शासकीय कर्मचाऱ्यांना व इतरांना वाहतूक भत्ता (T. A.) केव्हा मिळतो व केव्हा मिळत नाही? स्पष्टीकरण शासन निर्णय.

 शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता मंजूर करण्याबाबत स्पष्टीकरण देणारा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक नऊ मे 2003 रोजी निर्गमित केला आहे तो पुढील प्रमाणे.

परिपत्रक

वरील (३) व (४) येथील आदेशांन्वये राज्य शासकीय कर्मचा-यांना व इतरांना दिनांक १ ऑगस्ट, १९९७ पासून निवासस्थानापासून कर्तव्य-स्थानापर्यतच्या प्रवासावरील खर्चाची भरपाई म्हणून वाहतूक भत्ता (Transport Allowance) मंजूर करण्यात आला आहे. सदर वाहतूक भत्त्याच्या अनुज्ञेयतेबाबत काही मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. त्या संदर्भात शासन आता खालीलप्रमाणे खुलासा करीत आहे:-


(१) कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत खाजगी निवासस्थानात राहणा-या कर्मचा-यांनाही वाहतूक भत्ता अनुज्ञेय आहे किंवा कसे ?

अनुज्ञेय आहे.

(२) कर्तव्यस्थान आणि निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात (Campus) शासकीय निवासस्थान पुरविण्यात आलेल्या कर्मचा-यास वाहतूक भत्ता अनुज्ञेय आहे किंवा कसे ?

कर्तव्यस्थान आणि निवासस्थान. यांच्या एकत्र परीसरात (Cam-pus). शासकीय निवासस्थान पुरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यास कर्मचाऱ्याचे निवासस्थान आणि कर्तव्यस्थान यातील अंतर १ किलोमीटर व त्यापेक्षा जास्त असले तरीही वाहतूक भत्ता अनुशेय नाही.

(३) वाहतूक भत्त्याची परिगणना करण्यासाठी, अनुपस्थितीचा 'कालावधी मोजताना अशा कालावधीच्या पुढे व मागे जोडून येणा-या सुट्टया त्या कालावधीत समाविष्ट कराव्यात किंवा कसे ?

अनुपस्थितीचा कालावधी मोजताना अशा कालावधीला जोडून येणारे पुडील व मागील सुटीचे शनिवार, रविवार आणि सार्वजनिक व विशेष सुट्या वगळण्यांत याव्यात.

(४) अनुपस्थितीचा कालावधी वेगवेगळ्या कैलेंडर महिन्यातील असल्यास वाहतूक भत्त्याचे विनियमन कसे करावे ?

अनुपस्थितीचा कालावधी मोजतांना कैलेंडर महिने स्वतंत्रपणे विचारात न घेता, तो सलगपणे विचारात घ्यावा.

उदा. एखादा कर्मचारी एखाद्या वर्षी १५ जुलै ते २० ऑगस्ट या कालावधीसाठी अनुपस्थित असेल तर या आदेशांच्या प्रयोजनार्थ त्याच्या अनुपस्थितीचा कालावधी (पुढे मागे जोडून येणारे सुटीचे दिवस वगळून) ३७ दिवस इतका असेल. ह्या ३७ दिवसांच्या अनुपस्थितीच्या कालावधीसाठी त्याला वाहतूक भत्ता मिळणार नाही. मात्र जुलै आणि ऑगस्ट या महिन्यातील उर्वरित कालावधीसाठी त्याला यथाप्रमाण (in proportion) वाहतुक भत्ता अनुज्ञेय असेल.

५) (1) दीर्घ सुटी अनुज्ञेय असलेल्या कर्मचाऱ्यांना दीर्घ सुटीच्या कालावधीत वाहतूक भत्ता अनुज्ञेय आहे किंवा कसे ?

दीर्घ सुटीचा कालावधी कमाल ३० दिवस इतका असेल तर, अन्य अटींच्या अधीन राहून, वाहतूक भत्ता अनुज्ञेय ठरेल.

मात्र. दीर्घ सुटीचा कालावधी ३० दिवसांपेक्षा जास्त असेल तर वाहतूक भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

(ii) दीर्घ सुटी अनुज्ञेय असलेल्या कर्मचाऱ्यांना दीर्घ सुटीच्या कालावधीत मुख्यालयाच्या हद्दीत वा त्याबाहेर प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आल्यास त्यांना वाहतूक भत्ता अनुज्ञेय आहे किंवा कसे ?

