PM-Poshan(शालेय पोषण आहार) Update - ऑगस्ट २०२३ पासून निश्चित केलेल्या साप्ताहिक पाककृती मध्ये मसालाजन्य पदार्थाचे प्रमाण वाढविणे बाबत.

 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत साप्ताहिक पाककृती निश्तिच करुन, माहे ऑगस्ट २०२३ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीतील शालेय कार्यदिनाकरिता आवश्यक तांदुळ व धान्यादि मालाची मागणी पुरवठादाराकडे नोंदविणे बाबत आपणास निर्देश देण्यात आलेले आहेत. सदर निश्चित केलेल्या साप्ताहिक पाककृती मध्ये मसालाजन्य पदार्थाचे प्रमाण कमी असल्याने, सदर प्रमाण वाढविणे बाबत निवेदने प्राप्त झालेली आहेत.


शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील संदर्भ क्रमांक ५ पत्रान्वये, मसालाजन्य पदार्थाचे प्रमाण वाढविल्यानंतर ३ पैकी एका पाकृतीला खर्च शानाच्या दरापेक्षा जास्त येत असलातरी आठवडयाचा खर्च शासनाने निश्चित केलेल्या खर्च मर्यादेमध्ये आहे. त्यामुळे दिनांक ०२/०२/२०११ च्या शासन निर्णयाव्दारे प्रती दिन प्रती विद्यार्थी इ.१ ली ते ५ वी व इ. ६ वी ते ८ वी करीता आवश्यकतेनुसार चवीप्रमाणे मसालाजन्य पदार्थाचे एकुण प्रमाणे अनुक्रमे २ ते ५ ग्रॅम व ३ ते ७ ग्रॅम या मर्यादेमध्ये निश्चित करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.


त्यानुसार माहे ऑक्टोबर २०२३ पासून पुढील कालावधीकरीता साप्ताहिक पाककृतीमध्ये मसालाजन्य पदार्थाचे प्रमाण वाढवून सुधारीत पाककृती निश्चित करण्यात आलेली आहे. सुधारीत पाककृती नुसार माहे ऑक्टोबर २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीतील तसेच पुढील कालावधितील तांदुळ व धान्यादि मालाची मागणी विहित कालावधीत नोंदविण्यात यावी. तसेच संदर्भ क्रमांक ४ च्या आदेशातील अटी व शर्ती कायम असतील.


(आशिष येरेकर, भाप्रसे ) मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद अहमदनगर


प्रत :- शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे १ यांना माहितीस्तव.

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏

 


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.