HM Training 2024-25 Update - वर्ग पहिली ते बारावीच्या शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांना प्रशिक्षणासाठी करावी लागणार ऑनलाइन नोंदणी! MIEPA संचालक.

महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था छत्रपती संभाजी नगर च्या संचालकांनी दिनांक पाच जून 2024 रोजी  निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार स्टार्स प्रकल्प : मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभागाच्या इयत्ता पहिली ते बारावी च्या शाळांमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य या पदावर कार्यरत व्यक्तीच्या ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता नावनोंदणी करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


संदर्भ - १.STARS प्रकल्प अंतर्गत मंजूर PAB मिटिंग इतिवृत्त दि. ३१ मार्च, २०२४. २. मा. संचालक, SCERT, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र जा.क्र./राशैसंप्रपम/सशि/STARS उपक्रम नियोजन /२०२४-२५/०१९६३/दि.०४.०४.२०२४.


उपरोक्त संदर्भीय विषयानुसार कळविण्यात येते की, राज्यातील शालेय स्तरावर अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आणि परिणाम यांचे बळकटीकरण करण्यासंदर्भात जागतिक बँक अर्थसहायीत, केंद्र पुरस्कृत Strengthening Teaching Learning And Results for States (STARS) या उपक्रमातील मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सन २०२२-२३,२०२३-२४ मध्ये मुख्याध्यापक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न झाले आहे. सदर उपक्रमाअंतर्गत सन २०२४-२५ मध्ये उर्वरित (आतापर्यंत सदर ऑनलाईन प्रशिक्षण न घेतलेल्या) आपल्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभागाच्या तसेच आदिवासी कल्याण विभागाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक/प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या (पदाचे/प्रभारी) यांनी पुढे दिलेल्या लिंकवर दि.३०/०६/२०२४ या तारखेपर्यंत नोंदणी करणेबाबत आपल्या स्तरावरून आदेशित करावे.


नोंदणीसाठी ऑनलाईन लिंक कुणी भरावी याबाबत महत्वाची सूचना -

१. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभागाच्या इयत्ता पहिली ते बारावी च्या शाळांमध्ये मुख्याध्यापक /प्राचार्य या पदावर (पदाचे/प्रभारी) कार्यरत व्यक्ती २. प्रथम वेळी नोंदणी करणारे

३. पूर्वी नोंदणी केलेले परंतु ऑनलाईन प्रशिक्षणास सुरुवात न केलेले

४. नोंदणी करताना ईमेल आय-डी, संपूर्ण नाव (SPELLING), जिल्हा ही माहिती काळजीपूर्वक भरावी. आपले प्रशिक्षण आपल्या वैयक्तिक ईमेल आयडी द्वारेच होणार आहे.

५. लिंक मधील सर्व माहिती फक्त इंग्रजी भाषेतच भरावी.

सदर प्रशिक्षणात पूर्वचाचणी, फेज-1, फेज-2, फेज-3, उत्तरचाचणी, स्वाध्याय, प्रात्यक्षिक, PLC- व्यावसायिक अध्ययन समूह बैठक यांचा समावेश आहे.

खालील नोंदणी लिंक भरणे अनिवार्य आहे.


ऑनलाईन लिंक- 

https://forms.gle/o7xs6NfFueAMNdxY8


 (डॉ. वैशाली जामदार)


संचालक

महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), छत्रपती संभाजीनगर


प्रतिलिपी माहितीस्तव सादर -


१. मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई

२. मा. आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र, पुणे

३. मा.राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई ४. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
 वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.