महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक सात मे 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासनादेशानुसार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत- शुद्धिपत्रक नुसार पुढील प्रमाणे बदल केला आहे.
शासन शुद्धीपत्रक :-
उपरोक्त संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयामधील "मुद्दा क्र. १४ (शिष्यवृत्तीचे वितरण):- शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत त्यांच्या बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, खाते क्रमांक व IFSC कोड इ.) व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी."
याऐवजी
"मुद्दा क्र. १४ (शिष्यवृत्तीचे वितरण):- शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थ्यांचे आई/वडील/पालक यांच्या संयुक्त बँक खात्यात (विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करुनच देय रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्याच्या अर्जासोबत विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांचे आई / वडील / पालक यांच्या बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, खाते क्रमांक व IFSC कोड इ.) व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी." असे वाचण्यात यावे
सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४०५०७१४२७२२७४२१ असा आहे. हे शुद्धीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
प्रति,
१. मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई.
वरील संपूर्ण शासन आदेश शुद्धिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments