प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणोत्तर चाचणी व मूल्यमापन संदर्भात सूचना देणेबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 11 जून 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
दिनांक ०२.०६.२०२५ ते १२.०६.२०२५ या कालावधीमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थ्यांचे मूल्यमापन करण्याच्या अनुषंगाने खालील सूचना देण्यात येत आहेत.
अ) प्रशिक्षणोत्तर चाचणीच्या अनुषंगाने सूचना
1) सर्व प्रशिक्षण गट व सर्व स्तरांसाठी प्रशिक्षणोत्तर चाचण्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत प्राचार्यांच्या वैयक्तिक मेलवर दिनांक ११.०६.२०२५ रोजी रात्री ११.०० वाजता pdf (Password Protected) स्वरुपात देण्यात येतील. प्राचार्य यांनी तालुका समन्वयक / वरिष्ठ अधिव्याख्याता यांना त्यांच्या वैयक्तिक मेलवर Password Protected Pdf पाठवावी. गोपनीयतेच्या अनुषंगाने परिषदेमार्फत देण्यात आलेल्या प्रशिक्षणोत्तर चाचणी प्रश्नपत्रिका प्रशिक्षाणार्थ्यांच्या संख्येनुसार नुसार छायांकित प्रती काढून सीलबंद लखोट्यात सुरक्षित ठेवाव्यात. गोपनीयतेचा भंग होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, तालुका समन्वयक / वरिष्ठ अधिव्याख्याता यांची राहील,
2) चाचणी दिनांक १२.०६.२०२५ रोजी ३.१५ ते ५.१५ या कालावधीत घेण्यात यावी.
3) चाचणीसाठी प्रशिक्षाणार्थ्यांच्या संख्येनुसार नुसार, प्रती प्रशिक्षणार्थी 15 ते 16 पानाची उत्तरपत्रिका याप्रमाणे उत्तरपत्रिका उपलब्ध ठेवाव्यात.
4) परीक्षेसाठी बैठक व्यवस्थेचे योग्य नियोजन करावे.
5) प्रत्येक बेंचवर एक परीक्षार्थी बसण्याची व्यवस्था करावी जर ते शक्य नसेल तर एका बेंचवर एक वरिष्ठ व एक निवड प्रशिक्षणार्थी बसतील अशी बैठक व्यवस्था करावी,
6) उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थी व सुलभक यांची सही घ्यावी.
7) परीक्षेसाठी विहित नियमांचे पालन करण्यात यावे.
8) प्रश्नपत्रिका मराठी माध्यमातून देण्यात येणार आहेत. मात्र उर्दू प्रशिक्षणार्थी उर्दू भाषेतून उत्तरे लिहू शकतात.
ब) प्रशिक्षणार्थी मूल्यमापन तक्ता भरण्याबाबत
1) प्रशिक्षणादरम्यानचे स्वाध्यायांचे तसेच प्रकल्प/नवोपक्रम/कृतीसंशोधन अहवाल यांचे मूल्यमापन व गुणांकन कसे करायचे या विषयीच्या केंद्र संचालकासाठीच्या स्पष्ट सूचना घटकसंच पुस्तिकेत देण्यात आल्या आहेत.
2) प्रशिक्षणादरम्यान गटाने केलेले स्वाध्याय सुलभकांकडून तपासून घेउन केंद्रसंचालकाने बॅचनिहाय एकत्रित करावेत व जमा करुन घ्यावेत.
3) प्रत्येक स्वाध्याय तपासून प्राप्त गुण नोंदवून सुलभकाने स्वाक्षरी केलेली असावी.
4) प्रशिक्षणोत्तर चाचणी तपासून गुणांकन करण्यासाठी व ऑनलाइन नोंद करण्यासाठी प्रशिक्षणानंतरे दोन ते तीन दिवसात कामकाज पूर्ण करावे.
5) ऑनलाइन गुण नोंद केल्यानंतर बँचनिहाय प्रिंट काढून त्यावर बेंच सुलभकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ते केंद्र समन्वयकाच्या लॉग ईनच्या माध्यमातून त्याच दिवशी अपलोड करावे,
6) प्रशिक्षण संपल्यानंतर ४० दिवसापर्यंत (मंगळवार, दि. २२/७/२५ पर्यंत) प्रशिक्षणार्थ्यांनी आपले गृहकार्य (५ वैयक्तिक स्वाध्याय व प्रकल्प/नवोपक्रम/कृतीसंशोधन) आपल्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमध्ये जमा करावेत.
7) दिनांक ०१.०८.२०२५ पर्यंत सुलभकांना प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था कार्यालयात बोलावून प्रशिक्षणार्थ्यांचे वैयक्तिक स्वाध्याय व प्रकल्प/नवोपक्रम/कृतीसंशोधन इ. तपासून ऑनलाइन नोंद करणेबाबत कार्यवाही करावी, गुणांची नोंद ऑनलाइन करुन प्रीट काढून त्यावर सुलभक व केंद्रसंचालकांची स्वाक्षरी घेऊन ते केंद्रसंचालक यांच्या लॉग ईनच्या माध्यमातून अपलोड करावे.
8) प्रशिक्षणासंदर्भातील तासिकानिहाय उपस्थिती पत्रक, प्रशिक्षणार्थ्यांनी जमा केलेले स्वाध्याय, प्रकल्प नवोपक्रम कृतीसंशोधन अहवाल, गुणदानाचे प्रिंट आउट काढून आपल्या कार्यालयात जतन करून ठेवाव्यात.
9) गुणदानाबद्दलच्या विस्तृत सूचना घटकसंचामध्ये दिलेल्या आहेत.
10) सोबत जोडलेल्या गुणदान तक्त्यानुसार पोर्टलवर गुण नोंदवावेत.
Signed by
Rahul Ashok Rekhawar Date: 06-2025:24:19:07
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी यांचा प्रशिक्षण गट व प्रकार बदलाबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 30 मे 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी प्रक्रिया दि. २१ मे ते ६ जून २०२५ या कालावधीमध्ये राबविण्यात आली होते. या तसेच यानंतर दिनांक ८ व ९ मे २०२५ या कालावधीमध्ये प्रशिक्षण गट व प्रशिक्षण प्रकार बदलासाठी आवश्यक दुरुस्ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती.
