सारथी शिष्यवृत्ती 2023-24 वर्ग नववी, दहावी व अकरावी ऑनलाइन अर्ज साठी नवीन लिंक.

 छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती सन २०२३- २०२४ यो शैक्षणिक वर्षातील इयत्ता ९ वी, १० वी व ११ वी च्या दिनांक ११/०७/२०२३ च्या पत्रात दिलेल्या लिंक मध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे नवीन लिंकमध्ये अर्ज भरणे बाबत.

सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिनांक 18 जुलै 2023 रोजी पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित करून निर्देश दिले आहेत.



छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता ९ वी इयत्ता १० वी व १२ वी च्या मराठा, कुणबी, कुणबी - मराठा व मराठा - कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्याकडून सन २०२३-२४ या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.


छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस अर्ज करू इच्छिणान्या लक्षित गटातील पात्र इयत्ता ९ वी इयत्ता १० वी व १२ वी साठी दिनांक ११/०७/२०२३ च्या पत्रात ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता दिलेल्या लिंकमधील तांत्रिक दोष असल्यामुळे सदर लिंक बंद पडली आहे. त्यामुळे नवीन लिंक तयार करण्यात आली आहे व नव्याने तयार करण्यात आलेली लिंक पत्रात नमूद करण्यात आली आहे. त्यानुषंगाने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी सदर लिंक बाबत आपण आवश्यक कार्यवाही करावी व गट शिक्षणाधिकारी यांना आपल्या स्तरावरून कळवावे.


विद्यार्थ्यांची ऑनलाईन माहिती खाली दिलेल्या सुधारित लिंकवर अचूक भरावी. (A) इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी https://forms.gle/egSulphxjNV3Gcamz ही लिंक आहे.


B) इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी https://forms.gle/4Tdwja7ccoutdeUy8 ही लिंक आहे.


C) इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यासाठी https://forms.gle/oBLbTF5WOgh4ytxj9 ही लिंक आहे. लिंकवरील माहिती इंग्रजी भाषेत भरणे आवश्यक आहे.


उपरोक्त सूचनांचे पालन करून छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या कामकाजात आपण आपला सक्रिय सहभाग दिल्यास समाजाच्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्याचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्याना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक साह्य करण्यास सारथी संस्थेस सुलभ होईल.



श्री. अशोक काकडे (भा.प्र.से.)


व्यवस्थापकीय संचालक छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी), पुणे





वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.