच्या आदेश व विभागीय तपासणी समिती यांचे प्रपत्र जोडलेले नसल्यास थकीत देयक नामंजूर करण्यात येईल.

सदर न्यायालयीन प्रकरणाशी निगडित देयकासोबत खालीलप्रमाणे सुस्पष्ट वाचनिय कागदपत्रे अपलोड करावी.

७) मुख्याध्यापक यांचे कव्हरिंग लेटर, विलंबाच्या सविस्तर खुलाश्यासह.

८) प्रशासकीय मान्यता आदेश

९) मुख्याध्यापक यांनी सादर करावयाचा घटनाक्रम न्यायालयाच्या आदेशाचा/निकालाचा स्पष्ट मजकूर नमूद करून (शिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीसह सादर करावे)

१०) न्यायालयीन आदेश/निकाल,

११) देयकाचा कालावधी व फरक तक्ता (Due-Draw-difference).

१२) देयकाबाबत मुख्याध्यापक यांचे हमीपत्र,


(डॉ. महेश पालकर)

 शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)


प्रत माहितीस्तव सचिनय सादर.

३) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१

४) कक्ष अधिकारी, विशाल लोहार, टिएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई-३२

प्रत श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी मुंबई-३२ यांनी दिनांक ०८/०८/२०२५ पासून ते दिनांक २०/०८/२०२५ पर्यंत मुख्याध्यापक/डिडिओ-१ शाळा स्तर यांना न्यायालयीन प्रकरणांसाठी ऑनलाईन टैब उपलब्ध करून देण्यात यावा.

तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सदरील न्यायालयीन प्रकरणाचे थकीत देयके संचालनालयास फॉरवर्ड करणेसाठी ऑनलाईन टॅब दिनांक ३१/०८/२०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावा.


शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी दिनांक 13 जून 2025 रोजीसन २०२५-२६ मधील थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत  पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहे.


सन २०२४-२५ पासून शासन निर्णय दिनांक १५/७/२०१७ मधील आदेशानुसार थकीत देयके ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. यासंदर्भात विस्तृत सूचना संदर्भ क्र. ५ अन्वये देण्यात आलेल्या आहेत. प्राप्त स्थितीत न्यायालयीन आदेशामुळे अदा करावयाच्या थकीत देयकाबाबत विविध कार्यालयाच्या स्तरावर अवमान याचिका दाखल झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने मा. न्यायालयाच्या आदेशान्वये तसेच मा. लोकायुक्त व उपलोकायुक्त यांच्या आदेशान्वये अदा करावयाची थकीत देयके महाआयटी शालार्थ प्रणालीमार्फत थकीत देयके (केवळ १ ते ६ वर्ष व ६ वर्षा पेक्षा जास्त कालावधीचे प्रशासकीय मान्यता दिलेली न्यायालयीन प्रकरणे) अदा करण्यासाठी शालार्थ प्रणालीवरील थकीत देयकाचा टॅब दिनांक ०२/६/२०२५ ते २५/६/२०२५ या कालावधीसाठी सुरू करण्यात येत आहे.

संचालनालयाचे संदर्भिय पत्र क्र. ५ नुसार ऑनलाईन थकीत देयके संचालनालयास सादर करावयाची प्रक्रिया राबविण्यात यावी. तसेच न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित थकीत देयके शाळा स्तरावरून अपलोड केल्यानंतर त्याची एक प्रत, न्यायालयीन आदेशासह शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या मार्फत व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची तपासणी समिती यांच्या संयुक्त स्वाक्षरीच्या अहवालासह न्यायालयीन प्रकरणाचे प्रपत्रासह संचालनालयास तातडीने ऑनलाईन व ऑफलाईन (हार्ड कॉपी) (दिनांक ५ जुलै २०२५) पर्यंत संचालनालयास सादर करावी.

मा. न्यायालयाचे आदेश/मा. लोकायुक्त व उपलोकायुक्त यांच्या आदेश व विभागीय तपासणी समिती यांचे प्रपत्र जोडलेले नसल्यास थकीत देयक नामंजूर करण्यात येईल.

सदर न्यायालयीन प्रकरणाशी निगडित देयकासोबत खालीलप्रमाणे सुस्पष्ट वाचनिय कागदपत्रे अपलोड करावी.