तथापि सद्यस्थितीमध्ये देखील काही प्रशिक्षणार्थी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्याशी आवश्यक दुरुस्तीसाठी संपर्क साधत आहेत. तरी प्रशिक्षण प्रकार व प्रशिक्षण गटाबाबत शिक्षकांच्या असणाऱ्या बदलाबाबतची माहिती खालील नमुन्यामध्ये घेऊन gradetraining@maa.ac.in या ई-मेलवर पाठविण्यात यावी.
माहिती नमुना
प्रशिक्षणार्थी नोंदणी क्रमांक
प्रशिक्षणार्थीचे नाव
शालार्थ क्रमांक
सद्यस्थितीमधील प्रशिक्षण गट व प्रशिक्षण प्रकार
बदल करावयाचा प्रशिक्षण गट व प्रशिक्षण प्रकार
माहितीच्या आधारे पडताळणी करून त्यानंतरच आवश्यक बदल करण्यात येईल व केलेल्या बदलाची माहिती आपणास कळविण्यात येईल जेणेकरून आपण तयार केलेल्या बॅचमध्ये आवश्यक बदल करावा.
Signed by
Rahul Ashok Rekhawar
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
प्रत माहितीस्तव सविनय सादर,
मा.आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे १.
अत्यंत महत्त्वाचे
वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी शिक्षकांचे प्रशिक्षण आहे त्या शिक्षकांना मेल आलेले आहेत प्रत्येकाने आपला मेल चेक करून प्रशिक्षण नेमके कुठे आहे? त्याबद्दल माहिती मिळते तरी प्रत्येकाने आपला मेल चेक करावा.
जर आपल्या ईमेलवर मेल दिसत नसेल तर..
Spam या ऑप्शन मधील ईमेल चेक करा.
आपल्या इमेलचे स्टोरेज पूर्ण झाली आहे का झाले असल्यास ते कमी करा ई-मेल येईल.
जर ईमेल कुठेही सापडत नसेल तर आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाट पहा अन्यथा आपल्या तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाची संपर्क साधून त्यांच्याकडून आपली वरिष्ठ वेतनश्रेणी किंवा निवड श्रेणी प्रशिक्षण नेमकी कुठे आहे याची माहिती मिळवा.
या अगोदरच तुम्हाला यादी व स्थळ माहित असेल तर काहीही करण्याची गरज नाही.
वरिष्ठ/ निवड श्रेणी प्रशिक्षण 50% गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक! अन्यथा अपात्र घोषित..
राज्यात एकाच वेळेस दहा दिवसीय वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण
शिक्षकाने आपल्या सेवेची 12 वर्ष किंवा 24 वर्ष पूर्ण केली असेल त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. यावर्षी प्रथमच शिक्षक वर्गात प्रत्यक्ष प्रशिक्षण घेता घेता त्याच वेळेस संपूर्ण राज्यात एकाच वेळेस राज्यस्तरीय ऑनलाईन चाचणी सोडविणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे हे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाच्या मार्फत राज्यात 2 जून ते 12 जून 2025 दरम्यान राज्यात एकाच वेळेस या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
सेवेत पदार्पण दरम्यानची परिस्थिती व त्यानंतर झालेले स्थित्यंतरे यासाठी शिक्षकांनी सिद्ध होण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. नुकतेच राज्यस्तरीय प्रशिक्षण एससीआयआरटी पुणे येथे पार पडले असून दिनांक 26 ते 29 मे 2025 दरम्यान विभागस्तरिय/ जिल्हास्तरीय TOT प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर या प्रशिक्षणात तयार झालेले तज्ज्ञ मार्गदर्शक 2 जून ते 12 जून 2025 दरम्यान तालुकास्तरीय शिक्षकांना प्रत्यक्षात( ऑफलाईन स्वरूपात) वर्गात प्रशिक्षण देणार आहे.
रियल टाइम हायब्रीड प्रशिक्षण :-
कोरोना संपूर्ण ऑनलाईन स्वरूपात वरिष्ठ वेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण घेण्यात आले. यावर्षी हे प्रशिक्षण प्रत्यक्ष वर्गात ऑफलाईन स्वरूपात होणार असले तरी प्रत्यक्ष तासिका झाल्यावर रियल टाईम मध्ये चाचणी सोडवावी लागणार असल्याने सदर प्रशिक्षण हायब्रीड स्वरूपातील राहणार आहे. यापूर्वी प्रशिक्षणार्थींना ठराविक मुदतीत आपल्या सोयीने प्रशिक्षण करता येत होते मात्र यावेळी एकाचवेळी चाचणी लिंक उपलब्ध होणार असल्याने एखादा प्रशिक्षणार्थी वर्गात हजर नसल्यास तो प्रशिक्षणात अनुत्तीर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशिक्षणातील विषय :-
या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण, राज्य अभ्यासक्रम आराखडा, शिक्षण हक्क कायदा, शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा, ऑनलाईन शिक्षण, सायबर सुरक्षा, पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन, व्यवसाय शिक्षणसह ताणतणावाचे व्यवस्थापन, मूल्यमापन, कृतीसंशोधन आदी विस ते बावीस विषयांचा समावेश राहणार आहे.
प्रशिक्षणाचे स्वरूप :-
दहा दिवसीय प्रशिक्षणात प्रत्येक प्रशिक्षणार्थींना प्रत्येक तासिकेला हजर राहणे अनिवार्य आहे. प्रत्येक दिवशी परिपाठ नंतर आदर्श शाळांवर चर्चा होणार असून दर दिवशी पाच तासिका होणार आहे. प्रशिक्षण पूर्व काळात पूर्व चाचणी (ऑनलाईन बहुपर्यायी) आणि उत्तर चाचणी (ऑफलाईन स्वरूपात लेखी) असणार आहे. प्रत्येक घटक नंतर 10 गुणांची बहुपर्यायी ऑनलाईन चाचणी होणार असून संपूर्ण राज्यात ही एकाच वेळी होणार असल्याने संपूर्ण राज्याचे वेळापत्रक सारखे राहणार आहे. विशेष म्हणजे यात किमान 50% गुण मिळविणे आवश्यक आहे.