दीर्घ सुटीच्या कालावधीत प्रशिक्षणासाठी वा इतर शैक्षणिक किंवा प्रशासकीय कर्तव्य पार पाडण्यासाठी मुख्यालयाच्या हद्दीत वा त्याबाहेर कर्मचाऱ्यास पाठविण्यात आल्यास त्याची दीर्घसुटी खंडीत झाल्याचे समजण्यात यावे आणि त्यांना जर दैनिक भत्ता, मोफत वाहन सुविधा वा कोणत्याही प्रकारच्या वाहनभत्त्याचा लाभ या प्रयोजनार्थ मिळत नसेल तर, वाहतूक भत्ता अनुज्ञेय ठरेल. मात्र प्रशिक्षण वा शैक्षणिक कार्य पार पाडण्यासाठी व्यतित केलेला संपूर्ण कालावधी हा कर्तव्य कालावधी म्हणून नियमित केला नसेल तर या कालावधीत वाहतूक भत्ता अनुज्ञेय ठरणार नाही.

(६) (1) निलंबन कालावधीत वाहतूक भत्ता अनुज्ञेय आहे किंवा कसे ?

निलंचन कालावधीत वाहतूक भत्ता अनुज्ञेय नाही.

ii) निलंबन कालावधी हा नंतरच्या आदेशान्वये कर्तव्य कालावधी म्हणून विनियमित करण्यात आला असेल तर त्या कालावधीसाठी वाहतूक भत्ता अनुशेय ठरतो किंवा कसे ?

निलंबन कालावधी कालांतराने कर्तव्य कालावधी म्हणून नियमित झाला तरी त्या कालावधीसाठी वाहतूक भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

७) कर्तव्य म्हणून मानल्या गेलेल्या प्रशिक्षण कालावधीत कर्मचा-यांना वाहतूक भत्ता अनुज्ञेय आहे किंवा कसे ?

अशा प्रकरणी जर संबंधित कर्मचा-याच्या शासकीय निवासस्थानापासून प्रशिक्षणाचे ठिकाण (असे ठिकाण मुख्यालय हद्दीतील वा त्याबाहेरील असू शकेल) १ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असेल (किंवा तो वास्तव्य करीत असलेल्या खाजगी निवासस्थानापासून प्रशिक्षणाचे ठिकाण १ किलोमीटरपेक्षा कमी वा जास्त अंतरावर असेल) आणि त्यास या प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यासाठी कोणतीही वाहन सुविधा / प्रवासभत्ता / दैनिक भत्ता देण्यात आला नसेल तर प्रशिक्षणाचा कालावधी कितीही दिवसांचा असला तरी, वाहतूक भत्ता अनुज्ञेय ठरेल.

मात्र प्रशिक्षणासाठी दौ-यावर असणा-या कर्मचा-यास, जर त्याची अनुपस्थिती ३० दिवसांपेक्षा जास्त असेल तर त्याला वाहतूक भत्ता अनुज्ञेय होणार नाही.

८) (1) निरीक्षणाच्या कामासाठी जाणा-या निरीक्षण पथकाच्या सदस्यांना वाहतूक भत्ता अनुज्ञेय आहे किंवा कसे ?

(ii) क्षेत्रीय कामासाठी सतत (Continuously) फिरती करावी लागणा-या कर्मचा-यांना वाहतूक भत्ता अनुज्ञेय आहे किंवा कसे ?

वाहतूक भत्ता हा कर्मचा-याला त्याच्या निवासस्थानापासून ते कर्तव्यस्थानापर्यंतच्या व परतीच्या प्रवासावरील खर्च भागविण्यासाठी दिला जातो. जर कर्मचा-यास निवासस्थान ते निरीक्षणाचे स्थान /क्षेत्रीय कामाचे स्थान व परत अशा ३० दिवसांपेक्षा जास्त कालावधीतील निरीक्षण / फिरतीनिमित्तच्या प्रवासासाठी प्रवासभत्ता /दैनिक भत्ता वा मोफत वाहत सुविधेचा लाभ मिळत असेल वा कोणत्याही प्रकारचा वाहन भत्ता मिळत असेल तर क्रर्मचा-यास वाहतूक भत्ता मिळणार नाही.

(९) एखाद्या ठिकाणची विशेष परिस्थिती लक्षात घेऊन, निवास-स्थानाचे ठिकाण ते कार्यालय व परत या प्रवासावरील खर्चाची भरपाई म्हणून विशेष रोख भत्ता / विशेष रक्कम इत्यादी मंजूर करण्यात आली असेल तर त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता देय होईल किंवा कसे ?

