ऑनलाइन बदली अपडेट - फक्त या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या होणार ऑनलाईन सुगम दुर्गम भागानुसार! ग्रामविकास विभाग.

 महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 31 मे 2012 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार उच्च न्यायालयात गेलेल्या शिक्षकांना दुर्गम भागातून सुगम भागात बदली मिळणे बाबत मे. विन्सीस आय टी सर्विसेस प्रा. लि., पुणे यांना उपलब्ध करून देण्यात यावेळी याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


संदर्भ : १) शासनाचे समक्रमांकीत दि. १५.५.२०२४ रोजीचे पत्र. २) आपली दिनांक २१.५.२०२४ व दि. २९.५.२०२४ रोजीची पत्रे.


महोदय,


उपरोक्त संदर्भ क्र. २ वरील आपल्या पत्रान्वये उपस्थित केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने नमूद करण्यात्त येते की, यातील मुद्दा क्र. १ (server availability) व २ (Renewal of SMS and email work order) बाबत (शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टल सुरू करण्यासाठी लागणारे हार्डवेअर आणि त्याच्यासाठी येणारा एकूण १ वर्षासाठीचा खर्च) यानुषंगाने विभागाच्या स्तरावर कार्यवाही करण्यात येत असून याबाबत आपणास कळविण्यात येईल. दरम्यान, शिक्षक ऑनलाईन बदल्यांसाठी सर्वर अनुषंगिक बाबींची पूर्तता करून तात्काळ पोर्टल सुरू करण्याची कार्यवाही करावी तसेच जिल्हा परिषद अमरावती करिता तात्काळ पोर्टल उपलब्ध करून द्यावे. सदर बाब तातडीची समजण्यात यावी. तसेच मुद्दा क्र. ३ व ४ बाबत जिल्हा परिषद, अमरावती यांचेकडून तातडीने माहिती उपलब्ध करून घ्यावी. जिल्हा परिषद, अमरावती यांना आवश्यक सूचना देण्यात येत आहेत. तसेच मुद्दा क्र. ५ बाबत सध्या फक्त अमरावती जिल्हा परिषदेसाठी पोर्टल सुरू करण्याच्या सूचना आपणास संदर्भीय क्र. १ वरील पत्रान्वयेच देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी.


आपला,

(नितीन स. पवार)


कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन प्रतः- १. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांना कळविण्यात येते की, मे. विन्सीस आय टी. कंपनीचे दि. २१.५.२०२४ रोजीचे पत्र सोबत जोडले असून यातील मुद्दा क्र. ३ व ४ शिक्षक ऑनलाईन बदल्यांसाठी आवश्यक माहिती तात्काळ संबंधित कंपनीस उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच सदर कंपनीशी संपर्क करून जिल्हांतर्गत बदल्यांबाबतीच प्रक्रीया तात्काळ राबविण्यात यावी.

२. निवड नस्ती- आस्था-७




महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏


Post a Comment

3 Comments

  1. संवर्ग १,२,३,४ च्या बदल्या होणार की फक्त संवर्ग३ च्या बदल्या होतील.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.