सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील राज्य मंडळाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षा दिनांक ११ एप्रिल ते २२ एप्रिल, २०२६ या कालावधीत आयोजित करण्याबाबत शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक व प्राथमिक यांनी संयुक्तपणे आदेश निर्गमित करून पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
क्र. शिर्स/संकीर्ण/२०२६/ए-१/विद्याशाखा/ 1778737 प्रति,
महत्वाचे /कालमर्यादित/ई-मेल व्दारे
12 MAR 2026
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषदा सर्व,
३) शिक्षण निरीक्षक मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)
४) शिक्षणाधिकारी बृन्हमुंबई महानगरपालिका
५) प्रशासकीय अधिकारी, पुणे महानगरपालिका
६) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. (सर्व)
७) उपशिक्षणाधिकारी/गटशिक्षणाधिकारी सर्व पंचायत समिती.
विषय: सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील राज्य मंडळाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षा दिनांक ११ एप्रिल ते २२ एप्रिल, २०२६ या कालावधीत आयोजित करण्याबाबत.
संदर्भ : मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र जा.क्र.राशैसंप्रपम/मूल्यमापन/सं.चा. २जिल्हा पत्र/२०२५-२६/१७६८८५३दि.०९/०३/२०२६.
उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे संदर्भीय पत्रान्वये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी-१ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे इयत्ता २ री ते ८ वी करिता नियोजन करण्यात आलेले असून संकलित चाचणी २ (PAT 3) दिनांक ११,१५ व २२ एप्रिल, २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व शाळांनी त्याच दिवशी आयोजित संकलित चाचणी-२ (PAT 3) करून त्याअनुषंगाने कार्यवाही करण्याची दक्षता घेण्यात यावी. उपरोक्त दिनांकांमध्ये आपल्या स्तरावरुन फेरबदल करण्यात येऊ नये. (सोबत संदर्भीय पत्राची प्रत जोडली आहे.)
तसेच सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील राज्य मंडळाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षा या मूल्यांकन चाचणी २ (PAT 3) हा कालावधी वगळून उर्वरित दिवशी आयोजित करण्यात याव्यात.
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविदयालयामध्ये नियतकालिक मूल्यांकन चाचणी २ (PAT 3) /, इयत्ता १ ते ८ वी, ९ वी व ११ वी आणि इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेला उपस्थित असणारी विदयार्थ्यांची संख्या ही ग्राह्य धरण्यात येईल. या अनुषंगाने सर्व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक/योजना, सहाय्यक शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना वार्षिक परीक्षेदरम्यान भेटी देऊन एकूण पटावर विदयार्थी व परीक्षेला उपस्थित विदयार्थी संख्येचा अहवाल शिक्षण संचालक कार्यालयाकडे सादर करावा. विदयार्थी उपस्थिती नोंद करण्याच्या सुविधेबाबत यथावकाश कळविण्यात येईल.
Digitally signed by
SHARAD SHANKARGIRI GOSAVI
शिक्षण संचालक प्राथमिक
महाराष्ट्र राज्य, पुणे
Digitally signed by PALKAR MAHESH MADHUKAR Date:26 18:05:26
शिक्षण संचालक
माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रत माहितीस्तव सविनय सादर :-
१. मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
२. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
४. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, ७०८, आरबी कुमठेकर मार्ग, सदाशिव पेठ, पुणे.
वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


0 Comments