वाहतूक भत्ता कर्मचाऱ्याला त्याच्या निवासस्थानापासून ते कर्तव्यस्थानापर्यंतच्या प्रवासावरील खर्चाची भरपाई म्हणून दिला जातो. त्याच प्रयोजनासाठी अन्य नांवाने प्रवास खर्चाची भरपाई मंजूर करण्यात आली असेल तर एकाच वेळेस वाहतूक भत्ता आणि अन्य नांवाने भरपाई मंजूर करता येणार नाही. अशा प्रकरणी कोणताही एक पर्याय निवडण्याचा विकल्प देण्यात यावा.

२. वाहतूक भत्त्याच्या अनुज्ञेयतेसंदर्भातील तरतूदीचा, वर नमूद केलेल्या स्पष्टीकरणापेक्षा वेगळा अर्थ लावला गेल्याने या भत्त्याचे अतिप्रदान झाले असेल तर अशी अतिप्रदानाची रक्कम कमाल १२ समान हप्त्यांमध्ये वसूल करण्यात यावी.

३. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय'कुडाळ या ठिकाणाहून 'ओरोस' या ठिकाणी हलविण्याबाबतचा निर्णय घेतल्यावर 'ओरोस ' या नव्या मुख्यालयो स्थानांतरीत केल्या जाणा-या कार्यालयात काम करणा-या कर्मचा-यांना त्यांचे मुख्यालयाचे जुने ठिकाण ते ओरोस येथील प्रशासकीय इमारत या दरम्यान कराव्या लागणा-या प्रवासासाठी, संदर्भाधीन (१) आणि (२) येथील आदेशांन्वये, दरमहा रु.२४०/- या दराने विहीत अटींच्या अधीन राहून विशेष रोखभत्ता मंजूर करण्यात आला आहे. आता संदर्भाधीन (३) आणि (४) येथील आदेशान्वये, सर्व राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना विहीत अर्टीच्या अधीन राहून दिनांक १ ऑगस्ट, १९९७ पासून वाहतूक भत्ता मंजूर करण्यात आला असल्याने, विशेष रोख भत्त्याच्या अनुज्ञेयतेबाबत पुढीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत :-

(अ) ओरोस येथे कार्यरत असणा-या आणि विशेष रोख भत्ता व वाहतूक भत्ता अशा दोनही भल्यांचा लाभ घेणा-या कर्मचा-यांना या दोनपैकी एकच भत्ता अनुज्ञेय ठरविण्यांत यावा. विशेष रोख भत्ता व वाहतूक भत्ता या दोनपैकी कोणताही एक भत्ता स्विकारण्याचा विकल्प कर्मचा-यांकडून घेण्यात यावा.

(ब) सध्या सेवेत असणारे जे कर्मचारी वाहतूक भत्ता स्विकारण्याचा विकल्प देतील, त्या कर्मचा-यांना दिनांक १ ऑगस्ट, १९९७पासून देण्यात आलेल्या विशेष रोख भत्त्याची कमाल ३६ समान मासिक हप्त्यात वसूली करण्यात यावी.

(क) जे कर्मचारी विशेष रोख भत्ता स्विकारण्याचा विकल्प देतील, त्या कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये ऑगस्ट १९९७ ते सप्टेंबर १९९८ च्या कालावधीसाठी वाहतूक भत्त्याची थकबाकी जमा करण्याबाबतचे आदेश रद्दबातल समजण्यात यावेत. हे आदेश रह करण्यात आल्याने अशा जमा करण्यात आलेल्या रकमेवर मिळणारे व्याजही संबंधितांना मिळणार नाही.

अशा कर्मचा-यांना ऑक्टोबर १९९८ पासून अदा करण्यात आलेल्या वाहतूक भत्त्याची कमाल ३६ मासिक हप्त्यांमध्ये वसुली करण्यात यावी.

४. वरील परिच्छेद २ व ३ मध्ये देण्यात आलेल्या आदेशांच्या परिणामी उद्भवणाऱ्या वाहतूक भत्त्याच्या रकमेची वसुली माहे मे, २००३ या महिन्याच्या वेतनापासून सुरु करण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


शु. श. कारेकर, 

शासनाचे उप सचिव.



अधिकृत आणि विश्वासार्ह माहितीसाठी नियमित आमच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! 


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.