केंद्रप्रमुख पदोन्नती बाबत मंत्रालय स्तरावरील अपडेट.

🔶 मंत्रालय भेट वृतांत...


 🟥 आज गुरुवार दिनांक 02 नोव्हेंबर 2023 रोजी मान.उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे आयोजित शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात शिक्षण सचिव श्री रणजीत सिंग देओल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न..


१)केंद्रप्रमुखांच्या भरती बाबत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना एकत्रित सर्वसमवेशक  मार्गदर्शन पत्र देऊन केंद्रप्रमुख भरती प्रकिया(सेवाजेष्टने /विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे ) जलदगतीने राबविणेबाबत  शिक्षक परिषदेची आग्रही भूमिका.


२)राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातर्फे शिक्षण सचिव रणजितसिंग देओल , उपसचिव श्री तुषार महाजन, सहसचिव श्री प्रवीण मुंढे त्याचबरोबर शिक्षण विभागातील अधिकारी श्री सुनील  हाणजे  ग्रामविकास विभागातील अधिकारी  श्री बागूल यांच्या उपस्थितीत व उपमुख्यमंत्री कार्यालयातील  कार्यासन अधिकारी श्री अतुल वझे श्रीपाद  ढेकणे उपमुख्यमंत्री कार्यालयाचे  मुख्य प्रशासकीय अधिकारी मा श्री संतोष राऊत अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाचे पश्चिम क्षेत्र प्रमुख प्रा डॉ शेखर चंद्रात्रे शिक्षक परिषदेचे प्रांत संघटन मंत्री सुरेश दंडवते शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे आदींची उपस्थिती होती.


३)मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या सुरुवातीला शिक्षक परिषदेचे प्रांत संघटन मंत्री श्री सुरेश दंडवते यांनी राज्यातील सर्व संवर्गातील समाजाला गणवेश मागणी 1 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत केलेली होती ती शासनाने मान्य करून यंदाच्या वर्षापासून सर्व संवर्गातील मुला-मुलींना दोन दोन गणवेश दिले त्याबद्दल सर्वप्रथम  ग्रामविकास मंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री महोदयांचे अभिनंदन व्यक्त करण्यात आले  मंत्रालयीन स्तरावर झालेल्या या बैठकीत निवेदनातील सर्व विषयांवर संक्षिप्त चर्चा होऊन त्याचे प्रोसिडिंग लिहिले गेले सर्व विषय प्राधान्य क्रमाने सोडवण्यात येणार असल्याचे शिक्षण सचिव श्री रंजितसिंग देओल यांनी  सांगितले.


४)प्रांत संघटन मंत्री सुरेश दंडवते तथा प्रांत कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी निवेदनातील सर्व विषयांवर सविस्तरपणे चर्चा घडवून आणली.


🔸५)केंद्रप्रमुख पद भरती संदर्भात संपूर्ण राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण झालेली असून मेहरबान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाप्रमाणे  50 टक्के गुणांची 50 वयाची तसेच विषयाच्या बाबतीत कोणती अट नसताना तसेच" प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक )या शब्दाचा अर्थ आपल्या सोयीने लावला जात असून याबाबतीत सविस्तरपणे चर्चा झाली असता कोणताही प्राथमिक शिक्षक, विषय शिक्षक ,पदोन्नती मुख्याध्यापक  ज्याची  व्यावसायिक पात्रता बीए , बीकॉम ,बीएससी बीएड होऊन 6 वर्ष झाली आहे  असे शिक्षक केंद्रप्रमुख पदासाठी सेवा जेष्ठतेने पदोन्नतीला पात्र ठरणारे आहे असे शिक्षण उपसचिव तुषार महाजन यांनी बैठकीत स्पष्ट केले अनेक ठिकाणी पदवीधर प्रशिक्षित शिक्षक याचा अर्थ विषय शिक्षक म्हणून लावला जात आहे सदर बाब चुकीची असून याबाबतीत सुधारित एक पत्र शासन स्तरावर निर्गमित होण्याची विनंती बैठकीत प्रांत संघटन मंत्री सुरेश दंडवते यांनी केली असता लवकरच याबाबतीत पत्र निर्गमित केले जाईल असे आश्वासन उपसचिव तुषार महाजन यांनी दिले.


🔸७)ग्राम विकास उपसचिव श्री पो द देशमुख यांना ही निवेदन देण्यात येऊन केंद्रप्रमुख पदासाठी एकत्रित स्वयं स्पष्ट असे मार्गदर्शन राज्यातील सर्व जिल्हा परिषदेला पाठवण्याबाबत निवेदन देण्यात आले असता याबाबत ज्यांनी मार्गदर्शन मागितले त्यांना मार्गदर्शन दिलेले आहे असे देशमुख साहेबांनी सांगितले परंतु संघटनेच्या वतीने आम्ही आपणाला मागणी करीत आहोत तेव्हा आपण संपूर्ण राज्याला असे मार्गदर्शन करावे अशी विनंती केल्याने सकारात्मकता दाखवत लवकर राज्यातील सर्व जिल्हा परिषदेंना केंद्रप्रमुख पदभरती बाबत स्पष्ट मार्गदर्शनपर पत्र  निर्गमित करणार असल्याचे देशमुख साहेबांनी सांगितले.


यासह निवेदनातील 25 विषयांचे सादरीकरण करण्यात आले.


🔸 मंत्रालय स्तरावर झालेल्या बैठकीत शिक्षक परिषदेतर्फे देण्यात आलेल्या 25 मागण्यांचे  निवेदन आपल्या सर्वांसाठी माहितीस्तव पाठवत आहे कृपया सर्वांनी त्याची अवलोकन करावे.

वरील माहिती ही संघटने च्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीप्रमाणे आहे.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.