१) मुख्याध्यापक यांचे कव्हरिंग लेटर, विलंबाच्या सविस्तर खुलाश्यासह.

२) प्रशासकीय मान्यता आदेश

३) मुख्याध्यापक यांनी सादर करावयाचा घटनाक्रम न्यायालयाच्या आदेशाचा/निकालाचा स्पष्ट मजकुर नमूद करून (शिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीसह सादर करावे)

४) न्यायालयीन आदेश/निकाल.

५) देयकाचा कालावधी व फरक तक्ता (Due-Draw-difference).

६) देयकाबाबत मुख्याध्यापक यांचे हमीपत्र.


 (डॉ. महेश पालकर)

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रत माहितीस्तव सविनय सादर.

१) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१

२) कक्ष अधिकारी, विशाल लोहार, टिएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई-३२

प्रत श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी मुंबई-३२ यांनी दिनांक ०२ जून २०२५ पासून ते दिनांक २५ जून २०२५ पर्यंत मुख्याध्यापक/डिडिओ-१ शाळा स्तर यांना न्यायालयीन प्रकरणांसाठी ऑनलाईन टॅब उपलब्ध करून देण्यात यावा.

तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सदरील न्यायालयीन प्रकरणाचे थकीत देयके संचालनालयास फॉरवर्ड करणेसाठी ऑनलाईन टॅब दिनांक ५/७/२०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावा.



लेखाशिर्ष २२०२०१७३-३६ व २२०२०२०८-३६ या लेखाशिर्षातर्गत थकीत देयकांसाठी टॅब उपलब्ध करून मिळणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालयातून निर्गमित दिनांक 26 मार्च 2025 रोजी च्या आदेशानुसार पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.

लेखाशिर्ष २२०२०१७३-३६ व २२०२०२०८-३६ महानगरपालिका या लेखाशिर्षातर्गत थकीत देयकांसाठी शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून मिळावा ही विनंती.

(देविदास कुलाळ) 

शिक्षण उपसंचालक (प्राथमिक) 

अंदाज व नियोजन महाराष्ट्र राज्य, पुणे-०१




सन २०२४-२५ मध्ये ऑनलाईन प्राप्त थकीत देयके पडताळणी करून प्रशासकीय मान्यतेसाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 



संदर्भ

- १) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/थकीत/ऑनलाईन/५०४७ दि. ११/९/२०२४

२) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/थकीत /ऑनलाईन/मुदतवाढ/५१८६ दि. २५/९/२०२४.

उपरोक्त विषयी व संदर्भान्वये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शी संबंधित सर्व थकीत देयके संबंधित शाळांनी दि. १५/१०/२०२४ पर्यंत शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत निर्देश देण्यात आले होते.

तथापि त्यानंतर शिक्षणाधिकारी/अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्यमिक) सर्व आणि विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व यांनी त्यांचे स्तरावर ऑनलाईन प्राप्त थकीत देयकाची ऑनलाईन पडताळणी करून संचालनालयास ऑनलाईन सादर करणे अपेक्षित होते. परंतू अद्यापही अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) आणि विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणावर थकीत देयके प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. ही बाब प्रशासकीयदृष्टया योग्य नाही.

सबब अधीक्षक, वेतन व भनिनि पथक (माध्यमिक) सर्व आणि विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व यांना थकीत देयके नियमानुसार पडताळणी करून ऑनलाईन सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे कालमर्यादा निश्चित करून देण्यात येत आहे.

सन २०२४-२५ थकीत देयके ऑनलाईन सादर करणे

अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) सर्व यांनी शाळांकडून प्राप्त थकीत देयके विभागीय शिक्षण उपसंचालक, संबंधित यांना सादर करावयाचा अंतिम दिनांक.

