पवित्र पोर्टलवर आज दिनांक 2023 रोजी नवीन प्रेस नोट जारी करून अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2017 च्या उमेदवारांना पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.
शिक्षक पद भरतीसाठी "अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०१७" नुसार पवित्र पोर्टलमार्फत यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांकरिता आणि मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थातील मुलाखतीसह पद भरतीसाठीची कार्यवाही करण्यात आलेली आहे.
सन २०१९ मधील शिक्षक पदभरतीच्या वेळी अपात्र, गैरहजर, रुजू न झालेल्या तसेच माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे रिक्त राहिलेल्या जागांसाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांच्या शिफारशी करावयाच्या आहेत.
यापूर्वी पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या व गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारामधून नियुक्तीची शिफारस करण्यासाठी पोर्टलवर दिनांक ३१/१०/२०२३ ते दिनांक ०३/११/२०२३ या कालावधीत उमेदवारांनी प्राधान्यक्रम नोंद करण्याबाबत कळविण्यात आलेले होते. राज्यात मागील दोन दिवसापासून राज्यात काही ठिकाणी इंटरनेट सुविधा विस्कळीत असल्याने उमेदवारांना काही मुदतवाढ देणे आवश्यक आहे.
यापूर्वी mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर PAVITRA-TEACHER RECRUITMENT - २०१७ साठी स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या उमेदवारांना या प्रक्रियेत सहभागी करण्यात आलेले आहे, तथापि सन २०१९ मध्ये उमेदवारांनी स्व प्रमाणित केलेले होते तसेच जुलै- २०२२ मध्ये स्व-प्रमाणित केलेले होते त्यांनी एप्रिल २०२३ मध्ये स्व-प्रमाणित केलेले नाही त्यांना स्व-प्रमाणित करून प्राधान्य क्रम नोंद करण्यास सुविधा देणे आवश्यक आहे. या उमेदवारांना त्यांचे प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी काही मुदत देणे आवश्यक आहे. वरील बाबी विचारात घेता कार्यवाही पूर्ण करण्यास दि. ०७/११/२०२३ पर्यन्त मुदतवाढ देण्यात येत आहे.
तसेच प्राधान्यक्रम नोंद करताना अडचणी येत असल्यास edupavitra@gmail.com या ईमेल पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा. या पदभरती संदर्भात कोणत्याही कर्मचारी, अधिकारी अथवा त्रयस्थ व्यक्तीशी संपर्क साधू नये.
वर नमूद केलेल्या कालावधीत जे उमेदवार प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण करणार नाहीत ते उमेदवार अपात्र, गैरहजर, रुजू न झाल्यामुळे रिक्त राहिलेल्या जागावर करावयाच्या पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत.
यास्तव उमेदवारांनी
https://mahateacherrecruitment.org.in
या संकेतस्थळावर भेट देऊन दिनांक ०७/११/२०२३ अखेर आपली कार्यवाही पूर्ण करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments