माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या गुणपत्रिका व इतर साहित्य वाटपाबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर दिनांक १३/०५/२०२५ रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.
त्याअनुषंगाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना सोमवार दिनांक २६/०५/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात येणार असून माध्यमिक शाळांमार्फत त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबत विभागीय मंडळांमार्फत सर्व माध्यमिक शाळांना सूचित करण्यात आलेले आहे.
याबाबत विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व संबंधित मुख्याध्यापक/विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी.
(देविदास कुलाळ)
सचिव,
राज्य मंडळ, पुणे-०४.
दिनांक:- २०/०५/२०२५
SSC Result 2025 Maharashtra Update - दहावीचा निकाल आज दि १३/०५/२०२५ ला दुपारी १ वाजता जाहीर होणार! निकाल पाहण्यासाठी अधिकृत लींक.
https://sscresult.mahahsscboard.in/
SSC Result March 2025 दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://sscresult.mahahsscboard.in/
ओपन झालेल्या विंडो मधील वरील दिसणाऱ्या भागात आपला दहावी परीक्षेच्या प्रवेश पत्रावरील बैठक क्रमांक म्हणजेच Seat Number टाका व त्याखाली आईचे नाव टाईप करा. व सर्वात शेवटी असलेल्या हिरव्या रंगाच्या View Result बटनवर क्लिक करा आपल्याला आपला निकाल दिसेल.
स्क्रीन शॉट काढा व आपले यश सर्वांना शेअर करा!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे दिनांक 12 मे 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्ध पत्रका नुसार दिनांक 13 मे 2025 रोजी राज्य मंडळाचा दहावीचा निकाल दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक पुढीलप्रमाणे.
https://sscresult.mahahsscboard.in/
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४.
।। प्रकटन ।।
विषय : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ निकालाबाबत
मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक १३ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
१. https://results.digilocker.gov.in
२. https://sscresult.mahahsscboard.in
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com
६. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
७. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results
८. https://www.indiatoday.in/education-today/results
९. https://www.aajtak.in/education/board-exam-results
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना
एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-
१) ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन https://mahahsscboard.in स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार, दिनांक १४/०५/२०२५ ते बुधवार, दिनांक २८/०५/२०२५ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/Credit Card/UPI/Net Banking बाद्वारे भरता येईल.
२) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा,
३) फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रु. मार्च २०२६ व जून-जुलै २०२६) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.
४) जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दिनांक १५/०५/२०२५ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.
(देविदास कुलाळ)
सचिव, राज्य मंडळ, पुणे-०४.
दिनांक:-१२/०५/२०२५
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा रिझल्ट कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. दहावीचा निकाल हा १५ मेपर्यंत लागू शकतो असं सांगण्यात आले आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर दहा दिवसात दहावीचादेखील निकाल जाहीर करु असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लवकरच दहावीचा निकाल लागणार आहे.
पुढच्या आठवड्यात दहावीचा निकाल (SSC Result Date)
पुढच्या आठवड्यात १५ तारखेपर्यंत दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. याबाबत बोर्डाने अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, बारावीच्या निकालानंतर १० दिवसात दहावीचा रिझल्ट जाहीर करु असं सांगितलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
दहावीचा निकाल कसा चेक कराल? (How To Check 10th SSC Result)
दहावीचा निकाल तुम्ही ऑनलाइन पद्धतीने वेबसाइटवर जाऊन चेक करु शकतात.
mahahsscboard.in
mahresult.nic.in
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
या वेबसाइटवर जाऊन रिझल्ट पाहू शकतो.
अकरावी प्रवेशप्रक्रिया
अकरावी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया १९ मेपासून; माहिती भरणं ८ मेपासून सुरु होणार आहे. शालेय शिक्षण विभागाने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार असून, विद्यालयांना आवश्यक माहिती पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया ८ मेपासून सुरू होईल. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज आणि प्रोफाइल तयार करण्याची सुविधा १९ मेपासून सुरू होणार आहे.
बारावी पूरवणी परीक्षा
बारावी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) जून-जुलैमध्ये बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ७ ते १७ मे या कालावधीत नियमित शुल्कासह, तर १८ ते २२ मे या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.
पुण्याहून एका सुप्रसिद्ध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमी नुसार दहावी निकालाबाबत महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे.
निकाल पाहण्यासाठी डायरेक्ट लिंक खालील लिंक वर क्लिक करून आपण आपला महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल पाहू शकता.
https://hscresult.mahahsscboard.in/
दहावीचा निकाल पाहण्यासाठी लिंक.
https://sscresult.mahahsscboard.in/
दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्यांनाही अकरावी प्रवेश!!
■ इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत दोन विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या कला शाखेत प्रवेश घेता येतो. पण, जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेत किंवा मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेत त्या विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण विषयात पास व्हावेच लागते. त्याशिवाय त्याला पुढे इयत्ता बारावीला प्रवेश घेता येत नाही.
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता इयत्ता दहावीच्या निकाल जाहीर करण्याची बोर्डाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. विद्यार्थ्यांना ग्रेस पासिंगसाठी दिलेल्या चित्रकला, क्रीडा, लोककलेच्या गुणांची पडताळणी बोर्डाकडून सुरू आहे. येत्या सोमवारी (ता. २७) दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार असल्याचे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा २७ मे रोजी निकाल जाहीर होईल. असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बोर्डाचे अधिकारी आता दिवसरात्र बसून निकाल जाहीर करण्याच्या तयारीत गुंतले आहेत. इयत्ता दहावीच्या जवळपास १५ लाख विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली होती. 'बेस्ट ऑफ फाईव्ह'नुसार दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. १२ ते १५ जून दरम्यान राज्यातील बहुतेक अकृषिक विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. राज्य लवकर लगेचच आहे.
या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र बोडनि बारावीचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत काही दिवस अगोदरच जाहीर केला आहे. आता दहावीच्या विद्यार्थ्यांचाही निकाल जाहीर होणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण होण्याची संधी दीड महिन्यात मिळणार!
इयत्ता दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घोषित करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. ताज्या माहितीनुसार बारावीचा निकाल मंगळवारी (ता. २१) जाहीर होणार आहे.
सोमवारी (ता. २०) बारावीचा निकाल जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, राज्य मंडळाकडून निकाल जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी पत्रक प्रसिद्ध केले जाते. रविवारी साप्ताहिक सुटीमुळे असे परिपत्रक काढणे अशक्य आहे. परिणामी, सोमवारी निकाल जाहीर होण्याची शक्यता मावळली आहे. राज्य मंडळाच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल तयार करण्याचे काम अजूनही सुरूच आहे. तसेच, अद्याप निकालाची अंतिम तारीख निश्चित झालेली नाही. परंतु, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यापूर्वी बारावीचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे स्पष्ट झाले आहे. पुढील दोन दिवसांत निकालाच्या टेस्टिंगचे काम पूर्ण होऊ शकते. त्यामुळे निकाल जाहीर होण्याची शक्यता नाकारता आहे. राज्य मंडळाकडून निकालाच्या घोषणेचे पत्रक केव्हा प्रसिद्ध केले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निकाल पाहण्यासाठी डायरेक्ट लिंक खालील लिंक वर क्लिक करून आपण आपला महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल पाहू शकता.
https://hscresult.mahahsscboard.in/
दहावीचा निकाल पाहण्यासाठी लिंक.
https://sscresult.mahahsscboard.in/
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
13 Comments
Nawaz Firoz banjari
ReplyDeleteNawaz Firoz banjari
ReplyDeleteSalma
ReplyDeleteD185476
ReplyDeleteD185476
ReplyDeleteअजून निकाल जाहीर झाला नाही!
ReplyDeleteशाळांचे result बघण्याकरिता कोणती वेबसाईट आहे
ReplyDeletewww.mahahsscboard.in
DeleteSHOBHA
ReplyDeleteYes
DeleteX002355
ReplyDeleteX002355
ReplyDeleteOk
Delete