दि. १०/०१/२०२५ पर्यंत

विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व यांनी वेतन पथक यांचेकडून प्राप्त थकीत देयके पडताळणी करून ऑनलाईन सादर करण्याचा अंतिम दिनांक २०/०१/२०२५

तरी वरील तक्त्यामध्ये नमूद दिनांकापर्यंत शालार्थ प्रणालीमध्ये प्राप्त ऑनलाईन थकीत देयके पडताळणी करून ऑनलाईन संचालनालयास सादर करावी. तसेच क्षेत्रिय समितीचा सर्व सदस्यांचा संयुक्त स्वाक्षरीचे विहित नमुन्यातील विवरणपत्र क्रमांक १, २, व ३ ची हार्ड कॉपी संचालनालयास सादर करावी. तसेच न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित थकीत देयक प्रस्तावासोबत विधी अधिकारी यांचे स्वाक्षरीसह न्यायालयीन प्रकरणाबाबतचे विहित नमुन्यातील विवरणपत्र, घटनाक्रम व इतर आवश्यक कागदपत्रासह हार्ड कॉपी सादर करावी. त्यानंतर सन २०२४-२५ मध्ये ऑनलाईन प्राप्त थकीत देयके स्विकारली जाणार नाही. व त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.


(संपत सुर्यवंशी)

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)


प्रत माहितीस्तव सविनय सादर.

१. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे-१

२. श्रीम. रोहीणी किरवे, कक्ष अधिकारी, टिएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई-३२



शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 2024 रोजी निर्गमित केलेलं आदेशानुसार शालार्थ प्रणाली मध्ये ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. 

संदर्भ- १) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टी-७/शालार्थ/थकीत/ऑनलाईन/५०४७ दि. ११/९/२०२४.

२) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टी-७/शालार्थ/थकीत /ऑनलाईन/मुदतवाढ/५१८६ दि. २५/९/२०२४.

उपरोक्त विषयी संदर्भ क्र. १ अन्वये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी दि. २५/९/२०२४ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तसेच संदर्भ क्र. २ अन्वये शाळांना थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी दि. ०५/१०/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती.

तथापि अद्यापही काही शाळेतील कर्मचा-यांचे थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यात आलेली नाही त्यामुळे वेतन पथक (माध्यमिक) कार्यालयाकडून थकीत देयके ऑनलाईन सादर करणेबाबत मुदतवाढ देणेबाबत विनंती केलेली आहे.

२) उक्त प्रकरणी क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात आलेली मागणी तसेच शालार्थ प्रणालीमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीचा विचार करता डिडिओ-१ (मुख्याध्यापक) स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दि. १५/१०/२०२४ अखेर अंतिम मुदत राहील. त्यानंतर सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची नोंद घ्यावी. 

३) याबाबत संबंधित शाळांना आपल्या स्तरावरून स्पष्ट सूचना देण्यात याव्यात.

४) तसेच ऑनलाईन प्राप्त थकीत देयके शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प./अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) सर्व यांनी शासन निकषानुसार पडताळणी करून विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे ऑनलाईन फॉरवर्ड करावे. तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांचेकडे ऑनलाईन प्राप्त थकीत देयके शासन निकषानुसार तपासून पडताळणी करून पात्र थकीत देयके संचालनालयाकडे ऑनलाईन फॉरवर्ड करण्याची कार्यवाही करावी.


संपत सुर्यवंशी ७/१०/२४

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)


प्रत श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई यांना उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याचा टॅब/सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा. व सदरची प्रणाली सुरळीतपणे सुरू राहील याची दक्षता घ्यावी. तसेच तांत्रिक अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी.


प्रत माहितीस्तव सविनय सादर.

१) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१

२) श्रीम. रोहीणी किरवे, कक्ष अधिकारी, टिएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई-३२





शिक्षण संचालक प्राथमिक यांनी दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी शालार्थ प्रणालीमध्ये सचित देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


संदर्भः १.

शासन निर्णय क्रं. संकीर्ण२४१५/ (३४/१५)/अर्थसंकल्प दि.१५.७.२०२१७

२. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. अंदाज-२०१/थकीत वेतन/२०२१/३०७०/दि.४.८.२१

३. दिनांक ६.६.२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या सूचना

४. दिनांक ३.९.२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या सूचना

५. या कार्यालयाकडील प्राशिसं/अंदाज-२०३/थकीतशाओं/२०२४/६०९४ दिनांक १२.०९.२०२४

उपरोक्त विषयास अनुसरुन संदर्भाकित क्रं. १ च्य शासन निर्णयानुसार थकीत देयके शालार्थ प्रणालीद्वारा ऑनलाईन पध्दतीनेच सादर करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून त्याअनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता घेणेबाबत या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक ५ अन्वये यापूर्वी कळविण्यात आलेले आहे. तथापि, सध्या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे शाळांना थकीत देयके ऑनलाईन सादर करणे शक्य नाही. तसेच शालार्थ प्रणाली बंद असल्याने थकीत देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यास किमान एक महिन्याची मुदतवाढ मिळणेबाबत राज्यातील काही वेतनपथक कार्यालयाकडून विनंती करण्यात आलेली आहे.