प्रशिक्षण दरम्यान मूल्यमापन :
प्रशिक्षण काळात दर तासिका नंतर 10 गुणाच्या चाचणी सह 10 स्वाध्याय पूर्ण करावे लागणार आहे. यातील 5 स्वाध्याय प्रत्यक्षात प्रशिक्षण दरम्यान वर्गात पाच घटकांवर आधारित गटनिहाय स्वाध्याय राहणार आहे. उर्वरित 5 स्वाध्याय प्रशिक्षण नंतर वैयक्तिक स्वरूपात पूर्ण करावे लागणार आहे. संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केल्यावर शेवटच्या दिवशी 50 गुणांची लेखी चाचणी घेतली जाणार आहे. ज्यात रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरे द्या, टीपा लिहा, लघुत्तरी उपयोजनात्मक व मुक्तोत्तरी प्रश्नाचा समावेश राहणार आहे.
40 दिवसांचा कालावधी:-
प्रशिक्षण नंतर संपूर्ण मूल्यमापन प्रक्रियेतील स्वाध्याय व अहवाल लेखन 40 दिवसांत पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रत्येक स्वाध्यायास 10 गुण राहणार आहे तर नवोपक्रम/प्रकल्प/कृती संशोधन अहवाल साठी 50 गुण राहणार आहे. त्यानंतर उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
गुणदान योजना :-
वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण चाचणी साठी 100 गुण, स्वाध्याय साठी 100 गुण, लेखी चाचणी 50 गुण तर अहवाल लेखन साठी 50 गुण असे एकूण 300 गुणांवर आधारित संपूर्ण मूल्यमापन होणार आहे. प्रशिक्षण दरम्यान व नंतर अश्या दोन्ही मूल्यमापन प्रक्रियेत किमान 50% गुण मिळविणे अनिवार्य आहे. अन्यथा पुन्हा नव्याने नोंदणी करून व शुल्क भरून याच प्रमाणे प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे अपात्र घोषित
राज्यात एकाच वेळेस दहा दिवसीय वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण
शिक्षकाने आपल्या सेवेची 12 वर्ष किंवा 24 वर्ष पूर्ण केली असेल त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. यावर्षी प्रथमच शिक्षक वर्गात प्रत्यक्ष प्रशिक्षण घेता घेता त्याच वेळेस संपूर्ण राज्यात एकाच वेळेस राज्यस्तरीय ऑनलाईन चाचणी सोडविणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे हे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाच्या मार्फत राज्यात 2 जून ते 12 जून 2025 दरम्यान राज्यात एकाच वेळेस या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
सेवेत पदार्पण दरम्यानची परिस्थिती व त्यानंतर झालेले स्थित्यंतरे यासाठी शिक्षकांनी सिद्ध होण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. नुकतेच राज्यस्तरीय प्रशिक्षण एससीआयआरटी पुणे येथे पार पडले असून दिनांक 26 ते 29 मे 2025 दरम्यान विभागस्तरिय/ जिल्हास्तरीय TOT प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर या प्रशिक्षणात तयार झालेले तज्ज्ञ मार्गदर्शक 2 जून ते 12 जून 2025 दरम्यान तालुकास्तरीय शिक्षकांना प्रत्यक्षात( ऑफलाईन स्वरूपात) वर्गात प्रशिक्षण देणार आहे.
रियल टाइम हायब्रीड प्रशिक्षण :-
कोरोना संपूर्ण ऑनलाईन स्वरूपात वरिष्ठ वेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण घेण्यात आले. यावर्षी हे प्रशिक्षण प्रत्यक्ष वर्गात ऑफलाईन स्वरूपात होणार असले तरी प्रत्यक्ष तासिका झाल्यावर रियल टाईम मध्ये चाचणी सोडवावी लागणार असल्याने सदर प्रशिक्षण हायब्रीड स्वरूपातील राहणार आहे. यापूर्वी प्रशिक्षणार्थींना ठराविक मुदतीत आपल्या सोयीने प्रशिक्षण करता येत होते मात्र यावेळी एकाचवेळी चाचणी लिंक उपलब्ध होणार असल्याने एखादा प्रशिक्षणार्थी वर्गात हजर नसल्यास तो प्रशिक्षणात अनुत्तीर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशिक्षणातील विषय :-
या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण, राज्य अभ्यासक्रम आराखडा, शिक्षण हक्क कायदा, शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा, ऑनलाईन शिक्षण, सायबर सुरक्षा, पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन, व्यवसाय शिक्षणसह ताणतणावाचे व्यवस्थापन, मूल्यमापन, कृतीसंशोधन आदी विस ते बावीस विषयांचा समावेश राहणार आहे.
प्रशिक्षणाचे स्वरूप :-
दहा दिवसीय प्रशिक्षणात प्रत्येक प्रशिक्षणार्थींना प्रत्येक तासिकेला हजर राहणे अनिवार्य आहे. प्रत्येक दिवशी परिपाठ नंतर आदर्श शाळांवर चर्चा होणार असून दर दिवशी पाच तासिका होणार आहे. प्रशिक्षण पूर्व काळात पूर्व चाचणी (ऑनलाईन बहुपर्यायी) आणि उत्तर चाचणी (ऑफलाईन स्वरूपात लेखी) असणार आहे. प्रत्येक घटक नंतर 10 गुणांची बहुपर्यायी ऑनलाईन चाचणी होणार असून संपूर्ण राज्यात ही एकाच वेळी होणार असल्याने संपूर्ण राज्याचे वेळापत्रक सारखे राहणार आहे. विशेष म्हणजे यात किमान 50% गुण मिळविणे आवश्यक आहे.
प्रशिक्षण दरम्यान मूल्यमापन :
प्रशिक्षण काळात दर तासिका नंतर 10 गुणाच्या चाचणी सह 10 स्वाध्याय पूर्ण करावे लागणार आहे. यातील 5 स्वाध्याय प्रत्यक्षात प्रशिक्षण दरम्यान वर्गात पाच घटकांवर आधारित गटनिहाय स्वाध्याय राहणार आहे. उर्वरित 5 स्वाध्याय प्रशिक्षण नंतर वैयक्तिक स्वरूपात पूर्ण करावे लागणार आहे. संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केल्यावर शेवटच्या दिवशी 50 गुणांची लेखी चाचणी घेतली जाणार आहे. ज्यात रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरे द्या, टीपा लिहा, लघुत्तरी उपयोजनात्मक व मुक्तोत्तरी प्रश्नाचा समावेश राहणार आहे.
