राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४ ऑनलाइन नवोपक्रम सादर करण्यास सुरुवात!

🏆राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४🏆


✒️राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात.  सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४ चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.


१.पूर्व प्राथमिक गट  (अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका) 

२.प्राथमिक गट  (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक  व  मुख्याध्यापक)

३.माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)

४. विषय सहायक,  विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट

५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता )


✒️प्रस्तुत स्पर्धा ही मराठी माध्यमासह इतर सर्व माध्यमातील शिक्षक व अधिकारी यांचेसाठी आयोजित करण्यात येत आहे.


✒️या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जाऊन माहिती पत्रकाचे अवलोकन करावे.


✒️ सर्व माध्यमातील स्पर्धकांनी आपले नवोपक्रम अहवाल मराठी अथवा इंग्रजी या भाषेमध्येच https://scertmaha.ac.in/innovation/ या लिंकवर दि.२८/११/२०२३ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत सादर करावेत.


✒️या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोपक्रमशील शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व अधिकाऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच आपल्या संपर्कातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांपर्यंत सदर माहिती पोहचविण्यात यावी.


     अमोल येडगे (भा.प्र.से.) 

 संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४ चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.


१. पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका)

२. प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक)

३. माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)

४. विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट

५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता । प्रस्तुत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पहिल्या टप्प्यात उपरोक्त गट क्र. १ ते ३ साठी जिल्हा स्तरावर व गट क्र. ४ व ५ साठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण (विभाग) स्तरावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोपक्रमशील शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व अधिकाऱ्यांना सहभाग घेण्यासाठी whats app, वर्तमानपत्र यासारख्या प्रसार माध्यमांच्याद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी, यासाठी प्राचार्य, डाएट व संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद यांनी एकमेकांशी समन्वय साधावा, आपल्या स्तरावरून स्पर्धेबाबत आणि सोबत दिलेले माहितीपत्रक अवलोकन करून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेविषयी अधिनस्त कार्यालयातील सर्व गटातील स्पर्धकांना याबाबत अवगत करावे.


प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व) यांनी आपल्या कार्यालयातील एका सक्षम अधिकाऱ्याकडे नोडल अधिकारी म्हणून या स्पर्धेची जबाबदारी देण्यात यावी. तसेच सदर नोडल अधिकाऱ्याचे नाव, संपर्क क्रमांक यासह नवोपक्रम स्पर्धेची माहिती पोहचविण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास researchdept@maa.ac.in या ई-मेल पत्त्यावर कळविण्यात यावा. प्रस्तुत स्पर्धा ही सन २०२३-२४ साठी मराठी माध्यमासह इतर सर्व माध्यमातील शिक्षक व अधिकारी यांचेसाठी आयोजित करण्यात येत आहे. इतर माध्यमातील स्पर्धकांनी आपला नवोपक्रम अहवाल मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये सादर करण्याविषयी संबंधितांना अवगत करण्यात यावे.

त्यानुसार आपल्या अधिनस्त उपरोक्त नमूद पाच गटात समाविष्ट अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांसह सर्व स्पर्धक नवोपक्रमशील घटकांना सोबतचे माहिती पत्रक निदर्शनास आणून द्यावे. संबंधित स्पर्धकांनी माहिती पत्रकाचे अवलोकन करून आपले नवोपक्रम अहवाल

 https://scertmaha.ac.in/innovation/ 

या लिंकवर दि.२८/११/२०२३ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत सादर करण्याविषयी सूचित करण्यात यावे. दिलेल्या मुदतीत संबंधितांनी आपले नवोपक्रम सादर करण्याबाबत आपले स्तरावरून योग्य ती दक्षता घेण्यात यावी.

सोबत : राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा माहिती पत्रक.


प्रत माहितीस्तव सविनय सादर

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालय, मुंबई.

२. मा. आयुक्त (शिक्षण), आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,


(अमोल येडगे भा.प्र.से.) संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.