उपरोक्त वस्तुस्थितीचा विचार करता डीडीओ-१ (मुख्याध्यापक) स्तरावरुन थकीत देयके ऑनलॉईन सादर करण्यासाठी दिनांक ५/१०/२०२४ पर्यत मुदतवाढ देण्यात येत आहे. तदनंतर सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होणार नाही, याची नोंद घ्यावी.


( शरद गोसावी)

शिक्षण संचालक,

प्राथमिक शिक्षण संचालनालय, म. रा. पुणे-१.


प्रत श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई. 

२/-उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याकरिता आलेल्या तांत्रिक अडचणीचे तात्काळ निराकरण करावे. तथापि, थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याचा टॅब/सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा व सदरची प्रणाली सुरळीतपणे सुरु राहील याची दक्षता घ्यावी.


प्रत माहितीस्तव सविनय सादर-

१. मा. आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे-१. २. श्रीमती रोहिणी किरवे, कक्ष अधिकारी (टीएनटी-३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी शालार्थ प्रणालीमध्ये सचित देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


संदर्भ- १) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/२०२४/टी-७/शालार्थ/थकीत/ऑनलाईन/५०४७ दि. ११/९/२०२४

२) श्री. शिवाजी खांडेकर, सरकार्यवाह, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ यांचे निवेदन क्र. ४१/२०२४ दि. २०/९/२०२४.

३) श्री. के. एस. ढोमसे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, संयुक्त महामंडळ, पुणे यांचे ईमेलवर प्राप्त निवेदन क्र. ७२/२०२४-२५ दि. २४/९/२०२४

४) अधीक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (माध्यमिक) लातूर यांचे पत्र क्र. वेप/माध्य/ला/आस्था/ २०२४/७८२ दि. २४/९/२०२४.

५) अधीक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (माध्यमिक) वर्धा, सातारा, अमरावती, यांचे ईमेलद्वारे प्राप्त झालेले पत्र, 

उपरोक्त विषयी संदर्भ क्र. १ अन्वये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी दि. २५/९/२०२४ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.

तथापि सध्या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे शाळांना थकीत देयके ऑनलाईन सादर करणे शक्य नाही. तसेच शालार्थ प्रणाली बंद असल्याने थकीत देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यास किमान एक महिन्याची मुदतवाढ मिळणेबाबत संदर्भ क्र. २ व ३ अन्वये विनंती करण्यात आलेली आहे. तसेच काही वेतन पथक (माध्यमिक) कार्यालयाकडूनही शालार्थ प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ मिळणेबाबत विनंती केलेली आहे.

उपरोक्त वस्तुस्थितीचा विचार करता डिडिओ-१ (मुख्याध्यापक) स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दि. ५/१०/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानंतर सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही. याची नोंद घ्यावी.


शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रत- श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई यांना उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याकरीता आलेल्या तांत्रिक अडचणीचे तात्काळ निराकरण करावे. तथापि थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याचा टॅब/सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा. व सदरची प्रणाली सुरळीतपणे सुरू राहील याची दक्षता घ्यावी.

प्रत माहितीस्तव सविनय सादर.

१) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१ २) श्रीम. रोहीणी किरवे, कक्ष अधिकारी, टिएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई-३२




शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी च्या परिपत्रकाचा संदर्भ देऊन शिक्षणाधिकारी प्राथमिक चंद्रपूर यांनी दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी शालार्थ प्रणालीतून थकीत वेतन देयके ऑनलाईन सादर करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