40 दिवसांचा कालावधी:-
प्रशिक्षण नंतर संपूर्ण मूल्यमापन प्रक्रियेतील स्वाध्याय व अहवाल लेखन 40 दिवसांत पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रत्येक स्वाध्यायास 10 गुण राहणार आहे तर नवोपक्रम/प्रकल्प/कृती संशोधन अहवाल साठी 50 गुण राहणार आहे. त्यानंतर उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
गुणदान योजना :-
वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण चाचणी साठी 100 गुण, स्वाध्याय साठी 100 गुण, लेखी चाचणी 50 गुण तर अहवाल लेखन साठी 50 गुण असे एकूण 300 गुणांवर आधारित संपूर्ण मूल्यमापन होणार आहे. प्रशिक्षण दरम्यान व नंतर अश्या दोन्ही मूल्यमापन प्रक्रियेत किमान 50% गुण मिळविणे अनिवार्य आहे. अन्यथा पुन्हा नव्याने नोंदणी करून व शुल्क भरून याच प्रमाणे प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 21 मे 2025 रोजी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाबाबतच्या सूचना पुढील प्रमाणे दिल्या आहेत.
उपरोक्त संदर्भीय विषयात नमूद केल्यानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्य यांना देण्यात येणाऱ्या बरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाच्या अनुषंगाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे-
प्रशिक्षण पूर्वतयारी -
१) प्रशिक्षणाचे जिल्हयाचे प्रमुख म्हणून प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे कामकाज पाहतील, तर तालुकास्तरचे प्रशिक्षण केंद्र समन्वयक म्हणून प्रशिक्षणाची जबाबदारी वरिष्ठ अधिव्याख्याता / अधिव्याख्याता यांची राहील. तालुकास्तरीय प्रशिक्षणासाठी वरिष्ठ अधिव्याख्याता / अधिव्याख्याता हे पूर्णवेळ प्रशिक्षणस्थळी उपस्थित राहून प्रशिक्षणाचे संनियंत्रण करतील. तसेच आवश्यकता असल्यास केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी /गटशिक्षणाधिकारी यांनाही केंद्र समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवावी.
२) प्रशिक्षणासंदर्भात नियोजन करण्यासाठी परिषदेमार्फत देण्यात आलेल्या पोर्टलद्वारे आपल्या जिल्ह्यातील स्तरनिहाय (प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय) व प्रशिक्षण प्रकारनिहाय (वरिष्ठ व निवड) प्रशिक्षणार्थ्यांची संख्या आपल्याला उपलब्ध झाली आहे.
3) तालुकास्तरावर प्रशिक्षणार्थी संख्येनुसार दोन ते तीन तालुके एकत्र करून पुरेशाप्रमाणात सुविधा असणारे प्रशिक्षणस्थळ निश्चित करावे.
४) एका प्रशिक्षण ठिकाणी किमान १ वर्ग (५० प्रशिक्षणाथी) व कमाल ४ वर्ग (२०० प्रशिक्षणार्थी) यामयदित नियोजन करावे. स्तरनिहाय व प्रशिक्षण प्रकारनिहाय वर्गाची निश्चिती करावी.
५) प्रशिक्षणार्थ्यांना देण्याचे वाचनसाहित्य व सुलभकांसाठीचे घटकसंच पुरेशा प्रमाणात आले आहेत यांची खात्री करावी.
६) प्रशिक्षणार्थी संख्या लक्षात घेऊन सर्व भौतिक सुविधायुक्त असे योग्य प्रशिक्षणाचे स्थळ निशित करावे. (उदा. LCD प्रोजेक्टर असलेले वर्ग, स्मार्ट क्लास रूम)
७) प्रशिक्षण हे उन्हाळी काळात असल्याने प्रशिक्षणाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, पंखे, योग्य बैठक व्यवस्था, महिला व पुरुष स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्याची जबाबदारी प्रशिक्षण केंद्रसंचालकाची राहील. (केंद्र व राज्यसरकारने उन्हाळ्याविषयी निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे.)
८) प्रशिक्षणस्थळी प्रशिक्षणार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात (किमान ४ प्रशिक्षणाध्यर्थ्यांमागे १ संगणक) संगणककक्ष उपलब्ध असावा,
९) प्रशिक्षणस्थळी सक्षम इंटरनेटची व्यवस्था असावी.
१०) पी.पी.टी. दाखवण्यासाठी एल. सी. डी. प्रोजेक्टरची (व्हिडिओ/ऑडिओ) सोय प्रशिक्षणाच्या ठिकाणी करावी. (प्रत्येक कक्षात १ LCD प्रोजेक्टर)
११) वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी सुलभकाची निवड करताना खालील निकष लक्षात घेतले जावेत.
अ) वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी स्वतः प्रशिक्षण पूर्ण केलेले ज्यांना राज्यस्तरावर जिल्हास्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा अनुभव आहे.
ब) अध्यापक विद्यालयातील सेवांतर्गत तुकडीला अध्यापन करणाऱ्या अध्यापकाचार्याचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा,
क) प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय स्तरावर अध्यापन करणाऱ्या अनुभवी शिक्षकांचा समावेश करावा.
