पूर्व माध्यमिक व माध्यमिक स्तरावरील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित बँड स्पर्धेसाठी जिल्हातर्गत नोंदणी करिता मुदतवाढ देणेबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशक्षण परिषदेने दिनांक 12 नोव्हेंबर 2026 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.
जा.क्र. राशैसंप्रपम/कला व क्रीडा/बँड स्पर्धा आ/सन२०२६-२७/
दिनांक:- स्वाक्षरीखाली नमूद
प्रति,
१. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई
२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३. शिक्षणाधिकारी (माध्य.), जि. प. (सर्व)
४. शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर
विषयः- पूर्व माध्यमिक व माध्यमिक स्तरावरील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित बँड स्पर्धेसाठी जिल्हातर्गत नोंदणी करिता मुदतवाढ देणेबाबत..
संदर्भ :
- १. GOI, MOE, Department of School Education & Literacy, Samagra Shiksha, PAB Minutes, F. No. १०-३/२०२६-SS.१, दिनांक १६ जून, २०२६.
२. Final Recommendation Sheet for Minutes (Samagra Shiksha of Maharashtra), GOI, MOE, Department of School Education & Literacy, Samagra Shiksha, दिनांक १५ जून, २०२६.
३. PAB Details Sheet, Department of School Education & Literacy, Samagra Shiksha (Quality Intervention-Band Competition)
४. मा. राज्य प्रकल्प संचालक, MPSP, मुंबई यांचे पत्र - SS/३००/२०२६-MPSP-PROGRAM/I/२४९२३९३/२०२६ दि. २८/०९/२०२६
५. Letter from Deputy Secretary to the Govt. of India F. No. 7-1/2026-PMP-2 Ministry of Education Department of School Education & Literacy, PM POSHAN Room No.21056, Kartavya Bhawan-02, New Delhi, dated 12th October, 2026
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार, महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील इयत्ता ९ वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील बँड स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धेची नोंदणी दि. १२/११/२०२६ पर्यन्त वेळ-सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत) पर्यंत जिल्ह्यातून नोंदणी पाठविण्याची अंतिम तारीख देण्यात आलेली होती.
तथापि, तांत्रिक व अपरिहार्य कारणांमुळे अनेक शाळांना व्हिडिओ अपलोड करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे जिल्हा स्तरावर नोंदणी आणि व्हिडिओ सबमिट करण्यासाठी दि. २७/११/२०२६ (पर्यन्त वेळ-सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत) ही मुदतवाढ देण्यात येत आहे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे, बँडच्या माध्यमातून कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे अशा उद्देशाने राष्ट्रीयस्तरावरील बँड स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सदर स्पर्धा राज्यस्तर, झोनल स्तर (राष्ट्रीय उपांत्य), राष्ट्रीयस्तर या ३ स्तरांवर आयोजित करण्यात येणार आहे. सदर स्पर्धा सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना खुली आहे. ज्यामध्ये CBSE, ICSE, KVS, NVS, PM- SHRI, व सैनिकी शाळा सुद्धा समविष्ट होणे अपेक्षित आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई आणि प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी आपल्या जिल्ह्यात शिक्षणाधिकारी, माध्यमिक व शिक्षण निरीक्षक यांचे सहकार्याने उपरोक्त नमूद सर्व शाळांना याबाबतचे परिपत्रक काढून प्रस्तुत कार्यालयाकडील सदरच्या पत्रात दिलेल्या लिंकवर नोंदणी करणे आणि बँडचे व्हिडीओ अपलोड करणेबाबत सूचित करण्यात आले होते. त्याकरिता दि २७/११/२०२६ (वेळ-सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत) पर्यंत या पत्राद्वारे जिल्ह्यातून नोंदणी पाठविण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.
आपल्या जिल्ह्यांतील शाळांच्या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार https://forms.gle/RLKGitdfTw6dq6Hz५ या लिंकमध्ये माहिती भरून व मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार पाईप बँडचा विद्यार्थी ग्रुप/विद्यार्थिनी ग्रुप आणि ब्रास बँडचा विद्यार्थी ग्रुप/विद्यार्थिनी ग्रुप अशा ४ प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारच्या एक किंवा प्रत्येक प्रकारातील एक अशा संघाची नोंदणी करून व्हिडीओची लिंक पेस्ट करणे दि. २७ नोव्हेंबर, २०२६ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत लिंक भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे (व्हिडीओची लिंक पेस्ट करताना त्याला एडीटचा Access द्यावा.)
तदनुषंगाने, आपल्या अधिनस्त सर्व कार्यालये व शाळांना याबाबत सविस्तर माहिती कळवून जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होतील असे पहावे. उपरोक्त विषया संदर्भात यापुढे कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची दक्षता घ्यावी. बैंड स्पर्धांच्या विभागीय व राष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धांच्या सूचना आपणास स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येतील.
Digitally signe KAMALADEVI SHRIDHAR AWATE Date: 12-11-2026 13:26:58 LAWA
(डॉ. कमलादेवी आवटे)
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर:-
१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२) मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई.
३) मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, पुणे- १
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.



0 टिप्पण्या