जिल्हा परीषदेच्या शाळांमधील कार्यरत/सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी / केंद्र प्रमुख सेवानिवृत्त / मय्ययत कर्मचारी यांचे 6 वा 7 वा वेतन आयोगाचा फरकाचा हप्ता, पदोन्नती, वेतनवाढ, निवडश्रेणी, वरिष्ठ श्रेणी, शिक्षण सेवक मानधन, महागाई भत्ता फरक, निलंबन/बडतर्फ कालावधी फरक, न्यायालयीन प्रकरणे, नियमित वेतनश्रेणी फरकचे व इतर वेतना संबधी थकबाकी देयके SHALARTH प्रणाली मधुन दिनांक 25 सप्टेंबर 2024 पर्यंत ONLINE पध्दतीने सादर करणेबाबत DDO-1 (मुख्याध्यापक) स्तरावरुन थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याबाबत निर्देश संदर्भ क्रमांक 01 नुसार प्राप्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने आपल्या पंचायत समिती / हायस्कुल अंर्तगत सेवानिवृत्त झालेले शिक्षक केंद्र प्रमुख कर्मचारी यांचे कार्यरत/सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी/ केंद्र प्रमुख सेवानिवृत्त / मव्ययत कर्मचारी यांचे 6 या 7 वा वेतन आयोगाचा फरकाचा हप्ता, पदोन्नती, वेतनवाढ, निवडश्रेणी, वरिष्ठ श्रेणी, शिक्षण सेवक मानधन, महागाई भत्ता फरक, निलंबन/बडतर्फ कालावधी फरक, न्यायालयीन प्रकरणे, नियमित वेतनश्रेणी फरकचे व इतर वेतना संबधी थकबाकी देयके तसेच माहे जानेवारी 2024 ते जुन 2024 पर्यातचे महागाई भत्ता फरकाचे देयके SHALARTH प्रणालीमधुन SHALARTH 2.0 या टॅब मधील Pending Bill या सुविधेचा उपयोग करुन जिल्हा स्तरावर Online पध्दतीने सादर करावी याकरीता शालार्थ जिल्हा समन्वयकांनी तयार केलेल्या मार्गदर्शनपर User Manual Facility In Shalarth चा उपयोग करावा. यापुर्वी संदर्भ क्रमांक-02 नुसार दिलेल्या सुचना प्रमाणे 6 व 7 हप्ता व महागाई भत्ता थकबाबतची ऑनलाईन सादर करण्याचे सुचना दिल्या होत्या त्यानुसार ज्यांनी देयक सादर केले असेल त्यांना पुन्हा देयक सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच दुबार देयक अदा होणार नाही याची खात्री घ्यावी. तसेच आपल्या अधिनस्त एकही शिक्षक किवा केंद्र प्रमुख यांचे कुठल्याही प्रकारची थकबाकी राहणार नाही.

उपरोक्त सुचनेनुसार विहीत कालावधीमध्ये कार्यवाही पूर्ण करावी. सदर बाबतीत विलंब झाल्यास व आपले पंचायत समिती/शाळे अंतर्गत एकही शिक्षकांचे देयक प्रलंबित राहील्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांची राहील याची नोंद घ्यावी.

सहपत्र : अधिक माहितीकरीता संदर्भ क्र. 1 ते 2 सलग्न


शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

 जिल्हा परीषद, चंद्रपुर

PDF Download


शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी थकीत वेतन देयके शालार्थ प्रणाली मध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत. 

थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीनेच सादर करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून त्याअनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.

तपशिल

संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य ती तपासणी/पडताळणी करून सदर दाव्यांना मंजूरी घेण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये आपल्या लॉगीन वरून थकीत देयकाची माहिती भरावी. तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक, अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) संबंधित सर्व यांचेकडून आजअखेर संचालनालयास ऑफलाईन सादर केलेल्या नवीन/पुनर्मान्यतेची तसेच न्यायालयीन प्रकरणाची थकीत देयके ऑनलाईन सादर करावीत. सन २०२४-२५ मध्ये संचालनालयाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेली परंतू कोषागारात सादर न केलेली देयके पुनश्च ऑनलाईन पद्धतीने सादर करावीत. प्रलंबित सर्व थकीत देयकाची माहिती दिलेल्या तारखेपर्यंत शालार्थमध्ये ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची राहील.


अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) व संबंधित शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेली थकीत वेतन अनुदानाची देयके नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना ऑनलाईन मंजूरीकरीता संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे सादर करणे.तथापि ऑफलाईन प्रस्तावासोबत पुढील कागदपत्रे सादर करावीत.