१२) राज्यस्तरावरील TOT प्रशिक्षणानंतर पोर्टलवर उपलब्ध होणान्या स्तरनिहाय (प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक, अध्यापक विद्यालय) व प्रशिक्षण प्रकारनिहाय (वरिष्ठ व निवड) शिक्षक संख्येनुसार आवश्यक मुत्तभक (एका वर्गासाठी चार सुलभक याप्रमाणात) तयार करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्तरावर करण्यात यावे, त्यामध्ये पुरेसे सुलभक उपलब्ध होतील असे नियोजन करण्यात यावे, आवश्यक सुलभक संख्येमध्ये तातडीचे कारणास्तव अतिरिक्त म्हणून काही सुलभक संख्या वाढविण्यात यावी (अंदाजे एकूण आवश्यक संख्येमध्ये १०%), सवर प्रशिक्षण राज्यस्तराप्रमाणे चार दिवसीय आयोजित करण्यात यावे. १३) आपणास उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीवरील लॉगिनच्या माध्यमातून सुलभक यादी (Trainers List), प्रशिक्षण स्थळ (Training Center), केंद्र समन्वयक (Co-ordinator List) इत्यादी बाजी दिनांक १६/०५/२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अद्ययावत करण्यात यावी,
१४) प्रत्येक वर्गाचे प्रत्येकी सहा ते सात प्रशिक्षणार्थी याप्रमाणात आठ गट तयार करावेत. दोन गटास एक याप्रमाणे सुलभकाची नेमणूक करावी. प्रत्येक सुलभकाने आपल्या गटातील प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षणा दरम्यान आणि प्रशिक्षणोत्तर कार्याचे निकषावर आधारित मूल्यांकन करणे अपेक्षित आहे तशी सूचना सुलभकांना द्यावी, १५) प्रशिक्षण कार्यक्रम सुरु होण्यापुर्वी प्रशिक्षणार्थ्याला पुढील सूचना पत्राद्वारे निर्गमित करण्यात याव्यात.
अ) प्रशिक्षणाचे स्थळ, दिनांक व वेळ कळविण्यात यावे.
ब) तालुकास्तरीय प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थीना भोजन अल्पोपहार सुविधा नसल्याचे सूचित करणेत यावे.
क) प्रशिक्षणला येण्यापूर्वी स्वाध्याय लेखनासाठी फुलस्केप कागद, वही सोबत आणावी,
ड) ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न सोडविता यावेत यासाठी Android मोबाईल फोन पूर्णतः चार्ज असेल असा बरोबर असावा.
ई) आपण शिकवत असलेल्या विषयाची किमान पाठ्यपुस्तके, प्रश्नपत्रिका सोबत असान्यात (बरिष्ठ
वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी)
ए) राष्ट्रीय शिक्षण घोरण २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा, शाळामूल्यांकन- शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड (SQAAF), यासारखे साहित्य परिषदेच्या संकेत स्थळावरील सदर साहित्याचे वाचन करावे.
प्रशिक्षणादरम्यान -
१) प्रशिक्षण नियोजनाप्रमाणे चालू आहे याविषयीचा आढावा समन्वयकांमार्फत घेणे व आवश्यक सूचना देणे,
२) प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण साहित्याचे वाटप करणे. साहित्य मिळाल्याची पोच घेणे, वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण.
३) प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रत्येक तासिकेला उपस्थित असल्याबद्दलची तासीका निहाय स्वाक्षरी पत्रक रोजच्या रोज प्रशिक्षण पोर्टलवरून डाउनलोड करून ती प्रत्येक तासादरम्यान स्वाक्षरीसाठी उपलब्ध होईल असे पहावे. प्रत्येक तासिके दरम्यान स्वाक्षरी पेऊन तासिकानिहाय उपस्थितीची नौर पोर्टलगर अपलोड विहीन वेळेमध्येच करावी.
४) तासिकेनंतर घेतल्या जाणाऱ्या बहुपर्यायी चाचणी व सुलभकाव्या तासिकेबद्दल प्रत्याभरणासाठीची लिंक उपलब्प करुन दिली असेल, त्यादृष्टिने चाचणी होईल असे पहावे, केंद्रसंचालकाने प्रत्याभरणाये विश्लेषणावर सुलभकांना वैयक्तिकरित्या मार्गदर्शन कराने,
५) प्रशिक्षणाच्या शेवटी लेखी चाचणीचे नियोजन परीक्षापद्धतीप्रमाणे करावे,
६) प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विहित नमुन्यात प्रशिक्षणार्थ्यांना उपस्थिती प्रमाणपत्र देणे.
७) प्रशिक्षणार्थ्यांना उर्वरित पाच स्वाध्याय व प्रकल्प/ कृतिसंशोधन / नवोपक्रम अहवाल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर (४० दिवसांत) आपल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थात जमा करणेविषयीची तारीख, वेळ याबाबत स्पष्ट सूबना
प्रशिक्षणानंतर-
१) प्रशिक्षण संपल्यानंतर ४० दिवसांनी प्रशिक्षणाभ्यांकडून पाच स्वाध्याय व प्रकल्प/कृतिसंशोधन/नवोपक्रम अहवाल जमा करून प्यावेत.
२) आपल्या केंद्रावरील सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या कडून पाच स्वाध्याय व प्रकल्प/ कृतिसंशोधन /नवोपक्रम अहवाल प्राप्न झाल्यानंतर आपल्या केंद्रावरील सुलभकांना तपासणी, गुणांकन आणि तक्त्यात गुणांची नोंद करण्याकरीता दोन दिवसांसाठी निमंत्रित करण्यात यावे.
प्रशिक्षण कालावधी व प्रशिक्षण खर्च-
१) जिल्हास्तरावर विनांक २६/०५/२०२५ ते दिनांक २९/०५/२०२५ या कालावधीत ४ दिवसीय TOT चे आयोजन एकाच टप्पामध्ये करावे.
२ ) तालुकास्तरावरील प्रशिक्षण दिनांक ०२/०६/२०२५ ते दिनांक १२/०६/२०२५ या कालावधीत एकाच टप्प्यात आयोजित करावे.
१) प्रशिक्षणासाठी प्रत्येकी ५० प्रशिक्षणार्थी चा एक वर्ग करण्यात यावा व त्यानुसार पोर्टलवर नोंद करावी.
४) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक २४ जुलै २०१७ व दिनांक २४ ऑगस्ट २०१७- शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील जिल्हास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण अनुषंगिक खर्च या शासन निर्णया प्रमाणे करावा, ५) अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्यचे १० दिवसांचे प्रशिक्षण हे राज्यस्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचे मार्फत आयोजित केले जाईल याचाचतच्या सविस्तर नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी करून याबाबतच्या सूचना निर्गमित करणेत यावेत
६) कला व क्रिडा शिक्षकाचे तालुकास्तरीय ७ दिवसीय प्रशिक्षण नियमित प्रशिक्षण वर्गासोवत (दिनांक २ जून ते १ जून एकूण ०७ दिवस) होईल त्यांच्या मुल्याकन व उपस्थिती नावतच्या नोंदी संबधित जिल्ह्याने ठेवाव्यात. तसेच विभाग स्तरीय प्रशिक्षणास उपस्थित राहण्यासाठी कला व क्रिडा शिक्षकांना विनांक ९जून रोजी प्रशिक्षण कार्यमुक्त करण्यात यावे,
( ७) कला व क्रीडा शिक्षकाचे विभागीय प्रशिक्षण दिनांक१० जून ते १२ जून या कालावधीत विभागीय जिल्हा
शिक्षण व प्रशिक्षण संस्था याचेमार्फत आयोजित केले जाईल. संबधित विभागीय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी आपल्या विभागातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना आवश्यक सूचना निर्गमित करण्यात याव्यात
८) कला व क्रिडा शिक्षकांसाठी TOT आयोजन विभागस्तरावर करण्यात यावे.
९) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना देण्यात येणार रक्कमेची बावनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षकाचे प्रशिक्षणा (TOT) साठी रु १०००/- प्रती दिन प्रतिव्यक्ती या खर्च मयदित विनीय नियमांच्या आधीन राहून करण्यात यावा
खर्च तपशील
TOT जिल्हास्तर-प्रतिदिन प्रतिव्यक्ती
जिल्हातर प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (TOT)
वर (रु.) १,०००/-
दिवस ४
तालुकास्तर प्रशिक्षण (प्रति वर्ग)
केवळ सुलभक मानधनासाठी
५००/- ×१० × ४ = २०,०००/-
इतर अनुषंगिक खर्च
४०००/-
(साविल, प्रमाणपत्र, प्रश्नपत्रिका, स्टेशनरी, L.C.D. प्रोजेक्टर, पिण्याच्या पाण्याची सुविधा
इ.) (प्रति वर्गासाठी)
तरी वरील सूचनांप्रमाणे जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण व तालुकास्तरीय प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण विहित कालावधीमध्ये सर्व सूचनांच्या काटेकोर पालनासह करण्यात यावे.
(डॉ. माधुरी सावरकर)
21/5/25
उपसंचालक (सेवापूर्व शिक्षण)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच टप्प्यामध्ये दिनांक 02 जून 2025 ते 12 जून 2025 या कालावधीमध्ये होणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 9 मे 2025 रोजी निर्गमित केलेल्या इयत्ता पहिलीच्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजित करणे बाबत परिपत्रकानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण हे दिनांक 2 जून ते 11 जून 2025 या कालावधीमध्ये होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परिपत्रक पुढील प्रमाणे!
अर्थात वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण बाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे अधिकृत परिपत्रक निर्गमित झाल्यानंतर त्यामध्ये अधिक स्पष्टता येईल.
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणीची मुदत संपलेली आहे.
ज्यांची नोंदणी यावर्षी होऊ शकली नाही त्यांची नोंदणी पुढील वर्षीच होऊ शकते.
वरिष्ठ वेतन निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी अर्जात दुरुस्तीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://training.maa.ac.in/Update/
पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल. योग्य अशा हिरव्या किंवा निळ्या बॉक्स वर क्लिक करून ई-मेल आयडी व मोबाईल नंबर वर येणारा ओटीपी घेऊन लॉगिन करा व जी चूक झाली आहे ती दुरुस्त करून सबमिट करा.
ऑनलाईन वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणीमधील दुरुस्तीबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 6 मे 2025 पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
दिनांक २१/०४/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून नावनोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. संदर्भ क्रमांक २ अन्वये नावनोंदणी प्रक्रियेसाठी दिनांक ०६/०५/२०२५ रोजी सायं. ६:०० वाजेपर्यंतची मुदत देण्यात आलेली होती.
यानुसार ऑनलाईन प्रशिक्षण नावनोंदणी करत असताना काही पात्र प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण प्रकार व प्रशिक्षण गट यांची निवड करत असताना चुका केलेल्या आहेत. अशा प्रशिक्षणार्थ्यांना दिनांक ७/०५/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजेपासून दिनांक ८/०५/२०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आपण स्वतः निवड केलेल्या प्रशिक्षण गट आणि प्रशिक्षण प्रकारच्या चुका दुरुस्ती करणेसाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
तरी यानुसार केवळ ज्या प्रशिक्षणार्थ्यांना आवश्यक दुरुस्ती करावयाची आहे, केवळ अशाच प्रशिक्षणार्थ्यांनी सदरच्या कालावधीमध्ये आवश्यक दुरुस्ती करावी. ज्या प्रशिक्षणार्थ्यांची नावनोंदणी अचूक झालेली आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांनी कोणतीही दुरुस्ती यामध्ये नोंदवू नये. तसेच दुरुस्तीची ही अंतिम संधी प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. नमूद कालावधीनंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली जाणार नाही याची नोंद, नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी घ्यावी अशा सुचना आपल्यास्तरावरून सर्व नोंदणी केलेल्या पात्र प्रशिक्षणार्थ्यांना निर्गमित करण्यात याव्यात शालार्थ/ आश्रम शालार्थ / BMC स्टाफ आय. डी असलेल्या या पर्यायामधून नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
1. आपल्या शाळेचे नाव देवनागरी लिपीत नोंदविणे.
2. निवड श्रेणी साठी पात्र प्रशिक्षणार्थी यांनी चुकीने वरिष्ठ श्रेणी मध्ये नोंदणी केले असणे. केवळ यासाठी प्रशिक्षण प्रकार दुरुस्ती करणे.
3. प्रशिक्षण गट (प्राथमिक / माध्यमिक/उच्च माध्यमिक / अध्यापक विद्यालय) दुरुस्ती करणे.
4. प्रशिक्षण गटामध्ये माध्यमिक / उच्च माध्यमिक / अध्यापक विद्यालय शिक्षकांनी कला शिक्षक व क्रीडा शिक्षक नसताना चुकीने कला शिक्षक व क्रीडा शिक्षक अशी नोंदणी केली असणे. यासाठी दुरुस्ती करणे.
शालार्थ/ आश्रम शालार्थ / BMC स्टाफ आय. डी नसलेल्या या पर्यायामधून नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
1. आपल्या शाळेचे नाव देवनागरी लिपीत नोंदविणे.
2. निवड श्रेणी साठी पात्र प्रशिक्षणार्थी यांनी चुकीने वरिष्ठ श्रेणी मध्ये नोंदणी केले असणे. केवळ यासाठी प्रशिक्षण प्रकार दुरुस्ती करणे.
3. प्रशिक्षण गट (प्राथमिक / माध्यमिक/उच्च माध्यमिक / अध्यापक विद्यालय) दुरुस्ती करणे.
4. प्रशिक्षण गटामध्ये माध्यमिक/उच्च माध्यमिक / अध्यापक विद्यालय शिक्षकांनी कला शिक्षक व क्रीडा शिक्षक नसताना चुकीने कला शिक्षक व क्रीडा शिक्षक अशी नोंदणी केली असणे. यासाठी दुरुस्ती करणे.
5. शाळा व्यवस्थापन प्रकार दुरुस्त करणे.
उक्त नमूदप्रमाणेच दुरुस्ती असेल तर अशाच दुरुस्ती प्रशिक्षणार्थ्यांना करता येणार आहेत. केवळ ज्या प्रशिक्षणार्थ्यांना दुरुस्ती करणे आवश्यक आहे केवळ अशाच प्रशिक्षणार्थ्यांना दुरुस्ती नोंदवावी.
(डॉ. माधुरी सावरकर)
उपसंचालक (सेवापूर्व शिक्षण)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
सन 2025-26 मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक / मुख्याध्यापकांकरिता निवड श्रेणी ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेत समाविष्ट करणे बाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ने दि. ३०/०४/२०२५ रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत एप्रिल - मे 2025 या कालावधीमध्ये वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण आयोजित केले जात आहे.
सद्यस्थितीत प्रशिक्षणाची ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रिया दिनांक २१.०४.२०२५ पासून सुरू करण्यात आली असून सदरच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी प्रक्रियेमध्ये दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत १२ वर्षे अर्हताकारी सेवा अथवा २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण केली असेल असेच शिक्षक/मुख्याध्यापक नाव नोंदणी करू शकत होते.
तथापि राज्यामध्ये काही शिक्षक / मुख्याध्यापक हे दिनांक ३०.०४.२०२५ ते दिनांक ३०.०४.२०२६ या कालावधीत २४ वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण करत आहेत आणि ते माहे एप्रिल २०२६ पूर्वी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांचा सेवानिवृत्तीचा कालावधी लक्षात घेता, जे शिक्षक / मुख्याध्यापक हे दिनांक ३०.०४.२०२५ ते दिनांक ३०.०४.२०२६ या कालवधीत सेवानिवृत्त होत असल्याने व सेवेची २४ वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण होत असल्याने अशा शिक्षक / मुख्याध्यापक यांना नावनोंदणी करणेसाठीची सुविधा दिनांक ०१/०५/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजेपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच सर्वांसाठी नावनोंदणीस दिनांक ०६/०५/२०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे.
तरी अशा पात्र शिक्षक / मुख्याध्यापक यांना निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणेबाबतबाबतच्या सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक/मुख्याध्यापक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावे.
30/04/25
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर
1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई
2. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे, ४११००१
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यासाठी लिंक.
वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.
शालार्थ सेवार्थ किंवा बीएमसी स्टाफ आयडी असलेल्यांसाठी वरीलपैकी योग्य ठिकाणी क्लिक करा पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.
वरीलपैकी लागू असलेला मुद्दा निवडा. व तो आयडी क्रमांक नोंदवून त्यासमोर असलेल्या निळ्या रंगाच्या प्रविष्ट करा बटनावर क्लिक करा पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल
ती बरोबर असल्यास त्याखाली शाळेचे नाव देवनागरी लिपीत म्हणजेच मराठीत नोंदवा प्रशिक्षणाचे माध्यम निवडा.
योग्य त्या प्रशिक्षणाचा गटावर क्लिक करा.
वरील प्रमाणे नमूद केलेली माहिती मी तपासली असून ती मान्य आहे या अगोदर असलेल्या चेकबॉक्स वर टिक करा व सर्वात शेवटी असलेल्या Pay & Save वर क्लिक करा पुढील प्रमाणे विंडो होईल.
वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नोंदणी 2025 मार्गदर्शिका पीडीएफ डाउनलोड.
नोंदणी पुन्हा पुढे ढकलली 21 तारखेला करता येणार नोंदणी.
नोंदणी डायरेक्ट लिंक.
https://www.maa.ac.in/index.php?tcf=training
तरी सर्व पात्र शिक्षकांनी दिनांक १८/०४/२०२५ पासून सदरच्या प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंदणी करावी ही विनंती.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2025-26 ऑनलाईन नाव नोंदणी करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
दिनांक २० जुलै २०२१ च्या शासननिर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होणेकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.
संदर्भामधील शासन निर्णयातील परिच्छेद क्र. 2 नुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आलेली आहे. यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक (मान्यताप्राप्त) या चार गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करणेसाठी पुढीलप्रमाणे दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी. (नोंदणीचाबतचा सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.) ) प्रशिक्षणाच्या नाव नोंदणीकरिता परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टैब
१ मधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅब वर क्लिक करून प्रकिया सुरु करावी.
२) वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत एकूण १२ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.
३) निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक ३०.०४.२०२५ पर्यंत एकूण २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे.
४) प्रशिक्षण नोंदणी दिनांक १५.०४.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक २५.०४.२०२५ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत पर्यंत सुरु राहील. यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
५) सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचेमार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे.
६) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत
गट क्र. १- प्राथमिक गट (इ.१ली ते ४ थी, इ. १ली ते ५ वी, इ.१ली ते ७ वी, इ.१ली ते ८ वी, इ.६वी ते ८ वी)
गट क्र. २- माध्यमिक गट (इ.९ वी, १० वी)
गट क्र. ३-उच्च माध्यमिक गट (इ.११वी, १२ वी)
गट क्र. ४- अध्यापक विद्यालय गट
मान्यताप्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक व उच्च्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी.
७) नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या SOP तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करूनच नोंदणी करावी
८) प्रशिक्षणार्थीनी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ सेवार्थ/ बीएमसी पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी. जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी आधी शालार्थ सेवार्थ/ बीएमसी पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करूनच नंतर नाव नोंदणी करावी.
९) शालार्थ/ सेवार्थ/ बीएमसी प्रणालीवर अद्ययावत करावयाची माहिती खालील प्रमाणे
• स्वतःचे नाव (देवनागरी लिपी)
• लिंग
• जन्म दिनांक
• पदनाम
• Udise No.
जिल्हा
• तालुका
• शाळा व्यवस्थापन प्रकार
• नियुक्ती दिनांक
• शाळेचे नाव
• मुख्याध्यापकाचे नाव
• मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक
• व्यावसायिक अर्हता (सेवा कालावधीत व्यावसायिक अर्हता वाढवली असल्यास)
• शैक्षणिक अर्हता (सेवा कालावधीत शैक्षणिक अर्हता वाढवली असल्यास)
मोबाईल क्रमांक
• ई-मेल आयडी
१०) प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपला अचूक शालार्थ/सेवार्थ/बीएमसी ID, ई-मेल आय.डी. व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.
११) आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ/सेवार्थ/बीएमसी या पोर्टलवर नोंदवलेल्या ई-मेल आय.डी. वर OTP येईल. प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून नोंदणी पूर्ण करावी. तसेच आपल्या शालार्थ/सेवार्थ/बीएमसी या पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल प्राप्त OTP नोंदवून नोंदणी पूर्ण करावी. ई-मेल आय.डी. व मोबाईल क्रमांक यांचे verification होणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्ययावत सूचना येणार आहेत याची नोंद घ्यावी.
१२) नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी. आपण निवडलेला प्रशिक्षण गट (प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय) व प्रशिक्षण प्रकार (वरिष्ठ व निवड) यास पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहात.
१३) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय, सूचना व मार्गदर्शनपर संदर्भ साहित्य, व्हिडीओ, सर्व माहिती www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत.
१४) या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील.
१५) इंटरनेट बँकिंग/ क्रेडीट / डेबिट कार्ड/UPI payment या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क भरता येईल.
१६) सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit Card, Debit Card, Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे.
१७) एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी. प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवाशुल्क बँकेच्या guideline नुसार प्रशिक्षणार्थीना लागू राहतील याची नोंद घ्यावी.
१८) ज्या कालावधीतील प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठीच ते मर्यादित असेल.
१९) प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणीची ऑनलाईन (रिसिप्ट) पावतीची PDF जतन करून ठेवावी सदर पावतीवर आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट व नोंदणी क्रमांक इ. तपशील असणार आहे. सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी आवश्यक असणार आहे. तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ई मेलवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
२०) नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर Email आय.डी. वरून gradetraining@maa.ac.in या ई-मेल आय.डी. वर संपर्क करावा.
२१) नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचे संयुक्त स्वाक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल. तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अधिक माहिती साठी वेळोवेळी www.maa.ac.in हे संकेत स्थळ पाहावे.
२२) प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल. तथापि वाचनसाहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी व उर्दू माध्यमातून उपलब्ध असेल. याची नोंद घेण्यासाठीची सुविधा नाव नोंदणी प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आली आहे. उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावे व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यास अवगत करण्यात यावे प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
अभय परिहार - अधिव्याख्याता संपर्क क्रमांक - ९००४११९९२६
अभिनव भोसले - विषय सहाय्यक संपर्क क्रमांक ८२०८८७९१५९
तांत्रिक सहाय्य (Trifmd Pvt. Ltd.) संपर्क क्रमांक ९५११८७४३७३ (कार्यालयीन वेळेत)
(राहूल रेखावार भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रत:-
माहितीस्तव सविनय सादर
1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई
2. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे, ४११००१
संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
गेल्या वर्षी म्हणजेच शैक्षणिक सत्र 2022 23 वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण साठी राज्य शैक्षणिक संशोधन शिक्षण परिषदेने स्वतंत्र परिपत्रक निर्गमित करून सदर प्रशिक्षणासाठी नोंदणी करून घेतली होती.
यावर्षी वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू झाली आहे का? प्रशिक्षण सुरू झाले आहे का? अशा आशयाची मेसेजेस व फोनवरून आपल्या अनेक शिक्षक बांधवांनी चौकशी केल्यामुळे सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी यावर्षी म्हणजेच 2024 मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद देणे कोणतेही नवीन परिपत्रक निर्गमित केली नाही. व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याबाबत नवीन कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाही. समाज माध्यमांवर जे वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीचे परिपत्रक फिरत आहे ते मागील वर्षीचे आहे यावर्षी जोपर्यंत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवीन परिपत्रक निर्गमित करून प्रशिक्षणासाठी नोंदणी करवून घेत नाही तोपर्यंत सदर लिंक सुरू होणार नाही.
राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य द्वारे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी करण्यासाठी पुढील अधिकृत संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.
https://training.scertmaha.ac.in/index.aspx
वरील संकेतस्थळाला भेट दिली असता पुढील प्रमाणे पेज ओपन होते.
अर्थात जेव्हा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत अधिकृत परिपत्रक निर्गमित करेल व नोंदणी सुरू करेल तेव्हा आपण अधिकृत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू..
अधिकृत आणि विश्वासार्ह माहितीसाठी नियमित आमच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
6 Comments
सर नमस्कार, जनगणनेचा जी आर ELबाबत
ReplyDeleteOk
Deleteमी अनिल माने, माझी नेमणूक 1993 असून मी 2011 मध्ये पदोन्नती पदवीधर शिक्षक झालो त्यामुळे माझी सेवा सलग24 वर्ष पूर्ण शकली नाही, आत्ता पदवीधर म्हणून मी तेरा वर्षे सेवा पूर्ण केली आहे, तरी मला पदवीधर वेतनश्रेणी मध्ये वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ घेता येईल का? माहिती मिळावी ही नम्र विनंती
DeleteYes
ReplyDeleteसर दुरुस्तीच्या संदर्भामध्ये काय करावे याबद्दलची माहिती व कोणत्या लिंक दिलाय त्याबद्दल माहिती द्यावी
ReplyDeleteOk
Delete