१. थकीत देयक प्रशासकीय मान्यता संदर्भ आदेश (वैयक्तिक मान्यता/वरिष्ठश्रेणी/न्यायालयीन आदेश/अनुदानाअभावी थकीत देयके इत्यादी)



२. विहित नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र- सोबत प्रपत्र आहे. उपरोक्त अ.क्र. १ च्या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.

विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेली थकीत वेतन अनुदानाची देयके नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना ऑनलाईन मंजूरीकरीता संबंधित संचालकांकडे सादर करणे. तसेच उपरोक्त अ.क्र. १ च्या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.

तथापि ऑफलाईन प्रस्तावासोबत पुढील कागदपत्रे सादर करावीत.
 १. विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे मंजूरीस्तव शिफारसपत्र
२. थकीत देयक प्रशासकीय मान्यता संदर्भ आदेश (वैयक्तिक मान्यता/वरिष्ठश्रेणी/न्यायालयीन आदेश/अनुदानाअभावी थकीत देयके इत्यादी)
३. विहित नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र- सोबत प्रपत्र आहे,
४. न्यायालयीन प्रकरणाचे प्रस्ताव संचालनालयाचे न्यायालयीन प्रकरणा बाबतचे परिपत्रक दि. ६/१/२०२३ नुसार सादर करावे.
उपरोक्त अ.क्र. १ च्या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.

विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून ऑनलाईन प्राप्त झालेली प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना शासन निर्णय दि. १५/७/२०१७ मधील सुचनांनुसार ऑनलाईन प्रशासकीय मंजूरी संबंधित शिक्षण संचालक यांनी देणे
प्रत्येक संचालनालय स्तरावरून शा.नि. दि. १५.०७.२०१७ मधील सुचनानुसार प्रशासकीय मंजूरी दिलेल्या दाव्यांची लेखाशीर्षनिहाय पुरवणी मागणी/पुनर्विनियोजन/सुधारित अंदाजाच्या माध्यमातून शासनाकडून निधी उपलब्धतेबाबतचे मागणी प्रस्ताव प्रस्तावित करणे.

वरीलप्रमाणे लेखाशीर्षनिहाय निधी उपलब्धतेनुसार अनुक्रमांक ४ मध्ये नमूद प्रशासकीय मान्यता नुसार, संबंधित सर्व प्रशासकीय आदेश क्रमांक व दिनांक नमूद करून स्वतंत्रपणे निधी वितरण आदेश वितरीत करणे.

थकीत देयकाच्या प्रकारानुसार अपलोड करावयाच्या कागदपत्रांची यादी तपशिल खालीलप्रमाणे आहे. आवश्यक कागदपत्रे
देयकाचा प्रकार

१. पदोन्नती
२. वेतनवाढ

शिक्षणाधिकारी यांचा आदेश व लेखाधिकारी यांचे वेतननिश्चिती पडताळणी आदेश

३. निवडश्रेणी 
मुख्याध्यापकाचा आदेश
४. वरिष्ठ वेतन श्रेणी
- शिक्षणाधिकारी यांचा मान्यता आदेश लेखाधिकारी यांचे वेतन निश्चिती पडताळणी आदेश. क्र. व दिनांक

५. शिक्षण सेवक मानधन
शिक्षाधि अन्ये । 12 उस मान्यता आदेश

५. महागाई भत्ता फरक
शासन निर्णय/मुख्याध्यापक यांचे पत्र
६. सहाव्या वेतन आयोग फरक
मुख्याध्यापक यांचे पत्र.

७. निलंबन/बडतर्फ कालावधीतील फरक-
संस्था आदेश, देयक दुबारआहरित केले नसल्याबाबतचे
मुख्याध्यापक यांचे हमीपत्र

८. न्यायालयीन प्रकरणे
- विहित नमुन्यातील न्यायालयीन
प्रकरणाचे प्रपत्र, न्यायालयाचा निकाल,
घटनाक्रम, याचिका, दाखल केलेले प्रतिक्ष्मपत्त्रः




९. पवित्रद्वारे नियुक्ती असल्यास संस्थेचा आदेश व रूजू अहवालाची प्रत १०. नियमित वेतनभोणी फरक - 12- अ । शिउस मान्यता व वेतनभिश्चिती प्रत वरील कागदपत्रासोबतच विहित नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र अपलोड करावेत.

शासनास सादर करण्यात येणारी सहा वर्षावरील कालावधीचे थकीत देयकाचा प्रस्ताव विवरणपत्र- ३ मध्ये सादर करावे. सदर प्रस्तावासोबत तपासणीसुचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रस्ताव सादर करावा.

डिडिओ-१ (मुख्याध्यापक) स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दि. २५/९/२०२४ पर्यंत सुविधा उपलब्ध राहील त्यानंतर सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही.

वरीलप्रमाणे दिलेल्या नियोजनानुसार थकीत देयकांसाठी निधी उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने आपल्या स्तरावरून दिलेली कालमर्यादा पाळल्यास दि. १५/७/२०१७ च्या शासन निर्णयातील परिच्छेद २ मधील सूचनांनुसार कार्यवाही करणे सोईचे होईल. व पर्यायाने चालू आर्थिक वर्षातील मंजूर असलेल्या तरतूदी मधून नियमित वेतनाचा खर्च नियमितपणे भागविणे सुकर होईल. तसेच थकीत वेतनासाठी तरतूद उपलब्ध करून देणे बाबत कार्यवाही करता येईल. वर नमूद कालमर्यादा सर्वच स्तयवर तंतोतंत पाळली जाईल याची दक्षता घ्यावी. सविस्तर माहितीसाठी शालार्थमध्ये
User manual पहावे.

संपत सुर्यवंशी

शिक्षण संचालक
 (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

प्रत- माहितीस्तव सविनय सादर.

१) मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे-१

२) श्रीमती. रोहिणी किरवे, कक्ष अधिकारी, टिएनटी-३ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई-३२

प्रत- श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी मुंबई.

वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


 शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य कार्यालयातील निर्गमित दिनांक 4 मे 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार शिक्षण संचालक माध्यमिक यांनी श्री. पवन जोशी, बिझनेस अॅनालिस्ट, शालार्थ सिस्टीम, महाआयटी, मुंबई यांना थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पद्धतीने काढणेस शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 


संदर्भ- १) वेतन पथक, माध्यमिक, नाशिक यांचे पत्र क्र. शिअवेपना/आस्था/२०२४-२५/१२७२ दि. ३/६/२०२४.

२) वेतन पथक माध्यमिक, नाशिक यांचे पत्र क्र. शिक्षण/वेतन व भ.नि.नि. पथक/२०२४- २५/१२७३ दि. ३/६/२०२४.


उपरोक्त विषयी व संदर्भान्वये सद्यस्थितीत नियमित वेतन वगळता इतर देयकांचे टॅब शालार्थमध्ये बंद आहे. संदर्भ क्र. १ अन्वये वेतन पथक माध्यमिक, नाशिक यांनी थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पारीत करण्यासाठी शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केलेली आहे. २. त्याअनुषंगाने लेखाशीर्ष २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२३३६१, २२०२३३७९, २२०२१९४८ या लेखाशीर्षाची पुरवणी देयके ऑनलाईन पारीत करण्यासाठी शालार्थमध्ये तात्काळ टॅब उपलब्ध करून देण्यात यावा.


३. तसेच २२०२०४४२ व २२०२०४७८ ची वैद्यकीय देयके ऑनलाईन पारीत करण्यासाठी शालार्थमध्ये तात्काळ टॅब उपलब्ध करून देण्यात यावे. त्याचप्रमाणे थकीत देयके ही बाब सेवा हमी कायद्याअंतर्गत येत असल्याने प्रस्तुत प्रकरणी तात्काळ टॅब उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. 



(संपत सुर्यवंशी) 

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)


प्रत- माहितीस्तव सविनय सादर.

१) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१

२) रोहीणी किरवे, कक्ष अधिकारी, टिएनटी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई-३२


प्रत- १) विभागीय शिक्षण उपसंचालक, संबंधित सर्व.

२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, संबंधित सर्व.

२) अधीक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (माध्यमिक) संबंधित सर्व.



सदर परिपत्रकानुसार शालार्थ सिस्टीम मध्ये दिनांक 18 जून 2024 पर्यंत थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पद्धतीने काढणेस शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 



 महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

  1. मेळघाट मध्ये सर्व शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली होणार का सर?

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.